गाभा:
नॅनो
नॅनो टेकनॉलॉजी म्हणजे काय?..
त्याचा मानवि समुहास उपयोग किति आहे?
नॅनो टेकनॉलॉजी चा उपयोग केलेले रोजच्या वापरातली एखादी गोष्ट कोणती?
वैद्यकिय शाश्त्रात पण याचा उपयोग होतो..तो कसा?
आपल्या सनातन संस्क्रुति मधे पण नॅनो टेकनॉलॉजी होति का?
जाणकार समजावुन सांगु शकेल का?
प्रतिक्रिया
28 Jul 2010 - 11:56 am | लिखाळ
वा धाग्यावर शेकडो प्रतिसाद खेचणारे हे सनातन 'तंत्र' आवडले. या तंत्राचा उपयोग मात्र नेहमी होताना दिसतो. (ह. घ्या ;) )
28 Jul 2010 - 12:01 pm | नितिन थत्ते
>>नॅनो टेकनॉलॉजी म्हणजे काय?..
ते काय माहिती नाही बॉ.
>>आपल्या सनातन संस्क्रुति मधे पण नॅनो टेकनॉलॉजी होति का?
हे काय विचारणे झाले? ती तर होतीच. डॉ वर्तक नावाचे गृहस्थ सूक्ष्मरूपात सर्वत्र संचार करायचे ती नॅनो टेक्नॉलॉजीच होती. म्हणजे असणार, म्हणजे असेल, म्हणजे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ;)
शिवाय आपल्याकडे स्त्रियांच्या नवीन साडीला कायतरी करतात ती 'नॅनो'पेक्षा पुढची 'पिको' टेक्नॉलॉजी.
नितिन थत्ते
28 Jul 2010 - 12:06 pm | विजुभाऊ
आपल्या सनातन संस्क्रुति मधे पण नॅनो टेकनॉलॉजी होति का?
सनातन संस्कृती कोणती ती दुर्जनांच्या नाशासाठी म्हणतात तीच का?
अजून एक प्रश्न सुचवतो "नाडी पट्ट्या नॅनो टेक्नॉलोजी वापरून लिहिल्या असाव्यात का?"
'पिको' टेक्नॉलॉजी
हा शब्द काळजाला फॉलला.....
28 Jul 2010 - 1:15 pm | गणपा
नॅनो ?
माझ्या मते तरी टाटाने शोध लावला ना रे ह्याचा ;)
28 Jul 2010 - 8:09 pm | विलासराव
वैद्यकिय शाश्त्रात पण याचा उपयोग होतो..तो कसा?
नॅनो टेकनॉलॉजी चा उपयोग करुन खुप सुक्ष्म असे सेन्सर बनणार आहेत. जे आपल्या शरिरात बसवले जानार आहेत.
उदा : हार्ट पेंशन्ट्साठी बसवलेला सेन्सर साधारनतः ६ तास अगोदर अॅटॅक येण्याची सुचणा बाहेरील उपकरनावर मिळेल. आनखी १०-१५ वर्शांनी.......
28 Jul 2010 - 10:57 pm | शिल्पा ब
नॅनो आयपॉड असलेला माहीती आहे...नॅनो म्हणजे आकाराने अगदी छोटा..
http://dictionary.reference.com/browse/nano
29 Jul 2010 - 12:19 am | शिल्पा ब
अगदी हेच...लोक फार त्रास देतात हो...तुम्ही आपले लिहित रहा...विरामचिन्हे नसली जमत तर नवीन पॅरेग्राफच टाकत चला...तुमच्याकडून असे दर्जेदार इंग्रजी शिकावयास मिळणे हि एक मेजवानीच आहे...पु.ले.शु.
28 Jul 2010 - 11:09 pm | लंबूटांग
उगाचच चुकीचे English लिहीण्यापेक्षा तुमची जाहिरात मराठीत करा की.
-(Englishची का) मार्तोस
29 Jul 2010 - 12:40 am | कार्लोस
मि काय चुकिचे मान्दले
28 Jul 2010 - 11:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हे Plz, abt, bcz असले इंग्लिश शब्द वाचून डोक्यात तिडीक जाते ब्वॉ! मराठी सायटीवर 'माहितगार' म्हणून माज करायचा तर किमान भाषातरी व्यवस्थित वापरा हो!
