ग्रिन चिकन

जागु's picture
जागु in पाककृती
6 Aug 2010 - 3:00 pm

लागणारे साहित्य:
१ किलो चिकन साफ करुन धुवुन
२ बटाटे फोडी करुन
ग्रिन मसाला वाटण - मिरच्या १० (तिखटाच्या आवडीवर अवलंबुन) कोथिंबीर २ मुठ, पुदीना १ मुठ, आल १ इंच, लसुण ८-१० पाकळ्या.
हिंग, हळद,
चवीप्रमाणे मिठ
१ लिंबु
गरम मसाला १ चमचा
तेल

क्रमवार पाककृती:
प्रथम धुतलेल्या चिकनला वरील वाटण, मिठ, हिंग, हळद, एक लिंबाचा रस चोळून घ्यावे व अर्धा तास मुरवत ठेवावे.

मग तेलावर वरील सगळ टाकुन बटाट्याच्या फोडी टाकाव्यात.

मग सगळ एकत्र करुन वाफेवर चिकन शिजु द्यावे. शिजल्यावर गरम मसाला टाकुन परत एक वाफ आणून गॅस बंद करावा.

अधिक टिपा:
बटाटे जरुरी नाहीत. आवडत नसतील तर नाही घातले तरी चालतात. मी बटाट्याचा वापर पुरवठ्यासाठी करते.
ह्या चिकनला कांद्याची गरज नसते. तरीपण आवडत असल्यास वाटणातच घातला तरी चालेल.

प्रतिक्रिया

भिरभिरा's picture

6 Aug 2010 - 3:16 pm | भिरभिरा

श्रावणाच्या आधीच टाकल्याबद्द्ल धन्यु...
फोटो मस्तच..

रश्मि दाते's picture

6 Aug 2010 - 3:21 pm | रश्मि दाते

छान आहे ,साधि आणी सोपी,आपल्या सगळ्या पाक्रु मस्त असतात

गणपा's picture

6 Aug 2010 - 3:26 pm | गणपा

चला गटारीची सोय झाली ;)

भिरभिरा, रश्मि, गणपा धन्यवाद.

शरयुप्रितम२०१०'s picture

6 Aug 2010 - 3:38 pm | शरयुप्रितम२०१०

पण बटाटे न घातलेलेच बरे अस मला वाट्त..
chicken ची taste कमी होईल.
बाकी पाकृ खूप मस्तच आहे...आनि फोटो पण !!!!
:-)

चिरोटा's picture

6 Aug 2010 - 3:43 pm | चिरोटा

मस्तच. गो ग्रीन. दही घालुन मॅरिनेट करायची गरज नाही का?

शरयु धन्यवाद.
भेण्डीबाजार लिंबुच्या ऐवजी दही चालेल पण ग्रिन कलर कमी होऊन फिक्कट होईल.

बरे झाले श्रावणाच्या आगोदर पाककृती सांगीतली...
करुन बघायला हरकत नाही.

जागु ताई चिकन ऐवजी सोया कयुब वापरले तरी चलतील का?

परिकथेतील राजकुमार's picture

6 Aug 2010 - 5:19 pm | परिकथेतील राजकुमार

शाकाहारी असल्याने नुसतेच बटाटे खाऊ ;)

सुनील's picture

6 Aug 2010 - 5:34 pm | सुनील

एक्दम शिंपल दिसते! बटाटा नकोच आणि कांद्याची गरज नाही, मग काय झटपट पाकृच! पण काय हे चिकन मुरवायची गरज नाही?

प्रभो's picture

6 Aug 2010 - 6:41 pm | प्रभो

मस्त!!

piu's picture

6 Aug 2010 - 11:47 pm | piu

छान आहे !

मराठमोळा's picture

7 Aug 2010 - 12:09 am | मराठमोळा

जागु तै,
तुमच्या पाकृ छान असतात, तुमच्या मेहनतीचे कौतुकही आहे.
पण प्रेझेंटेशकडे थोडे लक्ष दिलेत तर आणखीन छान वाटेल. सादरीकरणाला फार महत्व आहे स्वयंपाकत असे मला वाटते, गणपा शेटचा सल्ला/मदत घ्या हवं तर याबाबतीत. :)

सहज's picture

7 Aug 2010 - 6:59 am | सहज

छान

कवितानागेश's picture

7 Aug 2010 - 9:04 am | कवितानागेश

लसूण वजा केल्यास, आणी थोडे शेंगदाणे/काजू घातल्यास हे 'उपासाचे चिकन' होउ शकते!

श्रिराजे, सहज, पियु , प्रभो धन्यवाद.

लिमाउजेट, राजकुमार जर तुम्हाला चालत असेल उपवासाला तर काहीच हरकत नाही.

मराठमोळा धन्यवाद, तुम्हीही सुचना दिल्यात तरी चालेल. तरी मी गणपांना विचारेनच.

सुनिल, मुरवल तर चांगलच आहे.

डिलर अगदी चालतील. मी सोयाक्युबचे पदार्थ मटण, चिकन प्रमाणेच बनवते.