उकडी शेवया

कुक's picture
कुक in पाककृती
13 Aug 2010 - 4:31 am

साहित्य----२ वाडगे तादुळाचे पिठ, १ खोवलेला नारळ, पाव किलो गुळ, १ मोठा चमच तुप, वेलची पुड, मिठ..

क्रुति---- टोपात २ ग्लास पाणी उकळत ठेवा. त्यात थोडे मिठ टाका. तादुळाचे पिठ त्यात घालुन मोदका प्रमाणे उकड
काढुन घ्या परातित घेउन गरम असताना म़ळुन घ्या. मुठि एवढे गोळे करुन ठेवा. १ मोठ्या पातेल्यात पाणी
उकळत ठेवा. त्यात हे गोळे घाला. गोळे प्रथम पाण्यत बुडतिल. गोळे पाण्यावर तरनगु लागतिल म्हणजे ते शिजले
शेव पात्राला मोठि शेव जाळी लाउन गोळ्यानची शेव पाडुन घ्या. शेवेवर तुप घाला म्हणजे शेव एकमेकाना चिकटणार नाहि.
वरुन खिसलेले नारळ , खिसलेले गुळ ,वेल्चि घालुन एकत्र कालवा. उकडी शेवया तयार. गरम्-गरम खाण्यास द्या.

*आमच्या ईथे अशी शेव गणपती ला करतात.
* ह्याचि चव मोदकान प्रमाणे लागते, मोदक वळता येत नसतिल तर हे करुन पाहा.
*तादुळाच्या खिरित हि शेव घालुन खाल्लिहि जाते त्याला लोकल नाव शेव व गोरया म्हणतात

प्रतिक्रिया

चित्रा's picture

13 Aug 2010 - 2:38 pm | चित्रा

छान पाककृती. जमल्यास फोटोही चढवा.

जागु's picture

13 Aug 2010 - 3:09 pm | जागु

अरे वा रेसिपी आवडली.

सूड's picture

13 Aug 2010 - 5:01 pm | सूड

ह्या शेवया नारळाच्या दुधासोबत अप्रतिम लागतात ....

माया's picture

13 Aug 2010 - 5:03 pm | माया

रेसिपी आवडली.

कौशी's picture

13 Aug 2010 - 7:09 pm | कौशी

मस्त....करून बघते.

रामदास's picture

13 Aug 2010 - 8:45 pm | रामदास

वेस्ट कोस्ट नावाचे एक हॉटेल होते .त्यात सकाळी हा पदार्थ मिळायचा. अजूनही पेस्शल आनंद भवनात मिळतो पण सकाळी साडे दहा पर्यंतच.

कुक's picture

14 Aug 2010 - 1:11 pm | कुक

@ सुधाशु देवरुखकर
नारळाचे बरेच दुध काढावे लागेल

सूड's picture

16 Aug 2010 - 12:53 pm | सूड

@ कुक
बरोबर आहे, पण खाण्याची हौस असेल तर तेवढं करायलाच हवं, नाही का !!