पं. प्रभाकर कारेकर यांच्या गाण्याचे शौकिन

तर्री's picture
तर्री in काथ्याकूट
28 Jul 2010 - 5:36 pm
गाभा: 

माझ्या आजवरच्या संगीत श्रवण साधने मध्ये अनेक नामवन्त गायक / गायीका चे गाणे ऐकले. कुमारजी / वसंन्तराव / प्रभा ताई अत्रे / किशोरी ताई / पासून प्रथमेश लघाटे / आर्या आंबेकर पार्यन्त.
ह्या सग्ळ्या गायक / गायीकांचे चाहते/ पंखे खूप भेट्ले .
परन्तु पं. प्रभाकर कारेकर यांचे चाहते कधिच सापड्ले नाहीत. हा केवळ योगायोग किवा काय ? समजत नाही .
माला त्याचे शा.सन्गीत / नाट्य संगीत फार फार आवडते .............आपणापैकी कोणी पं. प्रभाकर कारेकर जीं चा चाहता / ती ?

प्रतिक्रिया

मराठी नाट्यसंगीताचे चाहते त्यांचे चाहते आहेतच.त्यांच्या मैफीलीत ज्यांनी हजेरी लावली असेल त्यांना नक्की माहीती आहे की कारेकर म्हणजे फक्त नाटयसंगीत असे नाही.
फार फार वर्षांपूर्वी कर्जतला प्रकाश ट्रेडींग कंपनीच्या वाढदिवशी बेडेकरांनी (कंपनीचे मालक) त्यांचे गाणे ठेवले होते.
सोबत इतर्ही काही गायक होते.
कारेकर गायला बसले तेव्हा पहाट झाली होती. त्यावेळचे प्रिये पहा ...जे ऐकले ते आजही कानात आहे.
त्यानंतर डोंबीवलीच्या सिकेपी हॉलमध्ये सकाळच्या रागात त्यांनी गायलेला भैरव (बहुतेक नटभैरव) अजूनही आठवतो.
सूरज चंदा जबतक गगनमे ही चिज ते गायले होते. सोबत नाना मुळे आणि पुरुशोत्तम वालावलकर होते.
येस्स ,कारेकरांचे फॅन आहेत.
थोडीशी अवांतर माहीती : प्रकाशचे माक्याचे तेल बनवणारे बेडेकर दर पाडव्याला गाण्याचा भरगच्च कार्यक्रम आयोजीत करायचे.रसिकांना मुक्त निमंत्रण असायचे. आम्ही त्या कार्यक्रमाला मिनी सवाई म्हणायचो.

श्रावण मोडक's picture

28 Jul 2010 - 7:47 pm | श्रावण मोडक

कारेकर गायला बसले तेव्हा पहाट झाली होती. त्यावेळचे प्रिये पहा ...जे ऐकले ते आजही कानात आहे.

आह्ह... केवळ कल्पनेनंच अंगावर काटा आला.
त्यांच्याच आवाजातलं विलोपले... ऐकल्यानंतर माझ्या एका विदेशी मित्रानं टेपला दंडवत घातला होता हे आठवलं. पुण्यातच एका मैफिलीत (बहुदा सवाईतच) त्यांना काही काळापूर्वी ऐकलं होतं. पण ती पहाटेची वेळ आणि प्रिये पहा...! बोलती बंद!!!

हे पद जसे गायले आहे ते दंडवत घालण्यासार्खेच आहे.....
श्रावण राव माझी " विमल अधर निकटी मोह हा आणि सूर सुख करी हो विमला " ही दोन नाट्यगीते अत्यन्त आवडीची आहेत. तुम्च्या मित्राला ही आवडत असतीलच्....अन्यथा सुचवा.

रामदास तुमचा हेवा व धन्यवाद...

नाटक्या's picture

28 Jul 2010 - 11:38 pm | नाटक्या

२००० साली अमेरिकेत (सॅन होजे, कॅलिफोर्निया) त्यांचा कार्यक्रम आम्ही केला होता. तेव्हा पण "विलोपले" ऐकून मी चक्क त्यांच्या पाया पडलो होतो. त्या गाण्याच्या आठवणीने आजही अंगावर रोमांच उभे रहातात.. काय गायले होते वा!!! अर्धा तास "विलोपले मधु-मिलनात ..".. एक एक जागा त्यांनी पंडीतजी (पं. जितेंद्र अभिषेकी) असे पण गात म्हणून वेगवेगळ्या पध्दतीने गायले होते. गाणे संपल्यावर बराच वेळ नुसत्या टाळ्या वाजत होत्या... क्या याद दिलाई आपने... बहोत खूब!!!

- नाटक्या

मला वाटतं २००५ किंवा २००६ मधे.

त्याचं व्हिडीओ शुटींग मी केलं होतं..

-एक

नाटक्या's picture

31 Jul 2010 - 4:36 am | नाटक्या

ते शुटिंग आहे माझ्याकडे.. "तू-नळी वर चढवावे का?" याचा विचार करतो..

नुसते चढवू नका दुवाही द्या इथे! (आणि आमचा दुवा घ्या! ;) )

निखिल देशपांडे's picture

29 Jul 2010 - 10:58 pm | निखिल देशपांडे

पण ती पहाटेची वेळ आणि प्रिये पहा...! बोलती बंद!!!

