फिश-केक:
परवा लक्षात आले की घरी दोन दिवसांपूर्वी आणलेले मासे (haddock) पडलेले आहेत. आमच्याकडे जास्त पसंती कालवणाला आहे, पण आज त्यासाठी मला हवे होते ते नारळ, कोथिंबीर असे काहीच घरात नव्हते. होते असे माझे कधीकधी. ;) आणि तेवढ्यासाठी संध्याकाळी इंडियन स्टोरला जायचा कंटाळा आला होता. आमच्याकडे बाबा लहानपणी म्हणत असत की घरात काय आहे त्यात बरेच काही करता येते, दरवेळी एखाद्या पदार्थासाठी अडून बसण्याची गरज नाही. आणि ते खरोखरच घरात जे आहे त्यात चविष्ट जेवण तयार करतात (मूड असला तर). हा उपदेश आठवला, म्हणून घरात काय होते ते पाहिले. एक म्हणजे घरी बनवलेला गव्हाचा उरलेला ब्रेड होता. बेसिलची पाने होती, कांदे-बटाटे, लसूण थोडेतरी घरात असतातच, तसे होते. म्हणून या सर्वात फिश केक (हवे तर पॅटिस म्हणा) बनवले. ही काही फिशकेकची सगळ्यात उत्तम पाककृती नाही, पण ठीक लागली. तेव्हा पेश आहे - तुमच्याही काही टिप्स असल्या तर लिहा.
साहित्यः
३/४ वाटी ब्रेड-क्रम्ब्ज (माझ्याकडे घरगुती गव्हाचा आणि भाकरीच्या पिठाचा ब्रेड होता/होती, तो/ती मिक्सरमधून काढले).
१ - १ १/४ पाऊंड कुठच्याही पांढर्या माशाचे तुकडे - (काटे आणि त्वचा काढून टाकलेले) - मॅश करून -फूड प्रोसेसरमधून माशाचे तुकडे मॅश करून घेतले. ( ज्यांना मासा आधी किंचित उकडून मग मॅश करायचा असल्यास ते तसे करू शकतात, पण गरज नाही).
१ लहान कांदा बारीक कापून (कांद्याची पात असल्यास ती घाला).
लिंबाचा रस १-१/२ चमचा (चिंचेचा कोळही घालता येईल).
आले-लसणीची पेस्ट १-१/२ च. चमचे
मीठ, गरम मसाला, १-१ १/२ चमचा तिखट (चवीप्रमाणे)
४-६ बेसिलची पाने बारीक कापून
१ च. कॉर्नफ्लावर (असल्यास)
तेल
कृती:
तेल सोडून बाकी सगळे साहित्य जितके एकजीव होईल तितके केले. एकजीव करायला कॉर्नफ्लावर घालायला हवे होते. पण ते माझ्याकडे नव्हते! खरेतर यात बटाटेही मॅश करून घालता येतील. पण मी बटाटे वेगळे तेलावर भाजले होते, ते माशाच्या मिश्रणात घालणार नाही असे ठरवले. :) त्यामुळे आता माझे पर्याय फारच मर्यादित झाले: म्हणजे माशाचे मिश्रण जास्त न मोडता तव्यावरून काढायला लागणार होते. त्यामुळे लहान लहान चपटे पॅटिसप्रमाणे केले. तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूने परतले. खालच्या बाजूने पांढरट रंग दिसला (रंग बदललेला दिसला) की मोडणार नाहीत अशी काळजी घेऊन उलटून परतले.
काल आम्ही हे असे जेवलो.
" alt="" />
प्रतिक्रिया
6 Aug 2010 - 12:15 am | प्रियाली
पण यावेळी तळतळाट नाही लागणार. ;)
घरी कॉड उरला आहे. त्याचे कटलेट करावेत असे डोक्यात आले होते पण नंतर विसरले. आता करेनच.
6 Aug 2010 - 12:27 am | चित्रा
पाककृती आणि फोटोही टाका.
6 Aug 2010 - 12:21 am | शुचि
यमी!! मस्त दिसतोय पदार्थ.
