णमस्कार लोक्स (परममित्र (मिपा)दि. टार्या कडून साभार),
नावात आय टी बघून दचकू नका बरंका.
निख्याने काल बिका ( कांदा टोमॅटोची 'बॅचलर' भाजी... उर्फ सुगरण्याचा सल्ला) आणी चोता दोन ( उपवासाची साबुदाण्याची बॅचलर थालिपीठे ... उर्फ डॉन्याचा सल्ला..) यांच्याकडून स्फूर्ती घेऊन "कांदा बटाटा 'बॅचलर' रस्सा" टाकला.
आधी केसुंनी पण पाकमैदानात उडी घेतलेली. एक गोष्ट कॉमन...सर्वजण संपादक ;) ..आय टी भाषेत म्यानेजर लोक.
नॉन संपादक क्याटॅगरीत गणपाशेठ एकटेच किल्ला लढवत होते. म्हटलं आपणही जरा मदत करावी. ;)
पेश करत आहे मंडळी बॅचलरी सैपाकाच्या मालिकेतील पुढची डिश - गोभी मसाला
साहित्यः
१. एक मोठा कांदा - हवा तसा चिरून
२. एक मोठा टोमॅटो - हा पण हवा तसा चिरून
३. अर्धा किलो फ्लॉवर - हा पण हवा तसा चिरून
४. मीठ, तिखट चवी/कॅपॅसिटी नुसार
५. दोन चिमुट हळद
६. एक चमचा गरम मसाला
७. एक चमचा अशोकचा सब्जी मसाला
८. कडिपत्ता, कोथिंबीर
९. दोन मिरच्या चिरून - हव्या तश्या चिरून
१०. तेल , जिरे - फोडणीसाठी
११. आलं-लसूण पेस्ट
वरच्या लिस्टमधील मसाल्याच्या गोष्टी कमी असल्यास त्याप्रमाणात सब्जी मसाल्याचे प्रमाण वाढवा.. :)
कृती :
एका चोत्या छोट्या कुकरमधे तेल + जिर्याची फोडणी करा.
त्यावर कांदा लाल होईपर्यंत परता. त्यात टोमॅटो टाकून परता. कांदे-टोमॅटो शिजले की त्यात फ्लॉवर सोडून सर्व गोष्टी टाकून दोन मिनीट परता.
आता त्यात फ्लॉवर आणी एक वाटी पाणी टाकून कूकर लावा. एक शिटी झाल्यावर कूकर बंद करा. सर्व वाफ (वायू नाही ;) ) सरली /झाकण पडलं की मंद आचेवर उरलेलं पाणी अटवा. दहा-पंधरा मिनिटात गोभी मसाला तयार....
घरी असाल तर तर आईने बनवलेल्या पोळ्या, बाहेरगावी असाल तर पोळीभाजी केंद्रातल्या पोळ्या , परदेशात असाल तर फ्रोजन आणून गरम केलेल्या पोळ्या/पराठ्या सोबत लुटा लुफ्त गोभी मसाल्याचा ... गोड आवडत असल्यास सोबतीला काहीतरी विकत आणलेलं / घरी बनवलेला गोड पदार्थ घ्या. गेला बाजार तुप-साखर्,दही-साखर, गुळ-तुप घ्या...आणी ऐश करा....
प्रतिक्रिया
6 Aug 2010 - 7:39 am | सहज
वा वा वा आयटीची मुले स्वैपाक करु लागली.
मस्त रे प्रभो!
6 Aug 2010 - 3:40 pm | केशवसुमार
आयटीची मुले स्वैपाक करु लागली..
प्रभोशेठ,
एकदम चोक्कस पाकृ..
(आयटीतला नॉन आयटी)केशवसुमार
स्वगतः पाककृती विभागात, आयटी आणि नॉन आयटी असे उपविभाग चालू करावे अशी मालकांना विणंती करावी का?
6 Aug 2010 - 9:46 am | मदनबाण
च्यामारी प्रभो...डायरेक्ट गोभी मसाला !!!
खाके देखना पडेगा !!! ;)
लगे रहो... :)
6 Aug 2010 - 7:47 am | चित्रा
घरी असाल तर तर आईने बनवलेल्या पोळ्या, बाहेरगावी असाल तर पोळीभाजी केंद्रातल्या पोळ्या , परदेशात असाल तर फ्रोजन आणून गरम केलेल्या पोळ्या/पराठ्या सोबत लुटा लुफ्त गोभी मसाल्याचा ...
