रावण पिठल्यावर उतारा...मलाई मिंट स्मूदी (लस्सी ची इं.आवृत्ती)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture
जाई अस्सल कोल्हापुरी in पाककृती
4 Aug 2010 - 12:31 am


साहित्य :
१ कप गोड घट्ट दही
२-३ चमचे साखर
पुदिन्याची पाने -७-८
बर्फ ३-४ क्यूब्ज
घरगुती साय २-३ चमचे
किंवा whipping cream किंवा व्हिप्ड क्रीम स्प्रे

कृती :
अगदी बारीक चिरुन घ्या.
दही + साखर + चिरलेला पुदीना मिक्सर मध्ये घ्या.
साखर विरघळेपर्यंत ब्लेंड करा.
बर्फ घालुन थोडा वेळ फिरवा.
ग्लास मध्ये घ्या.
त्यावर आपली मस्त घरगुती दाट साय घाला.
किंवा क्रीम घाला.
एखाद्या पुदीन्याच्या पानाने मस्त गार्निश करा.
आपल्या आवडत्या जागी जा जिथे कोणी त्रास देणार नाही.
आणि निवांत पणे स्मूदी चा / लस्सी चा आस्वाद घ्या... आणि माझी पण आठवण न चुकता काढा.

प्रतिक्रिया

प्रभो's picture

4 Aug 2010 - 12:38 am | प्रभो

फोटो??????????? :#

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

4 Aug 2010 - 2:40 am | जाई अस्सल कोल्हापुरी

अपलोड करायचा प्रयत्न करते आहे.. होतच नाहिये हो. धीर धरा... मदतही केली तर चालेल.

टिउ's picture

4 Aug 2010 - 2:45 am | टिउ

आवडत्या जागी ठीक पण आवडत्या स्त्री/पुरुषासोबत बसुन आस्वाद घ्यावा की एकटं बसुन ते सांगितलं नाहीत...

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

4 Aug 2010 - 3:00 am | जाई अस्सल कोल्हापुरी

...आवडत्या खाउ बद्दल विचारशील तर ..... काही काही खाउ असे असतात ना ते आपले आपण आणि तो खाउ येवढ्यातच एन्जॉय करायचे असतात. उदा.चॉकलेट आणि असा कोणताही पदार्थ कि ज्यात डार्क चॉकलेट आहे(चॉकलेट मूस, क्रोझंट्स इ.).माझ्या घरातला एक कोपरा मी निव्वळ तेवढ्यासाठी राखुन ठेवला आहे.कोणी व्यत्यय आणत नाही असा कोपरा. फक्त मी आणि चॉकलेट क्रोझंट..... wallah!
या अर्थानी आवडती जागा आणि कोपरा सांगितला होता.
काय बाई... कोणाचा जीव कशात तर कोणाचा कशात! :)

सहज's picture

4 Aug 2010 - 7:12 am | सहज

आता रावण पिठल्यावर उतारा असे लिहल्याने व आपल्या आवडत्या जागी जा जिथे कोणी त्रास देणार नाही असल्याने ही स्मुदी नक्की अ‍ॅज ए ओरल मेडीकेशन की.... ???????????????????

(उर्मट) सहज

पर्नल नेने मराठे's picture

4 Aug 2010 - 10:46 am | पर्नल नेने मराठे

घरगुती साय २-३ चमचे...
कुठले दुध वापरतेस तु?

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

4 Aug 2010 - 3:30 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

अगं...ते घरगुती सायीचे सुख मायदेशी राहणार्‍या नशिबवंतांसाठी होते. आपल्या सारख्या वाळवंटात राहणार्‍यांसाठी whiippimg cream किंवा whipped cream spray हा option दिला आहे.

अब् क's picture

4 Aug 2010 - 12:52 pm | अब् क

गोकुल वापरत असेल

स्वछंदी-पाखरु's picture

4 Aug 2010 - 2:39 pm | स्वछंदी-पाखरु

अहो हल्ली चितळे पण दुबईला येउन दुध टाकुन जातात म्हणे....

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

4 Aug 2010 - 3:36 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

अशी जिवघेणी थट्टा ?
माझ्या सायवेड्या मनाला असंख्य यातना झाल्या ना. २ सेकंदासाठी मन असे शहारले.अंगावर रोमांच उभे राहिले के व्वा! खरंच की काय? आणि मग नावाकडे लक्ष गेले.
अस्ला दुष्ट नाठाळपणा तुच करु शकतोस.