6 Aug 2010 - 12:31 am | धनंजय
मस्तच!
6 Aug 2010 - 1:08 am | piu
थोडासा Traders Joe's मध्ये मिळ्णार्या crab cake सारखा दिसतोय तुमचा फिश केक!
7 Aug 2010 - 6:53 am | स्मृती
छान दिसतोय फिश केक.. पण हे कॉड वगैरे वाचल्यावर, बाजारातून हलवा, सुरमई, बांगडे.. असे 'आपले' भारतीय मासे आणता येण्याचे आमचे भाग्य आहे याचा हेवा वाटतो :)
अर्थात, माशांचे असे वैविध्यपूर्ण किंवा पारंपारिक पदार्थ केले तरी फोटो काढण्याएवढा धीर नसतो ;)
9 Aug 2010 - 5:43 pm | चित्रा
स्मृती,
अगदी खरे आहे. आम्हाला इथे सुरमई, बांगडे मिळू शकतात, पण ते सगळ्याच स्टोर्समध्ये असतात असे नाही. त्यामुळे इथल्या नेहमीच्या सुपरमार्केटमध्ये गेलो की जे मिळतील ते मासे आणतो. ते इथल्या पद्धतीनेही केले तरी मला आवडतात.
असो. पुढच्या वेळी माशाचे काही पदार्थ केल्यास धीर ठेवून, नक्की फोटो आणि पाककृती इथे चढवा, आम्हाला आवडेलच.
6 Aug 2010 - 1:21 am | रेवती
वा! वा!!
प्लेट सजलेली दिसते आहे.
हिरवी भाजी कोणती आहे?
परतलेल्या बटाट्यांचा रंग छान आलाय.
6 Aug 2010 - 1:30 am | संदीप चित्रे
रेवती,
त्या प्लेटमधे हिरवी भाजी, परतलेले बटाटे इ. गोष्टीही आहेत ह्याकडे प्रतिसादामुळे लक्ष गेलं :)
चित्रा,
फिश केक सहीच दिसतायत पण पुस्तक वाचल्याशिवाय, नाटक / सिनेमा पाहिल्याशिवाय, आणि पदार्थ चाखल्याशिवाय आम्ही मत देत नाही ;)
>> आमच्याकडे जास्त पसंती कालवणाला आहे
चालेल चालेल ... कालवणही चालेल :)
6 Aug 2010 - 1:50 am | Nile
सहमत आहे. इतर पदार्थ दिसलेच नव्हते. ;-)
बाकी आमचा सारस्वत मित्र म्हणतो त्याप्रमाने "चव आली"!
अश्या पदार्थांना नुसती प्रतिक्रिया काय द्यायची म्हणा, त्या प्रतिक्रीया खाल्ल्यावर आपोआपच दिल्या जातात. :-)
6 Aug 2010 - 1:58 am | रेवती
अरे संदीप, शाकाहारींनाही आपल्या मैत्रिणीचे कौतुक करायला आवडते.
त्यात "आम्ही हे खात नाही' असा विचार करण्यापेक्षा अस्सल खवय्याधर्माला जागून मी यातले काय काय खाउ शकते ;) हा विचार केला.
6 Aug 2010 - 10:59 am | निखिल देशपांडे
त्यात "आम्ही हे खात नाही' असा विचार करण्यापेक्षा अस्सल खवय्याधर्माला जागून मी यातले काय काय खाउ शकते Wink हा विचार केला.
+१ सहमत
तुम्ही म्हणता तशा प्लेट मधल्या व्हेज गोष्टी नजर आल्या.
6 Aug 2010 - 11:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
छे छे छे, निदे, दिल्लीला जाऊन तुमची भाषा बिघडली. तुम्ही बिघडला नाहीत ना?
मी माशाच्या जागी कडधान्य घालून हाच प्रकार करून पहायच्या विचारात आहे.