होय का?! अस्सं, अस्सं.
*ये हं आता घरी एकदा परत. लाटणेच, ओह सॉरी, लाटूनच दाखवते पोळ्या.
6 Aug 2010 - 7:51 am | चित्रा
गोभी मसाला छानच आहे.
6 Aug 2010 - 8:23 am | llपुण्याचे पेशवेll
कवन च्या फ्रोझन पोळ्या का रे ह्या?
(देशाविदेशातला) पेशवे
आधी केसुंनी पण पाकमैदानात उडी घेतलेली. एक गोष्ट कॉमन...सर्वजण संपादक ..आय टी भाषेत म्यानेजर लोक.
नॉन संपादक क्याटॅगरीत गणपाशेठ एकटेच किल्ला लढवत होते. म्हटलं आपणही जरा मदत करावी.
आपण आयटीत आहात मॅनेजर नाही आहात तरीही स्वयंपाक करता येतो हे वाचून आपण लग्नाळू आहात याची खात्री झाली.
(आयटीतला)पेशवे
, परदेशात असाल तर फ्रोजन आणून गरम केलेल्या पोळ्या/पराठ्या सोबत लुटा लुफ्त गोभी मसाल्याचा
आपण परदेशात आहात हे दाखवून देण्याच क्षीण प्रयत्न आवडला.
-परापेशवे
6 Aug 2010 - 7:52 am | चतुरंग
खलास रे!
तुझं कधी ठरलं आहे त्याची फक्त तारीख कळवा व्यनिने! ;)
(खात्रीशीर)चतुरंग
6 Aug 2010 - 1:53 pm | श्रावण मोडक
अच्छा. खात्रीशीर माहिती का? बरं.
प्रभो, कधी येतोयेस बाळा इथं? मग पाहू आपण याचं काय करायचं ते! ;)
6 Aug 2010 - 7:55 am | बेसनलाडू
प्रभोशेठ, पाकृ भारी! पण टॉर्टिया? त्याऐवजी भारतीय दुकानातून कावान किंवा रोटीलॅन्डच्या 'पोळ्या'च घेऊन या. आणि खायचेच असले तर गव्हाचे किंवा मल्टिग्रेन टॉर्टिये खा. चित्रातले तब्येतीसाठी तितके चांगले नाहीत. काही दिवसांनी तुम्ही शरीरानेही मेक्सिकन होऊन जाण्याची शक्यता आहे :)
(टॉर्टियाविरोधी)बेसनलाडू
6 Aug 2010 - 7:57 am | प्रभो
टॉर्टीया नाहीयेत हो ते बेलाशेठ..
देसी स्टोर मधे मिळणारे मलेशियन कावान पराठेच आहेत... पश्चिमेला असलो म्हणून काय झालं ..पुर्वेचेच पराठे खातो... ;)
6 Aug 2010 - 8:24 am | llपुण्याचे पेशवेll
कवनचेच पराठे ना हे? झटक्यात ओळखले मी.
6 Aug 2010 - 8:28 am | बेसनलाडू
कवनचेच पराठे ना हे? झटक्यात ओळखले मी.
अगदी अगदी! बॅचलर लाइफमध्ये स्वयंपाक करणार्यांच्या हाताला किती चव येते माहीत नाही, पण नजरेला मात्र नक्की गुण असतो हो ;)
(क्ष-बॅचलर स्वयंपाकी)बेसनलाडू
6 Aug 2010 - 9:45 am | ऋषिकेश
ऐसे पराठे ना और कहि दिखते है ना कही मिलते है! (हिंदी का कुणास ठाऊक)
6 Aug 2010 - 9:53 am | सहज
कवनच्या पराठ्यांची बात काही औरच!
परंतु प्रभोने तो मध्यभागी नीट/पुरेसा खरपूस भाजला नाही किंवा तो खरपूस पापुद्रा फोटो काढण्याआधीच गट्टम केला म्हणुन बहुतेक बेलाचा गोंधळ झाला असावा.
6 Aug 2010 - 11:28 am | विश्वनाथ मेहेंदळे
काय हे बेलाशेट? किती वर्षे अमेरिकेत आहात? अशी चूक तुम्ही करणे योग्य नाही. :)
6 Aug 2010 - 8:50 am | रेवती
भारी रे!
