कलमाडी आणि राष्ट्रकुल भ्रष्टाचार

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
13 Aug 2010 - 4:39 am
गाभा: 

सुरेश कलमाडी हा पुण्यातून कायम निवडून येत असलेला खासदार. कुठली ना कुठली लफड्यात त्याचे नाव गुंतलेले असून हा पुण्यातून कायम निवडून कसा येतो हे मला न उलगडलेले कोडे आहे. मागे कुठल्याशा स्पर्धांच्या वेळी चकाचक केलेले बाळेवाडीचे क्रीडासंकुल आज दयनीय स्थितीत आहे. पण त्याचे कुणाला फार सोयरसुतक आहे असे वाटत नाही. कलमाडींनी तिथेही अमाप पैसा कमवला असे ऐकिवात आहे.

मराठा लॉबी प्रबळ असणारी काँग्रेस व राष्ट्रवादी पुण्यात इतकी भक्कम असताना ह्या मूळ कानडी भाषिकाला आपले स्थान टिकवून ठेवता आले म्हणून कलमाडींचे कौतुक करावे का पुणेकरांची कीव करावी हे कळत नाही. पवार आणि त्यांच्या घराण्यातील इतर मातब्बरांशीही ह्याचे फार सख्य नाही असे वाटते.

सध्याचा भ्रष्टाचार जो राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने घडला तो ह्याला जरा जड जातोय का असे वाटू लागले आहे. नेहमीप्रमाणे विरोधी पक्षा बोंबलत आहेत पण काँग्रेस तितक्या हिरिरीने ह्याचा बचाव करताना दिसत नाही.
पण हा माणूस महा बिलंदर आहे. ह्या प्रकरणातूनही तो शिताफीने सुटून पुढच्या लोकसभा विलेक्शनला भरघोस मताने निवडून येऊ शकेल. काही वर्षापूर्वी चक्क भाजपचे समर्थन मिळवू शकलेला हा काँग्रेसवाला आहे!

इतक्या प्रकरणात गुंतूनही तसा ठणठणीत राहिला कसा हा? अफाट पैशामुळे की अफाट जनसंपर्कामुळे? का वलयांकित व्यक्तिमत्वामुळे?

तुम्हाला या माणसाविषयी आणि ताज्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाविषयी काय वाटते? विशेषतः पुणेकरांना.

प्रतिक्रिया

गांधीवादी's picture

13 Aug 2010 - 6:58 am | गांधीवादी

>> कुठली ना कुठली लफड्यात त्याचे नाव गुंतलेले असून हा पुण्यातून कायम निवडून कसा येतो हे मला न उलगडलेले कोडे आहे.
कसले कोडे आणि कसले काय?
अनेक (गणेशोत्सव) मंडळे हाताशी धरले आहेत त्यानी.
आजकाल मंडळे हि फक्त राजकारण्यांना साहाय्य करण्यासाठीच चालविली जातात,
उत्सव साजरा करणे हा हेतू दुय्यम असतो.
मंडळ अध्यक्ष थोड्या फार पैशाच्या जोरावर मंडळावर आपला अधिकार गाजवून असतो,
त्यातून पुढे मागे (पाय चाटून चाटून) एक लाभाचे पद किव्वा आपले एक गले लठ्ठ लाभाचे काम पदरात पाडून घेतो.
बाकी मंडळातल्या पोरांना थोडे फार पैसे पुरविले जातात, मंडळाला भली मोठी ध्वनी यंत्रणेची भिंत घेऊन दिली कि सगळे येडे एकदमात खुश.
मग काय जिकडून तिकडू गोळा करून सगळी मते टाकतात त्याच्या झोळीत.
पुण्यातल्या बरीच गाजलेल्या मंडळाची नावे आहेत, पण ती इथे देणे उचित नाही.

इथे अगोदरच काही चर्चा झालेली आहे.

आणि माझी प्रतिक्रिया बघा इथे
सबसे बडा खिलाडी, सुरेश कलमाडी

या विषयावर धागा कधी येतो याची वाट पाहतच होतो. पुण्याच्या लोकांना काय डिटेल्स - आतली माहीती- आहे ते सांगा जरा.

सुनील's picture

13 Aug 2010 - 7:10 am | सुनील

जोवर काँग्रेसला पुण्यात राष्ट्रवादीशी (पक्षी शरद पवारांशी) टक्कर घेऊ शकेल असा तोलामोलाचा दुसरा नेता मिळत नाही, तोवर कलमाडींना सांभाळून घेतले जाईल, हे नक्की.

बाकी पुणेकरांनी एक्पर्ट कमेन्ट्स द्याव्यात..

सुरेश कलमाडी हा पुण्यातून कायम निवडून येत असलेला खासदार. कुठली ना कुठली लफड्यात त्याचे नाव गुंतलेले असून हा पुण्यातून कायम निवडून कसा येतो हे मला न उलगडलेले कोडे आहे. मागे कुठल्याशा स्पर्धांच्या वेळी चकाचक केलेले बाळेवाडीचे क्रीडासंकुल आज दयनीय स्थितीत आहे. पण त्याचे कुणाला फार सोयरसुतक आहे असे वाटत नाही. कलमाडींनी तिथेही अमाप पैसा कमवला असे ऐकिवात आहे.

बाकी कुठल्याच प्रदेशातून पैसे खाणारे किंवा खुनी, गुंडवगैरे निवडून येत नाहीत का ?

मराठा लॉबी प्रबळ असणारी काँग्रेस व राष्ट्रवादी पुण्यात इतकी भक्कम असताना ह्या मूळ कानडी भाषिकाला आपले स्थान टिकवून ठेवता आले म्हणून कलमाडींचे कौतुक करावे का पुणेकरांची कीव करावी हे कळत नाही.

संपूर्ण देशाची सूत्रे मूळच्या इटालियन बाईकडे आहेत मग सगळ्या भारतीयांबाबत हाच प्रश्न येत नाही का ?