6 Aug 2010 - 3:33 pm | रश्मि दाते
अदिती यात फिश ऐवजि उडिद्,मटकी घालुनही छान कटलेट करता येतात्,फक्त गरम मसाला थोडा जास्त घ्यावा लागतो
कडधान्याचा उग्रपणा कमी करण्या करीता
7 Aug 2010 - 5:22 am | पंगा
तसे केल्यास हा प्रकार कडधान्याच्या वड्यासारखा दिसण्याची शक्यता आहे.
यात काही गैर आहे असे मला व्यक्तिशः वाटत नाही. परंतु यात शाकाहार आणि मांसाहार या दोहोंचाही अपमान होऊ शकतो, (तसेच करणारीचाही, अर्थात आपलाही), असे खात्रीलायक स्रोतांवर मिळालेल्या माहितीवरून वाटते.
कल्जि घेने.
(विशेष टीप: हा संपूर्ण प्रतिसाद कृपया सर्वांनी हलका घेणे.)
7 Aug 2010 - 5:28 am | आमोद शिंदे
एकच प्रकार अनेक प्रकारांसारखा दिसणे हे कॉमन आहे. अन्नभेसळ करणारे हाच दृष्टीभ्रम वापरुन फायदा उठवतात.
भेसळ करताना घोड्याची लीद मसाल्यात घालतात असे नुकतेच एका चर्चेत वाचले. थोडक्यात, निव्वळ फोटोत बघून कडधान्याचा वडा आहे ह्यावरही विश्वास ठेवणे अवघड आहे :)
7 Aug 2010 - 5:32 am | पंगा
मुद्दा अगोदरच लक्षात आला होता, मांडावासाही वाटला होता, केवळ चपखल उदाहरण आठवत नव्हते.
लक्षात आणून दिल्याबद्दल मनापासून आभार.
6 Aug 2010 - 1:42 am | इंटरनेटस्नेही
एक विशेष रेसिपी. छान आहे. :)
6 Aug 2010 - 1:48 am | प्रभो
मस्त!!!
6 Aug 2010 - 2:45 am | चित्रा
@पियु (?) - होय, ट्रेडर जोचे माहिती नाही, पण आमच्या जवळच्या होल फूडस मार्केटमध्ये मिळणारे क्रॅबकेक आम्हाला आवडतात. अर्थात ते याहून बरेच जड असतात.
@ संदीप -फिश केक सहीच दिसतायत पण पुस्तक वाचल्याशिवाय, नाटक / सिनेमा पाहिल्याशिवाय, आणि पदार्थ चाखल्याशिवाय आम्ही मत देत नाही हाहा! या आता घरी. ग्रोसरी करून ठेवीन म्हणजे असे मिळेल ते खायला नको. :)
@ नील (नाईल) - धन्यवाद! चाखून पहायला इकडे यावे लागेल.
@रेवती - "आम्ही हे खात नाही' असा विचार करण्यापेक्षा अस्सल खवय्याधर्माला जागून मी यातले काय काय खाउ शकते, हा विचार केला". - - दॅट इज द स्पिरीट! गुड! भाजी पालकाची आहे. पालक नुसता गरम पाण्यातून काढला आहे. वर हवे तर लोणी आणि मीठ घालायचे. पालकाची स्वतःची चव लागते. एरवी आपण पालकाची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करतोच, कधीतरी थोडे वेगळे बरे वाटते.
@शुचि, धनंजय, प्रभो, इंटरनेटप्रेमी - धन्यवाद!
6 Aug 2010 - 3:23 am | बेसनलाडू
पालक, बटाटे आणि केक पाहून तोंडाला पाणी सुटले. स्टीम्ड्/बॉइल्ड बॉक्चॉय असते, तसा पालक अर्धकच्चा उकडून वापरलेला दिसतो. छानच लागणार. केक्सचा आकार आहे त्यापेक्षा जरा मोठा चालला असता, असे वाटते. चू.भू.द्या.घ्या.
(हावरट)बेसनलाडू
6 Aug 2010 - 5:03 am | चित्रा
तसा पालक अर्धकच्चा उकडून वापरलेला दिसतो. छानच लागणार. केक्सचा आकार आहे त्यापेक्षा जरा मोठा चालला असता, असे वाटते.