आणि हो विरामचिन्हांचा एवढा का दुष्काळ म्हणे तुमच्या प्रतिसादात?
नाव तर मोठं देवनागरीत घेतलं आहेत तर मराठीची का ही अशी बोंब? काय वाटलं असेल मराठी मनाला हे असे प्रतिसाद मिपावर पाहून?
बादवे, घनता मोजण्याचं एकक आम्ही शिकायचो तेव्हा ग्रॅम प्रति घनसेंमी (किंवा किलोग्राम प्रति घनमीटर) असं काहीसं असायचं. नॅनोमीटरमधे पाण्याची घनता मोजता का तुम्ही संशोधनात ... वाजलंच मग बंबाळं सगळ्याचं!!
लिखाळ, लंबू आणि नितीन थत्तेंचे प्रतिसाद लै आवडले पहा!
29 Jul 2010 - 12:41 am | कार्लोस
माहित नसेल तर उगाच बोलु नका
29 Jul 2010 - 1:06 am | शिल्पा ब
त्यापेक्षा अदितीने काय चुकीचं लिहिलंय ते दुरुस्त करून टाकलं असतं तर आम्ही उपकृत झालो असतो...
29 Jul 2010 - 12:42 am | क्रेमर
तै तुमच्या प्रतिसादाची चौकट पहा. दुसर्याच ओळीत काय लिहिले आहे हे पहा.
यात तुमचे नाव व वार सोडून सगले विंग्रजीत आहे. तुम्ही कार्लोस यांनाच का धारेवर धरले आहे?
तुम्हा लोकांचा काहीतरी हिडन अजेंडा दिसतो आहे.
29 Jul 2010 - 7:43 am | देवदत्त
हसत लोळण्याचा स्माईली कुठे गेला रे नीलकांत? :)
28 Jul 2010 - 11:16 pm | धनंजय
पुढील प्रतिसादात भ्रामक-भरकटलेले = पूर्ण-अज्ञान आहे, अर्धज्ञान नाही, म्हणून श्री. कार्लोस म्हणतात तसा हा प्रतिसाद धोकादायक नाही. (ते म्हणतात त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे धोकादायक असू शकेल.)
नॅनो गाडी बनवण्यासाठी वापरलेले तंत्रज्ञान म्हणजे नॅनो टेकनॉलॉजी.
"समूह" म्हणजे एकापेक्षा अधिक (कित्येकदा चार-पाच पेक्षा अधिक). मानव अतिशय स्थूल असल्यास नॅनो गाडीमध्ये फारतर एक बसू शकतो. मानव रोडके असल्यास फारतर चार-पाच बसू शकतील. "मानव समूहा"स नॅनो स्थूलत्व मोजण्यासाठी उपयोगी आहे.
पुढे कधी रोजवापरातली होईल, तेव्हा नॅनो गाडी अशी गोष्ट होय.
नॅनो गाडीमध्ये अतिशय उंच किंवा स्थूल व्यक्ती बसल्यास त्यांची पाठ अवघडली, तर कुठल्यातरी वैद्यकीय शास्त्र्याचे बँक खाते भरण्यास त्याचा उपयोग होऊ शकेल. (शिवाय पुढच्या प्रश्नाच्या उत्तरातला आयुर्वेदाच्या माधवनिदानातील श्लोक बघावा.)
होय. कल्पक दृष्टीने पाहिल्यास उपग्रह चित्रांतून याचे अवशेष दिसून येऊ शकतील.
आयुर्वेदातल्या "माधवनिदान" ग्रंथात हा श्लोक सापडतो :
येथे "नानातंत्र" म्हणजे "नॅनोटेक्नॉलॉजी" हे कोण्या आंधळ्या वाचकालाही जाणवेल.
जाणकार समजावून सांगू शकेल. पण तो मी नव्हेच.
28 Jul 2010 - 11:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =)) =)) =))
हसण्याचा अटॅक ओसरला की पुढचं काही काम करता येईल!!
