सुकटची चटणी

जासुश's picture
जासुश in पाककृती
31 Jul 2010 - 1:22 am

जिन्नस
सुकट २ वाटि
टोमेटो-१
कान्दा-१
लसुण-४ पाकळ्या
हिरवि मिर्चि-१
कोथिम्बिर चिरुन
तिखट-१ चमचा
हळ्द-१ लहान चमचा
मिठ- चविनुसार
तेल- १ पळि
जिरे- १ लहान चमचा

मार्गदर्शन

१.एका पातेल्यात पाणी घ्यावे. मग त्यात सुकट टाकावी. सुकट पाण्यात अलगद तरंगेल. ति पाण्यातून काढून घ्यावी.
२.एका कढईत तेल घ्यावे.त्यात जिरे,ठेचलेला लसूण व कांदा सोनेरी होई पर्यंत परतावा. त्यात चिरलेला टोमेटो टाकावा .त्यात हळद, तिखट व मीठ टाकावे.
३.नंतर धुऊन घेतलेली सुकट टाकावी. व वाफ येईपर्यंत शिजवावी. ही चटणी सुकी बनते. वरुन कोथिंबीर टाकून सर्व करावी. हि सुकटिची चटणी तांदुळाच्या भाकरीबरोबर खुप मस्त लागते.

टीपा
सुकट पाण्यात टाकण्याचे कारण - त्यात कधी कधी माती असते

प्रतिक्रिया

पंगा's picture

31 Jul 2010 - 1:29 am | पंगा

फोटो खतरनाक आहे,

ती मिरची हवेत अधांतरी नेमकी कशी तरंगवलीत?

सुहास..'s picture

31 Jul 2010 - 2:18 pm | सुहास..

बेस्ट !!

पिताना हा एक "जबरा" ह्या प्रकारात मोडणारा चकणा आहे ....

नावातकायआहे's picture

31 Jul 2010 - 2:26 pm | नावातकायआहे

>>पिताना हा एक "जबरा" ह्या प्रकारात मोडणारा चकणा आहे ....

असहमत...

सुकटाचि चटनि आसल तर दारुचा चकना होतो

सुकटाचि चटनि आसल तर दारुचा चकना होतो >>>

विमान डोक्यावरनं गेल !!

परिकथेतील राजकुमार's picture

31 Jul 2010 - 2:41 pm | परिकथेतील राजकुमार

विमान डोक्यावरनं गेल !!

अबे त्याला भवतेक सुकटची चटणी असली की दारु कमी पिली जाते आणि चटणी जास्ती खाल्ली जाते असे म्हणायचे असावे.

जाशुश छान रेसिपी.
मी मागे एकदा इथे बोंबलाची चटणी टाकली होति.
सुकटीची चटणी मी दुसर्‍या पद्धतीने करते. सुकट तव्यावर कोरडी भाजुन लसुण तिखट, मिठ घालून. ही चटणी टिकाउही असते. आणि जर चेंज हवा असेल तर हीच चटणी नंतर कांद्यावर फोडणीला देउन टोमॅटो, कोथिंबीर घालुन करता येते.

आशिष सुर्वे's picture

31 Jul 2010 - 9:59 pm | आशिष सुर्वे

जवळा काय, सुकट काय,...
अर्रे काय गोंधळ घालाचाय तो घालून घ्या..
श्रावण येतोच आहे!! :)

नावातकायआहे's picture

31 Jul 2010 - 10:55 pm | नावातकायआहे

>>अबे त्याला भवतेक सुकटची चटणी असली की दारु कमी पिली जाते आणि चटणी जास्ती खाल्ली जाते असे म्हणायचे असावे.

एकदम बराबर

पराभाउ तुमच्या तोंडात रम-थम्सअप!