होय!
केकचा आकार ते धरून ठेवायला अंडे, बटाटे, सॉस असले काही नसल्याने (घाबरून) लहान ठेवला. परतायला बरे! नाहीतर मोडण्याची भिती!
6 Aug 2010 - 5:21 am | गणपा
आधी पाककृतीच नाव (केक आणि तोही फिशचा) वाचुन काही तरी भन्नाट पाकृ असणार याची खात्री झाली, मग सुगरणी च नाव वाचलं ,स्वाती ताई नाही म्हटल्यावर जरा गोंधळलो. त्यांचा काही नेम नाही. त्या उद्या नारळाच्या करवंटीचा ही केक बनवुन दाखवतील ;)
पण उघडल्यावर भ्रम निरास झाला नाही.
चित्रातै विष्णुच्या पहिल्या अवतारावर आमचा फार जीव :) त्याच्या पासुन बनवलेल्या सर्व पदार्थांना उदार मनानं मी माझ्या उदरात स्थान देतो.
फिश केक मस्त दिसतायत, आणि डिश पण अश्या रंग संगतीने सजवली आहे की ज्याच नाव ते. :)
>>पालकाची स्वतःची चव लागते.
एकदम पटेश.
6 Aug 2010 - 6:09 am | सहज
इतकं छान छान बनवायला कसं हो सुचतं ?
बाकी साबुदाणा, बटाटे मिश्र वडे म्हणून देखील हा फोटो खपेल काय? एकदम शाकाहार फ्रेंडली लुक आहे! :P
6 Aug 2010 - 7:58 am | चित्रा
@ गणपा - फिश केक मस्त दिसतायत, आणि डिश पण अश्या रंग संगतीने सजवली आहे की ज्याच नाव ते.
धन्यवाद! स्वातीताईंबद्दलचे ऑब्झर्वेशन अगदी पटले.
@ सहज - एकाच प्रतिसादात एखाद्याला झाडावर चढवणे आणि खाली उतरवणे याचे बक्षीस द्यायचे झाले तर ते तुम्हालाच द्यावे लागणार ;)
6 Aug 2010 - 11:58 am | पंगा
'खाली उतरवणे' कसे, ते समजले नाही.
असो.
6 Aug 2010 - 5:38 pm | चित्रा
माशाचा पदार्थ हा साबुदाण्याच्या वड्यांप्रमाणे दिसतो, हा दोन्ही शाकाहार आणि मांसाहाराचा अपमान नाही काय?! आणि करणारीचाही.! (सहज, ह. घ्या.)
असो.
मागे एकदा बटाट्याचा रोगनजोश अशा नावाची पाककृती वाचली होती, त्याची आठवण झाली!
7 Aug 2010 - 12:19 am | पंगा
अपमान कशाबद्दल? 'दिसतो' म्हटले आहे. 'चवीला लागतो' म्हटले असते तर गोष्ट वेगळी होती.
या दोन गोष्टी (एंड प्रॉडक्ट्स) बाहेरून सारख्या दिसणे शक्य आहे - खास करून चित्रात. (पदार्थ बनवताना त्यात कायकाय घातले होते हे चित्रात थोडीच दिसते?) कम टू थिंक ऑफ इट, आता परत बघून विचार केला, तर नुसता फोटो दाखवून कशाचा आहे ते सांगितले नसते तर मलासुद्धा प्रथम साबूदाणावड्याचेच चित्र वाटले असते, असे वाटते. इतके हुबेहूब सारखे आहे. यात माशाचा, साबूदाण्याचा, बनवणारीचा किंवा फोटो काढणार्या/रीचा कोणत्याही प्रकारे अपमान असण्याचे काही कारण मला तरी दिसत नाही. आपल्याला दिसते का?
(बाय द वे, शाकाहाराचा आणि मांसाहाराचा अपमान, की शाकाहार्यांचा आणि मांसाहार्यांचा अपमान? असो.)
