काय जेवलात?

मनस्वी's picture
मनस्वी in काथ्याकूट
4 Apr 2008 - 1:44 pm
गाभा: 

काहीतरी विचित्र विषय वाटतोय ना?
तर सांगायचे आहे की आज सकाळी / रात्री तुम्ही काय जेवलात.
जेवण कोणी बनविले / कुठे जेवलात हे सांगायचं की नाही ही तुमची मर्जी.
त्यायोगे कळेल, मिसळपावकरी पौष्टीक आहार घेतात की नाही.
किंवा आपल्यालाही निरनिराळे पर्याय माहित होतील.

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 1:49 pm | मनस्वी

बटाटा भाजी (काचर्‍या आणि उकडलेल्या बटाट्याची सोडून तिसरी असते ती - थोडी रश्याची, दाण्याचा थोडा कूट आणि थोडा गरम मसाला टाकलेली), पोळी, लिंबाचं गोड लोणचं.

आनंदयात्री's picture

4 Apr 2008 - 1:51 pm | आनंदयात्री

फुड कोर्टात जेवलो आम्ही. जेवण आचार्‍याने बनवले असणार.

आम्ही हे जेवलो:

१. दोन तीन पोळ्या
२. फ्लॉवरची भाजी, कशाचीतरी उसळ आणी कशाचेतरी वरण
३. काकडी, टोमॅटो, कांदा याच्या चकत्या

विसोबा खेचर's picture

4 Apr 2008 - 1:52 pm | विसोबा खेचर

मी आज शेंगा-वांगी-बटाट्याची भाजी आणि गरमागरम ज्वारीची भाकरी जेवलो आहे. त्यांतर ताकभात आणि सोबत माळेतला कांदा!

आपला,
(तृप्त!) तात्या.

स्वाती दिनेश's picture

4 Apr 2008 - 2:20 pm | स्वाती दिनेश

तात्या ..अरे इथे कुठली रे माळ..आणि कांदा... :(
आता मस्त माळेचे कांदे यायला लागले असतील ना,उन्हाळयाची काहिल त्या माळेतल्या कांद्याने जरा शमते नाही..
माळेतला कांदा चौकोनी चिरुन हिरवी मिरची तेल लावून भाजून चुरडून घालून दह्यात कालवायचे आणि चवीला मीठ...अहाहा.. भाकरीबरोबर खाऊन पहाच..
स्वाती

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 2:26 pm | मनस्वी

पाणीच पाणी चहुकडे!
करून बघीन म्हणते!

धमाल मुलगा's picture

4 Apr 2008 - 2:09 pm | धमाल मुलगा

कशाचीतरी उसळ आणी कशाचेतरी वरण
सहमत रे आ॑द्या!

मी नेहमीप्रमाणे
२-३ वात्तड पोळ्या, व्हेज कोल्हापुरीच्या नावाखाली केलेला काल-परवाच्या उरलेल्या भाज्या॑चा लगदा, आलू मिर्च चटपटा नावाचा बटाट्याच्या फोडी बुळबुळीत करुन केलेला उपद्व्याप, चिकन६५, ३-३ ग्लासभरुन ताक, म्हैसुरपाक आणि चिक्क्कट्ट भात!!!!

-(अतृप्त) ध मा ल.

आनंदयात्री's picture

4 Apr 2008 - 2:15 pm | आनंदयात्री

चामारी त्यांच्या .... ते नुसते अर्धवट उकडवलेले बुळबुळीत बटाटे सगळ्या भाज्यांच्या कॉमन ग्रेव्हीत टाकुन साले आलु मिर्च म्हणतील नाही तर आलु अजुनकाहीतरी म्हणतील ... एखाद्या दिवशी जर गावलं ना बेणं ...

प्रभाकर पेठकर's picture

4 Apr 2008 - 2:19 pm | प्रभाकर पेठकर

फार वाईट वाटलं वाचून. खाण्या -'पिण्या' बाबतीत कोणाचे हाल झालेले पाहवत नाही. तिन ग्लास ताक म्हणजे नुसते स्वर्गसुख.

धमाल मुलगा's picture

4 Apr 2008 - 2:25 pm | धमाल मुलगा

तिन ग्लास ताक म्हणजे नुसते स्वर्गसुख.

उदरभरण नोहे, जणिजे यज्ञकर्म....
पोटात काहीतरी भर नको का टाकायला? म्हणून ३ ग्लास ताक, तो हलकट देतच नव्हता, मग भा॑डलो त्याच्याशी. म्हणल॑ "मी भूकेन॑ मेलो तर ब्रम्हहत्येच॑ पातक तुझ्या डो॑बल्यावर!"

बाकी आपल्याला ताक लै आवडत॑, म्हणून भागवून नेल॑.

-(दुर्दैवी) ध मा ल.

प्रभाकर पेठकर's picture

4 Apr 2008 - 2:32 pm | प्रभाकर पेठकर

उदरभरण नोहे, जणिजे यज्ञकर्म....

अरे व्वा! हे तर माझ्या व्यवसायाचे ब्रिदवाक्य आहे.

