काय बॅचलर मंडळी शिकलात की नाही सैपाक बिंपाक? अहो नसाल तर लागा तयारीला. चुकुन माकुन एखाद्या IT वालीने गळ्यात माळ घातली तर मग कस व्हायच तुमचं? ;)
आज एका सोप्या डिश पासुन सुरवात करा.
गृहिणींचा आणि बॅचलर मंडळींचा अगदी अडी-नडीला धावुन येणारा किचन मधला दोस्त म्हणजे बटाटा. घरात दुसरी कसलीच भाजी नसली तरी कांदे /बटाटे असतातच. अश्या वेळी नुसत्या बटाट्याच्या काचर्या करुन वेळ मारुन नेता येते.
थोडी फुरसत असेल आणि कणिक तिंबता येत असेल तर हा पदार्थ करुन पहायला हरकत नाही.
साहित्यः
२-३ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे.
१/२ चमचा हळद.
१ चमचा जीरे पुड.
१ चमचा लाल तिखट.
२" आलं बारील तुकडे करुन वा किसुन.
७-८ पाकळ्या लसुण बारील तुकडे करुन वा किसुन.
३-४ मिरच्या ठेचुन.
मीठ चवी नुसार.
कणकेचा गोळा चांगला तिंबुन.
कृती:
सर्वप्रथम बटाटे मॅश करुन घावे.
त्यात सगळे मसाल्याचे पदार्थ टाकुन चांगल एक जीव करुन घ्यावं. चवीचा अंदाज घेउन मीठ टाकावं.
कणकेचा गोळा परत एकदा मळुन, लहान सफरचंदाच्या आकाराचा गोळा वेगळा करुन त्याची छोटी पुरी लाटावी.
हातानेच केली तरी चालेल पण कडा शक्यतो पातळ ठेवाव्या.
लिंबाच्या आकाराचा सारणाचा गोळा या तयार पुरी मध्ये ठेवुन तिच्या कडा मोदका प्रमाणे वाळुन घ्याव्या.
शक्यतो मध्ये हवा रहाणार नाही याची दक्षता घ्या. हलक्या हातानेच हा सारण भरलेला दाबुन त्याला पेढ्याचा आकार द्या.
हलक्या हाताने, हळु हळु फिरवत चपाती प्रमाणे लाटुन घ्या. हे खर कौशल्याच काम.
पुरण पोळीतल पुरण असो आलु पराठल्यातला बटाटा, ज्याला ते सारण आतच कोंडुन पोळी लाटता येत तोच खरा बल्लव् (काकु असेल तर सुगरण).
आमचे हात हलके नसल्याचे पुरावे वरील कलाकृती दाखवतेच आहे. ;) असो मीच करणार, नी मीच गिळणार असल्याने जीथे जमेल तिथे थोडी ठिगळं लावली. पराठ्याचा आकार एखाद्या देशाच्या भौगोलीक नकाश्या सारखा आला नाही या वरच समाधान मानुन आम्ही स्वत:चीच पाठ थोपटुन घेतली.
पराठा अलगद उचलुन तव्यावर टाकुन, मध्यम आचेवर थोड लोणी सोडुन पराठा खमंग भाजुनघ्यावा.
ताज्या ताज्या दह्या /लोणच्या बरोबर , आवडी नुसार तळलेल्या / कच्या मिरच्यांसोबत लुफ्त घ्या गरमा गरम आलु के पराठे का ;)
प्रतिक्रिया
6 Aug 2010 - 4:57 am | शिल्पा ब
तोंडाला पाणी सुटलं... मस्त.
आता पालक पराठे कसे करायचे ते पण सांगा.
6 Aug 2010 - 5:03 am | असुर
गणपा भौ, नळ सुटलाय तोंडात!
गणपाभौ हे असं काहीतरी शिकवणार|| आमच्याकडून ते नीट नाय होणार||
आमची पोटं बिघडणार|| गणपाभौची 'मिश्कील स्मायली' निश्चित||
--असुर
6 Aug 2010 - 5:04 am | चित्रा
मस्तच.
9 Aug 2010 - 8:56 am | धनंजय
+१
पण दुसर्या चित्रातील सामग्रीची सुंदर रंगसंगतीची रांगोळी विस्कटायची म्हणजे जिवावर येते.
पुढच्या वेळेला आधीच विस्कटून मसाल्यांची प्रकाश्चित्रे काढा राव.
6 Aug 2010 - 5:11 am | मदनबाण
पहाटे पहाटे रिकाम्या पोटी हापिसात आल्यावर हे असले धागे वाचले की पार वाईट्ट अवस्था होते !!! मनाची आणि पोटोबाची देखील... ;)
भूक लागली.................................................................................