7 Aug 2010 - 2:13 am | चित्रा
सहज यांना ह. घ्या म्हटलेले वाचलेले दिसत नाही!
ते तुम्हालाही लागू करते.
7 Aug 2010 - 3:47 am | पंगा
सहज यांना उद्देशून केलेल्या व्यक्तिगत स्वरूपाच्या विधानाची दखल घेण्याचे काही कारण अथवा गरज वाटली नाही.
धन्यवाद.
7 Aug 2010 - 3:07 am | आमोद शिंदे
फोटो वरुन लोकं इतकी तारीफ कशी काय करतात हा मलाही पडलेला प्रश्न आहे. फोटोत दिसणारा पदार्थ चवील खारट, तूरट, बेचव कसाही असू शकतो. प्रत्यक्ष चाखल्याशिवाय दाद कशी द्यायची?
गणपाने घरी स्वयपाकाला बाई ठेवली असून फोटो काढायला नोकर ठेवला आहे असे असू शकते. तरीही लोकांचे प्रतिसाद आपले बदाबदा गणपा क्या बात है असे येतात त्याला काहीच अर्थ नाही. किंवा चवीला ते प्रकार इतके बेचव असावेत की फोटो काढून झाले की गणपा नाक्यावरच्या गाडीवर भजी चापत असावा.
(संपूर्ण प्रतिसाद ह.घ्या)
7 Aug 2010 - 3:42 am | गणपा
=)) =))
जय भिम शिंदे साहेब.
आज वर सगळ्या मिपाकरांना मुर्ख बनवत आलोय. पण तुम्ही पहिलेच शहाणे बुवा.
कस एका फटक्यात पकडलत. मान गये आपकी पारखी नझर को.
=)) =))
अरे हो तुमच म्हणण हलकेच घेतल आहे हं ;)
7 Aug 2010 - 4:55 am | आमोद शिंदे
सगळ्या मिपाकरांना मुर्ख बनवत आलोय.
पिवळे पितांबर, गाईचे गोमुत्र इ.इ. झाले की इथे.... (पुन्हा एकादा हलके घ्या!)
7 Aug 2010 - 5:10 am | पंगा
:)
थोडक्यात, 'हलके घ्या' हा वाक्प्रचार म्हणजे आधी थोबाडीत मारून मग आगाऊ 'सॉरी' म्हणण्याचा (किंवा आगाऊ 'सॉरी' म्हणून थोबाडीत मारण्याचा) प्रकार असावा काय, यावर विचार करतोय.
(एवढे थोबाडीत मारायचे ठरवलेलेच असेल, तर मग 'सॉरी' तरी कशाला म्हणायचे? आणि तेही आगाऊ, in anticipation? सरळ ठेवून द्यावी, आणि मोकळे व्हावे! असो.)
टीप: हा प्रतिसाद श्री. आमोद शिंदे यांच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने दिलेला असला, तरी तो श्री. आमोद शिंदे यांना उद्देशून नाही. या प्रतिसादातील विधाने ही साधारण विधाने आहेत.
7 Aug 2010 - 5:14 am | आमोद शिंदे
ह.घ्या म्हणजे कडू औषधाला साखरेचे आवरण ही अधिक चपखल अॅनॉलॉजी आहे.
"माफ करा, तुम्ही मूर्ख आहात! "* असे प्रतिसादात लिहिणे म्हणजे तुमची अॅनालॉजी.
*हे केवळ उदाहरण आहे. अर्थातच ते पंगा ह्यांना उद्देशू नाही.
7 Aug 2010 - 5:28 am | पंगा
'ह. घ्या' या वाक्प्रचाराचा मूळ उद्देश जरी कडू औषधाला साखरेचे आवरण* लावणे हा असला, तरी कालांतराने त्यास आधी (किंवा आगाऊ) सॉरी म्हणून थोबाडीत मारण्याचे स्वरूप आले असावे, आणि पुढे मूळ अर्थ लुप्त झाला असावा, असा कयास आहे.
पण तरीही, point well taken. (विशेषतः दुसरा.)