'यज्ञकर्म कॅटरर्स'

प्रोप्रा. प्रभाकर पेठकर.

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 2:28 pm | मनस्वी

मी बेंगलोरला असताना असाच अचाट आणि अजब पाककृती पचवल्यात!
मराठी माणसाचे जाम हाल होतात.

धमाल मुलगा's picture

4 Apr 2008 - 2:45 pm | धमाल मुलगा

आपल्याला तरी ब॑गळूरात काही वा॑धा झाला नाही बॉ!
मस्त आ॑ध्रा-थाळी घ्यायची...आणि मग....दिसल॑ की ओरबाड....दिसल॑ की ओरबाड!!!

मला गेली कित्येक वर्ष हाताने भात खाता यायचा नाही, म्हणून मी चमच्याने खायचो. कारण एकच बोट॑ बरबटतात आनि त्याची चारचौघा॑त लाज वाटते.
पण ब॑गळूरात गेल्यापासून तिसर्‍या दिवशी माझा भात ओरपायचा सराईतपणा बघून सगळी वेटर॑ माझ्याशी कुडमुडायला लागली होती!

ते...गडद चॉकलेटी / काळपट र॑गाच॑ लोणच॑ कुठल॑ ग॑? एकदम मस्त असायच॑.

- ध मा ल अण्णा येरकु॑टकर

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 2:48 pm | मनस्वी

लोणच्यांतले नक्की कोणते?

धमाल मुलगा's picture

4 Apr 2008 - 4:48 pm | धमाल मुलगा

नक्की नाव आठवत नाहीय्ये.
पण आ॑ध्रा-थाळीबरोबर हमखास असत॑च असत॑. कुठच्याशा गवताच॑ केलेल॑ असल्यासारख॑ दिसत॑ पण जब्बरदस्त लागत॑.
(आमच्या लेखी गवत हा शब्द 'पालक' सोडून इतर यच्चयावत पालेभाज्या॑पासून कॉ॑ग्रेस गवतापर्य॑त सगळ्यासाठी फिट्ट बसतो! )

- (विसराळू) ध मा ल.

प्राजु's picture

4 Apr 2008 - 7:01 pm | प्राजु

आंध्रामध्ये, लाल रंगाच्या आंबाडीचं करतात. एक्दम भारीच लागतं.
माझी एक मावशी मस्त करते.

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

प्राजू म्हणते तसं ते अंबाडीच्या भाजीचं करतात.
दही - भात - घोंगुरा पिक्कल म्हणजे दुपारी झोपायची तयारी!

चतुरंग

बरोब्बर चतुरंग... मी खात्रीने सांगु शकतो... माझी बायको तेलूगू आहे :) ... खवय्यांसाठी "प्रिया" चे लोणचे उत्तम मिळते ... दुसरे आंध्रात विशेष खाल्ले जाणारे लोणचे म्हणजे "आवकाया" - कैरीचे - आंब्याचे लोणचे ...
मुख्य आंध्रा म्हणजे कोस्ट्ल आंध्रामध्ये लोक नुसता भात आणि हे लोणचे खातात...

धमाल मुलगा's picture

7 Apr 2008 - 11:06 am | धमाल मुलगा

माहितीबद्दल धन्यवाद!!!

प्राजुताई, चतुर॑गराव,
ते लोणच॑ अ॑बाडीच॑ असत॑?????? एव्हढ॑ मस्त? खल्लास !!!
च्यामारी, एखाद॑ पोत॑भर आणून ठेवाव॑ म्हणतो :-))

बाकी दही + भात + घो॑गुरा = भर हापिसात माना टाकून पे॑गायचो मी!

मैत्र, मजा आहे तुझी!
तेलुगु बायको म्हणजे काय...लय भारी! माझी काकूपण तेलुगु आहे. क्काय एकेक पदार्थ बनवते...तिच्यामुळेच खर॑ तर अस्सल 'कापी' प्यायला शिकलो मी. पण ती कट्टर आहे यार. हैद्राबादची आहे तरी बिर्याणीच॑ नावही काढू देत नाही, करण॑ तर दूरच :-((

-(हावरट) ध मा ल.

छोटा डॉन's picture

7 Apr 2008 - 11:45 pm | छोटा डॉन

"बाकी दही + भात + घो॑गुरा = भर हापिसात माना टाकून पे॑गायचो मी!"
अहो शेठ हे काहीच नाही.