इतक्या प्रकरणात गुंतूनही तसा ठणठणीत राहिला कसा हा? अफाट पैशामुळे की अफाट जनसंपर्कामुळे? का वलयांकित व्यक्तिमत्वामुळे?

असे प्रश्न पडत असतील तर सोडून द्या.

तुम्हाला या माणसाविषयी आणि ताज्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाविषयी काय वाटते? विशेषतः पुणेकरांना.

सारख पुणेकर पुणेकर काय लावलय? जो उठतो तो कुठल्याही कारणावरून पुणेकरांना शिव्या देतो. तुमचे गाव कोणते ? तिकडे कलमाडींसारखे कोणी कधीच निवडून येत नाहीत का ? रामराज्य आहे का ?

पाषाणभेद's picture

13 Aug 2010 - 7:47 am | पाषाणभेद

Pain, पुण्याचा वार जरा वर्मी लागलेला दिसतोय. अहो >>> तुम्हाला या माणसाविषयी आणि ताज्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाविषयी काय वाटते? विशेषतः पुणेकरांना.
हे विचारण्याचे कारण म्हणजे जर येथे कोणी पुणेकर असतील तर त्यांना आतल्या गोटातील जास्त माहीती असू शकते जी वृत्तपत्रांपर्त्यंत जात नसेल अन आम्हा पर्यंत येत नसेल.

अवांतर:कालपरवा मुंबई v/s पुणे झाले आता पुणे v/s इंडीया (भारत नव्हे) असे होवू द्यायचे काय?

Pain's picture

13 Aug 2010 - 1:45 pm | Pain

वर्मी ? गेल्या काही दिवसांपासून उगाच पुणेकरांच्या नावाने खडे फोडले जात आहेत. आज एकदा उत्तर दिले. जर खरच एखादी चूक असती तर वर्मी म्हणता आले असते. आणि चूक ते चूक, कोणाचेही असो. दाखवणार्‍याचा कधीच राग नसतो. (चुका लक्षात आल्या नाहीत तर सुधारणार कशा ?) पण ज्यात सर्वसामान्य, सभ्य पुणेकरांचा काही संबंध नाही त्याबद्दल कुठल्याही लुंग्यासुंग्या़कडून का ऐकून घ्यायच ?

त्याला का निवडून दिल म्हणे- त्याच्या विरोधी काय सर्वसंगपरित्याग केलेले साधू उभे होते का की याच्याऐवजी त्यांना निवडून द्यावे ? कोणीही निवडून आले तर काय फरक पडतो ? आपली वाट तर लागणारच आहे. मत द्या/ देउ नका.

आता तुम्ही विचारलेल्या माहितीबद्दल : आतल्या गोटातल वगैरे काही माहिती नाही, पण बहुतेकांना माहित असलेली आणि इथे उल्लेख न झालेली गोष्ट - पीएमटी आणि संबधित सर्व गोष्टी , बहुदा बीआरटीसुद्धा.

हुप्प्या's picture

13 Aug 2010 - 4:28 pm | हुप्प्या

<<
त्याला का निवडून दिल म्हणे- त्याच्या विरोधी काय सर्वसंगपरित्याग केलेले साधू उभे होते का की याच्याऐवजी त्यांना निवडून द्यावे ? कोणीही निवडून आले तर काय फरक पडतो ? आपली वाट तर लागणारच आहे. मत द्या/ देउ नका.

<<

एके काळी अविनाश धर्माधिकारी, अरूण भाटिया, गेला बाजार डी एस कुलकर्णी असे पर्याय होते की. त्यांना कुठे मिळाली पुरेशी मते? म्हणजे जेव्हा स्वच्छ पर्याय होते तेव्हा पुणेकरांनी त्यांचे डिपॉझिटही राखू दिले नाही. एक गोष्ट खरी की पुणे आहे म्हणून हे लोक निवडणूक लढवावी असा विचार तरी करु शकले. अन्य भागात असे कमी आढळते.

शिवाय लोकशाहीमधे उमेदवारही लोकच ठरवतात. पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीत चांगल्या उमेदवारांची चणचण का वाटावी?

Pain's picture

15 Aug 2010 - 1:01 pm | Pain

एके काळी अविनाश धर्माधिकारी, अरूण भाटिया, गेला बाजार डी एस कुलकर्णी असे पर्याय होते की. त्यांना कुठे मिळाली पुरेशी मते? म्हणजे जेव्हा स्वच्छ पर्याय होते तेव्हा पुणेकरांनी त्यांचे डिपॉझिटही राखू दिले नाही. एक गोष्ट खरी की पुणे आहे म्हणून हे लोक निवडणूक लढवावी असा विचार तरी करु शकले. अन्य भागात असे कमी आढळते.

चांगल्या लोकांची संख्या वाईट लोकांच्या संख्येपेक्षा फार कमी आहे आणि पुणे त्याला अपवाद नाही. मुंबई किंवा इतर प्रदेशाच्या तुलनेत चांगले लोक संख्येने जास्त असू शकतील पण गुणोत्तरात नाही.

शिवाय लोकशाहीमधे उमेदवारही लोकच ठरवतात. पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीत चांगल्या उमेदवारांची चणचण का वाटावी?

लोक उमेदवार ठरवत नाही, किंबहुना त्यांना काहीच ठरवता येत नाही.
चांगल्या उमेदवारांची चणचण नाहीये, पण ते जिंकू शकले / शकणार नाहीत हे वर सिद्ध झालेले आहे. आणि परिस्थिती त्याहून बिघडली आहे त्यामुळे आशाही नाही.

ऋषिकेश's picture

19 Aug 2010 - 12:01 am | ऋषिकेश

कालपरवा मुंबई v/s पुणे झाले आता पुणे v/s इंडीया (भारत नव्हे) असे होवू द्यायचे काय?

तुम्हाला लेटेस्ट ट्रेंड माहित नाहि काय? सध्या पुणे वि. कोल्हापूर असते..
मुंबईकर वाढत्या ट्रॅफिकमधे रोजचा प्रवास करून दमुन जातात .. आणि इथे झाडावर चढून बसतात

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Sep 2010 - 10:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

=))
तुझा आयडी पर्‍याने ढापला का रे?