28 Jul 2010 - 11:22 pm | Nile
=)) =)) यापेक्षा अधिक अज्ञान दाखवणे मला जमेल का नाही कुणास ठावुक (पुन्हा अज्ञानामुळेच ;-) )
28 Jul 2010 - 11:22 pm | चतुरंग
धन्याशेठने जाम म्हणजे जामच ठोकून एकदम अवलेह बनवलेले आहे! =)) =)) =))
नानारंग ;)
28 Jul 2010 - 11:25 pm | क्रेमर
ज्येष्ठ सदस्यांनी धाग्यामध्ये प्रामाणिकपणे विचारलेल्या प्रश्नांची व त्यांना उत्तरे देणार्या सदस्यांची थट्टा उडवलेली पाहून वाईट वाटले. एकच सांगावेसे वाटते Plz don’t be angry on me and don’t take it personel.
28 Jul 2010 - 11:50 pm | Nile
काय मास्तर क्रेमर नंतर कार्लोस घेतला काय?? =)) =))
पळा पळा ;-)
29 Jul 2010 - 12:10 am | क्रेमर
एखाद्या नवीन सदस्यास नवीन लोक कंपू करून त्रास देत असतील तर त्याची मदत करण्याचा प्रयत्न केला एवढेच. श्री कार्लोस यांच्याविषयी त्यांची मातृभाषा स्पॅनिश असावी एवढाच अंदाज सध्या बांधता येत आहे.
29 Jul 2010 - 12:18 am | Nile
साफ अंदाज चुकला मास्तर. आंतरजालाचा अभ्यास कमी पडतोय काय?
डु आयडी ओळख लक्षात येउ नये म्हणुन मुद्दाम नव्या इष्टाईलीत लिहतात हे तुमच्या लक्षात येउ नये!!! ;-)
बाकी त्यांची भाषा(मोडकी तोडकी असली तरी) इंग्लिश असावी असेच वाटते. :D
29 Jul 2010 - 12:30 am | क्रेमर
प्रत्येक आयडीकडे डुप्लिकेट म्हणून पाहण्याचा हा अट्टाहास का? कार्लोस कुणीही असू शकतील. त्यांच्याकडे त्यांच्या दर्शनी मूल्यावर पाहीले जावे. त्यांनी प्रतिसाद इंग्रजीत लिहिला आहे तर शीर्षक मराठीतून पण त्यांचे सदस्यनाम साधारणत: स्पॅनिश/पोर्तुगीज भाषकांमध्ये आढळते. ते मराठी व इंग्रजी भाषेत रस असलेले (पण इंग्रजीत पारंगत असलेले) एखादे स्पॅनिश/पोर्तुगीजभाषक असू शकतील. या व अशा शक्यतांना नजरेआड करून डुप्लिकेट आयडी या एकाच शक्यतेला तुम्ही का चिकटून आहात?
29 Jul 2010 - 12:51 am | Nile
मागे कुणीतरी सांगितलं होतं क्रेमर म्हणजेच पुर्वीचे ते किंवा त्यापुर्वीचे ते असतीलच असे काही नाही म्हणुन. (कदाचीत त्या गोटात सामिलही असतील असेही म्हणले होते ) आता यावर विश्वास बसु लागला आहे.
पुर्वीचे ते (किंवा त्यापुर्वीचे ते) यांना से प्रश्न पडलेच नसते याची खात्री आहे. तरी कारणे देतो.
मआंची स्वाभाविकता पुर्वीचे ते (किंवा त्यापुर्वीचे ते) यांनी बरोबर जाणली होती.
अशी चुक पुर्वीचे ते (किंवा त्यापुर्वीचे ते) यांनी कधीच केली नसती.
वरती आम्ही जे म्हणालो तेच सिद्ध करणारे वाक्य आमच्याशी प्रतिवाद करताना पुर्वीचे ते (किंवा त्यापुर्वीचे ते) यांनी कदापी वापरले नसते.
=)) =))
बाकी सद्ध्याच्या नाजुक परिस्थितीत पोर्तुगीजांचा स्फोटक उल्लेख पुर्वीचे ते (किंवा त्यापुर्वीचे ते) यांनी कदापी केला नसता. ;-)
खातीशीर तर्कास शक्यता असे पुर्वीचे ते (किंवा त्यापुर्वीचे ते) यांनी कदापी म्हणले नसते.