6 Aug 2010 - 5:49 pm | स्मिता_१३
सहमत.
बाकि पराठे एकदम झकास गणपाभाउ !!! :-)
6 Aug 2010 - 5:13 am | केशवसुमार
एकदम झकास..तो.पा.सु.
(हवरट)केशवसुमार
वर दोन बटर क्यूब ठेवायला विसरलात का?
(अमुल)केशवसुमार
बॅचलर मंडळीं साठी कोचिंग क्लासेस काढा..इथेच लै गिर्हाईक मिळेल..;)
पाकृ दिसतीय सोप्पी पण..
ते ३ नंबरच्या फोटोची कृती सविस्तर द्या..म्हणजे बॅचलर मंडळीना समजेल कस आणि किती तिंबायचे ते..
(फुकट सल्लागार)केशवसुमार
बाकी चालू दे..
6 Aug 2010 - 6:19 am | सहज
फक्त आनंदयात्री उवाच || श्री गणपाय नमः ||
6 Aug 2010 - 9:23 am | आनंदयात्री
खाद्याधिदेव गणपा,
आम्ही रोज बॅचलर प्रयोग करतांना आपणास नमुन आपलाच विचार करुन आरंभ करत असतो. कालच सुहृदांशी बोलतांना बॅचलर स्वयंपाक्याचा शिक्का कसा पुसावा याबाबत चर्चा करतांना बटाट्याचे परोठे हा किल्ला सर करण्याचा विचार केला होता, आणि खाद्याधिदेव !! आपण महान आहात !! भक्ताने बास विचार करण्याचा अवकाश आपण पाककृती पदरात .. सॉरी सॉरी उपरण्यात टाकली सुद्धा !!
-
(खाद्याधिदेव गणपाचा भक्त)
आंद्या बल्लव
बाकी शेठ आम्ही जरा वेगळी रेशिपी मारत असतो पराठ्यांसाठी. उकडलेल्या बटाट्यांची मस्त खमंग भाजी करुन ती स्टफ करतो आम्ही नुसत्या तिखट मीठ लावलेल्या बटाट्यांपेक्षा. हे पराठे पण आवडतात, पण थोडा पंजाबी हॉटेल स्टाईल टेस्ट येते.
6 Aug 2010 - 10:31 am | मस्त कलंदर
गणपा पाकृ मस्तच.. मी पण आधी असेच पराठे बनवायचे
पण प्रभुमास्तरांच्या घरचे पराठे ( नॉन आयटी काकूंनी बनवलेले)खाल्ले तेव्हापासून मी पण नुसतेच सारण वापरण्याऐवजी आधी मस्त भाजी करून घेते.. सही लागतात असेही पराठे..
बाकी, प्रभुकाकूही चांगल्या सुगरण आहेत हं!!!!
6 Aug 2010 - 12:31 pm | Nile
तरीच विप्र काकांना इतका वेळ मिळतो हां जेवण बिवण करत धिंगाणा घालायला. ;-)
हे सुख आजच्य आयटी नवर्यांच्या नशिबात कुठे?? ;-)
6 Aug 2010 - 11:21 am | मराठमोळा
>>बाकी शेठ आम्ही जरा वेगळी रेशिपी मारत असतो पराठ्यांसाठी. उकडलेल्या बटाट्यांची मस्त खमंग भाजी करुन ती स्टफ करतो आम्ही नुसत्या तिखट मीठ लावलेल्या बटाट्यांपेक्षा. हे पराठे पण आवडतात, पण थोडा पंजाबी हॉटेल स्टाईल टेस्ट येते.
शमत आहे. कांदा असला आलु पराठ्यात की अजुन छान चव येते. :)
बाकी पाकृ आणी फोटु एक्दम झकास. :)
6 Aug 2010 - 10:50 pm | स्वप्निल..
आमची पण हीच पद्धत. भाजी करुन स्टफ करणे :)
बाकी गणपासेठ, पाककृती नेहमीप्रमाणेच मस्त!! मस्त!!
6 Aug 2010 - 7:25 am | चतुरंग
6 Aug 2010 - 8:32 am | बेसनलाडू
च्यायला आजवर हा गणपा माझा रूममेट म्हणून का नाही लाभला असा विचार करतोय :(
(शक्यतायुक्त)बेसनलाडू
पाककृती ऑल टाइम हिट! गणपाने बनवलेला पराठा स्वादिष्ट असणार यात शंकाच नाही. फोटोही भारी!