हुप्प्या's picture

13 Aug 2010 - 4:03 pm | हुप्प्या

>>बाकी कुठल्याच प्रदेशातून पैसे खाणारे किंवा खुनी, गुंडवगैरे निवडून येत नाहीत का ?

बाकी सगळे प्रदेश हे त्या भागाचे सांस्कृतिक केंद्र असतात का? मला वाटत नाही. पुण्याचे स्थान हे सांस्कृतिक दृष्ट्या वरचे आहे. साक्षरता जास्त आहे. विचारवंत भरपूर आहेत. टिळक, अत्रे, काका गाडगीळ, धारिया, ना.ग. गोरे असे राजकीय नेते पुण्याला मिळाले आहेत आणि ते स्थानिक पातळीवरुन वरती गेले आहेत.
उदाहरण द्यायचे तर पुण्यात जे होते तेच मुंब्र्याला होते, वसईला होते किंवा भंडार्‍याला होतेच की हे कारण मला पटत नाही. कारण पुणे हे माझ्या मते स्पेशल आहे. आजही.

>>संपूर्ण देशाची सूत्रे मूळच्या इटालियन बाईकडे आहेत मग सगळ्या भारतीयांबाबत हाच प्रश्न येत नाही का ?

नाही. कारण भारतीय नेता अमक्या जातीचाच असे काही दिसत नाही. महाराष्ट्राचे गेल्या ५० वर्षातले मुख्यमंत्री बघितलेत तर मराठा लॉबीचे प्राबल्य लक्षात येईल. शिवाय गांधी घराण्याबद्दलची भक्ती हे कारण आहे. कलमाडीबाबत असे कारण सापडलेले नाही.

>>सारख पुणेकर पुणेकर काय लावलय? जो उठतो तो कुठल्याही कारणावरून पुणेकरांना शिव्या देतो. तुमचे गाव कोणते ?

कलमाडी पुण्याचा आहे. त्यामुळे पुणेकराला मत विचारले तर काय बिघडले? आपला जाज्ज्वल्य अभिमान दुखावलेला दिसतो आहे.. हरकत नाही. पुणेकरांना यात फार शिव्या दिल्या आहेत असे मला वाटत नाही. पण मला कलमाडी हे प्रकरण जाणून घ्यायचे आहे.

Pain's picture

15 Aug 2010 - 1:18 pm | Pain

बाकी सगळे प्रदेश हे त्या भागाचे सांस्कृतिक केंद्र असतात का? मला वाटत नाही. पुण्याचे स्थान हे सांस्कृतिक दृष्ट्या वरचे आहे.

असतात.
उदा. प. बंगालचे कोलकाता*, तमिळनाडूचे मद्रास*, तशीच राजस्थान, पंजाब राज्यातील शहरे त्या त्या प्रदेशाची सांस्कृतिक केंद्रे आहेत.

साक्षरता जास्त आहे.
केरळची सर्वात जास्त आहे, गेल्या अनेक वर्षांपासून. तिथे तुम्हाला आदर्श वाटावेत असे नेते निवडून येतात का ?

विचारवंत भरपूर आहेत
मतदान करून चांगल्या व्यक्तीस निवडून द्यावेत इतके नाहीत. लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प!

टिळक, अत्रे, काका गाडगीळ, धारिया, ना.ग. गोरे असे राजकीय नेते पुण्याला मिळाले आहेत आणि ते स्थानिक पातळीवरुन वरती गेले आहेत.

इतिहासात असे झाले म्हणजे वर्तमानात तसे होइलच असे नाही. मी वरती गुणोत्तराचा मुद्दा दिलाच आहे.

उदाहरण द्यायचे तर पुण्यात जे होते तेच मुंब्र्याला होते, वसईला होते किंवा भंडार्‍याला होतेच की
हे उदाहरण मल कळले नाही.

कलमाडी पुण्याचा आहे. त्यामुळे पुणेकराला मत विचारले तर काय बिघडले? आपला जाज्ज्वल्य अभिमान दुखावलेला दिसतो आहे.. हरकत नाही.

मत विचारणे आणि उगाच अपमान करणे वेगळे. पाषाणभेद यांनाही ते जाणून घ्यायचे आहे. त्यांची भाषा बघा.

पुणेकरांना यात फार शिव्या दिल्या आहेत असे मला वाटत नाही.

म्हणजे थोड्या किंवा मध्यम दिल्या आहेत. का म्हणून ? तुम्हाला तर तुमचे गावही सांगावेसे वाटत नाही.

पण मला कलमाडी हे प्रकरण जाणून घ्यायचे आहे.
मग स्पष्ट तेवढेच बोलायला काय होते ? माहिती करून घ्यायची असल्यास नम्रपणे प्रश्न विचारावेत. उगाच अपमान करण्याची ही कुठली पद्धत आहे तुमच्या गावाची ?

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Aug 2010 - 8:39 am | llपुण्याचे पेशवेll

आम्ही कधीही कलमाडीला मत दिले नाही. आमचे मत शिवसेनेला. आमच्या प्रभागातून नगरसेवक, आमदार दोन्ही शिवसेनेचे आहेत. कलमाडी महोदयांचे साई सर्व्हीसेस (मारुती आणि बजाजचे डीलर), कर्नाटक हायस्कूल, साई पेट्रोलपंप इ. अनेक धंदे आहेत. हिंजवडीत लीज ने दिल्या जाणार्‍या अनेक इमारतीत सदर गृहस्थांची गुंतवणूक आहे. त्यामुळे पैसा भरपूर आहे. म्हणून निवडून येतात.

बाकी नो कमेंट्स.

गांधीवादी's picture

13 Aug 2010 - 8:45 am | गांधीवादी

(५० खोकी ओतली होती म्हणे मागच्या निवडणुकीला, खरे आहेका हो हे ?)