हेन्स प्रुव्ह्ड. =))
29 Jul 2010 - 1:00 am | क्रेमर
=)) =)) =)) =)) =)) =))
'पुर्वीचे ते (किंवा त्यापुर्वीचे ते)' यांना पुर्वीची पु दीर्घ असते हे सुद्धा माहीत नव्हते असे खेदाने नमूद करावेसे वाटते. हे निदर्शनास आणून दिल्यानंतर पहील्यांदा 'पुर्वीचे ते (किंवा त्यापुर्वीचे ते)' यांनी काय केले नसते हे दाखवणारा लेमा (lemma) सिद्ध करणे गरजेचे ठरते. मग तुमच्या या प्रुफाला ग्राह्य समजले जाईल.
29 Jul 2010 - 2:59 am | राजेश घासकडवी
कार्लोस व क्रेमर, मिपावर तुमचं स्वागत असो.
नाईल वगैरे सारख्या लोकांनी नवीन आयडींचं स्वागत करण्याऐवजी त्यांची अशी चेष्टा करणं, अंगावर धावून जाणं शोभत नाही.
क्रेमर, उगी उगी. ललाचं नाई... नाईलच्या बुद्धीला क्यान्सर झाला असावा. एकंदरीत त्याच्या पापांचा घडा पुर्ण भरला असावा. तसा तो संपत नाहीच म्हणा....
असो, कार्लोस यांच्या जन्मस्थानाबद्दल तुम्ही जसे वंशशास्त्रीय तर्क लढवले तसंच मी तुमच्याही नावाविषयी थोडा शोध घेतला. http://www.aculink.net/~catholic/what%20the%20kramer%20name%20means.htm तर तुम्ही जर्मन किंवा डच असून (म्हणजे दोन्ही हरणाऱ्या टीमचेच!) तुमच्या नावाचा अर्थ खालीलप्रमाणे आला...
“one who traveled through the country making and selling cloth which he carried to the market in a cram or pack on his back.” Although this interpretation is the result of onomastic research, I found it also meant: “One who traveled through the country buying butter, eggs and hens which he carried to the market in a cram or pack on his back.”
शिवाय तुम्ही आपल्या नावाचं स्पेलिंग कसं करत असाल याविषयीही प्रश्न आले...
it is not surprising that dictionaries of surnames indicate probably spelling variations of the Kramer surname to be Kramer, Kraemer, Kreamer, Krammer, Kremerman, Cramer, and Crammer
त्यातलं Kreamer हे मला खूप खूप आवडलं.
29 Jul 2010 - 4:12 am | क्रेमर
धन्यवाद.
सहमत आहे.
मी रडलेलो नाही. हे जुने-जाणतेच गळा काढत आहेत. नाइल, अदितीतै, लंबुटांगदादा, थत्तेकाका आणि आश्चर्य म्हणजे धनंजय या सर्वांनी कार्लोस या नवीन सदस्याची केलेली टवाळी मला आवडली नाही. वाईट वाटले. ज्येष्ठ मिपाकरांविषयीचा आदर कमी झाला.
तर्क नव्हे तर तर्काधारीत शक्यता वर्तवली होती. तसेच शक्यता जन्मस्थानाविषयी नाही, तर मातृभाषेविषयी मांडली होती. आमच्या नावाचा शोध घेतल्याबद्दल आभारी आहे.
थोडक्यात गाठोड्यात बांधून गावोगाव हिंडत फिरणारा विक्रेता. समाजाचा एक सन्माननीय घटक. मीही आंतरजालावरील अनुभव गाठोड्यात बांधत एका संस्थळावरून दुसरीकडे फिरत त्यांना ठिकठिकाणी सांडत असतो. माझी आयडेंटिटी मला आपण जमवलेल्या माहितीतून मिळाली. अनेक धन्यवाद.
मलाही.
29 Jul 2010 - 5:03 am | धनंजय
मला गोव्यात शुद्ध "वांशिक" ब्राह्मण ख्रिश्चन गोवेकर (मिश्तिस नव्हे) असे एक-दोन कार्लोस माहीत होते. त्यांचे सोडा.