२ महिन्यापूर्वी आमची पण अशीच भोजनोत्तर विश्रांती ती पण डायरेक्ट डेस्क वर मान टेकवून चाललेली असताना आमचे "मेनेजर" साहेब अवतरले. त्यांना हे सर्व पाहून धक्का बसला [ आणि मला त्याला पाहून धक्का बसला ....]
मग नक्की काय झालं हे डिस्कस करण्यासाठी आम्ही "स्मोकिंग झोनमध्ये" गेलो. [ आतल्या गोटातली बातमी म्हणजे हे बेणं माझं 'सिगारेट पार्टनर' आहे ]. मग त्यानं विचारल "काय झालं ?". तोवर विचार करायला भरपूर वेळ मिळाल्याने मी गोष्ट तयार केली होती [ आपण कल्पनाविलास करायला हायगाई करत नसतो ]
मग मी सांगितलं की आमच्या "मलिका-ए-हिंदूस्थान' च्या कटकटीमुळे रात्री झोप झाली नाही. मग २ सिगारेट संपूस्तोवरच्या आमच्या डिस्कशन मधून "पोरी ह्या अशाच" हा अभ्यासपूर्ण निष्कर्श काढून आम्ही निघालो व मी सुटलो ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

स्वाती दिनेश's picture

4 Apr 2008 - 2:13 pm | स्वाती दिनेश

कोबीची मटार घालून भाजी,गाजराची कोशिंबिर,मूगाचे वरण (लसणीची फोडणी घालून),पोळ्या ,भात आणि दही.. असा काल रात्रीचा बेत होता.(आज रात्री पेठकरांची पावभाजी..:-))
स्वाती
राहता राहिलं जेवण कोणी बनवले?--- स्वयं पाक.. दुसरे कोण?

प्रभाकर पेठकर's picture

4 Apr 2008 - 2:21 pm | प्रभाकर पेठकर

आज रात्री पेठकरांची पावभाजी.

मन कृतकृत्य की काय म्हणतात तसे झाले. भरून पावले.

स्वाती दिनेश's picture

4 Apr 2008 - 2:31 pm | स्वाती दिनेश

अहो काय लाजवता उगाच? चीज पावभाजी सहीच झाली होती तुमच्या रेसिपीने..फक्त आज चेडर चीज नाही त्याऐवजी हॉलंड-गौडा चीज घालणार ते ही छान लागते, हे तुम्हाला सांगायला विसरले होते..(चेडर संपले आहे,तेवढेच आणायला बाहेर कोण जाणार?)
स्वाती
अवांतर- ते मिरचीचे भरीत ट्राय करून पहा..मस्त लागते. आणि तुम्हाला काय माळेतले कांदे सहज मिळतील..:-)

प्रभाकर पेठकर's picture

4 Apr 2008 - 2:14 pm | प्रभाकर पेठकर

चिकन कॅफ्रिअल अँड राईस....

स्स्स्स्स्स्स....! मझा आया..!

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 2:20 pm | मनस्वी

एकंदरीत काहींची मजा तर काहींची सजा!

धमाल मुलगा's picture

4 Apr 2008 - 2:20 pm | धमाल मुलगा

ह्या दुष्ट मनस्वीचा जाहीर निषेध!!!!

आमच्या खाण्या-पिण्याची इतकी वाईट्ट आबाळ होते आहे आणि ही क्रूर, असले काहीतरी विषय काढते आहे!
आणि तात्या गरमागरम भाकर्‍या काय चापताहेत, ताकभात काय, माळेतला का॑दा काय!!
हे कमी म्हणून स्वातीताईने लगेच वर्णी लावायलाच हवी का?
कोबीची मटार घालून भाजी
मूगाचे वरण (लसणीची फोडणी घालून)
तो॑डाला पाणी सुटून टेबलाखाली तळ॑ झाल॑ तळ॑ !!!!

गपा ना राव! आम्हाला घरच॑ खायला मिळत नाही म्हणून का अस॑?

-(हावरट) ध मा ल.

प्रभाकर पेठकर's picture

4 Apr 2008 - 2:23 pm | प्रभाकर पेठकर

निदान यादी तर करून ठेवता येईल, घरी गेल्यावर काय काय खायचे ह्याची....

आनंदयात्री's picture

4 Apr 2008 - 2:23 pm | आनंदयात्री

सहमत. निषेध .. निषेध .. निषेध !!

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 2:24 pm | मनस्वी

माझा तुझ्या कोमल मनाला दुखवायचा अजिबात उद्देश नव्हता...
अरे येवढच आहे तर शिकून घे ना स्वयंपाक!

आनंदयात्री's picture

4 Apr 2008 - 2:32 pm | आनंदयात्री

आज रातच्याला ये आमच्या गरिबाच्या खोलीवर .. आम्ही बी जमवलीत २-४ बोळकी तिथे .. अन काय जमेल तो डाळ भात शिजवुन खात असतो ... कधी कधी बीटाची कोशींबीर वैगेरे पण करुन बघतो ;) .. बर मुळ मुद्दा असा की तु ये .. थोडा स्वयंपाक करु .. दोन दोन घोट लिंबुपाणी पिउत ... जेवण करुत ... नंतर आंतरजालिय राजकारणावर हलकट्पणे यथेच्छ गजाली करुत... २-४ लोकांना शिव्या देउत .. २-३ गुप्त खबरा एकमेकांना देउत ... बोल काय म्हणतो ?

धमाल मुलगा's picture

4 Apr 2008 - 2:54 pm | धमाल मुलगा

बेष्टच रे!