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Aug 2010 - 8:57 am | llपुण्याचे पेशवेll

असतील. जास्तही ओतली असतील.

पंगा's picture

14 Aug 2010 - 5:32 am | पंगा

कलमाडी महोदयांचे साई सर्व्हीसेस (मारुती आणि बजाजचे डीलर), कर्नाटक हायस्कूल, साई पेट्रोलपंप इ. अनेक धंदे आहेत.

कर्नाटक हायस्कूलबद्दल माहीत नव्हते.

बाकी पूना कॉफी हाऊस? त्यांचेच आहे का अजून?

पंगा- ते आता इतीहास जमा झाले हो.

मिसळभोक्ता's picture

19 Aug 2010 - 11:59 pm | मिसळभोक्ता

कलमाडीने ती जागा नारायण राणेंना विकली. आता तिथे डॉमिनोज पिझा आहे.

आपल्या मंत्री-संत्री लोकांना फक्त एकच गोष्ट माहित आहे... ती म्हणजे :--- जावे तिथे खावे.

सध्या मिडियावाले काय काय खणुन काढत आहेत ते पाहतोय...

समंजस's picture

13 Aug 2010 - 10:50 am | समंजस

>> पुण्यातून कायम निवडून कसा येतो हे मला न उलगडलेले कोडे आहे.

विचार करायला लावणारा प्रश्न आहे खरा परंतु उत्तर कळल्यास आश्चर्य वाटायला नको.
कारण तसली कारणे ईतरही बर्‍याच ठिकाणी आढळून येतीलच त्यामुळेच जी व्यक्ती/कुटुंबे काही दशकांपासून
राजकारण या व्यवसायात आहेत आणि भरपूर पैसा कमवून ठेवला आहे त्यांनी ती कमाई कशा प्रकारे केली हे अर्थातच स्थानिक जनतेला सुद्धा माहित असतंच आणि असं असून सुद्धा ती व्यक्ती/कुटुंबे प्रत्येक निवडणूकीत निवडुन येतात याचाच अर्थ बहुतांश स्थानिक जनतेला त्या व्यक्तींचं/कुटुंबाचं तसलं वर्तन मान्य असतं आणि समाजसेवेच्या गोंडस नावाखाली चालणारा राजकरणाचा हा व्यवसाय मान्य असतो किंबहूना मान्य केलेला असतो [कुठेतरी स्थानिक जनतेचे सुद्धा हितसंबंध/समाजसंबंध/आर्थिकसंबंध/भावनीकसंबंध गुंतलेले असतात ]. आता हे चुक की बरोबर यावर अर्थातच वाद/चर्चा करणे हे इतरांचा उद्योग होउन बसतो :)

[अवांतरः काही वर्षांपुर्वी बिहार च्या बाहेरची जनता सुद्धा असाच विचार करायची की बिहार मधे लालुप्रसाद कसा काय निवडून येतो. एवढे भ्रष्टाचाराचे आरोप असताना, बिहार च्या जनतेची आर्थिक/सामाजीक परिस्थीती अतिशय खराब असताना स्थानिक जनता का म्हणून निवडून देते. आता हा प्रश्न बिहार व्यतिरीक्त इतर ठिकाणांच्या/नेत्यांच्या बाबतीत सुद्धा पडतो हे बघुन अंमळ मौज वाटतेय :) ]

अवांतर (थोडेसे) : राष्ट्र्कुल स्पर्धेच्या आयोजनात भ्रष्टाचार झालाय हे नक्कीच, पण सध्या संपुर्ण देशाने स्पर्धेच्या आयोजनावर लक्ष केंद्रीत करावे असे नाही वाटत? भ्रष्टाचाराची चौकशी स्पर्धा पार पडल्यावरही करता येईल , पण सध्या देशाची अजून नचक्की नको.. हे वाचा
http://bliskworld.wordpress.com/2010/08/07/my-voice-on-the-emotional-app...

बाप्पा's picture

13 Aug 2010 - 11:41 am | बाप्पा

हे असे लोक तुमच्या मझ्या सारख्या जागरुक नागरिकांच्या मतावर निवडुन येत नाहित. यांच्या वोट बँका ठरलेल्या असतात. बरेचदा जे लोक मतं देतात ते कर्(टॅक्स) देत नाहित आणि जे कर देतात ते मतं देत नाहीत. त्यामुळे कराच्या पैशाचं हे निवडुन आलेले पुढारी काय करतात याचं निवडुन देणार्यांना काही सोयरं सुतक नसतं, आणी करदात्यांना या गोष्टीचा विचार करायला वेळ नसतो हि दुर्दैवाची बाब आहे.

चिंतामणी's picture

15 Aug 2010 - 1:35 pm | चिंतामणी

बरेचदा जे लोक मतं देतात ते कर्(टॅक्स) देत नाहित आणि जे कर देतात ते मतं देत नाहीत

बाप्पा- १६ आणे सच्चि बात कही है आपने.

स्वतन्त्र's picture

13 Aug 2010 - 12:18 pm | स्वतन्त्र

तसं पाहिलं साधारण कोणता हि नेता सध्या पैश्याच्या जोरावरच निवडून येतो हे आता उघड सत्य आहे !
जरा मोठी विशेषतः क्रीडाप्रकारातली खाती ह्यांनी पटकावली कि पैसे खायला मोकळे,मग तेच पैसे निवडणुकींमध्ये वापरायचे. कसे !!
पैसे टाकले कि मत तयार.अश्या प्रकारामुळेच लोकांचा सध्या मतदानातला विश्वास उडत चाललाय.पण हे कुठेतरी थांबवलं पाहिजे.
आपण कधी स्वप्नात तरी पाहिलाय का कि एखादा गरीब उमेदवार उभा राहिला आहे.हा खेळ आता फक्त आणि फक्त पैसेवाल्यांचाच राहिला आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Aug 2010 - 12:29 pm | परिकथेतील राजकुमार

कलमाडींचा एकेरी उल्लेख खटकला.