येथील श्री. कार्लोस यांचा इंग्रजी प्रतिसाद भारतात केलेल्या प्रदीर्घ अभ्यासाची साक्ष देते.
- ...it is using in construction...
- We are researching from last 5 yrs...
बघा - कुठे ती मुमूर्षू स्पॅनिश-पोर्तुगीज अर्थकारणे, नि कुठे येथील जिजीविषू भारतीय चालू वर्तमानकाळ!
- Even water is also counted...
येथील ईव्हन-ऑल्सो हे जोरकस द्वित्त कुठल्या आयबेरियनाला कसे जमणार. फारतर एक विश्वकरंडक जिंकतील - दोनदा जिंकून दाखवा म्हणावे.
- ...piko...
येथील "k" सिद्धच करतो की हा कोणी लेचापेचा ल्यातिनभाषक नाही - k सापडला की त्या ल्यातिनांना टोचू लागतो - स्पेलिंगात बदलून c केल्याशिवाय चैन पडत नाही. आणि येथे तर राकट, कणखर, दगडांच्या देशातल्या आपल्या नव्या सदस्याने गोलमटोल c ऐवजी ओबडधोबड k अंगीकारला आहे!
(संपादकहो! येथे श्री. कार्लोस यांची वैयक्तिक टीका नाही, तर त्यांच्या प्रतिसादाचे विश्लेषण आहे.)
नवागंतुक संभवनीय भारतीय सदस्याला तर्काधारित बिगर-भारतीय केल्याबद्दल राष्ट्रप्रेमी या नात्याने (राष्ट्रप्रेम दुवा) निषेध. निषेध. निषेध.
(संपादकहो! येथे श्री. क्रेमर यांची वैयक्तिक टीका नाही, तर त्यांच्या विश्लेषणाचा निषेध आहे.)
("निषेध-निषेध-निषेध" असा तो शब्द तीनदा उच्चारण्याऐवजी "त्रिवार निषेध" म्हणणे म्हणजे केवळ आळस किंवा कंजूषपणा किंवा पाजीपणा. उद्या कोणी घटस्फोटेच्छुक पुरुष तलाक-तलाक-तलाक असे तिहेरी म्हणण्याऐवजी "त्रिवार तलाक" म्हणू लागेल. हे म्हणजे काय? पोटगी नाहीच देणार, तुझ्यावर तोंडातली वाफसुद्धा तीन अक्षरे कमीच खर्च करणार... तीन वेळा "निषेध-निषेध-निषेध" टंकण्यामुळे मागे निरालस्य-औदार्य-उदात्तत्व सिद्ध होते, आणि खास करून राष्ट्रप्रेमी म्हणून मी पुनश्च अतिशय आदरास पात्र होतो.)
29 Jul 2010 - 6:36 am | क्रेमर
कार्लोस यांच्या प्रतिसादात दडलेल्या माहितीला धनंजय यांनी उत्तमपणे उलगडवून दाखवले आहे.
हे सगळे दडलेले आत्ता लक्षात येत आहे. कार्लोस यांच्या प्रतिसादास 'माहितीपूर्ण' हे विशेषण वापरणे किती योग्य होते याचा प्रत्यय येत आहे.
वा!! एकाच सामन्यात दोनदा जिंकता येणे शक्य आहे. कार्लोस यांनी ते किती नजाकतीने दाखवून दिले आहे!!
यातून कार्लोस यांनी एकाच दगडात दगडांच्या देशाशी निष्ठा दर्शवत अमेरिकन कनेक्शनही दाखवून दिले आहे. या मुद्द्याविषयी माझ्या सबल्टर्नपणामूळे मी sceptic होतो पण धनंजय यांनी दाखवून दिल्यानंतर माझा skepticism कुठल्या कुठे पळाला आहे. धन्य विश्लेषण!
इतक्या बिनतोड युक्तिवादानंतर वर्तवलेली शक्यता मागे घेत आहे. माघार. माघार. माघार.