(आस्वादक)बेसनलाडू
6 Aug 2010 - 8:37 am | प्रभो
मस्त रे गण्पाभौ....
>>असो मीच करणार, नी मीच गिळणार असल्याने
पराठा/पोळ्या नाही पण गोल पुर्या करायची माझी ट्रीक... पोळी लाटायची अन् एक गोल वाटी घेऊन त्यात पुर्या कापून घ्यायच्या... ;)
6 Aug 2010 - 10:29 am | मस्त कलंदर
नीट बघ.. गणपाने जिथे जिथे आकार जमला नाही तिथे चाकूने कापून नीट गोल आकार दिला आहे ते... लाटलेला गोल आकार आणि कापलेला गोल आकार यातला फरक निदान तुलातरी(चोराच्या वाटा चोराला माहितच्या चालीवर) नीट माहिती हवा ना!!
आणखी एक, लाटलेला पराठा आणि प्लेटमधला पराठा वेगवेगळा आहे. :)
-(छिद्रान्वेषी)मक
6 Aug 2010 - 10:43 am | गणपा
सॉरी S O R R E . मकबै तुमचे दोन्ही अंदाज चुकलेले हैत. :)
परठा सुरी/चाकु ने कापलेला नाही, हा कलथ्याने थोड दाबुन गोल करायचा प्रयत्न केलाय
(डोकेबाज ) गणा.
लाटलेला आणि तव्यावरचा पराठा एकच आहे. फोटोसेशन साठी फक्त तव्यावर खालची बाजु वर ठेवली आहे ;)
(चालु) गणा.
6 Aug 2010 - 10:48 am | मस्त कलंदर
>>>हा कलथ्याने थोड दाबुन गोल करायचा प्रयत्न केलाय
तेच रे.. लाटलेला आकार वाटला नाही तो म्हणून म्हटले इतकेच. आणि त्यात तुला हिणवायचे नव्हते, पण प्रभोला नीट आकार लाटता न येण्याची खंत वाटत असेल तर वाटू नये म्हणून लिहिले होते..
>>>लाटलेला आणि तव्यावरचा पराठा एकच आहे.
लाटलेला आणि तव्यावरचा पराठा एकच आहे. मी प्लेटमधल्या पराठ्याबद्दल बोलतेय. एक नीट गोलगोल आणि दुसरा बर्यापैकी गोल आहे.. :P
6 Aug 2010 - 10:57 am | गणपा
हा हा हा प्लेट मधाला ही तोच आहे.
कडा जरा कास्तच कुरकुरीत झाल्या मुळे तुटल्या. (त्या लगेच गट्टम केल्या) ;)
(लबाड) गणा
6 Aug 2010 - 8:48 am | रेवती
काय मग गणपा!
इकडं कुठं जॉब शोधतो आहेस काय?
आम्ही चांगला शेजार शोधतो आहोत्.....असंच आपलं सांगितलं तुला!;)
6 Aug 2010 - 9:27 am | llपुण्याचे पेशवेll
मस्तं रे गणपा एक नंबर पाकृ. मिक्स व्हेज पराठे करताना देखील उकडलेला एखादा बटाटा घातला सारणात तर सारण चांगले मिळून येते.
6 Aug 2010 - 10:11 am | विजुभाऊ
पुप्या आख्खा बटाटा सारणात घातला तर लाटायचे कसे ?
ती पराठाऐवजी वडे/कचोरी होईल .
गणपा भौ ते ३ नंबरच्या फोटोची कृती सविस्तर द्या..म्हणजे बॅचलर मंडळीना समजेल कस आणि किती तिंबायचे ते..
अन कणीक पाण्यात तिंबायची की तेलात
6 Aug 2010 - 9:38 am | ऋषिकेश
कणीक तिंबणे आणि लाटणे यासाठी काहि ट्रीक आहेत का? या दोन्ही गोष्टी मी अनेकदा ट्राय केल्या आणि नेहमी त्या वेगवेगळ्या पद्धतीने फसल्या. :)
6 Aug 2010 - 9:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
कणीक तिंबताना कशी फसते हे नीट सांगितलं असतंस तर गुद्देसूद, आपलं मुद्देसूद मदत करता येईल. तरीही काही टिप्सः
१. कणीक तिंबताना अंदाज नसेल तर अचानक भस्सकन पाणी ओतू नये, कष्टांवर पाणी ओतलं जाण्याची शक्यता असते. हळू हळू पाणी घालावे आणि आता अगदी थोडंच, दोन थेंब पाणी लागेल असं वाटत असेल तर पाणी घालू नये.