'बालेवाडीचा' केलेला 'बाळेवाडी' हा अपमान खटकला.

पुणेकरांची किव का करावीशी वाटते ते कळले नाही. एकही निवडणूक न लढवणारा माणूस ज्या देशाचा पंतप्रधान होउ शकतो त्या देशाची किव कोण आणि केंव्हा करणार ?

असो...

खरडपंच's picture

15 Aug 2010 - 1:29 pm | खरडपंच

-कलमाडींचा एकेरी उल्लेख खटकला

तुमच्या घरी किती पोहोचलेत म्हणतो??

परिकथेतील राजकुमार's picture

17 Aug 2010 - 7:02 pm | परिकथेतील राजकुमार

तुमच्या घरी किती पोहोचलेत म्हणतो??

तुम्हाला एक इनो विकत घेउन देता येईल येवढे नक्कीच ;)

खरडपंच's picture

22 Aug 2010 - 12:08 am | खरडपंच

पण आम्लपित्त आपणास झाले आहे ना ??

चिंतामणी's picture

15 Aug 2010 - 1:40 pm | चिंतामणी

कलमाडींचा एकेरी उल्लेख खटकला.

सहमत.

एकही निवडणूक न लढवणारा माणूस ज्या देशाचा पंतप्रधान होउ शकतो त्या देशाची किव कोण आणि केंव्हा करणार ?

निवडणुक लढुन जिंकणे हे फार हुषारीचे किंवा शौर्याचे काम आहे असे वाटते का तुला? निवडणुका जिंकण्याचे तंत्र अवगत झाले की कोणिही निवडणुक जिंकु शकतो.

नगरीनिरंजन's picture

13 Aug 2010 - 1:53 pm | नगरीनिरंजन

उगाच पुणेकरांवर खापर फोडू नये. सगळे भारतीय एकाच माळेचे मणी (मणिशंकर नव्हे) आहेत. हा भ्रष्टाचार काय कलमाडींनी (इच्छा नसताना सभ्यता म्हणून आदरार्थी उल्लेख केला आहे याची गरजूंनी नोंद घ्यावी.) एकट्याने केला आहे का? हजारो कंत्राटदार, सरकारी नोकर आणि इतरही अनेक लोक यात सामील आहेत. बहुसंख्य लोक निनावीपणे भ्रष्टाचाराच्या गंगेत न्हाऊन घेत असताना फक्त नेत्यांच्या नावाने गळा काढण्यात अर्थ नाही.
खाण तशी माती.

मैत्र's picture

13 Aug 2010 - 1:59 pm | मैत्र

कलमाडी या दोन गुणांमुळे निवडून येतो. भाजपचं समर्थन, काँग्रेसच्या सगळ्या जुन्या दिग्गजांना एकहाती बाजूला सारणारा हा थोर राजकारणी आहे.
या वेळी विधानसभा मतदारसंघांप्रमाणे मतं जाहीर झाली होती. त्यात चित्र स्पष्ट होतं. निम्हण या माजी शिवसेना आमदाराचे शिवाजीनगर भागातले वर्चस्व किंवा दहशत, दापोडी, बोपोडी, हडपसर, मोमीनपुरा आणि पूर्व पुण्यातली ची काँग्रेसची पक्की आणि पक्की विकत घेतलेली मते, सुशिक्षित मतदारांची उदासीनता - अतिशय कमी मतदान, याद्यांचे घोळ.
कलमाडी या सगळ्याचं गणित कोळून प्यायला आहे. पैशाला तोटा नाही. मागे ते सिंहगड रोडला कुठल्या राजघराण्यात लग्न झालं त्याच्या मुलाचं का मुलीचं तेव्हा भरपूर प्रदर्शन झाली संपत्ती आणि सत्तेचं.
एक जुना फ्लॅट नावावर असलेल्या आणि भागात पॉप्युलर असलेला प्राध्यापक पडतो आणि २९ गाड्यावाला आणि अनेक गुन्हे नावावर असलेला मनुष्य 'लोकसेवक' म्हणून निवडून येतो. तिथे कलमाडीची काय कथा.
या वेळी रस्त्यांमध्ये झालेली / केलेली सुधारणा नक्कीच उपयोगी पडली.

इतरः जंगली महाराज रस्त्यावर अत्यंत मोक्याच्या जागी पेट्रोल पंप आणि साई सर्व्हिस आहे. संपूर्ण रस्त्यावर नवीन काम करून उत्तम फूटपाथ केले आहेत, झाडे टिकवून. मध्ये फक्त पंपाच्या भागात फूटपाथ अस्तित्वातच नाही. आणि एका बाजूला आत जाणारा रस्ता आहे आणि दुसर्‍या बाजूला तिथल्या कर्मचार्‍यांच्या दुचाकी लावून रस्ता बंद केलेला असतो. म्हणजे चालणार्‍यांनी मध्येच भर वाहतूकीत रस्त्यावर उतरायचे कारण खासदार साहेबांनी फूटपाथ हा पंपावर येणार्‍या गाड्यांच्या म्हणजेच पर्यायाने आपल्या नागरिकांच्या सोयीसाठी वापरला आहे. एवढं उदाहरण पुरे असावं.

Pain's picture

13 Aug 2010 - 2:22 pm | Pain

सुशिक्षित मतदारांची उदासीनता - अतिशय कमी मतदान,

सर्व पक्ष आणि त्यांचे सगळे लोक भ्रष्ट असताना कोणीही निवडून आले तरी काय फरक पडतो ? म्हणूनच हे लोक मतदान करत नाहीत. त्यात काहीच चूक नाही.