तुम्हाला मागे ऐवजी माझे म्हणायचे असावे अशी शक्यता वर्तवत आहे. ('झे'च्या ऐवजी 'गे' टंकला गेला याला फ्रोय्डियन स्लिप म्हणावे का? कृहघे) राष्ट्रप्रेमाचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून तुमचा प्रतिसाद मराठी आंतरजालावर अजरामर झाला आहे, असे मी घोषित करतो. अमर रहे. अमर रहे. अमर रहे.
(संपादकहो! येथे श्री. धनंजय यांनी त्यांच्या प्रतिसादातून राष्ट्रभक्तिचा दैदिप्यमान वस्तुपाठ घालून दिला आहे. हा प्रतिसाद सदैव टिकून राहील अशी व्यवस्था करण्याची विनंती करत आहे.)
29 Jul 2010 - 6:39 am | Nile
वरील क्रेमर यांच्या कार्लोस यांच्या प्रतिसादासंदर्भात दिलेल्या प्रतिसादांनी आम्ही वर्तवलेला संदेह अधिकच दृढ झाला आहे.
एक थाप शंभर थापांना जन्म देते याचेही प्रत्यंतर आलेले आहे.
29 Jul 2010 - 8:32 am | धनंजय
(अमुक-मुळे) पाठीमागेच निरलस्य इ.इ.सिद्ध होते, (तमुक म्हणून) पुनश्च मी आदरास पात्र होतो...
सुसंदर्भीकरणाची हातचालाखी बघता पुनःपुनश्च.
29 Jul 2010 - 3:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्यवाद आणि असहमती!!
आपणाला माझ्याबद्दल आदर (अधिक) होता आणि आताही (थोडा कमी ;-) ) आहे हे वाचून मला अतिशय आनंद झाला.
पण कोणत्या भाषेत पाण्याची घनता nm (माझ्या मतीप्रमाणे नॅनोमीटर्स) या एककात मोजतात ते आधी सांगा, हेर क्रामर!!
29 Jul 2010 - 7:39 pm | क्रेमर
धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.
तै, आपण हा वाद माहीतगार कार्लोस यांच्याशी चालवावा.
29 Jul 2010 - 12:28 am | पुष्करिणी
इतक्या सगळ्या शंकांचं निरसन केल्याबद्द्ल धन्यवाद..:)
जरा पिको टेक्नॉलॉजीवरही प्रकाश टाकता का ??
29 Jul 2010 - 1:36 am | धनंजय
पिको म्हणजे आकड्याने किंवा "टॅटिंगच्या" शटलने विणण्याचे खास तंत्र आहे :

("पिको"चे चित्र : विकिपेडियाकडून साभार)
29 Jul 2010 - 7:36 am | नितिन थत्ते
पिको टेक्नॉलॉजीविषयी आमच्या माहितीस दुजोरा दिल्याबद्दल धनंजय यांचे आभार.
29 Jul 2010 - 8:02 pm | कार्लोस
फेको टेक्नॉलॉजीविषयी काहि महिति आहे का हो तुम्हाला?
29 Jul 2010 - 11:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला माहित्ये, मला माहित्ये!!
फेको टेक्नॉलॉजी म्हणजे एखाद्या भाषेची पूर्ण आय-माय करायची आणि आपल्याला किती जास्त माहिती आहे आणि दुसरा किती तुच्छ आहे अशा अहंगंडाने प्रतिसाद फेकून मारायचे!
अर्थात what goes round comes round किंवा आईच्या भाषेत पेरावे तसे उगवते या न्यायाने तेच आपल्याला टोचतं ही गोष्ट निराळी. पण ती टेक्नॉलॉजी नाही हो ...
आणखी एक शंका आहे: काल देवनागरीतून मराठी टंकता न येणारा आयडी अचानक "टेक्नॉलॉजीविषयी" हा शब्द शुद्ध लिहीतो आणि माहिती हा शब्द अशुद्ध ही कोणती टेक्नॉलॉजी?? यासाठी i-Chan* टेक्नॉलॉजी वापरावी का?
*अधिक माहितीसाठी कोणाला व्यनी करावे या पृच्छेसाठी मला व्यनी करू नयेत.
