साहित्य लागेल तसे अंदाजे घ्या.
तसे केल्यास सॅंडविच चांगले बनते.
बटाटे - ५ एक
टोमॅटो-१
कोथिंबीर-थोडीशी
कांदा-१
हिरवी मिरची-४
तेल-१ पळी
जिरे-मोहरी
हळद
मिठ
बटर.
ब्रेड
कृती
कढईत तेल घालून जिरे,मोहरी,हिरवी मिरची,कांदा,टोमॅटो एक एक शीजले की क्रमवार घाला.
मग हळद घाला.मग उकडलेले, मश केलेले बटाटे घाला. मिठ घाला. ४ मिनिट वाफ काढा.
कोथिंबीर घालून मिक्स करा. व भाजी गार होऊ द्या.
होल वीट ब्रेड घ्या. त्याला बटर लावा. मग चटणी लावा. मग भाजी लावा. ब्रेड ची दुसरी स्लाइस ह्यावर ठेवा.
सॅण्डविच मेकर मधे ठेवून टोस्ट करून घ्या. सॅण्डविच मेकर नसल्यास तव्यावर थोडे बटर घालून त्यावर हे सॅंडविच ठेवा. व कालथ्याने दाबून भाजा. मी केलेले सॅंडविच हे तव्यावर केले आहे.
ऑनियन रिंग्स सोबत खा.
फोटो बघून झाला की संध्याकाळी वेगळा स्नॅक खाउ नका. वजन वाढेल.
प्रतिक्रिया
6 Aug 2010 - 4:19 pm | शरयुप्रितम२०१०
बाजूला लावलेल्या रिंग्स कांद्याच्या आहेत का?
बाकी संध्याकाळचा बेत ठरला....
6 Aug 2010 - 4:27 pm | जासुश
त्या रिंग्स मधे फ्लेवर असतो
ऑनियन पाउडर असते.
बाकी कशापासून बनवतात ते माहीत नाही
6 Aug 2010 - 4:30 pm | जागु
मस्तच.
6 Aug 2010 - 4:36 pm | परिकथेतील राजकुमार
निजधामास पोचलो !!
6 Aug 2010 - 4:39 pm | गणपा
कालच पराठ्याच सारण उरलय, तेव्हा हाच आजचा बेत होता :)
6 Aug 2010 - 4:46 pm | जासुश
ह्यचि भाजि उरलि कि माझा पराठ्या चा बेत असतो.
6 Aug 2010 - 5:17 pm | अस्मी
मस्त..फोटो तर एकदम भारी :)
- अस्मिता
6 Aug 2010 - 5:33 pm | रश्मि दाते
मस्त मस्त
6 Aug 2010 - 5:37 pm | नितिन थत्ते
सॅण्डविच तर मस्त दिसतंय. अनिअन रिंगसुद्धा छान.
शंका: १ बटाटा, १ पळी तेल आणि बटर...... याला हेल्दी सॅण्डविच का म्हटले आहे? होल व्हीट ब्रेड आहे म्हणून?
6 Aug 2010 - 5:47 pm | जासुश
प्रतिक्रीयेसाठी आभारी आहे.
शंका रास्त आहे. पण मी शेवटी एक टिप दिली आहे ती अशी:
फोटो बघून झाला की संध्याकाळी वेगळा स्नॅक खाउ नका. वजन वाढेल. :)
फक्त फोटो तेवढा healthy आहे.
6 Aug 2010 - 5:54 pm | मीनल
तेच म्हणते. फक्त फोटो तेवढा healthy आहे.
कारण ओनियन रिंग्ज म्हणजे फ्राईड ! + बेडला बटर ही लावायचे आहेच.
healthy पेक्षी रूचकर असा बदल केला तर तो योग्य होईल.
6 Aug 2010 - 6:11 pm | जासुश
नावात तेवढे हेल्थि बाकी असो..मला बदल कसा करायचा ते येत नाही.अजुन्हि नविन आहे.
बाकी सॅंडविच म्हटल्यावर कुणी क्लिक नसते केले असे वाटून गेले..म्हणून तो शब्द पण टाकला.
बाकी त्यात अजुन चीज वगैरे नाहीए..आणि मेयोनिझ पण नाहीए ..म्हणून पार्ट्ली हेल्थि म्हणू शकू. :)
6 Aug 2010 - 6:33 pm | नितिन थत्ते
स्वयंसंपादन सोय - कारण/केस क्रमांक .......................
6 Aug 2010 - 5:56 pm | प्रभो
मस्त!!