हुप्प्या's picture

13 Aug 2010 - 4:14 pm | हुप्प्या

काही वर्षापूर्वी अविनाश धर्माधिकारी हा निवृत्त सनदी अधिकारी अपक्ष म्हणून लोकसभेला उभा होता. स्वच्छ चारित्र्य, उत्तम व्यक्तृत्व, राजकीय अभ्यास हे असताना त्यांचे डिपॉझिट जप्त! त्या सुमारास कलमाडीचे पवारांशी वाजले म्हणून बहुधा त्याने वेगळीच आघाडी काढली आणि तोही उभा होता. त्यावेळेस भाजप शिवसेनेचे खरे तर काही अडले नव्हते. कलमाडी हा भरवशाचा माणूस नाही हे माहित असायला हवे होते. त्या निमित्ताने धर्माधिकारींना पाठिंबा देऊन निदान नैतिक वरचढता दाखवता आली असती. पण तसे न करता त्यांनी कलमाडीला समर्थन दिले. पुढे कलमाडी चक्क हरला, यथावकाश त्याने युतीला अंगठा दाखवला आणि स्वगृही गेला. आणि राज्यसभेतून निवडून गेला. असा मूर्खपणा युतीने का केला आणि त्याना त्यात काय मिळाले हा मला न उलगडलेला प्रश्न आहे. आणि हे पुणेकरांनी बघितलेले असून नंतर त्यांना कलमाडीच निवडावा असे का वाटते हाही.
बाकी गेल्या निवडणूकीत बहुधा मनसेमुळे हे घडले.
माफ करा पण कलमाडीचा अनेकवचनी उल्लेख करण्याची इच्छा नाही.

कानडाऊ योगेशु's picture

19 Aug 2010 - 11:16 pm | कानडाऊ योगेशु

माझ्यामते त्यावेळी बाळासाहेब ठाकर्यांनी कलमाडींकडुन हमीपत्रही लिहुन घेतले होते.ठाकरे खरे तर कलमाडीला युतीतुन निवडणुक लढविण्याची संधी देण्याच्या विरोधात होते पण पवारांचा खंदा समर्थक आपल्या बाजुने होतेय हे पाहुन भाजपने संधी देण्याचा हट्ट धरला असावा.पण कलमाडी निवडणुक हरले.त्यावेळी बहुदा विठ्ठल तुपे निवडुन आले होते.
पण कलमाडी अगदी कसलेले गुंड पण वाटत नाहीत वा सभा गाजवणारे नेतेही.बराच काळ पवारांच्या कृपेचा त्यांना फायदा झाला असावा.नंतर जेव्हा पवारच दिशाहीन झाले तेव्हापासुन काँग्रेसींचे लांगुनचालन करुन वेळ मारुन नेत आहेत.

हुप्प्या's picture

13 Aug 2010 - 4:15 pm | हुप्प्या

चुकुन दोनदा प्रकाशित.

स्वतन्त्र's picture

13 Aug 2010 - 5:27 pm | स्वतन्त्र

हुप्प्या शी १०० % सहमत !

हुप्प्या's picture

14 Aug 2010 - 5:08 am | हुप्प्या

ह्या बातमीनुसार कलमाडी पुन्हा वाचणार असे वाटते. काँग्रेसच्या वरच्या नेत्यांना ह्या स्पर्धा संपेपर्यंत काही कारवाई करायची इच्छा नाही.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=935...

नशीब आणि धूर्तपणा दोन्ही साथ देतय.

पंगा's picture

15 Aug 2010 - 6:14 am | पंगा

मराठा लॉबी प्रबळ असणारी काँग्रेस व राष्ट्रवादी पुण्यात इतकी भक्कम असताना ह्या मूळ कानडी भाषिकाला आपले स्थान टिकवून ठेवता आले म्हणून कलमाडींचे कौतुक करावे का पुणेकरांची कीव करावी हे कळत नाही.

साधी गोष्ट आहे. सुरेश कलमाडींचा जन्म पुण्याचा, शिक्षण पुण्यात आणि पहिल्यापासून कायम वास्तव्यही पुण्यात, शिवाय पुण्यात त्यांचे अनेक उद्योग आहेत म्हणजे पुणेकरांच्या दृष्टीने ते स्थानिक आहेत. मग त्यांची मातृभाषा काही का असेना. (मराठी कितपत चांगले बोलतात, नक्की कल्पना नाही, पण अगदीच बोलता येत नसावी असे वाटत नाही.)

तशी कलमाडींची नेमकी मातृभाषा कोणती, याबद्दल खात्री नाही, पण बहुधा कन्नड नसावी, असे वाटते. (कोंकणीची एखादी आवृत्ती असण्याची शक्यता अधिक वाटते.) पण तो महत्त्वाचा मुद्दा नाही. ते स्थानिक आहेत, हे महत्त्वाचे. त्यांची मातृभाषा मराठी नाही, अशा प्रकारच्या बाबींचे सुतक तथाकथित कॉस्मोपोलिटन मुंबईकरांस कदाचित असू शकेलही, पुणेकरांस अशा सुतकाची आवश्यकता वाटण्याचे कारण दिसत नाही. पुणेकरांच्या दृष्टीने तो महत्त्वाचा मुद्दा असावा असे वाटत नाही.

बाकी, त्यांच्या नेहमी निवडून येण्याकरिता पुणेकर जबाबदार आहेत असे म्हणता येईलही, पण तो श्री. कलमाडी आणि पुणेकर मतदार यांच्यामधील अंतर्गत मामला असावा, नाही का?

(तसे राजकीय वारा पाहून पाठ फिरवू शकणारे गृहस्थ असावेत असे वाटते - मी राजकारणतज्ज्ञ नाही, आणि श्री. कलमाडी यांच्या करियरचा तितक्याही काळजीपूर्वक पाठपुरावा केलेला नाही, त्यामुळे छातीठोकपणे सांगू इच्छीत नाही. पण कदाचित हा राजकीय गुण हेही टिकाऊपणाचे रहस्य असू शकेल असे वाटते. चूभूद्याघ्या.)

