जवळ जवळ सर्वाना वडा बनवता येतो तरीही रेसिपी टाकत आहे.
आज टाइप करण्याचा हुरूप आला आहे म्हणून समजा..जेवण बनवणे टाइप करण्यापेक्षा जास्त सोपे आहे असे मला वाटते.
असो पा कृ आणि फोटो...देत आहे..चांगल्या प्रतिक्रिया कळवा.. :)
उकडलेले बटाटे - ६एक
कोथिंबीर-खूप
कढीपत्ता-८एक पाने
लसूण-६ पाकळ्या
आले-१/२ इंच
हिरवी मिरची ४- पेस्ट करून
तेल-१ पळी
जिरे-मोहरी
हळद
मिठ
तिखट-१/४ चमचा
बेसन
कृती
१.कढईत तेल घालून जिरे,मोहरी,हिरवी मिरची,कधिपत्ता,लसूण,आले एक एक शीजले की क्रमवार घाला.
मग हळद घाला.मग उकडलेले, मश केलेले बटाटे घाला. मिठ घाला. ४ मिनिट वाफ काढा.
कोथिंबीर घालून मिक्स करा. व भाजी गार होऊ द्या.
२.वड्या वरील आवरणा साठी बेसन,मीठ,लाल तिखट एकत्र करा. त्यात पाणी घालून घत्तसर मिश्रण बनवा. जास्त पातळ मिश्रण असेल तर ते वड्या ला मिश्रण नीट लागणार नाही. व वडा देखील कढाईला चिकटेल.
३.कढईत तेल तापवा. आता बनवलेल्या भाजीचे गोल गोल गोळे बनवा. मग ते क्र.२ च्या मिश्रणात बुडवा. व तापलेल्या तेलात फ्राइ करा.
वडे तयार आहेत...
त्यावेळि भारतातिल पावान्सारखे पाव मि ळाले नाहित .. म्हनुन..
असेच खाउन घ्या.. माफ करा बघुन् घ्या.
प्रतिक्रिया
6 Aug 2010 - 7:04 pm | पांथस्थ
ह्या दिवाडकर ष्टाईल गोल गोल बटाटावड्याने पुणे-मुंबई प्रवासाची आठवण करुन दिली. ह्या मौसमात गरमागरम वडा-पाव, मिरची आणि नंतर वाफाळता चहा म्हणजे पुछो मत!
ह्या हुरुपापायी आम्हाला काय काय वाचायला (लागणार) मिळणार बुवा?
6 Aug 2010 - 7:09 pm | परिकथेतील राजकुमार
वड्यात जिरे ? पहिल्यांदाच वाचतोय. बघायचा योग अजुन आला नाही.
बाकी ऐन पाणवठ्याला निघायच्या वेळेला आपण समोर वडा दाखवुन अतिशय मानसीक त्रास दिला आहेत :( आता जाता जाता १० वडे बांधुन न्यावे लागणार. साला पाणवठ्यावर एकट्यानी खायची सोय नाही ना.
6 Aug 2010 - 9:31 pm | शानबा५१२
कुठल्या पार्टीचा वडा आहे हा?
7 Aug 2010 - 12:33 am | मराठमोळा
अरे!! ईतकी चांगली पाकृ तळाला कशी गेली ब्वॉ लवकर?
असो.. फोटु तर लाजवाब, पावसाळ्यात गरमागरम वडे म्हणजे जन्नत का स्वाद धरतीपे.. :)
8 Aug 2010 - 7:17 pm | प्राजक्ताचि फुले
मिरच्या मात्र तळलेल्या दिसत नाहीत...
हुरुप निघुन गेला होता का???? :)
बाकी पाक़क्रुती छानच आहे!!!!
9 Aug 2010 - 1:02 pm | जासुश
मिरच्या फक्त सजावटि साठी वापरल्या आहेत.
लहानपणा पासूनच घरी जास्त तिखट खात नाही त्यामुळे.. तळलेल्या मिरच्या सुद्धा नाही खात..