२. कणीक-पाणी हे प्रमाण बरोबर असेल तर कणीक थोडी चिकट होते, तेव्हा कणकेत थोडं तेल किंवा तूप घालावे, चिकटपणा जाऊन कणकेचा गोळा बरोबर तयार होतो.
फूड प्रोसेसरमधे कणीक भिजवणार असल्यास पाणी किंचित कमीच घालणे. कणीक भिजवून झाल्यावर पोळ्या करण्याआधी अर्धा तासतरी झाकून ठेवून द्यावी, त्यामुळे पोळ्या मऊ होतात.
पोळ्या लाटताना अगदीच पातळ करू नयेत, पापड होण्याची शक्यताच जास्त असते. सवय नसल्यास पोळ्या मधे जाड आणि बाहेरच्या बाजूला बारीक (किंवा उलट) होण्याची शक्यता असते. पोळीची जाडी शक्यतोवर सारखी ठेवावी.
असं ऐकलं आहे की पोळी लाटताना एकाच बाजूने लाटावी. त्याने काय फरक पडतो हे मला आजपर्यंत कळलेलं नाही.
पुढचा फोटो केसु आणि चोता दोनने पाहू नये.
पुढचा सल्ला फक्त ऋ साठी: ;-)
मुख्य म्हणजे आपण आयटी असलो तरीही थेरॉटीशनप्रमाणे नुस्ते प्रश्न टंकू नयेत; कधीतरी कणीक मळण्यापासून पोळ्या भाजेपर्यंत सगळं स्वतःच करून पहावं. चार वेळा केलं की पाचव्या वेळेस पोळ्या करणे बरोब्बर जमेल.
(लाटणेप्रेमी) अदिती
अवांतरः गणपा, बटाट्याचे परोठे माझेही आवडते, पण हल्ली वाढत्या आकाराच्या भीतीने सोडून दिले आहेत.
6 Aug 2010 - 10:31 am | ऋषिकेश
अतिशय धन्यवाद!
वरच्या प्रॉब्लेम्समधून पुढे सरकत मी सध्या नवा प्रॉब्लेम फेस करतोयः कणिक तिंबताना ती दिसते बरोबर मात्र लाटायला गेलो की चिकटते.. जास्त तेल टाकलं तर एकदम च्युइंगगमसारखी होते :(
शिवाय लाटताना गोल वगैरेची अपेक्षा नाहिच पण न फाटणारी किंवा मधेच कच्चा गोळा न लागणारी पोळी मिळावी अशी अपेक्षा कशी पूर्ण करावी. बर्याचदा चांगली लाटलेली पोळी उचलताना पोलपाटाला / पुढे तव्याला चिकटून फाटते.. कधी मंद आचेवर ठेऊन भाजली तर पापडासारखी कडक होते.. मोठ्या आचेवर करपते..
काय सांगु कित्ती कित्ती प्रॉब्लेम आहेत :) आई / काकू /आत्या/बायको अश्या चौघींकडून शिकायचा प्रयत्न केला पण छे! माझी केस अगदीच हाताबाहेर गेलेली आहे :P
6 Aug 2010 - 11:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुझी केस ऐकल्यावर असं वाटत आहे, तू पाणी जास्त घालत असणार. पाणी थोडं कमी कर, किंवा कोमट पाण्यात कणीक भिजवून पहा.
पोळी पोळपाटाला न चिकटण्यासाठी पोळी लाटताना, किमान सवय होण्याआधी, भरपूर पीठ लाव. पोळी अगदी 'पिष्टमय' होईल, पोळपाटाभोवती पिठाचा सडाही पडेल, पण एकदा हे जमलं की पुढे तुलाच इंप्रोवाईज करता येईल.
पोळी तव्याला न चिकटण्यासाठी: तवा 'योग्य' तेवढाच गरम पाहिजे. पुरेसा गरम नसेल तर पोळी चामट होईल पण अतिगरम असेल तर पोळीचे पातळ भाग तव्याला चिकटतात. नॉन स्टिक तवा असेल तर त्यावर सुरूवात कर आणि पुढे फोटोत दाखवल्यासारखा किंवा लोखंडी तवा वापर.
