गाभा:
नमस्कार !
काल परवाच्या 'सकाळ' मधली मुख्य बातमी वाचली.
पुण्यात पंत चे भाडे कमीत कमी ५ रु.तसं पाहायला गेलं तर PMT भारताच्या प्रमुख शहरांच्या सार्वजनिक वाहतुकीपेक्षा महागच आहे .
आणि जर सुविधांचा विचार केला तर अगदीच शून्य.
PMT ची दरवाढ रास्त आहे असा आपल्यास वाटते का ?
*पुण्याचे आणि पुण्याबाहेरचे लोकही प्रतिक्रिया देऊ शकतात !
प्रतिक्रिया
27 Jul 2010 - 12:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नाय बा! आम्ही पुण्याबद्दल काहीही बोलणार नाही ... बोल्लो तर अखिल पुणेव्याप्त तिसरं जागतिक महायुद्ध ओढवायचं!!
पेट्रोल, गॅस, डिझेलचे भाव वाढले तर रिक्षा, बस, इ.ची भाववाढ सहाजिक आहे.
27 Jul 2010 - 12:51 pm | शानबा५१२
हो अगदी योग्य आहे.
मुंबई गेली मसनात्,आमच्या मिरा-भाईंदरचे सर्व 'कर' ह्या पुणेकरांवर लादा.आम्ही मुंबईच्या बॉर्डरवर राहतो पण सर्व मिळवल तर मुंबईपेक्षा जास्त 'कर' देतो,आणि सुविधा नावाचे थोडस काहीतरी हाताला लागत.
आमचे कर हे असे भाडे वाढ करुन पुणेकरांवर लादा आणि पुणेकरांना म्हणाव मग बसा कविता लिहत आणि आकाशगंगेत तारे शोधत!
- मिराभाईंदरचा हीतचिंतक.
27 Jul 2010 - 2:57 pm | परिकथेतील राजकुमार
+१ सहमत आहे.
तसेही विकपिडियावरुन शास्त्रज्ञांचे लेख इथे आणुन मराठीत डकवण्यापेक्षा, आपण ज्या पुस्तकाचे कव्हर देखील कधी बघितलेले नाही त्याच्यावरुन अक्कल गहाण ठेवुन वाद घालण्यापेक्षा अथवा आपण चड्डीच घातली नसावी अशी शंका लोकांना यावी असे वर्तन करत हिंडण्यापेक्षा ते जास्ती बरे.. नाही का ?
सायकल घेउन टाका हो. म्हणजे असल्या समस्या भेडसावत नाहीत.
सायकलपटू
27 Jul 2010 - 3:10 pm | शानबा५१२
माणसाला पोटाचा त्रास जास्त दीवस चालु राहीला की तो अस यडपटछाप लिहतो.
आपण यावर काहीतरी करा हो,तुमचा त्रास आमच्यापर्यंत पोहचायला लागलाय.
आणि हे आर्ध्या गावाची मीहीती नसलेले,आम्ही लिंक्स दील्यावर 'अरे अस चाललय काय?' म्हणत जागे होणारे महाभाग आमच्या वाचनाबद्दल शंका काढतात ह्याहुन दुर्दैव ते काय असणार.
खराब दीवस आले रे देवा आमचे!
आपण थोडी झोप घ्या,डोक्याला आराम भेटला की या परत,उगाच शटरफटर खाउ नका.आपल्या चुकांमुळे सर्वांनाच त्रास कशाला?
27 Jul 2010 - 4:49 pm | Dhananjay Borgaonkar
आमचे कर हे असे भाडे वाढ करुन पुणेकरांवर लादा आणि पुणेकरांना म्हणाव मग बसा कविता लिहत आणि आकाशगंगेत तारे शोधत!
तु एखद्या मानसोपचार तज्ञाला का नाही दाखवत्.ठार वेड्यासारख बडबडतो आहेस.
आरे विषय काय तु बोलतो काय?
27 Jul 2010 - 7:43 pm | शानबा५१२
हे बघा हे त्यांच्या(खाजकुमारच्या) चड्डीची नाडी शोधत आले इकडे.
अरे काय बडबडलो मी?
