विकांताची खादाडी : काळ्या मसाल्याची वांगी !!!

सुहास..'s picture
सुहास.. in पाककृती
8 Aug 2010 - 5:37 pm

खर तर सदर प्रांत आमचा नाही , गणपा, दिपाली,जागु,केशवसुमार आणी ढब्बो...आपल हे..प्रभो..ह्यांचा ;)
पण सहज कोणीतरी आठवण काढली आणी घुसलो आम्ही स्वंयपाक घरात..तिथे शिरल्यावर जाणीव झाली आम्ही ही काहीतरी बनवितो की..चला तर मग करूया सुरवात ..

साहित्य :
दोन पेग ..आपल हे ...दोन कांदे..:( (गटारी फिव्हर) टीप : कांदे जरा 'तेज'घ्या !! आणी कापताना पाण्यात टाका.
लसुन
अद्रक
कडीपत्ता
कोंथंबिर
काळा तवा
कढई/पातेल//कुकर/भगोणे/घमेल ..सॉरी टॅम्प्लिज..नो घमेलं
दिड ग्लास पाणी (किचन छोटे असल्यास पाच ग्लास ..नाही म्हणजे बाकीचे स्वतालाच प्यायला किंवा मग बॅचलर असाल तर 'त्यात' टाकायला !!)
गॅस (खरोखरचा ;) , चुल, स्टोव्ह ही चालेल)शेगडीसकट !!
डोकं (प्रमाण ओळखण्यासाठी.)
मिरची पुड

कृती :

सर्वात पहिले कांदा भाजुन घ्यावा

.a

भाजत रहा .मध्ये-मध्ये थोडं-थोडं,कांदा,जळुन,कंम्प्लिटली काळा पडणार नाही म्हणुन,पर्‍यासारख...आय मीन.. तेल ओतत रहा.हा पदार्थ बनविताना हा सगळ्यात काळजीचा भाग आहे, जरा कांदा काळा पडला की भाजी कडवट होऊ शकते,कांदा परतताना लाल तर झालाच पाहिजे,पण जास्तीचा काळा पडायलो नको, जर पडलाच तर गप डाळ बनवावी आणी वरनं तोच काळपटलेला कांदा टाकुन द्यावा ..गार्निश म्हणुन (गार्निशचा अर्थ गणपाला विचारा.)अरे हो एक सांगायच राहिल ,कांद्याच्या चकती लांब-लांब कापल्या की जरा बर असत.भाजण्याला चव येते !!

B

डन !! आता तो कांदा एखाद्या कटोरीत काढुन घ्या.त्यात,लसुन(सोललेला, टाकाल नाहीतर दक्षिणात्य जेवणप्रकारासारखा)अद्रक,ज्याला शुध्द भाषेत 'आले' म्हणतात, त्याच्या चिरा करुन टाका.सरते शेवटी कोंथंबिर, खुडून टाकायची,कापायची नाही,आपण मेथी किंवा शेपु बनविताना हिरवट दांड्याही टाकतो त्या टाकायच्या नाहीत.बाकी आपली मर्जी !!)

c

त्याची मिक्सर मध्ये पेस्ट बनवा , नसेल तर हाताने वाटुन घ्या ...त्यास थोडा ब्राऊनिश कलर आला पहिजे ..अरे हो पावसाळ्यात मी ह्याच्यात अद्रक जरा जास्त टाकतो ..त्यामुळे असाही कलर येऊ शकतो..

d

आता मुख्य पाककृती कडे वळुयात.
वांगी घ्या !!
चिरा !!(जशी आवडतात तशी, मला शेपटीसकट आवडतात,म्हणुन मी दोनदा ऊभ्या आडव्या चिरा मारल्या, आपल्या हवे असल्यास तुकडे ही करू शकता !!)
कढई/पातेल//कुकर/भगोणे गॅसवर ठेवा !!
गॅस स्लोवरच असायला हवा !!
तेल ओता !! [(जे प्रमाण असेल ते, मी दोन वांग्याना दोन कढची(तेलासाठी एक स्पेशल-टाईपची पळी टाकतो)]
त्यात कडीपत्ता टाका.
कड-कड असा आवाज आल्यावर फोटो क्र. ४ मधील मिश्रण टाका. मिश्रण हलवत रहा,पातेल्याला लागु देऊ नका.
थोडासा रंग पालटल्यावर, चिरलेले वांगे टाका.
वांगे एकजिनसी होईपर्यंत हलवत रहा !!
एकजिनसी झाल्यावर, लाल मिरची पुड टाका !!
पुन्हा एकजिनसी होईपर्यंत हलवत रहा !!
मग मीठ टाका !!
पुन्हा एकजिनसी होईपर्यंत हलवत रहा !!
आता पाणी टाका !!
प्रमाण स्वता ठरवायच आहे !! टीप : वांगे वाफेमुळे देखील शिजतात.
(तुम्ही म्हणाल फोटो कुठायत , बॉस हे सगळ ईतक पटापट कराव लागत की फोटो काढायला वेळच नसतो,आणी म्या रुम वर एकटाच आहे रे !! )
एक सिगरेट मारुन परत या !!
गॅस बंद करा !!
गरमागरम ' काळ्या मसाल्याची वांगी ' तयार .......

f

d

हाच पदार्थ आपण मटणाबरोबरही बनवु शकता !! फक्त मटन आधी 'अर्धवट' शिजवुन घ्यायचे .पण चिकनला मात्र काळ्या मसाल्याबरोबर चव येत नाही.
असो ..

