फ्रेंचाची खासियत असलेलं हे चॉकलेट टोर्ट युरोप आणि अमेरिकेतही भरपूरच लोकप्रिय झाले आहे. बाहेरुन हार्ड पण आतून लुसलुशीत असलेले हे टोर्ट चवीला काहीसे ब्राउनीसारखे लागते.
हे टोर्ट बनवताना मैदा अजिबात घालायचा नाही, मैद्याशिवाय केक,टोर्ट च्या अनेक रेसिप्या आहेत आणि त्यातलीच ही एक यम्मी.... रेसिपी.
याकरता लागणारे साहित्य-
२२५ ग्राम बटर, २५० ग्राम डार्कचॉकलेट( बिटर चॉकलेट),६ अंडी, २०० ग्राम साखर, १ चहाचा चमचा वॅनिला अर्क,
पाव चहाचा चमचा वाइनष्टाइन (क्रिम ऑफ टार्टार) ते उपलब्ध नसेल तर पाऊण चमचा लिंबाचा रस.
गार्निशिंग साठी- व्हाइट चॉकलेट
कृती-
अंडी फ्रिजमधील असतील तर पांढरे व पिवळे वेगळे करणे सोपे जाते. त्यामुळे टोर्ट करायच्या आधी किमान ४/५ तास तरी अंडी फ्रिजमध्ये ठेवलेली चांगली! ही अंडी फोडून पांढरे व पिवळे वेगळे करा आणि झाकून बाजूला ठेवा.
बटर मेल्ट करा, त्यात चॉकलेट घालून तेही मेल्ट करा. मायक्रोवेव असेल तर मेल्टिंग त्यात करता येईलच पण नसेल तर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा आणि दुसर्या एका स्टीलच्या भांड्यात बटर आणि चॉकलेट घ्या व चिमट्यात पकडून हे पातेले त्या उकळत्या पाण्यावर धरा. वाफ हातावर येणार नाही याची काळजी घ्या. बटर+ चॉकलेटचे मेल्टेड मिश्रण तयार होईल.
अंड्यातील पांढरे बिट करा.इतके बिट करा की रंगहीन द्रवावस्था जाऊन पांढरा फोम तयार होईल.(आयश्ने) वाइनष्टाइन म्हणजेच क्रिम ऑफ टार्टार घालून अजून बिट करा, पिक्स तयार होऊ लागतील. आता साखरेमधील अर्धी साखर घालून अजून बिट करा. हार्ड पिक्स येतील.
दुसर्या वाडग्यात अंड्यातील पिवळे बिट करा,बलक मोडून घ्या आणि उरलेली अर्धी साखर त्यात घालून परत बिट करा. पिवळा रंग क्रिमकलरकडे झुकेल.वीनिला अर्क घाला ,मेल्टेड चॉकलेट व बटरचे मिश्रण घाला आणि परत बिट करा.
ह्या केककरता अंड्यातील पिवळे व पांढरे दोन्ही भरपूर बिट करायची गरज आहे, जितके जास्त बिट कराल तितके चांगले. हँडमिक्सी असेल तर उत्तमच नाहीतर व्हिस्कर घ्या.
ह्या मिश्रणात अंड्यातल्या पांढर्याचे बिट केलेले मिश्रण हळूहळू घाला आणि चमच्याने एकत्र करा. आता बिटिंग करु नका.
ज्या मोल्ड मध्ये टोर्ट करायचे आहे त्याला बटर लावून घ्या. खरे तर त्या मोल्डला बेकिंग पेपर लावून त्याला बटर लावले तर फार उत्तम.
अवन १८० अंश से वर प्रि हिट करुन घ्या. ५० ते ६० मिनिटे बेक करा.
नेहमीप्रमाणेच केक झाला की नाही ते केकच्या पोटात सुरी खुपसून पहा, मिश्रण न चिकटता सुरी बाहेर आली म्हणजे केक झाला.
नंतर जाळीवर काढून रुमटेंपरेचरला आणा.
ह्या टोर्टला कधीकधी क्रॅक्स जातात आणि कधीकधी मध्ये कमी आणि कडेने जास्त फुगतो.
(गुड! ह्यावेळी टोर्ट नीट युनिफॉर्म फुगून क्रॅक्स पण जास्त नाही गेल्यात,:))
टोर्ट गार झाला की कापा म्हणजे तुकडे व्यवस्थित करता येतात आणि वाफ धरत नाही.
व्हाइट चॉकलेट किसा आणि ह्या टोर्ट वर खोबरे भुरभुरतो तसे भुरभुरा.
आता आणि काय बघता? हाणा.....
प्रतिक्रिया
9 Aug 2010 - 4:48 pm | झक्कास...
स्वाती ताई, काही आपल्या महाराष्ट्रीयन पाकृ पण देत जा हो.
आम्ही अडाणी लोकांना साध सुध आवडत.
