१ कप गव्हाचे पिठ
1/4 कप self raising फ्लोर
1/2 कप पिठि साखर
1/4 टिस्पुन मिठ
1/2 टिस्पुन इलायची
1/2 कप अनसॉल्टेड बटर
2 टेबल्स्पून्स दुध
ओवेन 360 डिग्री फॅरनाइट वर प्री हिट करा.
एका बोल मधे पीठ, साखर,मिठ,इलायची पाउडर मिक्स करा.
आता वितल्लेले बटर,दूध घालुन निट मिक्स करा व ते वरिल बोल मधिल मिक्स मधे घाला.
ह्याचा मळून मउ गोळा करा. आनी त्याचे छोटे छोटे गोळे करून चप्टे करा.
आता हे गोळे बेकिंग ट्रे वर ठेवा. व १५ मिनिट साठि बेक करा.
आता ह्या कुकिस तयार झाल्या.
गरम गरम चहा बरोबर मस्त लागतात.
हा फोटो कढुन मला जवळ जवळ एक वर्ष झाले उशिर होण्याचे कारण :-- टाइप करायाचा आळशि पणा आणखि काय.
प्रतिक्रिया
6 Aug 2010 - 12:42 pm | चिरोटा
मस्तच्.इराणी बेकरीत अशा कुकीज मिळतात बहुतेक.
-----
6 Aug 2010 - 12:53 pm | मस्त कलंदर
छान दिसत आहेत कुरकुरीत कुकीज... मला पण इराण्याच्या हॉटेलातल्या बरण्यांची आठवण झाली!!! :)
6 Aug 2010 - 1:02 pm | Nile
सकाळचा चहा अन बिस्किटे, कुकी(मग त्या चितळेंच्या कणकेच्या का असेना ;-) ), खारी, टोस्ट, रसक म्हणजे दिवसाची सर्वोत्तम सुरुवात असे तर ब्वॉ आपले ठाम मत आहे.
6 Aug 2010 - 6:31 pm | अर्धवट
ठाम मतभेद.
आपला जीव 'चा - बटार' अथवा चा चपाती वर आहे.
असो कुकीज आवडल्या
6 Aug 2010 - 10:11 pm | Nile
चपातीचा विसर पडला हो, लै लै वर्षे झाली खाउन!
माझे म्हणणे, चहा (अन असेच सोबत काहीतरी खायला)म्हणजे दिवसाची...
6 Aug 2010 - 1:01 pm | परिकथेतील राजकुमार
बघुनच तोंडाला पाणी सुटले !
ज ह ब र्या फोटु.
6 Aug 2010 - 6:23 pm | प्रभो
बघुनच तोंडाला पाणी सुटले !
6 Aug 2010 - 1:15 pm | गणपा
कडांना आलेला किंचीत लालसर रंगच सागतोय की नक्कीच कुरकुरीत झाल्या असणार कुकीज्.
:)
6 Aug 2010 - 1:57 pm | जासुश
आभारि आहे.सर्वान्च्या छान छान प्रति क्रियान्साठि..
मला नान खटाई जास्त आवडते. पन प्रॉपर रेसिपी कुठे मिळलि नाही.
6 Aug 2010 - 5:26 pm | चित्रा
छान. कुकीज खरोखरच मस्त दिसत आहेत.