नक्की... नक्की करु आपण हा 'कारेक्रम' !!!
पण माझी मदत तुला फक्त चिराचिरी आणि कापाकापीपुरतीच होईल बर॑! बाकी ते तिखटामिठाच्या अ॑दाजाच॑ आणि आपल॑ जोरात वाकड॑ आहे! हा॑ ! 'इतर तयारी' मध्ये आपण वाघ आहोत हे.वे.सा॑.न.ल. :-)))

नंतर आंतरजालिय राजकारणावर हलकट्पणे यथेच्छ गजाली करुत... २-४ लोकांना शिव्या देउत .. २-३ गुप्त खबरा एकमेकांना देउत ... बोल काय म्हणतो ?

हाण तिच्याआयला, ज ह ब ह र्‍ह्या !!!!

विसोबा खेचर's picture

4 Apr 2008 - 3:09 pm | विसोबा खेचर

नंतर आंतरजालिय राजकारणावर हलकट्पणे यथेच्छ गजाली करुत... २-४ लोकांना शिव्या देउत .. २-३ गुप्त खबरा एकमेकांना देउत ... बोल काय म्हणतो ?

कुणाला रे शिव्या देणार आहात? मी पण येऊ का?

की मलाच देणार आहात? :)))))

आपला,
(शंकेखोर!) तात्या.

आनंदयात्री's picture

4 Apr 2008 - 3:19 pm | आनंदयात्री

या ना तात्या ... तुम्ही यावे, मोजकीच दोन तीन ज्युनिअर टाळकी असतील, आमच्या पीसी वर तुमच्या आवडीचे एखादे गाणे लागलेले असेल, ग्लासांचा किणकिणाट चालु असेल, धमाल्या भाजी चिरत असेल, मी भात लावायच्या गडबडीत तुम्ही सांगितलेली भा़जी कशी बनवायची याचा विचार करत असेन. नंतर जेवण झाल्यावर तुम्ही मी धमाल्या आमच्या भारती विद्यापीठाच्या हिरवळीवर बसुन सुखा दु:ख्खाच्या २ गप्पा मारुत, तुम्ही आम्हाला २ अनुभवाचे बोल सांगताल, मुड बनलाच तर एखादी जुनी नाजुक आठवण सांगताल अन त्या अनुषंगाने एखादे दर्दभरे गाणे पण म्हणताल !!
अहो या तर खरे तात्या तुम्ही !

धमाल मुलगा's picture

4 Apr 2008 - 5:13 pm | धमाल मुलगा

काय वातावरणनिर्मिती केलीस रे गड्या!

तात्याबा, आता याच तुम्ही, आपण करुच हा बेष्टेष्ट कारेक्रम !!!!

प्रमोद देव's picture

4 Apr 2008 - 2:40 pm | प्रमोद देव

धमु अरे संत ज्ञानेश्वरांनी म्हटलंय ना? जो जे वांछिल, तो ते खाओ!
मग कुणी काही खाल्लं तर तू असा दु:खी होऊ नकोस. प्रत्येकाचे खायचे प्यायचे(म्हणजे "ते" नाही म्हणत मी..... आपले ताक रे)दिवस असतात तसे न खाण्याचेही दिवस असतात. सद्या न तुझे न खाण्याचे दिवस आहेत. लग्नानंतर आहेच मग नको म्हणशील इतके नवनवे खाणे! तेव्हा धीर धर.
आता माझेच बघ ना! मला आज जेवण बनवायचा कंटाळा आला तर मी चक्क पाणी(शुद्ध पाणी बरं का! रंगीत वगैरे आपल्याला चालत नाही) पिऊन मजा करतोय.
मजा करो यार! दुसर्‍यांच्या आनंदात आनंद मानायला शिक.(हे जरा अतीच होतंय नाही? )

भाई's picture

7 Apr 2008 - 11:10 am | भाई

मला ना, किनई, आपण ना, 'शिशुविहारा'त आहोत असे वाटू लागले गडे. तुम्ही मनस्वीतायडी आणि तात्यादाद्या आणि अपर्णातायडी या सगळ्यांना चिमटाच काढा म्हणजे समजेल.
- (न लाडावलेला)भाई

स्वाती दिनेश's picture

4 Apr 2008 - 2:24 pm | स्वाती दिनेश

तिकडे तात्याने माळेतला कांदा खाल्ला... आणि इकडे मला वडखळ फाट्यावरच्या माळा दिसायला लागल्या.. आता तात्याला सांगितलेली भरताची रेसिपी मी साधा कांदा घेऊन करणार..काय करणार मजबूरीका नाम.. साधा कांदा!
तू ही करुन पहा..सोपी आहे आणि सोपी असून चविष्ठ आहे,:)
स्वाती

विसोबा खेचर's picture

4 Apr 2008 - 2:27 pm | विसोबा खेचर

हा काथ्याकूट सुरू केल्याबद्दल मनस्वीचे अभिनंदन!

पेठकरसाहेब म्हणतात त्याप्रमाणे यातल्या पदार्थांची नांवे वाचून निदान एक यादी तर करून ठेवता येईल! मला वाटतं, हाच या काथ्याकुटाचा महत्वाचा फायदा!

तात्या.

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 2:30 pm | मनस्वी

असेच चविष्ट आणि मनोरंजक विषय इथे यावेत हीच इच्छा!

