लाल भोपळ्याचा हलवा

शरयुप्रितम२०१०'s picture
शरयुप्रितम२०१० in पाककृती
2 Aug 2010 - 2:31 pm

साहित्य:-
किसलेला लाल भोपळा २ वाट्या
साखर १ वाटी
दूध, गरजेनुसार
बदामाचे काप

कृती:-
प्रथम भोपळ्याचा किस छान तुपावर भाजून घ्यावा. थोडा रंग बदलल्या वर तयार हळूहळू दूध घालाव. दूध आटत आल कि त्त्यात आवडीनुसार साखर टाकावी....थोडा गार झाल कि वरून बदामाचे काप घालावे....

प्रतिक्रिया

मस्त !! फटु पण टाकला असता तर खाण्यालायक आहे की नाही हे समजले असते.

प्रभो's picture

2 Aug 2010 - 6:54 pm | प्रभो

असेच म्हणतो.

शरयुप्रितम२०१०'s picture

2 Aug 2010 - 3:39 pm | शरयुप्रितम२०१०

अहो आम्ही मिपावर नवीनच आहोत....
आता मिपाकरांना फट्टू शिवाय पाककृती आवडतच नाही म्हटल्यावर पुढल्या वेळी नक्की फट्टू टाकू..... :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Aug 2010 - 3:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चांगली पाकृ! आवडली.

मेघवेडा's picture

2 Aug 2010 - 3:52 pm | मेघवेडा

आँ? शैंटिस्टबैंचा इतका सरळसाधा पर्तिसाद?

बाकी हल्ली विनाफोटोच्या पाकृ उदंड जाहल्या आहेत म्हणे. पाकृ छान, पण फोटु पायजेल!

रश्मि दाते's picture

3 Aug 2010 - 3:02 am | रश्मि दाते

साधि सोपि पाकु,करुन पाहायला हवि,उपवासालाहि चालेल नाहि का?

शरयुप्रितम२०१०'s picture

5 Aug 2010 - 4:44 pm | शरयुप्रितम२०१०

उपवासाला?
काही लोक लाल भोपळा उपवासाला खातात पण काही खात नाही..
जर खात असाल तर उत्तम आहे मग.....