खेल् मान्ड्ला

RAHULARATI's picture
RAHULARATI in काथ्याकूट
9 Aug 2010 - 5:54 pm
गाभा: 

माननीय राष्ट्रपती,

माझ्या आधीच्या प्रत्राचे उत्तर काही मिळाले नाही..असो.पुन्हा पत्र लिहिण्यास कारण कि खेळामध्ये असलेला राजकारणी लोकाचा सहभाग.

सध्या राष्ट्रकुल खेळामुळे सुरेश कलमाडी यांचे नाव सर्वच channel वर आणि पेपर मध्ये दिसते आहे.ज्या माणसाने कधी क्रिकेट ची फळी कधी उचलली नाही ते शरद पवार आज क्रिकेट चे आतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत.कुणी खेळाडू का नाही?.ते भारतीय अध्यक्ष सुद्धा होते.कृषिमंत्री असताना त्याचाच महाराष्ट्र राज्यात अनेक शेतकरी आत्महत्या करत असतात त्याने हे वेगळे पद का घायव्से वाटले?.

गरीब लोकांना पुरेल इतका गहू आज पाण्याखाली सडून जात आहे.आणि हे काही न लाज ठेवता सांगतात कि हे दर वर्षीच होते मग त्याचा इतका बाऊ का आता करता आहात.इतकी वर्ष हे खाते त्याचा कडेच होते मग अजून त्यावर काहीच उपाय योजना का नाही झाली.कि
एक त्रस्त भारतीय नागरिकत्याचे लक्ष फक्त क्रिकेट मधील निवडणुकामध्ये होते.आता आतरराष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी प्रतप्रधानाडे विनंती केली माझा कामाचा बोजा कमी करावा. एवढेच जर त्याचाकडे काम होते तर त्यांनी क्रिकेट कडे का लक्ष दिले?.लालू प्रसाद यादवांनी सांगितल्या प्रमाणे हा गहू मुदाम सडून तो बियर बनवण्यासाठी वापरला जातो का?

त्याचा कामावर लक्ष तरी आहे का?.सुषमा स्वराज महागाई वर भाषण करत असताना ते हसत होते हे सर्वांनी पहिले आहेच.विरोधी पक्ष त्यावर त्यांना विचारात असतानाही त्याचे हसणे कमी झले नाही.इथे लोकांना जेवणाचे हाल होत असताना याचे जेवण बराच वेळ सुरु होते.त्यांना नंतर लोकसभेत यावसे वाटले नाही.

हे सर्व कधी पर्यत आम्ही सहन करायचे.?

राहुल घुले

प्रतिक्रिया

हे ढकल पत्र आहे का?

पत्रातली भाषा एकदम शुद्ध वाटतेय (अनुस्वार , 'ळ') आणि धाग्याचा विषय पाहिला तर शंका येते.

हल्ली खेळात राजकारण आणि राजकारणात खेळ चालतो त्यामुळे मजकुराबद्दल नो कमेंट.

जासुश's picture

11 Aug 2010 - 2:35 pm | जासुश

अरे रे रे...

तर्री's picture

9 Aug 2010 - 7:36 pm | तर्री

राहुल,
चांगला लेख.
आपण हे असे ऊपद्व्याप ६० वर्षे सहन केले आहेत. नावे वेगळी / प्रसंग वेगळे इतकेच.

गेंड्याची कतडी असलेले नेते हे आपले दुर्भाग्य , दुसरे काय ?

भ्रष्टाचाराच्या आरोपातील सत्यता लक्षात येताच राम विलास पासवान व बुटासिंगा ची मंत्रि मंडळातून हाकालपट्टी ( व जॉर्ज ना आरोपामधील असत्यतालक्षात घेवून अभय देणारे ) करणारे वाजपेयी याची राजवट हा थोडा अपवाद.