आई, काकू, आत्या आणि बायकोकडून ट्रेनींग घेऊन झाल्यावर आता आंजा मैत्रिणीच्या छोट्याशा मदतीने काम होतंय का पहा. नाहीतर सरळ मकमावशींकडे पोळ्या लाटण्याचे क्लासेस लाव! ;-)
असं आंतरजालावर फुकटात शिकून काही येत नाही, त्यासाठी गुरूगृही राहून गुरूहस्ते विद्या आत्मसात करावी लागते. ;-)
(प्रयोगातून विज्ञानप्रेमी) अदिती
6 Aug 2010 - 1:01 pm | मस्त कलंदर
ये.. मी नॉन आयटीतली आहे.. त्यामुळे छान, गोल, व्यवस्थित फुगणार्या पोळ्या कशा लाटाव्यात हे शिकवेन हो तुला.. मी पण (योग्य त्या वयात न शिकल्याने)चुकतमाकत शिकले. त्यामुळे काय टाळावे हेही शिकवते.
पण फी मात्र थोडी वेगळी पडेल.. सगळ्यात आधी तु तुझा खजिना पुस्तकविश्वावर उघड कर आणि किमान दर दोन दिवसाला मी न वाचलेले एक पुस्तक मला आणून द्यायचे. पुस्तक नक्कीच आणि धड स्वरूपात परत मिळेल ही ग्यारंटी!!! जर हे केलेस तर तुला या प्रोग्राममध्ये १००% फी सवलत...
6 Aug 2010 - 1:04 pm | ऋषिकेश
जाऊदे मीच शिकीन ;)
6 Aug 2010 - 10:18 am | विजुभाऊ
बटाट्याचे परोठे माझेही आवडते, पण हल्ली वाढत्या आकाराच्या भीतीने सोडून दिले आहेत
ओ ताई .पुण्याच्या मंडईत छोटे बटाटे मिळतात की. प्राठ्यासाठी मोठेच बटाटे घ्यायला पहिजेत असे थोडेच आहे. ;)
( .....पळा ही बया माझी कणीक तिंबणार बहुतेक)
6 Aug 2010 - 11:13 am | स्वाती दिनेश
लै भारी दिसत आहेत प्राठे!!!
नवोदित शेफांसाठी : पराठे करताना सारण भरुण पराठे लाटण्यापेक्षा सगळे एकत्र मिसळून घेतले तर अजून सोपे जाते.
स्वाती
6 Aug 2010 - 11:48 am | परिकथेतील राजकुमार
जुळे झाल्याने एक संपादकांना अर्पण केले आहे.
6 Aug 2010 - 11:53 am | गणपा
अभिनंदन प्राजी ;)
6 Aug 2010 - 11:31 am | परिकथेतील राजकुमार
गणपा ख ल्ला स पा़कृ रे एकदम !! सकाळी सकाळी शॉट लावलास एकदम ;)
6 Aug 2010 - 11:45 am | विजुभाऊ
परा तु कालच्या हँगओव्हरचा विचार करच.
एकच प्रतिसाद दोनदोनदा दिसतोय.
6 Aug 2010 - 12:24 pm | जागु
एकदम झक्कास.
6 Aug 2010 - 12:27 pm | दिपक
6 Aug 2010 - 12:38 pm | Nile
अरे या गणपाला सैपाकाच्या धाग्यात गुंतवा रे,सैपाकघरात नको! छळतो लेकाचा.
6 Aug 2010 - 6:02 pm | नंदू
शेवटचा फोटु अगदी जिवघेणा आलाय. फोटो पाहुनच खमंग वास आला आणी जिभेवर चव रेंगाळली.
बाकी पाकृ फर्मास हे.वे.सां. न.ल.
नंदू
6 Aug 2010 - 7:27 pm | गणपा
सर्व मायबाप खवय्यांचे आभार :)
6 Aug 2010 - 8:14 pm | मेघवेडा
झक्कास्स्स! च्यायला नुसत्या पोळ्या लाटायचे वांधे आहेत इथं. स्टफ करून लाटायच्या म्हणजे कठीणच काम. पण पाकृ झक्कास!
च्यायला एखाद्या जीनीबाबाने वगैरे मला जर तुला कोण व्हायचंय विचारलं तर मी "मला गणपा व्हायचंय म्हणून सांगेन.." ;)
6 Aug 2010 - 10:12 pm | विसोबा खेचर
शब्द नाहीत..!
9 Aug 2010 - 12:05 am | प्रभाकर पेठकर
पराठ्याच्या शेवटच्या चित्रावर जान कुर्बान.
गणपा,
आलू पराठा म्हणजे विश्वामित्रासमोर मेनकाच कि रे....!
9 Aug 2010 - 8:41 am | विलासराव
मस्तच ....... फोटो पाहुन जिभ चाळवली.
करत बसायला आत्ता वेळ नाही. मग काय लगेहाथ होटेल गाठले आनी पराठा चापुनच आलो.