29 Jul 2010 - 3:58 pm | वेताळ
मग नॅनोचे मराठी भाषातंर नाना होते तर. मग नान्याला नॅनोटेक्नॉलॉजीची बरीच माहिती असण्याची शक्यता आहे.
29 Jul 2010 - 12:32 am | कार्लोस
इ दोन्त क्नोव होव तो त्य्पे इन मराथि नाहि तर बरोबर उत्तर दिले अस्ते
29 Jul 2010 - 12:42 am | Nile
उत्तर बरोबर असण्याची काळजी नको हो फक्त उत्तर येउद्या. अश्या ज्ञानार्जनाच्या संधीस आम्हाला मुकवु (!)नका.
29 Jul 2010 - 1:30 am | असुर
निशेध???
टारुशेठ 'गायब'ल्यापासून कोणी णिशेध नोंदविलाच नव्हता! डोळे पाणावले!
कार्लोस भाऊ, आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
नॅनो तंत्रज्ञानाविषयी थोडंसं -
'O' (गोल) आकारात नान बनवायच्या तंत्रज्ञानाला इंग्रज लोक 'नॅन''O' म्हणजेच नॅनो तंत्रज्ञान म्हणतात!
आता इंग्रज म्हणाले म्हणजे बरोबरच असणार असा समज बहुतेक सर्वांनी करून घेतला, आंधळा अभिनिवेश दुसरं काय!.
(अवांतर: इकडे राणीच्या देशात इंग्रज लोकांना स्वत: इंग्रज सोडून बाकी सगळे सपोर्ट करतात! कमाल आहे नै!)
मराठीसाठी तुम्ही "गुगल ट्रान्सलिटरेशन" वापरू शकता!
-- असुर
29 Jul 2010 - 1:38 am | असुर
नमस्कार अविनाश कुलकर्णी,
नॅनो तंत्रज्ञानाविषयी अधिक माहितीसाठी आपण http://en.wikipedia.org/wiki/Nanotechnology इथे भेट देऊ शकता!
या सर्व माहितीचे मराठी रुपांतर करणे अवघड आहे, आणि माझी बौद्धिक पात्रताही नाही. मी एक गरीब आय.टी. तंत्रज्ञ असल्याने अज्ञान आणि आळस हे गुण ठासून भरले आहेत.
आपण या माहितीचा उपयोग करून मिपावर नॅनो तंत्रज्ञानाविषयी सणसणीत लिखाण करावे ही अपेक्षा!
--असुर
29 Jul 2010 - 7:25 am | पक्या
अति अति अति अवांतरपणा ठासून भरलेल्या या लेखाकडे आपलं प्रतिसादांकडे संपादकांचं लक्ष गेलेले दिसत नाहिये. नाही...मध्यंतरी संपादन करण्याच्या कामाला फार ऊत आलेला होता आणि आता एकदम थंडगार.
29 Jul 2010 - 12:52 pm | अवलिया
ऑरवेलचे वाक्य विसरु नका.
29 Jul 2010 - 6:59 pm | राजेश घासकडवी
अवलियाजी, ऑरवेलच्या वाक्याची गंमत अशी आहे की ते आठवून, लक्षात ठेवून, आठवण करून देऊन फारसा फरक पडत नाही. ते लागू होतं ते होतंच... ते खरोखर अंगी बानण्यासाठी मानसिकताच बदलायला लागते. त्यामुळे तुम्ही इतका प्रयत्न करत आहात तरीही एकंदरीत परिस्थिती, मानसिकता किती प्रभावी आहे हेच दिसून येतं.
आपला तो गमतीदार, खेळकर दंगा व दुसऱ्याचं ते अवांतर असं धो धो रण करणारं काहींचं धोरण असतं... त्याला काय करणार.
29 Jul 2010 - 1:37 pm | मी ऋचा
29 Jul 2010 - 1:54 pm | डावखुरा
स्मायलींना मिपा(प)ण मिस करणार...
मिस्माईली कर....
29 Jul 2010 - 7:10 pm | मेघवेडा
"एकेक उद्बोधक प्रतिसाद वाचून ज्ञानात भर पडली" असे म्हणून पन्नासावा फुकटचा प्रतिसाद पूर्ण करतो.