मराठी अल्बम

आमोद शिंदे's picture
आमोद शिंदे in काथ्याकूट
4 Aug 2010 - 3:55 am
गाभा: 

माझा एक मित्र अतिशय सुंदर कविता करतो. स्वभाव बुजरा असल्याने ह्या कविता कुठेही प्रकाशित केलेल्या नाहीत. पण खरंच सुरेख कविता आहेत आणि मी शेवटी त्याला संगित देऊन त्याचा म्युजिक अल्बम बनवण्यासाठी प्रवृत्त केले आहे. आता पुढचा प्रश्न आहे हे कसे जमवायचे. मिपावर बर्‍यापैकी कलाकारांची उठबस असते, मिपाकर प्राजु ह्यांनी नुकताच अलबम प्रकाशित केला आहे, तेव्हा हा प्रश्न इथेच मांडायचा ठरवले.

कवितांना संगीत देऊन त्याचा बर्‍यापैकी निर्मिती मूल्ये असणारा अल्बम काढण्यास साधारण किती खर्च येतो.

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

4 Aug 2010 - 5:00 am | पाषाणभेद

>>> आणि मी शेवटी त्याला संगित देऊन त्याचा ...
म्हंजी तुमी संगीतकार हाये का? आन आसलात तर तुमची बी लय वळख आसलं नवं या फिल्डमधी. मंग जमवा एकदाचं आन आमालाबी आयकू द्या तुमच्या दोस्ताच्या कविता.

मधुशाला's picture

4 Aug 2010 - 5:47 am | मधुशाला

शब्दांचा क्रम चुकला असावा..
संगित देऊन त्याचा म्युजिक अल्बम बनवण्यासाठी मी शेवटी त्याला प्रवृत्त केले आहे.. असं वाचलं तर अर्थ लागतोय. :) :) :)