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 2:36 pm | मनस्वी

"आजची खादाडी " ढाब्यावरची झुणकाभाकरी खाईन म्हणते...

तात्या विंचू's picture

4 Apr 2008 - 2:42 pm | तात्या विंचू

२ पोळ्या, मेथी मटार मिक्स रस्सा भाजी, हराभरा कबाब्, व्हेज बिर्याणी, दाल आणि सफरचंदाची खीर....
सोबत कोशिंबीर ही.......

बाकी आमच्या ओफिसच्या कँटीन्चा जेवण झकास असते.......

(दाबुन खाल्ल्याने झोप आलेला....)
---तो मी नव्हेच

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 2:59 pm | मनस्वी

तो मी नव्हेच... अहो तो मी नव्हेच... झोपले वाटतं...

तात्या विंचू's picture

4 Apr 2008 - 3:56 pm | तात्या विंचू

आलो आलो....
कोनीतरी हाक मारतय अस स्वप्न पडल...
नशिब तुम्हीच होता.....
मला वाटल माझा मॅनेजर बोलावतोय........

आत्ताच उठलेला...
---तो मी नव्हेच

तात्या विंचू's picture

4 Apr 2008 - 4:14 pm | तात्या विंचू

अजुन एक राहिलच........

जेवण झाल्यावर एक कॉर्नेटो आइस्क्रीम......

विजुभाऊ's picture

4 Apr 2008 - 2:47 pm | विजुभाऊ

मनस्वी का उगाच आमचा जीव जाळतेस्...इथे प्रो़जेक्ट वर काम करताना वेळेवर जेवायची आठवण होत नाही म्हणुन रोज घरच्या शिव्या खातो.
डब्यात असले तर थन्ड भाजी आणि पोळ्या...अन कॅन्टीन मधे गेलो तर कसला तरी जाड भात , आणि भाज्यान्चे प्रयोग.
त्या दिवशी दम आलू घेतला...कॅन्टीन वाल्याने साध्या बटाट्याची भाजीज यालाच आजपासून दम आलू म्हणायचे असा दम देत वाढली.

शरुबाबा's picture

4 Apr 2008 - 2:55 pm | शरुबाबा

आतच ढाब्यावरुन दाल तड्का आणि तदुरि रोटि खाउन आलो.

विजुभाऊ's picture

4 Apr 2008 - 2:59 pm | विजुभाऊ

तदुरि रोटि खाउन आलो.

हे वाक्य लिहीले आहे तसे म्हंटले की सर्दी झाल्यासारखे वाटते. शरुबाबा शब्दांवर अनुस्वार दे रे बाबा

लिखाळ's picture

4 Apr 2008 - 3:06 pm | लिखाळ

काल रात्री (विवाहित) मित्राच्या घरी जेवण्याचा योग आला. त्यामुळे साग्रसंगीत जेवण झाले :)

गेल्या गेल्या 'जिंजर आलं '
मग थोड्या वेळाने झेक रिपब्लिक मध्ये बनलेली बिअर.

मग थोड्या वेळाने मुख्य जेवण-
- पनीर मसाला : पनीर चे छोटे तुकडे बेसन आणि मक्याच्या पिठात घोळवून तळलेले आणि मग त्याची टोमॅटो इत्यादीसहित भाजी.
- आलूमटर : बटाट्याचे मोठे तुकडे उकडलेले + मटार
- उत्तरभारतीय पद्धतीची डाळ (आमटी नव्हे ).
- भात

जेवणानंतर
स्ट्रॉबेरीच्या तुकड्यांवर बोरबॉन वॅनीला आईसक्रीम.

-- (तृप्त) लिखाळ.
जेवणाची आबाळ टाळण्यासाठी स्वयं-पाक हा एक उत्तम पर्याय आहे, मग तुम्ही जगाच्या पाठीवर कोठे ही असा! यावर आमचा ठाम विश्वास आहे.

ता.क.
आज दुपारी आम्ही केळं आणि काकडी-टोमॅटो-सअँडविच खाणार. रात्री पुन्हा चांगला स्वयंपाक करु !

-- (योजक) लिखाळ.
जेवणाची आबाळ टाळण्यासाठी स्वयं-पाक हा एक उत्तम पर्याय आहे, मग तुम्ही जगाच्या पाठीवर कोठे ही असा! यावर आमचा ठाम विश्वास आहे.

स्वाती राजेश's picture

4 Apr 2008 - 3:13 pm | स्वाती राजेश

आणि फाईड राईस सोबत स्प्रिंग रोल..
आज हा मेनु रात्री च्या जेवणाला...
फ्रायडे नाईट...

सृष्टीलावण्या's picture

4 Apr 2008 - 3:16 pm | सृष्टीलावण्या

आज ज्वारीची भाकरी, डाळींबीची उसळ, पोळी आणि शेंगदाण्याची कच्चे तेल घातलेली चटणी खाल्ले जेवणात.

>
>
आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना, हरिश्चंद्र ताराराणी डोम्बाघरी भरती पाणी...

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 3:26 pm | मनस्वी

ज्वारीची भाकरी आणि शेंगदाण्याची कच्चे तेल घातलेली चटणी म्हणजे जबरा! आणि कांदा पण हवा.