अगदी बरोबर लिहल आहे,तुला विषयाच गांभीर्य नाही समजत तर मी काय करु?
(माझ्याकडुन शहाणपणाच वाचायला भेटेल अशी मुर्खासारखी अपेक्षा तु ठेवतोस आणि नंतर बोंबा मारतोस?)
अवांतर : मला लेखात दम नाही वाटत.
अरे उद्या टोमॅटोचा भाव वाढले की धागा,सिगरेट्चे भाव वाढले की धागा,रीक्षाचे भाडे वाढले की धागा असे काय धाग्यावर धागे लिहणार का?
करा ना सहन्,सर्व सहन करत आहातच ना?
27 Jul 2010 - 8:27 pm | Dhananjay Borgaonkar
बाळ्..कडबा आवर स्वतःला.
28 Jul 2010 - 1:01 am | मेघवेडा
है शाब्बास! लढ बाप्पू!
नेहमीनेहमी काय मुंबै-पुणे पुणे-मुंबै वाद रंगवायचे! कधीतरी मिराभैंदर-पुणे पण होऊन जाऊदेत! ;)
परा कायतरी बडबडू नको हां.. बरोबर आहे. सगळे मिराभैंदरचे कर पुणेकरांवर लादले पाहिजेत! शानबा.. चीअर्स मॅन!
27 Jul 2010 - 7:59 pm | विलासराव
सहमत.........आपला पाठींबा .
27 Jul 2010 - 12:53 pm | चिरोटा
पण पाच रुपये भाडे आहेच मोठ्या शहरांमध्ये.मोठ्या म्हणजे आकाराने मोठ्या शहरांमध्ये.पाच रुपये दिल्यावर कंडक्टर तिकिट देत असेल्(सर्वत्र अशी परिस्थिती नसते)आणि बसमध्ये उभे राहता येत असेल तर हरकत नसावी.
(माजी पुणेकर)भेन्डि
27 Jul 2010 - 1:45 pm | विजुभाऊ
पी एम टी चे भाडे वाढले.... ते किती वर्षानन्तर वाढवले?
पुण्यात बस सर्व्हीस इतकी विचित्र आहे ( वाईट म्हणालेलो नाय विचित्र म्हणालोय)स्वारगेटावर तर बस कुठून सुटते तेच कळत नाही. कधीही पहावे तेंव्हा बसेस भरगच्च असतात. गर्दीच्या वेळेत हे लोक जास्त बसेस का सोडत नाहीत?
बंगरूळात बस सर्व्हीस खूपच मस्त आहेत. मोठ्या आणि संख्येने खूप आहेत.
27 Jul 2010 - 2:08 pm | Dhananjay Borgaonkar
पेट्रोल, गॅस, डिझेलचे भाव वाढले तर रिक्षा, बस, इ.ची भाववाढ सहाजिक आहे.
+१
27 Jul 2010 - 2:22 pm | स्वतन्त्र
पण,इथे भाववाढीबरोबर तशी सेवाही हवी ! दर्जाही वाढायला हवा !
27 Jul 2010 - 2:28 pm | Nile
अहो सेवा अन दर्जा सुधारावा असे वाटत असेल तर पैसे वाढीव द्यावे लागणारच ना?
27 Jul 2010 - 2:29 pm | सागर
तुमच्या आमच्या म्हणण्याने काही फरक पडणार आहे का? भाडे वाढ होणारच.
पेट्रोल डिझेल चे भाव एवढे वारेमाप वाढवल्यावर सरकारचे कोणी काही उपटले का? त्यांनी सरळ सांगितले होते की भाववाढ कोणत्याही परिस्थितीत मागे घेतली जाणार नाही. ३-४ रुपये वाढल्याने जनतेवर काही फार ताण नाही पडत. (प्रणव मुखर्जी आणि मुरली देवडा यांची वक्तव्य आहेत ही)
पेट्रोल डिझेलच्या तुलनेत पीएमटीच्या किरकोळ भाडेवाढीने काय फरक पडणार आहे?