तुझं आमंत्रण मिळालच आहे....काळजी नसावी आम्ही सगळे वेळेत पोहोचतो आहोत.
6 Aug 2010 - 9:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अश्लील, अश्लील, अश्लील!
पण प्रभोशी थोडीबहुत अचानक ओळख असल्यामुळे चान चान म्हणत आहे.
6 Aug 2010 - 6:26 pm | प्रभो
>>अश्लील, अश्लील, अश्लील!
या प्रतिसादात हेर क्रेमर दिसले.. ;)
6 Aug 2010 - 9:44 am | ऋषिकेश
हैच्च!!! क्या बात है प्रभो!! आयटीवाला शोभतोस खरा!
बाकी वरच्या रेशिपीत कधितरी चव बदल म्हणून फोडणीत अख्खे धने किंवा नंतर वरून धने-जिर्याची पुड टाकावी.. तसेही थोडे वेगळे आणि छान लागते.
6 Aug 2010 - 9:48 am | Nile
प्रभ्याला आयटी पोरीचे स्थळ आलेले दिसते. लेका प्रभ्या सुट्टीला इथे ये अन चार पाच रेसीप्या करुन खाउ घाल आम्हाला, तुला पन्नास प्रतिसाद पक्के! ;-)
बाकी ते पराठी भाजत जा रे नीट.
(उगाच्या उगाच)
6 Aug 2010 - 11:58 am | परिकथेतील राजकुमार
प्रभ्याला आयटी पोरीचे स्थळ आलेले दिसते.
अगदी हेच आले डोक्यात.
ह्यावरुन कणेकर गुर्जींचे 'काहीच नाही तर दह्यात विष कालवावे तशी साखर कालवा' आठवले ;)
प्रभो भो* खमंग रे एकदम !
*ह्याचा अर्थ बिका शेख जाणे.
6 Aug 2010 - 9:52 am | यशोधरा
प्रभो, कधी कुठे करणारेस लग्न? पुण्यामधेच कर, आम्हाला यायला मिळेल, आणि आमचे आशीर्वाद हाच तुला हवा असलेला आहेस असेल ना? :D
6 Aug 2010 - 9:55 am | Nile
घ्या, यांच्या अभ्यास कमीच पडतोय!! अगं, करं म्हणजे काय?? ठरलं आहे केव्हाच. ;-) आणि आशिर्वाद कसले देताय?? दोन चार रेसीप्या द्या त्यापेक्षा, त्याची होणारी वाईफ आय टीत आहे. ;-)
( प्रभ्याचा आहेर यायच्या आत, पळा)
6 Aug 2010 - 11:07 am | यशोधरा
अभ्यास कमी पडतोय म्हणूनच ना तिथे अपडेटांचा धागा काढलाय! तिथे माहिती द्यायची सोडून इथे का टिरटिरत आहेस? तिथे लिहिले असतेस तर मला कळ्ळे असते ना!
प्रभो, शुभेच्छा आणि अभिनंदन :)
6 Aug 2010 - 10:03 am | आनंदयात्री
छान रे प्रभो !!
आवडली रेसिपी.
6 Aug 2010 - 10:33 am | मस्त कलंदर
वा प्रभो मस्त दिसतोय गोभी मसाला... आता तुला आयटी वाईफ करायला हरकत नाही...
पुपाशु
6 Aug 2010 - 10:50 am | दिपाली पाटिल
मस्त दिसतोय IT गोभी मसाला...तु आता IT तली बायको करायला हरकत नाहीये...
6 Aug 2010 - 10:51 am | गणपा
लेका असशी लबाडी केलीस होय ;)
बाकी पाकृ मस्तच.
सध्या घरी नाही :( , आजुबाजुस पोळी भाजी केंद्र नाही. आणि परदेशात असुन फ्रोजन पोळ्या/पराठे मिळत नाही :((
आणि पदरी कुकही नाही.
त्यामु़ळे सगळं आपल्याच हाताने करावं लागत रे भौ.
6 Aug 2010 - 10:56 am | निखिल देशपांडे
मस्त रे प्रभ्या..
करुन बघतो एकदा..
बाकी लग्न कधी आहे तुझे????
