केवळ कोल्हापुरालाच नव्हे तर सार्या महाराष्ट्राला, देशाला अत्यंत अभिमान वाटावा अशी "नेमा"ची सुवर्ण कामगिरी करून घरी परतलेल्या तेजस्विनी सावंतचा करवीरकरांनी अगदी हत्तीवरून मिरवणूक काढून स्वागत-सत्कार केला. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हजारोंनी जणू काही आपली कन्याच, आपली लाडकी बहिणच पराक्रम गाजवून माहेरी आली आहे अशा भावनेने तिच्यावर खाली फोटोत दाखविल्याप्रमाणे कौतुकाचा वर्षाव केला. (फोटो "ई-सकाळ" सौजन्याने)
" alt="Tejswini1" />
महाद्वार रोडवरील मिरवणूक
आई, धाकटी बहिण आणि भाऊ यांच्यासमवेत
शासन व महापालिकेतर्फे स्वागत
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर
शेवटी करवीरनिवासिनी माता "अंबाबाई" चा आशीर्वाद
मिपावरील सर्व सदस्यांना म्युनिक, जर्मनी इथे तेजस्विनीने केलेल्या विश्वविक्रमाची माहिती झालीच आहे, तर तिला या निमित्ताने दिल्ली राष्ट्रकुल आणि लंडन ऑलिम्पिक्ससाठी हार्दिक शुभेच्छा!
प्रतिक्रिया
11 Aug 2010 - 12:37 pm | अब् क
:)
11 Aug 2010 - 1:05 pm | समंजस
तेजस्विनीचे अभिनंदन !!
अशीच कामगीरी पुढेही होत राहो या बद्दल शुभेच्छा.
11 Aug 2010 - 1:21 pm | sneharani
अभिनंदन आणि शुभेच्छा!
:)
11 Aug 2010 - 1:22 pm | मी ऋचा
मस्त..
11 Aug 2010 - 3:25 pm | स्पंदना
उत्तम फोटो बद्ध माहिती.
तेजस्विनीच हार्दीक अभिनंदन!!
कोल्हापुरच दर्शन घडवल्या बद्दल थँक्स इंद्राज दा.
11 Aug 2010 - 6:52 pm | इन्द्र्राज पवार
मला नक्की जाणीव होती की तुझा नेमका असाच प्रतिसाद येणार. महाद्वार रोड अगोदरच गर्दीने वाहुन जातो, आणि तेजस्विनीमुळे तर आणखीनच. हत्तीच्या मागे असलेल्या चांदीचा रथ पहा. अगोदर त्यातूनही तिची मिरवणूक निघाली.
11 Aug 2010 - 3:39 pm | भिरभिरा
तेजुचे अभिनंदन .
आता लक्ष्य ऑलिम्पिक..
11 Aug 2010 - 11:03 pm | चिंतामणी
अभीनंदन
अभीनंदन
पुढील स्पर्धांसाठी खूप खूप शुभेच्छा.
11 Aug 2010 - 11:05 pm | शिल्पा ब
अभिनंदन..
11 Aug 2010 - 11:11 pm | असुर
अतिशय देखणं स्वागत.
आवडलं हे.वे.सां.न.ला.
तेजस्विनीने अशीच यशाची नव-शिखरे गाठो या आणि अशा कोटी शुभेच्छा!
-- बुल्स आय
12 Aug 2010 - 4:59 am | मदनबाण
अभिनंदन आणि शुभेच्छा!!! :)