महागाई वाढवण्यात अजून हातभार लागेल एवढेच :(
काँग्रेसला जो पर्यंत सत्ता मिळत आहे तो पर्यंत देशाचे धिंडवडे निघणे अटळ आहे. तेव्हा चालू द्या.. आणि गप्प बघत बसा .. कसे?...
27 Jul 2010 - 3:45 pm | मितभाषी
काँग्रेसला जो पर्यंत सत्ता मिळत आहे तो पर्यंत देशाचे धिंडवडे निघणे अटळ आहे. तेव्हा चालू द्या.. आणि गप्प बघत बसा .. कसे?...
>>>>>>>
आता याचा इथे काय संबंध. हे अपरिहार्य होते.
_______________~**********~______________________
पेट्रोल, गॅस, डिझेलचे भाव वाढले तर रिक्षा, बस, इ.ची भाववाढ सहाजिक आहे.>>>> +२ सहमत.
अवांतर : सेनाभाजपच्या सरकारने तर तिजोरीत खडख्डाट करुन टाकला त्याचे काय?????
28 Jul 2010 - 11:35 am | देवदत्त
हे अपरिहार्य होते.
तुम्हाला गैरलागू किंवा विषयांतर म्हणायचे आहे का? की कॉंग्रेसला सत्ता मिळणे अपरिहार्य होते असे म्हणायचे आहे?
बाकी त्याचा संबंध असणारच आहे. वरून जेव्हा पाहिजे तशी भाडेवाढ लादली जाते तेव्हा खालचे त्यात भरडले जाणार आणि मग त्यातून बाहेर निघण्याकरीता /किंवा हात धुवून घेण्याकरीता स्वतःही भाडेवाढ करणारच.
सेनाभाजपच्या सरकारने तर तिजोरीत खडख्डाट करुन टाकला त्याचे काय?????
सेनाभाजपने काय केले तो मुद्दा नाही. पण तरीही पाहिजे असेल तर ५वर्षे:५०वर्षे ह्या प्रमाणात ते कसे काय ठरवू शकता? काँग्रेसने काय केले एवढ्य्य्या वर्षांत?
28 Jul 2010 - 1:57 pm | मितभाषी
तुम्हाला गैरलागू किंवा विषयांतर म्हणायचे आहे का? की कॉंग्रेसला सत्ता मिळणे अपरिहार्य होते असे म्हणायचे आहे?
इंधनाचे भाव वाढले म्हण्जे हे भाडेवाढ वगैरे ओघाने आलेच. त्याअर्थी 'अपरिहार्य' म्ह्टले होते.
इथे काँग्रेसच काय सम्बध . त्यांच्या वाड्यातील आडात काय डिझेल पेट्रोल पाझरते ? म्हणुन मग आले मनात कि वाढवा भाव. =)) =))
.
.
.
भावश्या.
___________
29 Jul 2010 - 7:16 am | देवदत्त
पहिले वाक्य वाचून अपरिहार्य चे प्रयोजन समजले.
दुसर्या वाक्यावर टिप्पणी नाही :)
27 Jul 2010 - 9:42 pm | मस्त कलंदर
इथे मुंबईत बेस्ट च्या बशीचे किमान भाडे तीन रूपये आहे.. आणि रेल्वेचे चार रू. त्यामानाने पुण्यातले भाडे जास्त आहे असे वाटते.. माझ्या सध्याच्या राहत्या घरापासून कॉलेजपर्यंत बसचे भाडे गेले वर्षभर आठ रू होते आणि इतर इंधनांचे भाव वाढल्यावरही ते अजूनही तितकेच आहे....
बाकी चालू द्या.
27 Jul 2010 - 9:44 pm | नावातकायआहे
५ रुपये परवडत नसल त रगडलेलि सायकल घ्या
ति बि परवडत नसल त डबल सिट कोन नेतय का बघा (तुमि ज चालवनार असाल त कोनि तरि भेटल ..)
ते बि नाय त चालत जा
ते बि जमत नसल त घरि बसा....
पन आयश्प्पत आस्ले धागे काडु नका...
28 Jul 2010 - 1:14 am | आनंदयात्री
हाण्ण हाण्ण रे भावड्या !! एकच नंबर प्रतिसाद ..