ध्रुव's picture

4 Apr 2008 - 3:20 pm | ध्रुव

मस्त खुसखुशीत सांडगे व बटाटे घातलेली गवारीची भाजी, दही, पोळी, भात.....

--
ध्रुव

प्रभाकर पेठकर's picture

4 Apr 2008 - 7:13 pm | प्रभाकर पेठकर

आयला मी चुकून 'लांडगे' वाचलं.... सॉरी..सॉरी.

इनोबा म्हणे's picture

4 Apr 2008 - 3:37 pm | इनोबा म्हणे

आज आम्ही 'हवा' खाऊन 'पाणी' पिले...:)

रात्री मस्तपैकी थंडगार बियर ढोसायची आणि मग बटर चिकन-तंदुरी रोटी वरपायची....

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

धमाल मुलगा's picture

4 Apr 2008 - 3:44 pm | धमाल मुलगा

धमु अरे संत ज्ञानेश्वरांनी म्हटलंय ना? जो जे वांछिल, तो ते खाओ!
मग कुणी काही खाल्लं तर तू असा दु:खी होऊ नकोस.....

च्च...चुकल॑च खर॑! असो, गुरुदेवा॑च्या आज्ञेनुसार मी जरा माझ॑ दु:ख सावरुन (की सावडून) घेतो!
काय करणार...स॑दीपशेठ खर्‍या॑च्या कवितेप्रमाणे 'मौनाचेही असतात हजार अर्थ...आयुष्याच्या ह्या वेड्या वेळी कळणार कुठुन' अशी काहीशी अवस्था आहे आपली!

तू ही करुन पहा..सोपी आहे आणि सोपी असून चविष्ठ आहे,:)
स्वाती

ह्म्म...करायलाच पाहिजे एकदा. निदान विका॑ताला तरी पोटात काहीतरी चा॑गल॑ जाईल !

- (सम॑जस) ध मा ल.

ब्रिटिश टिंग्या's picture

4 Apr 2008 - 3:53 pm | ब्रिटिश टिंग्या

आणि त्यावर चितळेंचे साजुक तुप अन् लिंबाच्या लोणच्याची फोड.....आहाहा!
दुपारी जेवताना गोरा साहेब बैलाच्या मांसाचे लचके तोडणार अन् आम्ही त्यासमोर डब्यात काल बनवलेला वरणभात खाणार. :(

(वैतागलेला) टिंग्या :(

प्रभाकर पेठकर's picture

4 Apr 2008 - 7:27 pm | प्रभाकर पेठकर

चितळेंचे साजुक तुप
चितळ्यांचे नाही हो....चितळ्यांकडचे म्हणा..

ब्रिटिश टिंग्या's picture

4 Apr 2008 - 9:20 pm | ब्रिटिश टिंग्या

पेठकरकाका,
आज एकदम फॉर्मात दिसताय!

- टिंग्या ;)

सहज's picture

4 Apr 2008 - 4:16 pm | सहज

सॅलेड [एव्होकॅडो, रोमन लेट्युस, लाल सिमला मिर्च, काकडी, टोमॅटो, ] ड्रेसींग - ऑलीव्ह ऑइल, लिंबु

लसणाची फोडणीवाली मुगाची डाळ, ब्राउन राईस.

कसे हेल्दी "वाटते"

पण दोन काजु कतल्या खाउन सगळे पुण्य गमावले......

आनंदयात्री's picture

4 Apr 2008 - 4:23 pm | आनंदयात्री

हे असे रोजचेच !
:)))))

आर्य's picture

4 Apr 2008 - 4:22 pm | आर्य

आपल्याला तरी ब॑गळूरात काही वा॑धा झाला नाही बॉ!
मस्त आ॑ध्रा-थाळी घ्यायची.....

झकास मजा येतीय ईकडे बेंगळूरात्........मसाला / बेण्णे दोसा, पुळीओगरे, पोंगल.....आणि मस्त फिल्टर कॉफी
तिही पावसात...धमाल पाऊस चालू आहे ईथे.
आता ऊद्या तर महाराष्ट्रात येणार आम्ही पाड्व्याला..........आधी जाऊन बटाटे वडा चापणार आणि घरी आईला साबूदाणा वडा / खिचडी करायला सांगणार

धमाल मुलगा's picture

4 Apr 2008 - 4:30 pm | धमाल मुलगा

काय आठवण करुन दिलीस रे!!!

फिल्टर 'कापी' प्यावी तर ब॑गळूरात (इतर कन्नड शहरा॑बद्दल फारशी माहिती नाहीय्ये). एकदम कात्तिल असते! आणि अय्य॑गार (की अय्यर?) बेकरीतली पेस्ट्री !!!

- धमालअण्णा येरकु॑टकर

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 4:39 pm | मनस्वी

त्यांच्या नानखटाईज पण मस्त असतात.