अगदी मनातले बोललात बघा...
प्रिये पहा आणि पहाटेची वेळ खतरनाकच

मेघवेडा's picture

29 Jul 2010 - 11:06 pm | मेघवेडा

असेच म्हणतो. रोमांच उठलेच कल्पनेने! अहाहा!

सोम्यागोम्या's picture

28 Jul 2010 - 11:35 pm | सोम्यागोम्या

नटभैरव असेल तो नक्की. गुरुभक्तितून जग्गन्नाथ बुवा पुरोहिंतावर केलेली सी. आर. व्यासांची रचना आहे ती. खूपच गुंगवून टाकणारा आहे हा नटभैरव.

सूरज चंदा जबतक फिरे, सबन तेरो नाम सुमिरन करे
ऐसो गुनिदास तुम कियो अमर धुन साच सप्तसुरन में
सुनत सब लोग जान गुनि मन हरे

त्यातली विलंबीत
गूंज रही कीरत उनकी
चहूं और संगीत जगमें
अतुल नाम पायो है

जान गुनिदास अभिधान जगतनाथ के
जुग जुग जियो, हो मोरे मन भायो है

अमूक एकाच्या/एकीच्या गाण्याचा चाहता आहे असे म्हणणे जीवावर येते इतके कलाकार सुदैवाने मराठीत आणि हिंदीत आहेत. पं. कारेकर हे त्यातील एक.

१९९९ साली मी बॉस्टनच्या न्यू इंग्लंड मंडळाचा अध्यक्ष होतो, तेंव्हा त्यांचा कार्यक्रम ठरवला होता. अमेरिकेत कलाकारांचे कार्यक्रम हे सर्वत्र होत असतात, पण शनीवार-रविवारी. मधल्या काळात त्यांना तरंगावे लागते आणि प्रवास करावा लागतो. असाच काहीसा प्रकार तेंव्हा झाला आणि कारेकर ४-५ दिवस आधी आले. तेंव्हा ते आमच्याकडे राहीले होते. त्यांचे रहाणे आणि वागणे एकदम साधे तसेच मैत्रिपूर्ण होते. खायच्या, प्यायचा काही त्रास नाही. आमचे घर, दोनच घरे आजूबाजूला असलेले, भाड्याचे होते त्यामुळे ते जाणून कुणाला त्रास होऊ नये म्हणून त्यांचा सतत चालू असलेला सराव देखील सहजतेने आणि हळू आवाजात चालत असे. त्यावेळेस ते सर्व दिवस त्यांचे अगदी सहजतेने गाणे ऐकण्याचा लाभ आम्हाला झाला. तसाच अनुभव तेंव्हा त्यांना साथ देण्यास आलेल्या डॉ. अरविंद थत्ते (हर्मोनियम वादक) यांचा आला होता. बर्‍याचदा ते पेटीवर नुसतेच बोटे फिरवत सराव करत...

नंतर गेल्या वर्षी त्यांना येथील एका संगीत संस्थेने बोलावले म्हणून ते आले होते. त्यात सक्रीय असलेल्या माझ्या एका मित्राने त्यांचा नंतर घरी कार्यक्रम ठेवला होता, त्याला गेलो असता, दहावर्षांनी देखील आम्हाला दोघांना व्यवस्थित ओळखले, आस्थेने विचारपूस केली.

दोन्ही वेळेस झालेला गाण्याचा कार्यक्रम लक्षात रहाण्यासारखा झाला, खूप आवडला वगैरे वेगळे सांगायची गरज वाटत नाही पण त्यांचे असे जमिनीवर राहून वागणे मात्र नक्कीच आदरणीय वाटले.

उपाशी बोका's picture

29 Jul 2010 - 6:17 am | उपाशी बोका

राग नसावा, पण पं. प्रभाकर कारेकर नाकातून गातात असे मला वाटते.

तर्री's picture

29 Jul 2010 - 11:21 am | तर्री

ऊ.भो.राव ,

तुमचे मत (नम्रपणे ) स्पष्ट मांडले .
मला तर पं. प्रभाकर कारेकरांचा "सानुनासिक " आवाजच जास्त भावतो .
पसन्द अपनी अपनी ....

विकास राव म्हण्तात ते ही आगदी खरे : इतके कलाकार सुदैवाने मराठीत आणि हिंदीत आहेत, अमूक एकाच्या/एकीच्या गाण्याचा चाहता आहे असे म्हणणे जीवावर येते ..............१०० % सहमत.

अनंत छंदी's picture

30 Jul 2010 - 10:31 pm | अनंत छंदी

पं. कारेकराचं गाणं मलाही आवडतं!
कुणाकडे त्यांच्या गाण्यांच्या लिंक्स असतील तर द्या की....
मागे कुमारजींच्या गाण्याचा विषय निघाला होता तेव्हा एका मित्राने त्यांच्या निर्गुणी भजनांच्या लिंक्स दिल्या होत्या.

खादाड_बोका's picture

30 Jul 2010 - 11:18 pm | खादाड_बोका

मिपाकर,

पं. कारेकराचं गाणं "दीनाची माऊली, अजी म्या देखीयली" कोणी द्याल काय?
आंतरजालावर शोधुनही मिळाले नाही.

धन्यवाद....

केशवराव's picture

31 Jul 2010 - 3:53 pm | केशवराव

आम्ही अलिबाग येथे त्यांची नाट्यसंगीत विरहीत मैफल ऐकली आहे. फर्माईश खातर २ नाट्यगितें गाईली. पण राग दारी वरील त्यांची हुकुमत , वा रे वा !!!