=)) =)) =))
27 Jul 2010 - 10:41 pm | रेवती
मला वाटते सध्याच्या वाढलेल्या इंधनाच्या किमतीमुळे हे झाले असावे.
पी एम टीच्या सेवेचा लाभ मी गेल्या जानेवारी घेतला होता.;)
मुख्य रस्त्यांवर धावणार्या बशींबद्दल माहीत नाही पण मी आणि आई सातारा रोडवर उभ्या राहून मावशीकडे जायला रिक्षा करावी कि बसने जावे या विचारात होतो. आम्हाला हवी असलेली बस चक्क बसस्टॉपवरच उभी होती.....निघणार होती. कंडक्टरसाहेबांचे आमच्याकडे लक्ष गेल्यावर "हळूहळू या मी थांबतो" असे म्हणून आम्ही येइपर्यंत थांबले. मी आवाक् झाले. आम्ही २.३० रू गुणीले दोन व्यक्ती असे पाच रू. दिल्यावर, साहेबांकडे सुटे पैसे होते त्यांनी न खेकसता आमचे पैसे परत केले. परत येतानाही मग बसने येण्याचे मानसिक बळ मिळाले. तो अनुभवही चांगला होता. चारेक दिवसांनी पुन्हा डेक्कनवरून बस घेण्याची वेळ आली (बघा, यावेळी हिम्मत वाढली!;)) कंडक्टरसाहेब तर भारीच होते. सगळे पाशिंजर चढेपर्यंत थांबले. "चढले का सगळे?" अशी खात्री केली (त्यासाठी त्यांना ओरडावे लागले इतका गलका होता) मग डब्बल बेल मारून आमची बस मार्गस्थ झाली. बराच वेळ माझी अवस्था "स्वप्नात रंगले मी" अशी झाली होती.
याचा अर्थ नेहमीच अशी सेवा मिळेल असे नाही याची पूर्ण कल्पना आहे.;)
28 Jul 2010 - 7:38 pm | गणपा
हा हा हा रेवती तै कदाचीत पी एम टी चा सौजन्य सप्ताहः चालु असेल तेव्हा
=)) =))
27 Jul 2010 - 11:10 pm | पुष्करिणी
माझाही सहामहिन्यांपूर्वी आलेला पी.एम.टी. चा अनुभव अगदी 'सुखद धक्का' या कॅटेगिरीतच मोडतो. कंडक्टर सगळे व्यवस्थित चढले-उतरले हे पाहूनच डबल बेल देत होता. शाळेच्या वेळात इतकी बरीच शाळकरी मुलं अगदी शेवटच्या पायरीवर ही उभी होती, त्यातल्या अगदीच लहान मुलांना बाकीच्या मुलांनी नीट वर चढवलं आणि कंडकटरनं एका न आलेल्याची चौकशीही केली. सुट्ट्या पैशांचा इतकी गर्दी असूनही अजिबात प्रॉब्लेम नव्हता.
परत एकदा त्याच रूटनं जाताना अप्पा बळवंत चौकात बस पकडली..बस चुकीचं वळ्ण घेतीय हे लक्षात आल्यावर लोकांनी आवाज करायला सुरूवात केली, मग कळलं की ड्रायव्हर-कंडक्टर जोडी नविन होती, नुकतच ट्रेनिंग संपलेली. तेवढ्यात एक उपजतच नेतृत्वगुण अंगी असलेले काका गर्दीतून मार्गक्रमण करत ड्रायव्हर शेजारी उभे राहिले आणि पुढची ३० मिनिटं प्रत्येक योग्य स्टॉपला बस थांबवत ,त्या स्टॉपचं नाव सांगत आणि वेळोवेळी 'नका हो घाबरू, आहोत की आम्ही ' असा त्याला धीर देत बस मार्गस्थ केली. काकांचा स्वतःचा स्टॉप आल्यावर ह्या त्यांच्या धडाडीनं स्फुरण चढलेल्या अजून एक आजी पुढच्या ७ स्टॉपांची धुरा घ्यायला उठल्या. शेवटच्या स्टॉपवर सगळे उतरल्यावर आजींनी ड्रायव्हर-कंडक्टरची परत एकदा उजळणी करून घेतली. फार मजा आली ..