आर्य's picture

4 Apr 2008 - 4:43 pm | आर्य

अरे ते सोड.......ईकडे ऐक वारीयार नावाची बेकरी आहे, (राजाजीनगर ४ था ब्लॉक मधे) काय आईट्म असतात स्पेशली - प्लंम केक, फ्रुट केक / ब्रेड, खारी अरे......स्वर्ग .................च फक्त

मदनबाण's picture

4 Apr 2008 - 4:44 pm | मदनबाण

पोळ्या,फ्लॉवरची भाजी,शिक्रण (वेलची केळ्याची),कैर्‍या,मिरची,लिंबु यांचे मिश्र लोणचे(बेडेकर-केप्र),पालक घालुन केलेली आमटी हे सर्व पदार्थ आज सकाळी जेवताना माझ्या पानात आमच्या मातोश्रींनी वाढले होते.

अत्ता चहा बटर खात खात प्रतिक्रिया लिहुन मोकळा झालो.....

(आईच्या हातच अमृत चाखणारा)
मदनबाण

आनंदयात्री's picture

4 Apr 2008 - 4:53 pm | आनंदयात्री

आम्ही उद्यापासुन ३ दिवस असेच काय काय हाणणार मी ! घरी चाल्लोय.

मीनल's picture

4 Apr 2008 - 5:59 pm | मीनल

आम्ही काल रात्री -
पंमकीन सूप प्याले .
नंतर लाल भोपळ्याची भाजी ,लाल भोपळयाचे रायतं,पोळी (साधीच होती गव्हाच्या पीठाची.)
डेसर्ट --खीर अर्थातच लाल भोपळ्याची.

अगदी `हॅलोविन` पार्टी असल्याचा आनंद मिळाला.

काय मोठ्ठा मिळाला होता लाल भोपळा.
अजून ही आहे शिल्लक फ्रिज मधे.

प्रभाकर पेठकर's picture

4 Apr 2008 - 7:16 pm | प्रभाकर पेठकर

म्हणजे फक्त 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' राहीले......

स्वाती राजेश's picture

4 Apr 2008 - 7:37 pm | स्वाती राजेश

उरलेल्या भोपळ्याच्या घार्‍या (घारगे) कर. ८ दिवस टिकतात, तेव्हा भोपळावीक साजरा कर.:))))))

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 7:48 pm | मनस्वी

झालंच तर घरातील लहान मुलांना चल रे भोपळ्या टुणुक टुणुक ची गोष्ट सांगा.
भोपळ्यांच्या बियांचा काही पदार्थ असेल तर तो करा (भाजून खातात असे ऐकले आहे).
भोपळ्याच्या सालीचा काही पदार्थ असेल.. चटणी वगैरे (जशी दोडक्याच्या सालीची करतात) तर तो करा.
राहीलेल्या भोपळ्याच्या भाजीची नाष्ट्याला कटलेट / धिरडी करा.
भोपळ्याची कोशिंबीरही उत्तम होते दही घालून. माझी फेव्हरेट आहे.

सध्यातरी येवढेच पर्याय आठवले :)

तर वाळवून तंबोरा करा...:-)

भोपळा एक कल्पवृक्ष असा निबंध लिहायला हरकत नाही.

प्रभाकर पेठकर's picture

5 Apr 2008 - 12:19 pm | प्रभाकर पेठकर

निबंध लिहायला हरकत नाही.

नीट जमला तर ठीक आहे नाहीतर गुरूजी द्यायचे अजून एक ............'भोपळा'.

आणि छडी घेऊन मागे लागले तर म्हणावे लागेल 'अरे! भोऽऽऽ पळा......'

वरदा's picture

4 Apr 2008 - 7:02 pm | वरदा

भेंडीची भाजी, पोळ्या, फ्लॉवर बटाटा, कांदा, सिमला मिरची रस्सा.. उरलेल्या पोळ्या आज डब्यात..रात्री काय करावं प्रश्न पडलाय्...एवढ्या रेसिपी दिसतायत एखादी करेन म्हणते...भाकरी खायचा किती मूड आलाय पण इथलं पीठ इतकं जुनं असतं भाकर्‍या तुटतात्..त्यात कणीक पण घालून पाहीली तर्री तेच....
भाकरी, वा.ग्याची भाजी, डाळि.ब्यांची उसळ, खूप वाट्या ताक.... ह्यावर्षी भारतात गेल्यावर खायच्या गोष्टींची यादी करतेय.....इथे तिथल्यासारखं ताक बनवता येईल का घरी?

अवांतरः म्हशीच्या गोठ्यातून आणलेल्या दुधाचं आणि गोकुळच्या दुधाचं ताक वेगळं लागतं त्या गोठ्यातल्या दुधाच्या केलेल्या ताकाची चव अप्रतिम ती कशालाच येत नाही....

