मासे ११) बांगडा

जागु's picture
जागु in पाककृती
28 Jul 2010 - 12:17 pm

मालवणी प्रकार :
लागणारे साहित्य:
बांगडे ४-५
थोड ओल खोबर,
१ चमचा धणे,
३-४ तिरफला ठेचुन
७-८ लाल सुक्या मिरच्या
५-६ लसुण पाकळ्या
१ छोटा कांदा चिरुन
अर्धे हळकुंड
मिठ चविपुरते
थोडा चिंचेचा कोळ
तेल

पाककृती:
बांगड्याला खवले नसतात त्यामुळे साफ करायला सोपे असतात. बांगड्याच्या कालवणासाठी पोटातील घाण काढायची, शेपुट व डोके काढून टाकायचे. बांगड्याचे दोन ते तिन तुकडे करायचे. तळण्यासाठी हवे असतील तर छोटे बांगडे पोटातील घाण व शेपुट काढून मध्ये मध्ये चिरा देउन स्वच्छ धुवुन त्याला थोडे मिठ व चिंचेचा कोळ लावुन ठेवायचे.

प्रथम ओल खोबर, कांदा, हळकुंड भिजवुन फोडून, धणे, लाल मिरच्या, लसुण घालुन वाटण करायचे. मग तेलावर ह्या वाटणाची फोडणी देउन ठेचलेले तिरफला, चिंचेचा कोळ(गरजे नुसार पाणी घालून) घालायचा एक उकळ आणायची नंतर त्यात वरुन बांगडे घालायचे, मिठ घालायचे व ३-४ मिनीटे उकळवुन गॅस बंद करायचा.

तळण्यासाठी बांगड्यांना आल लसुण पेस्ट, मसाला, हिंग, हळद, मिठ व थोडा चिंचेचा कोळ लावुन मुरवावेत मग बेसन किंवा रवा लावुन तळावेत.

अधिक टिपा :
धणे नसतील तर कोथिंबीर चालेल.
कोणतेही मासे ३ पाण्यातुन स्वच्छ दुवावेत कापल्यावर.
हळकुंड जरा आधीच भिजत घातले तर चांगले.
हळकुंड नसतील तर १/२ चमचा हळद चालेल पण ती चव येत नाही.

प्रतिक्रिया

गणपा's picture

28 Jul 2010 - 12:53 pm | गणपा

तुर्तास फक्स्त फोटोवर समाधान.
कालवणाचे फोटो न टाकल्या बद्दल आभार.. जळफळाट झाला असता.

आंबोळी's picture

28 Jul 2010 - 12:57 pm | आंबोळी

छानच...
बनवतानाच्या प्रत्तेक स्टेपचे फोटो टाकलेत तर आजुन मजा येईल.....
शेवटी ताटात वाढलेल्याचाही फोटो टाका.....
पाकृ छानच....
अवांतरः आम्हाला करायला जरा वेळ द्याहो.... पहिली करुन बघायच्या आत तुमच्या पुढच्या २-३ पाकृ येतायत ... सगळ्याच पाकृ छान असल्याने मग ही करु का ती असा गोंधळ उडतो....

गणपा, आता केले परत की टाकतेच फोटो कालवणाचे.

आंबोळी, ह्यापुढे प्रयत्न करते प्रत्येक स्टेप चा फोटो काढायचा. पण घाई असते जेवण करायची आणि त्यातुन प्रत्येक स्टेपला हातही धुवायला लागतात म्हणून जास्त कंटाळा येतो.

तुमच्या त्यांना सांगायचे की फोटो काढायला... ;)

काहीतरी चमचमीत व्हेज ची पाकॄ टाक ना...

का हो मायाताई तुम्ही नाही नॉन व्हेज खात ?
चमचमित व्हेज उद्या करणार म्हणजे पाकृ पण उद्याच टाकणार.

दिपाली पाटिल's picture

28 Jul 2010 - 8:54 pm | दिपाली पाटिल

मस्त गं जागू...

दिपाली पाटिल's picture

28 Jul 2010 - 10:14 pm | दिपाली पाटिल

.

जबर्‍या.
आपल्या घरच्यांची चंगळ आहे. रोज मस्त मस्त डिशेस आपण करून खायला घालत असल्याने.

प्रियाली's picture

29 Jul 2010 - 3:02 am | प्रियाली

फक्त फोटोत बघायचे. अमेरिकेत मस्त बांगडे मिळतात पण पाकिट मिळतं ८-१० चं. मी एकटीच खाणार त्यामुळे आणतच नाही. :-(

जागु's picture

29 Jul 2010 - 12:24 pm | जागु

दिपालि, पक्या धन्यवाद,
प्रियाली आणून फ्रिज मध्ये रोज एक एक खायचा. (स्मायली कुठे गायब झाल्यात ?)

तिरफला कसं असतं फोटो आहे का ? पा.क्रु मस्त :)

विंजिनेर's picture

29 Jul 2010 - 2:23 pm | विंजिनेर

तिरफळाचा फटु+वर्णन पेठकर काकांनी येथे केले आहे

गणपा's picture

29 Jul 2010 - 2:26 pm | गणपा

हे पहा.

सुहास..'s picture

29 Jul 2010 - 2:18 pm | सुहास..

पाणी सुटल तोंडाला !!

हो बरोबर हा तिरफलाच आहे. ह्याला मस्त वास असतो.

स्मिता_१३'s picture

30 Jul 2010 - 10:29 am | स्मिता_१३

मस्तच जागुताई !

जागु's picture

30 Jul 2010 - 11:35 am | जागु

धन्यवाद स्मिताताई.