पण तरी केक छान दिसतोय
9 Aug 2010 - 4:49 pm | जासुश
क्रूरपणा ह्यालाच म्हणतात...
9 Aug 2010 - 4:58 pm | गणपा
9 Aug 2010 - 5:33 pm | मराठमोळा
=)) =))
गणपा शेट,
स्क्रीन चाटल्याने टोर्टची चव मिळणार नाही.. येऊ द्या अशीच एखादी पाकृ लवकर.. :)
पाकृ अन फोटु जबरा!!!! इथे कुणी आहे का करुन खाउ घालणारं? ;)
9 Aug 2010 - 5:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा शुद्ध दुष्टपणा आहे. त्यापुढे प्रतिक्रिया मिळणार नाही!
9 Aug 2010 - 9:31 pm | निखिल देशपांडे
अगदी सहमत आहे ब्वॉ...
10 Aug 2010 - 12:17 am | श्रावण मोडक
+२
खरं तर हल्ली स्वातीताईचे धागे पहायचेच नाहीत असं ठरवलं होतं. चुकून विकेट पडली आणि हा धागा उघडला गेला. उघडलेला धागा वाचायचाच या पणामुळं वाचून काढला आणि मग अदिती, निखिलशी सहमत होण्यापलीकडं काही हाती राहिलं नाही.
11 Aug 2010 - 4:58 am | Nile
आमचा कंपु* सद्ध्या बंद असल्याने धागा वाचलेला नाही अन प्रतिसादही देता येणार नाही, सम्क्ष्व.
कंपु म्हणजे कंपुटर, लागले लगेच पार्टी करायला कंपु बंद वाचुन.
9 Aug 2010 - 5:42 pm | रेवती
फोटो छान दिसतोय!
स्वातीताई म्हणजे बेकर्स क्वीन झालिये. :)
दिनेशदांना पुढचे लेखन करायला ही प्रेरणाच आहे.;)
9 Aug 2010 - 6:16 pm | चित्रा
केक चांगलाच दिसतो आहे.
दिनेशदांना पुढचे लेखन करायला ही प्रेरणाच आहे
+१.
9 Aug 2010 - 6:58 pm | प्रभो
दोन-दोन संपादिकांशी सहमत आहे... नाही म्हणायचा चांसच नाही.. :)
9 Aug 2010 - 7:10 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
हं......wallah!
चॉकलेट आणि चॉकलेट फ्लेवरच्या कशाहिसाठी मी जीव देउ किंवा घेउ शकते...
करून पाहते...
धन्यवाद्....आवडती गोष्ट सांगितलीस...
काही शंका आली करता करता तर विचारेनच.
9 Aug 2010 - 7:40 pm | स्वाती२
मस्त दिसतोय.
9 Aug 2010 - 10:54 pm | नाटक्या
पुढचा कट्टा जर्मनीत करावा का? स्वातीताई आमंत्रणाची वाट बघतोय!!!!
10 Aug 2010 - 11:04 am | स्वाती दिनेश
स्वागत आहे, नाटक्याशेठ!
स्वाती
9 Aug 2010 - 10:58 pm | ऋषिकेश
आमी नाई जा!
10 Aug 2010 - 12:20 am | अरुंधती
किती ते अत्याचार सहन करायचे ह्या नजरेने! असले पदार्थ पाहिले आणि वाचले तरी क्यालरीज वाढताहेत हो!
10 Aug 2010 - 6:50 am | सहज
>आता आणि काय बघता? हाणा.....
10 Aug 2010 - 10:33 am | दिपाली पाटिल
खुपच मस्त दिसतंय टार्ट...
10 Aug 2010 - 11:20 am | नंदन
मस्त पाकृ आणि फोटो! या वीकांताला (एक्स्ट्राऑर्डिनरी डेझर्ट्समध्ये फेरी मारून) नक्की खाऊन पाहीन ;)
10 Aug 2010 - 11:45 am | लिखाळ
वा वा .. फारच मस्त :)
11 Aug 2010 - 4:34 am | इंटरनेटस्नेही
टोन्डा ला पाणी सुट्ले!*
*आभार: वैदर्भिय!
11 Aug 2010 - 5:07 am | चतुरंग
प्रतिक्रिया द्यायचीच नाही असे ठरवत होतो. धागा मागे गेलेला पाहून मनोमन सुखवलोही होतो पण हाय रे दैवा, श्रामोंनी हा धागा उचकटला आणि त्यांच्याबरोबरच माझाही बळी गेला! :( श्रामो कुठे फेडाल हे टार्ट ... हे आपलं पाप?
स्वातीतैच्या पाकृंना मस्त, छान, खलास, ज ह ब ह र्या हा असे सगळे शब्द वापरुन झालेत.
हा टार्ट म्हणजे, टार्ट म्हणजे, पाहून फक्त एकच गोष्ट मनात येते "हं स्टार्ट!" ;)
(फिनिश्ड्)चतुरंग