प्राजु's picture

4 Apr 2008 - 7:10 pm | प्राजु

मी भारतात गेल्यावर पहिले १० दिवस मस्त पैकी गरम गरम तांदूळाची/ज्वारीची भाकरी आणी घट्ट दही... त्यासोबत लसूण चटणी आणि मस्तपैकी आईच्या हातची भरल्या वांग्याची (हिरव्या)भाजी ... हेच खाणार आहे. नंतरचे काही दिवस.. आमरस आणि पोळी.... पोळी आणि आमरस... सगळ्या परदेशस्थ मिसळपावकरांच्या नावनेही खाईन आमरस. ... आठवण काढत काढ्त.
मग कोकणांत जाणार आहे. आणि तिथे आत्याच्या घरच्या डाळींब्यांची उसळ, घरच्या फणसाची .. घरचाच नारळ घालून केलेली भाजी.. घरच्याच कोकमचं सरबत. आणी पुन्हा घरचेच हापूस आंबे...तेव्हाही तुम्हां सगळ्या मंडळींची आठवण काढेन हो...!

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

प्रभाकर पेठकर's picture

4 Apr 2008 - 7:19 pm | प्रभाकर पेठकर

कृपया आपला, भारतातला, संपर्क क्रमांक द्यावा ही विनंती.

पिवळा डांबिस's picture

5 Apr 2008 - 1:19 pm | पिवळा डांबिस

:))

प्राजु's picture

4 Apr 2008 - 7:21 pm | प्राजु

खरं तर.. पुण्यात मी १४ एप्रिल ला पोहोचेन. तेव्हा प्रभाकर पंत तुमची गाठ घेण्याचाही विचार आहे.. बघू कसं काय जमतं ते..

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

प्रभाकर पेठकर's picture

4 Apr 2008 - 7:29 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद.

माझा संपर्क क्रमांक :(+९१) ९८५०५ ८३००५

रामदास's picture

4 Apr 2008 - 7:56 pm | रामदास

झासी रस्सा --दुपारचा कमळ काकडिची सुखी भाजी --रतलाम शेव -चविला पराठा .नो भात

प्रशांतकवळे's picture

4 Apr 2008 - 8:29 pm | प्रशांतकवळे

आज मस्तपैकी कोंबडीचा रस्सा (थोडा ति़खट) व भात असा मेनू झाला.. आता स्वयंपाक जमायला लागलाय..

प्रशांत.

व्यंकट's picture

4 Apr 2008 - 10:19 pm | व्यंकट
पिवळा डांबिस's picture

5 Apr 2008 - 12:57 pm | पिवळा डांबिस

आम्ही आपले आज कसाबसा टेंपूरा ( पिठीसाखर घातलेली कोलंबीची भजी), सुशी (कच्चा मासा, कुठ्ला होता देव जाणे!) आणि ढिकळं असलेला भात खाल्ला!!
नशीब गां* तो क्या करेगा पांडू?:))
-डांबिसकाका

भडकमकर मास्तर's picture

7 Apr 2008 - 12:31 am | भडकमकर मास्तर

आम्रखंड आणि गुलाबजाम खाल्ले आज.....आता फार झोप येतेय...

मनस्वी's picture

7 Apr 2008 - 11:19 am | मनस्वी

केळं घालून शिरा केलेला.
आणि शुक्रवारी चिकन शोरबा, चिकन रेशमी कबाब, चिकन ढाबा, मुर्ग मलई. :)

चंबा मुतनाळ's picture

7 Apr 2008 - 11:53 am | चंबा मुतनाळ

मी आज एक कप नूडल्स आणि रस्त्यावर बनवलेला अंडा पराठा खाल्ला. इथे चीनमधल्या छोट्या गावात ना Mcdonalds ना ऊडूपी!! आणि मा़झी चिनी हाटेलात जायची हिम्मत नाही होत बाबा! आता पुढच्या रविवारी घरी जाऊन (माझ्या) बायकोच्या हातची भाजी भाकरी खाईन.

नसनखवडी's picture

7 Apr 2008 - 12:02 pm | नसनखवडी

खास आग्री पेशल काळ्या खेकड्याचा रस्सा आनी मऊ मऊ तांदळाची भाकरी.

प्रियाली

प्रभाकर पेठकर's picture

7 Apr 2008 - 12:45 pm | प्रभाकर पेठकर

खास आग्री पेशल काळ्या खेकड्याचा रस्सा ....

पाककृती द्या कीऽऽ!

आग्री पाकसिद्धीबद्दल मनात बरेच कुतुहल आहे. ठाणे - घोडबंदर रस्त्यावर 'आग्री फुड' अशी पाटी जाता-येता दिसते. पण अजून योग आला नाही. असो.

पाककृतींच्या प्रतिक्षेत.

आर्य's picture

9 Apr 2008 - 1:01 pm | आर्य

झकास ! मिसळ खाल्ली यंदा कोकणात................
ऐका धरगुती समारंभा करीता रत्नागिरीला जाण्याचा योग आला
तेव्हा आमचे खवैये काका आम्हाला सकाळी सकाळी मिसळ खायला घेऊन गेले
राधाकृष्ण सिनेमा समोर.........गांधीची मिसळ.........दत्त कॅफे, रत्नागिरी....्ई मिसळ सोडू नकाच

बाकी जेवायला म्हणाल तर मोदक, बटाट्याची सुकी भाजी, पुरी आणि........वरण भात (माझे आवडते पदार्थ)
बाकी बरचं काही होत आणि खाल्लं पण .............यावर ताव मारला
खवैया - आर्य