पुढच्या विकांतास ...
राजस्थानी भेंडी !!

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

8 Aug 2010 - 6:01 pm | केशवसुमार

आयटीतला कूक.. :)
सुहासशेठ,
मस्त पाकृ..
(आस्वादक)केशवसुमार
असेच मसाला वांगे चिंचगुळ आणि तीळ व दाण्याचे कूट घालून ही बनवले जाते..
वांगे अजिबाताअवडत नसल्या मुळे वांग्या ऐवजी रस्स्यामध्ये मी बटाटे किंवा उअकडलेली आंडी घालतो..
(पर्यायी)केशवसुमार
राजस्थानी भेंडीची वाट बघतो..

श्रावण मोडक's picture

8 Aug 2010 - 6:20 pm | श्रावण मोडक

पोरगं गुणी आहे. म्हणजेच डाक्टरणीचं निदानकौशल्यही बरंच असावं. ;)
लिहिण्याची स्टाईलही आवडली.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Aug 2010 - 6:23 pm | बिपिन कार्यकर्ते

च्यायला!!! तुझ्या *&^%$@)प@$%%$@#*@

गणपा's picture

8 Aug 2010 - 6:45 pm | गणपा

व्हेज कलेजी ह्म्म यम्मी.
(आयटितली) पोरं धाडाधड सैंपाल बिंपाक करायला लागली.
हा फार चांगला बदल घडवुन आणला त्या चर्चांनी :)

सुनील's picture

8 Aug 2010 - 6:47 pm | सुनील

ह्यातला काळा मसाला नक्की कुठला?

बाकी लिहायची स्टाईल आवडली.

धनंजय's picture

9 Aug 2010 - 12:49 pm | धनंजय

(मला वाटले काळा=गोडा मसाला)

हा रस्सा छान दिसतो आहे.

छोटा डॉन's picture

8 Aug 2010 - 6:59 pm | छोटा डॉन

छ्या, ह्या विकांताचा सुहाश्याची आफर सोडायला नको होती राव :(
दणका पाककृती आणि लिहायची स्टाईल ...

फुडच्या च्या फुडच्या विकांताला येतो रे तिकडे बरोबर भाकर्‍या 'वगैरे' घेऊन.
मस्त प्यार्टी करु च्यायला, हाय काय आणि नाय काय ?

स्वाती दिनेश's picture

8 Aug 2010 - 7:03 pm | स्वाती दिनेश

पाकृ, फटू आणि लिवायची इस्टाइल सगळंच मस्त!
स्वाती

मीनल's picture

8 Aug 2010 - 7:26 pm | मीनल

बापरे!!
कढिपत्त्याचा आवाज ...कड कड??
काय वीज आहे की काय ती कडकडायला??????
की ...
कड कड मोडायला कढिपत्त्याच्या झाडाची अख्खी मोठी फांदी ????

प्रसन्न केसकर's picture

8 Aug 2010 - 7:27 pm | प्रसन्न केसकर

पोरगं लायनीला लागलं! काळजी संपली!
असं म्हणावं वाटतय पण `झणझणीत खानदेशी मटनाचे वाईल्ड एफेक्ट' आठवत असल्यानं म्हणवत नाहीये. चालु दे!

काळया मसाल्याची वांगी बघून मलाही भरली वांगी (गोड्या मसाल्याची) करावीशी वाटली.
आपल्यासाठी हा फोटू! :)
Picture 154

गणपा's picture

8 Aug 2010 - 11:29 pm | गणपा

वदनी कवळ घेताऽऽऽऽऽऽऽऽऽ नाम घ्या श्रीहरीचे.....
म्हणत अस्सल भारतिय बैठक घालुन बसलो आहे :)

सुहास..'s picture

9 Aug 2010 - 12:37 pm | सुहास..

ज ब रा !!

भरली वांगी (गोड्या मसाल्याची) >>

पाकृ टाका प्लिज !!

निखिल देशपांडे's picture

8 Aug 2010 - 11:33 pm | निखिल देशपांडे

सुहाश्या जबरदस्त पा़कृ..
फोटु तर खल्लासच आहेत

रश्मि दाते's picture

8 Aug 2010 - 11:33 pm | रश्मि दाते

मस्त दिस्तात,पण काळा मसाळा ???????????
कि तो मसलाच काळ्पट होतो वाटितला.

प्रभो's picture

9 Aug 2010 - 7:38 am | प्रभो

ज ह ब ह रा!!!

सहज's picture

9 Aug 2010 - 7:57 am | सहज

वांगे आवडती भाजी!!!!!!!!!!

मराठमोळा's picture

9 Aug 2010 - 1:40 pm | मराठमोळा

सुहासची काळ्या मसाल्याची वांगी आणी रेवती ताईंनी बनविलेले भरलेले वांगे..
के..व..ळ्..अ..प्र...ति.,.म...

:)

हर्दिकेतकी's picture

9 Aug 2010 - 3:23 pm | हर्दिकेतकी

मस्त मस्त मस्त

धमाल मुलगा's picture

9 Aug 2010 - 3:43 pm | धमाल मुलगा

>>साहित्य : दोन पेग ..आपल हे ...दोन कांदे..Sad
=)) =)) =)) =))
पाककृतीची अशी सुरुवात पाहुन दचकलोच ना बे. :D

बाकी, ही भाजी कशी झाली असेल ह्याचा अंदाज लाऊ शकतो. सुहासच्या 'सुगरण्या' असण्यावर विश्वास आहे आपला. :)

काय बे, खर्डा कधी? :)