हुप्प्या's picture

15 Aug 2010 - 6:26 am | हुप्प्या

>>
बाकी, त्यांच्या नेहमी निवडून येण्याकरिता पुणेकर जबाबदार आहेत असे म्हणता येईलही, पण तो श्री. कलमाडी आणि पुणेकर मतदार यांच्यामधील अंतर्गत मामला असावा, नाही का?
<<
असू द्या की. पण तोच जाणून घ्यायला हा विषय मांडला आहे. अंतर्गत अंतर्गत म्हणजे काय नवरा बायकोतल्या खाजगी गोष्टी विचारत नाही. कुठल्या कारणांमुळे हा नेता सगळ्यांना भावतो ते जाणून घ्यायची इच्छा आहे.

बाकी पुणेकर मतदार हे जातीपाती, भाषा याबाबत इतके नि:पक्ष आहेत हे आपले मत ऐकून डोळे डबडबले (हे आणण्दाश्रू).
आणि तमाम कॉस्मोपॉलिटन मुंबईकर एकाच जातीचा उमेदवार कायम निवडून देत आहेत हे ऐकूनही (पण हे दु:खाचे बरं का).

Pain's picture

15 Aug 2010 - 1:22 pm | Pain

कुठल्या कारणांमुळे हा नेता सगळ्यांना भावतो ते जाणून घ्यायची इच्छा आहे.

कुठलाही राजकीय नेता ज्या पद्धतीने निवडून येतो तसेच तो आला आहे. प्रश्न विचारण्यासारखे काही नाही.

हुप्प्या's picture

16 Aug 2010 - 1:05 am | हुप्प्या

आपल्या मताचा आदर करून म्हणतो की मला हे स्पष्टीकरण आजिबात मान्य नाही. वरती अन्य कारणे दिलेली आहेत जी मला जास्त सयुक्तिक वाटतात. पैसा, परिस्थितीचा योग्य अंदाज घेऊन योग्य वेळेत पलटी मारणे. अंतर्गत फुटीचा योग्य वापर करुन घेणे वगैरे.

प्रत्येक भागाची राजकीय समीकरणे वेगळी असतात असे माझे मत. कुठल्याही जागी ज्या पद्धतीने निवडून येतो तसेच इथेही वगैरे विधान अगदीच "हे" वाटते. क्षमस्व.

Pain's picture

17 Aug 2010 - 1:44 am | Pain

आपल्या मताचा आदर करून म्हणतो की मला हे स्पष्टीकरण आजिबात मान्य नाही
ते माझे मत नसून वस्तुस्थिती आहे. तुम्ही तपासून पाहू शकता. तुम्हाला मान्य असण्या /नसण्याने त्यात फरक पडत नाही.

वरती अन्य कारणे दिलेली आहेत जी मला जास्त सयुक्तिक वाटतात. पैसा, परिस्थितीचा योग्य अंदाज घेऊन योग्य वेळेत पलटी मारणे. अंतर्गत फुटीचा योग्य वापर करुन घेणे वगैरे.
त्यातील कुठल्याच कारणाला मी सहमती दर्शवलेली नाही किंवा विरोधही केलेला नाही.

प्रत्येक भागाची राजकीय समीकरणे वेगळी असतात असे माझे मत. कुठल्याही जागी ज्या पद्धतीने निवडून येतो तसेच इथेही वगैरे विधान अगदीच "हे" वाटते. क्षमस्व.
तशी ती असणारच. इथेही असतील. पण प्रत्येक नेता प्रत्येक वेळी बहुतांश गैर मार्गांचा वापर करून निवडून* येतो आणि आल्यावर पैसे खाणे आणि इतर वाईट कामे करत राहतो असा माझ्या विधानाचा अर्थ आहे आणि तो बरोबरच आहे. तुम्हाला "ते" कसेही वाटले / तुम्ही काहीही कृती केलीत तरी परिस्थितीत काही फरक पडणार नाही.

हुप्प्या's picture

18 Aug 2010 - 12:02 am | हुप्प्या

>>प्रत्येक भागाची राजकीय समीकरणे वेगळी असतात असे माझे मत. कुठल्याही जागी ज्या पद्धतीने निवडून येतो तसेच इथेही वगैरे विधान अगदीच "हे" वाटते. क्षमस्व.
<<
उदाहरण देतो. अमेठीमधे सोनिया गांधी अगदी नियमितपणे निवडून येते. काही क्रांतिकारक घडले तरच ह्यात बदल संभवतो (उदा जसे आणीबाणीच्या वेळेस घडले). बारामतीत पवार निवडून येत असत. आता तो वसा सुप्रियाताईंकडे गेला आहे. तर बारामती वा अमेठीत ज्या कारणाने नेता निवडून येतो तीच कारणे कलमाडीच्या बाबतीत लागू होतात का? माझ्या मते आजिबात नाही. त्यामुळे कुठल्याही जागी जसे तसेच वगैरे तर्कशुद्ध वाटत नाही. ही दोन उदाहरणे झाली. अजून कितीतरी देता येतील.

५० हजार फुटावरून एखादे दृश्य पाहिले तर ते दुसर्‍या दृश्यासारखे वाटणे शक्य आहे. पण इतक्या अंतरावरुन अनेक बारकाव्यांकडे दुर्लक्ष होते असे मला वाटते. असो.

बाकी कलमाडी आणि कंपू ने जे आर्थिक नुकसान केले आहे तेव्हडे कोणा अतिरेक्याना सुध्दा जमणार नाही. बिचारे अतिरेकी.......आणखी काय नुकसान करायचे राहीले याचा विचार करत असतील.

आधी पवारसाहेबांचा IPL शिमगा झाला. आता CWG चा शंखध्वनि चालू आहे. लोक ते विसरले, हेही विसरतील!