6 Aug 2010 - 11:26 am | स्वाती दिनेश
गोभीमसाला चान ,आपलं छाण ,सोरी... छान दिसत आहे, ;)
स्वगत-ह्म्म.. आता आयटी पाकृंचा महापूर येणार असे दिसते, आता तुम्ही गाशा गुंडाळायला लागा स्वातीताई.
ही स्वगतं फिक्क्या अक्षरात लिहायला अक्षररंग कधी चालू होणार? हे आणि दुसरे स्वगत.
स्वाती
6 Aug 2010 - 11:31 am | निखिल देशपांडे
ही स्वगतं फिक्क्या अक्षरात लिहायला अक्षररंग कधी चालू होणार? हे आणि दुसरे स्वगत.
अगं स्वाती तै..
आपल्या प्रतिक्रिया टाईप करायच्या खिडकीच्या खाली Input Format असे लाल अक्षरात लिहिले आहे. ते सिलेक्ट कर म्हणजे अक्षररंग दिसतील.
6 Aug 2010 - 11:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अक्षररंग सुरू आहेतच स्वातीताई. प्रतिसादाच्या बॉक्सखाली 'इनपुट फॉरमॅट'वर क्लिक कर, त्यात 'फुल एच्टीएमेल' निवड म्हणजे दिसेल.
प्रभ्या, लग्नं कधी रे तुझं?
6 Aug 2010 - 11:39 am | llपुण्याचे पेशवेll
बघितले करून.
6 Aug 2010 - 1:02 pm | ऋषिकेश
काय लग्न बघितले करून? ;)
6 Aug 2010 - 1:04 pm | Nile
पुप्या लैच नशिवबान राव. असे करुन बघायला मिळाले म्हणजे (कपडे घालुन बघायला मिळण्याच्या चालीवर!) साला सगळी आयटीची कमाल आहे. ;-)
6 Aug 2010 - 4:03 pm | llपुण्याचे पेशवेll
अहो आम्ही स्वतःबद्दल नाही त्या प्रभ्याबद्दल बोलतो आहोत. प्रभ्या काय उगाच पाकृ टाकायला लागला काय?
6 Aug 2010 - 11:37 am | मराठमोळा
बाब्बो...
सगळेच आयटी वाले स्वैपाक करायला लागले की.
थोड्या वर्षांनी "आयटी पुरुष आणी स्वयंपाक" असा लेख न आला तर नवलच. ;)
एक चमचा रेडीमेड सब्जी मसाला वापरला की सुक्या भाजीला मस्त सुगंध येतो, आणि चवही छान लागते. :)
प्रभो, लै भारी पाकृ.. जियो... :)
(सगळा स्वैपाक येणारा, पण कुणालाच न सांगणारा, आयटीतला)
मराठमोळा.
6 Aug 2010 - 11:48 am | स्वाती दिनेश
तुम्ही लोकं म्हणत आहात तसेच करत होते रे बाबांनो, फुल हटमल मध्ये जाऊन ..पूर्वीसारखेच.पण तेव्हा अक्षरंगावर क्लिकवले तरी रंग येतच नव्हते, आता आले.
असो. प्रभोच्या धाग्यावर हे खूप अवांतर आता पुरे...
स्वाती
6 Aug 2010 - 1:37 pm | इरसाल
चोरट्याला चोता छोत्ता वगैरे म्हणतात सगळे छोट्या डॉनच्या मागे (दादांना विसरा इथे) का लागलेत
6 Aug 2010 - 2:00 pm | नितिन थत्ते
मस्त पाक़कृती.
करून बघायला हवी.
(हातोडी वापरतानाच स्वयंपाक शिकलेला आणि आयटीत आल्यावर सोडून दिलेला)
6 Aug 2010 - 2:33 pm | मेघवेडा
हे जे काही क्षीण प्रयत्न* चालले आहेत त्यांचा निषेध म्हणून धागा फाट्यावर मारण्यात आलेला आहे.
बाकी त्रयस्थपणे फक्त पाकृचा विचार केल्यास छान आहे.
* कसले ते पेशव्यांना विचारा.
6 Aug 2010 - 3:39 pm | जागु
मस्त मस्त मस्त.
6 Aug 2010 - 6:26 pm | प्रभो
सर्व वाच-प्रतिसादकांचे धन्यवाद.
बाकी उपडेटं कळवीनच.. सध्या काही नाहीत ;)