28 Jul 2010 - 12:16 am | मी-सौरभ
माझ्या मते PMT आपण शिव्या घालतो तितकी वाईट नक्कीच नाही.......
28 Jul 2010 - 1:58 am | अडगळ
रात्री १० -१०:३० च्या दरम्यान सुटणार्या कात्रज चिंचवड गाव या बशीने मी ८-१० वेळा गेलो आहे.
विमान झक मारतंय.
निमिषार्धात डांगे चौक.
रामरक्षेत वर्णन केलेला "मनोजवम् मरुत्तुल्य वेगम्" तो हाच असावा.
असल्याच बशीतून प्रवास करताना आइन्श्टाईनला काळ की अवकाशाची वक्रता वगैरे सगळं सुचलं असावं.
28 Jul 2010 - 3:55 am | घाटावरचे भट
पीएमटीची पम्पमल झाल्यापासून सेवा सुधारल्यासारखी वाटते. पुण्यात परत आल्यापासून बशीने फिरण्याचा योग अनेकदा आला आहे. सेवा प्रत्येक वेळी चांगली मिळालेली आहे.
28 Jul 2010 - 4:46 am | शिल्पा ब
मी पुण्यात तसा खूप वेळा गर्दीच्या वेळी बशीने प्रवास केला आहे...क्वचित दोन्ही पाय टेकवून उभे राहायला जागा मिळाली आहे....एकदा तर उतरायच्या आधी एकदम बस गचकन थांबली आणि मी गाडीतून बाहेर फेकले गेले...जीवावरच हाताच्या तळव्यावर निभावलं...बाकी मागच्याच वर्षी पुण्यात सकाळी सकाळी गणपतीला गेले होते तर कंडक्टर आणि लोकं सगळ्यांचाच चांगला अनुभव आला...लोकांनी कोणत्या बशीने जायचं ते सांगितलं आणि ड्रायव्हरने (बस जाते कि नाही याची चौकशी करायची असल्याने) पुढून मला बसमध्ये चढू देऊन कंडक्टरने योग्य स्थळी उतरवलं..
बाकी आता भाववाढीबद्दल काय बोलणार? भाव कधी कमी झालेले ऐकलेय का?
29 Jul 2010 - 12:46 am | कार्लोस
पुने तिकदे सग्ले उने
29 Jul 2010 - 9:59 am | पाषाणभेद
काहीही असो. खाजगीकरणाचा बडगा डोक्यात बसण्यापेक्षा जे सार्वजनीक आहे त्यातच समाधान माना.
खाजगी बसवाहतूकदार मन मानेल तसे वागतात हा अनुभव आहे.
29 Jul 2010 - 3:39 pm | हुप्प्या
सेवा बरी मिळत असेल तर दरवाढ केलेली चालेल.
पुण्यातील काही मंडळींशी बोलताना एक ऐकले की पीएमटीचा कारभार गलथान असावा ह्याकरता जाणूनबुजून अर्थपूर्ण प्रयत्न केला जात आहे. एक (की दोन) नामवंत स्वयंचलित दुचाक्या बनवणारे कारखानदार ह्या करता प्रयत्न चालू ठेवतात. वरचे अधिकारी, युनियन लीडर, राजकीय नेते यांना मलिदा देऊन बसची देखबाल होणार नाही, त्यांची स्वच्छता वेळेवर होणार नाही, यांत्रिक भाग सदोष असतील असे बघितले जाते. जर सार्वजनिक बसेस नीट नसतील तर साहजिकच स्कूटर्स व अन्य दुचाक्या जास्त विकल्या जातील.
माझा मर्यादित पीएमटी अनुभव असा आहे की चालक आणि वाहक तितके वाईट नव्हते पण बसा अत्यंत भयानक मोडक्या आणि घाणेरड्या होत्या.
वाहतूक, पार्किंगची स्थिती इतकी वाईट असताना सार्वजनिक वाहने उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे.
विशेषतः ज्येष्ट लोक, लहान शाळकरी मुले यांकरता.