लागणारे साहित्य:
४-५ वाकट्या
हिंग, हळद,
१ चमचा मसाला
चविपुरते मिठ
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
तळण्यासाठी तेल.
क्रमवार पाककृती:
प्रथम वाकटीचा बाजुचा छोटा पिसारा ओढून काढायचा. मग त्याचे डोके व शेपुट काढुन तुकडे करायचे व स्वच्छ धुवायचे.
तेल वगळून वरील सर्व जिन्नस एकत्र करायचे व तव्यावर मिडीयम गॅस वर वाकट्या शॅलो फ्राय करायच्या. जास्त वेळ शिजउ नये त्यामुळे कडक होतात. जर कडक आवडत असतील तर शिजवलेत तर चालेल.
अधिक टिपा:
वाकट्या तळूनच चांगल्या लागतात. ह्याचे शक्यतो कालवण करत नाहीत. ह्या मोठ्या झाल्या की ह्यांचे बले होतात. तेही तळूनच चांगले लागतात. पावसाळ्यात वाकट्या अगदी ताज्या आणि भरपुर प्रमाणात येतात.
प्रतिक्रिया
6 Aug 2010 - 3:43 pm | शरयुप्रितम२०१०
मासे खाणाऱ्यांची मज्जाच मज्जा!!!!!!
सिल्वर फिश दिसतेय अगदि.. .....भारीच कि!!!!!!!!!!!
6 Aug 2010 - 9:20 pm | सविता
एकदम सही.......
6 Aug 2010 - 9:21 pm | प्रभो
वाकटी खाल्ली नाही कधी...खाऊन बघायला हवी... :)
7 Aug 2010 - 2:24 pm | जागु
शरयु तु नाही खात मासे ?
सविता धन्स.
प्रभो एकदा खाउन बघाच.