* हा प्रकार 'पाककृती' म्हणून क्वालिफाय होऊ शकेल काय?
7 Aug 2010 - 5:13 am | Nile
आता कळलं तुम्ही मिपा का जॉईन केलंत ते.
7 Aug 2010 - 5:17 am | आमोद शिंदे
थोडे गंभीरः मिपा जॉइन केले निव्वळ गप्पा हाणायला.
7 Aug 2010 - 3:49 am | पंगा
खाद्यपदार्थांच्या, फळांच्या जाहिरातींतील चित्रांत दिसणारे आकर्षक पदार्थ (ज्यांची जाहिरात करायची असते ते) हे अनेकदा खरे नसून मेण, प्लॅस्टिक अथवा इतर पदार्थांपासून बनवलेले आणि अतिरंजित असतात, असे कोठेसे वाचले होते, त्याची आठवण झाली.
तसेही रंगीत फोटोंत अगदी वाटेल ते नाही तरी बरेच काही चांगले / आकर्षक दिसू शकते असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
(टीपः सदर फोटोतील खाद्यवस्तू ही मी स्वतः चाखलेली नसल्याकारणाने ही टिप्पणी सदर फोटोतील विशिष्ट खाद्यवस्तूला लागू नाही. निदान, तशी ती असल्यास त्याबद्दल मला वैयक्तिक माहिती नाही. ही एक साधारण टिप्पणी आहे. कृपया संपूर्ण प्रतिसाद सर्वांनी हलका घेणे.)
7 Aug 2010 - 3:09 am | आमोद शिंदे
>>एकाच प्रतिसादात एखाद्याला झाडावर चढवणे आणि खाली उतरवणे याचे बक्षीस द्यायचे झाले तर ते तुम्हालाच द्यावे लागणार
हाहाहाहा...सहज चढणे सहज उतरणे!!
7 Aug 2010 - 3:28 am | पंगा
...What goes up, must come down??????
6 Aug 2010 - 10:53 am | दिपाली पाटिल
छान दिसतायत फिश-केक्स पण तो लाल सॉस काय आहे?
6 Aug 2010 - 11:20 am | स्वाती दिनेश
चित्रा, सॉल्लिड्डच! त्यातून घरात असलेल्या पदार्थात भागवाभागवी करुन केले आहेत त्यामुळे तर अजूनच छान!!
@ गणपा-केक कॉप्लिमेंटबद्दल धन्यवाद,:)
स्वाती
6 Aug 2010 - 12:01 pm | परिकथेतील राजकुमार
शाकाहारी असल्याने नुसतेच चान चान असे म्हणतो.
6 Aug 2010 - 12:17 pm | नंदन
छान पाकृ.
>>> आमच्याकडे जास्त पसंती कालवणाला आहे
--- अगदी, अगदी. मात्र 'वी हॅव बिगर फिश टू फ्राय' [दुवा], हे वाक्य अशा वेळी उपयोगी पडावं ;)
6 Aug 2010 - 1:03 pm | गणपा
=)) =))
लिंकाळे गुर्जी दंडावत. :)
(स्वगतः बचके रै ना रे गणा, हा नंदुशेट कधी कसला 'दुवा' देईल नेम नाही.)
.
6 Aug 2010 - 3:18 pm | जागु
एकदम मस्त. करुन पहायला हवा हा केक.
6 Aug 2010 - 5:49 pm | चित्रा
सर्वांचे आभार.
अदिती - अशा प्रकारे सोललेले केळफूल मिळाले (किंवा ते सोलण्याची हौस असली तर) त्याचे कटलेट/वडे करून बघ. कडधान्यांचेही छान लागेल असे वाटते. कदाचित मसाले थोडे अधिक घालावे लागतील. आणि आकार धरून ठेवायला मुगासारखे काहीतरी लागेल असे वाटते.
दिपाली - लाल सॉस घरात एक आंबटगोड सॉस होता, तो आहे. (तो मला तेवढासा आवडत नाही, पण कुठचाही थाई आंबटगोड सॉस चालेल)