मैद्याच्या साध्या आणि सोप्या चकल्या......

शरयुप्रितम२०१०'s picture
शरयुप्रितम२०१० in पाककृती
3 Aug 2010 - 12:27 pm

साहित्य:-
मैदा - २ वाट्या
तिखट:- चवीनुसार
हळद:- १ छोटा चमचा.
तीळ :- १ छोटा चमचा
ओवा:- आवडीप्रमाणे
धनेजिरे पूड :- २ छोटे चमचे
वाटलेलं लसून:- १ छोटा चमचा
मीठ:- चवीनुसार
तळणासाठी तेल, आणि एक मऊ कापड

कृती:-
पहिले कोरडा मैदा एका मऊ कापडामध्ये बांधून घ्यावा. कुकर मध्ये पाणी टाकून बांधलेले मैदा एका भांड्यात ठेवावा आणि वरून झाकण ठेवाव. तीन शिट्या झाल्या कि मैदा काढुन घ्यावा... कुकर मध्ये वाफ दिल्याने मैदा छान मऊसर होतो. मग त्यात सगळे जिन्नस आवडी प्रमाणे एकत्र करावे... आणि मग त्यात गरम तेलाचा मोहन पण घालावा. नंतर पाणी टाकून आपल्या नेहमीच्या चकाल्यांचे पीठ जसे मळतो तसे मळून घ्यावे. मिश्रण सोऱ्यात भरून चकल्या कराव्या आणि गरम तेलात तळून घ्याव्या....
ह्या चकल्या थोड्या झणझणीतच छान लागतात आणि खूप दिवस टिकतात pan.....
सोबत फट्टू पण आहे....

प्रतिक्रिया

शरयुप्रितम२०१०'s picture

3 Aug 2010 - 12:30 pm | शरयुप्रितम२०१०

शरयुप्रितम२०१०'s picture

3 Aug 2010 - 2:45 pm | शरयुप्रितम२०१०

छान अहेत हो चक्ल्या...

-प्रितम

शरयुप्रितम२०१०'s picture

3 Aug 2010 - 12:33 pm | शरयुप्रितम२०१०

उपाय सुचवा.....

शेखर दिवसे's picture

3 Aug 2010 - 1:25 pm | शेखर दिवसे

फोटो कुठ आहेत

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

3 Aug 2010 - 6:10 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

चकली?....
अगदी दुखर्‍या जागेवर बोट ठेवलंत हो. (असं मी का म्हणते आहे ते ओघानी कळेलच)
पण मला सांग ही खरंच जमते का? आणि खुसखुशीत होते का?
१०० AED च्या स्टँप पेपर वर लिहुन देणार असशील तर करुन पाहते.

शरयुप्रितम२०१०'s picture

4 Aug 2010 - 1:08 pm | शरयुप्रितम२०१०

हो जमते कि...
आणि का नाही जमणार? तू तुझ्या पाककृती न करताच देते कि काय?????? :-)
आणि १०० AED च्या स्टंप वर देण्यासाठी हि पाककृती आहे दागिना नव्हे....
(कळले असेल हि अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही ना जाई ताई???)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

4 Aug 2010 - 5:24 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

अगं,दात हा किती मौल्यवान असतो ते "दंतकथा" भोगलेल्यानाच कळू शकते.
आणि ..काही पाकृ असतात कि ज्या फक्त वाचुन सगळ्यांनाच तशाच्या तश्या जमतात. काहींना बनवण्यात स्वतः चा हातखंडा/स्किलसेट लागतो. उत्तम उदा.सुरळीच्या वड्या किंवा चकल्या! प्रमाण ,कृती हे जरी जसंच्या तसं फॉलो केलं तरी कधी कधी बिघडतात .त्या जमण्यासाठी अंदाजच यावा लागतो.फक्त पाकृ वाचुन करण तसं अवघड असतं. या अर्थाने जमतात का हे विचारले होत की हीच पद्धत वापरली तर तु केल्या तशाच जमतात का!
साधा सरळ प्रश्न होता..गैरसमज नको!
<< तू तुझ्या पाककृती न करताच देते कि काय?????? >>
(चथेइ चलाम चराच्याचो चनातम चदणंचां चही चणम्ह चका चठवलीआ चयका चहितमा) ;)
...चंम्मतग चरतियेक..
मजेत घे..!

शरयुप्रितम२०१०'s picture

9 Aug 2010 - 11:39 am | शरयुप्रितम२०१०

chakali