राष्ट्रमाता सोनिया यांनी आपले मौन सोडले आहे. राष्ट्रकुल प्रकरणी दोषी असणार्‍यंना शिक्षा होणारच असे त्या गरजल्या आहेत.
आता निश्चिंत झालो!

http://72.78.249.125/esakal/20100819/4836055563845845851.htm

गांधीवादी's picture

26 Aug 2010 - 6:10 am | गांधीवादी

हे बोलत आहेत विप्रो चे अध्यक्ष : अझीम प्रेमजी
Rs 28,000cr Games expense sounds like wrong priority: Premji

राष्ट्रकुल स्पर्धेपर्यंत सर्व कामे होतील - दीक्षित
स्टेडियमची कामे संपविण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत नसून, ३ ऑक्टोबरला सुरु होणाऱ्या स्पर्धेपूर्वी सर्व कामे पूर्ण होतील, अशी आशा व्यक्त केली आहे.
लाज कशी वाटत नाही ह्या लोकांना, देव जाने,
सगळं खापर त्या बिचार्या पावसाच्या डोक्यावर फुटणार असे दिसत आहे.
पाऊस आला तरी बोंब, नाही आला तरी बोंब

हुप्प्या's picture

1 Sep 2010 - 7:54 pm | हुप्प्या

http://www.saamna.com/2010/Sept/01/Link/Main5.htm

सुरेश कलमाडीने किती मोठा भ्रष्टाचार केलाय याची कल्पना आहे का तुम्हाला?
नेमबाज विक्रांत घैसासच्या आईने एका सत्कार समारंभाच्या वेळेस जाहीर आवाज दिला.
आता हा प्रत्यक्ष अनुभव आहे. स्टेडियम्स तयार नाहीत, खेळाडूंना सराव करायला जागा नाही.
कल्लूभाई आपले कोटीकोटी खिशात घालून शिट्ट्या मारत हिंडतायत!

आता ऐन स्पर्धेच्यावेळी काय काय उजेडात येईल त्या बद्धल विचार करण्याचा प्रयत्न करतोय. :(

सर्वांनी CWG बघायला जाण्या अगोदर हि बातमी वाचून जाने.
प्रत्येकाने आपापल्या जीवाची काळजी घेणे.
US warns citizens of terror strike during CWG

Only one week for full security drill at CWG venues

(तो भ्रष्टाचार (?) उघडकीस येवो अथवा न येवो, परंतु )
ह्या खेळापायी कोणासही आपले जीवन गमवावे लागू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

गांधीवादी's picture

3 Sep 2010 - 9:12 am | गांधीवादी

छत्री आणि टॉयलेट नॅपकीन फारच स्वस्त दरात देत आहेत... ;)

एनटीपीसी ने राष्ट्रमंडल खेलों से हाथ खींचे
http://www.bbc.co.uk/hindi/sport/2010/08/100819_ntpc_cwg_va.shtml

और कितना ख़र्च?
http://www.bbc.co.uk/hindi/sport/2010/08/100816_cwg_revenue_pp.shtml

आता ऑलिंपिकही भरवू शकतो - दीक्षित
राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने उभारलेल्या जागतिक दर्जाचे मैदाने पाहून दीक्षित यांनी हा विश्‍वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ""आम्ही ऑलिंपिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करू शकतो, याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही. राष्ट्रकुल स्पर्धेमुळे आमचा आत्मविश्‍वास वाढला आहे.''
१) जागतिक दर्जाचे मैदाने : करोडो लोकांच्या ताटातला घास हिरावून आणि 15 हजार कोरोडोंची उधळण केल्यावर कोणाचेही डोळे दिपणारच हो ?
२) आम्ही ऑलिंपिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करू शकतो : अजून खायला कमी पडले आहे काय ?
३) याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही. : त्यानिमित्ताने अजून एक २०-२५ हजार करोड उधळूया. कसली शंका आणि कसले काय ?
४) राष्ट्रकुल स्पर्धेमुळे आमचा आत्मविश्‍वास वाढला आहे. : तुम्हा विश्‍वास ठेवा तुमच्याकडेच, जग काय आपल्या नावानी बोंबलत आहे ते बघा अगोदर. आणि हे खेळ वगेरे पुरे, हिशोबाची तयारी करा.

हेलियम बलून'च्या तरंगत्या व्यासपीठासाठी 700 कोटी रुपयांचा धूर करण्यात आला.

स्वतःला गांधीवादी म्हणविणाऱ्या मूठभर गांधीवाद्यांपासून बापूंना आणि गांधीवादालाही मुक्त करून अधिकाधिक तरुणांपर्यंत गांधीजींच्या विचारांचा, त्यांच्या तत्त्वांचा प्रसार करण्याची खरी गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

हे 'गांधीवादी' म्हणजे नक्की कोण हे सांगायची गरज नाही.

गांधीवादी's picture

11 Oct 2010 - 7:58 am | गांधीवादी

भ्रष्टाचाराशी निगडीत नाही, पण हि बातमी इथे देऊशी वाटली.

दोन महिन्यापूर्वीच कोसळलेला आघात सहन करूनहि हा चिमुरडा तिथे हजर होता. ह्याचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे.
ह्या उपक्रमास हातभार लावला त्या सर्व सदस्यांचे आभार.



Guinness record: 50,300 saplings planted in an hour

>>50,300 saplings were planted at a village here in less than an hour by 9,000 volunteers under a drive supported by Buddhist monks to mark the ‘green' Commonwealth Games in Delhi.

लेह येथे एक तासात 50 हजार वृक्षरोपण
>>अंदाजे नऊ हजार स्वयंसेवकांनी एका तासामध्ये 50 हजार वृक्षरोपण करण्याचा विक्रम आज येथे करण्यात आला. या विक्रमाची नोंद गिनीजबुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

हुप्प्या's picture

16 Oct 2010 - 3:17 am | हुप्प्या

राष्ट्रकुल स्पर्धेचे सूप वाजले. आता कलमाडीचे बारा वाजणार का? का नुसती चौकशीची रिकामी टिमकी वाजणार?

स्पर्धेत यशस्वी झालेल्या भारतीय खेळाडूंना भेटणार्‍या पंतप्रधानांनी कलमाडीला ह्या कार्यक्रमापासून दूर ठेवले.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=108...

आणि

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=108...

त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे पुणेकर ह्या नराधमाला पुन्हा खासदार बनवणार का घरी धाडणार?

काळच सांगेल.