उडदाचं घुटं

शाल्मली's picture
शाल्मली in पाककृती
19 Jul 2010 - 10:58 pm

नमस्कार मंडळी,

आज खूप दिवसांनी येत आहे. सोबत आणला आहे रोजच्या जेवणातला साधासाच एक पदार्थ. रोजच्याच आमटीचा कंटाळा आला की करावं असं उडदाचं घुटं किंवा उडदाची आमटी.

साहित्यः-
उडदाची डाळ १ वाटी
हरभर्‍याची डाळ १ मोठा चमचा
कोरडं खोबरं किसून साधारण पाव वाटी
लसूण ४-५ पाकळ्या, आलं एक पेराएवढं, मीठ, चिंचेचा कोळ १ मोठा चमचा.
फोडणीचे साहित्यः- तेल, मोहरी, जिरं, कढिपत्ता, हिरवी /लाल मिरची, कोथिंबीर
कृती-
उडदाची डाळ व हरभर्‍याची डाळ कुकरात ४ शिट्ट्या करुन शिजवून घ्यावी. एका कढल्यात कोरडं खोबरं आणि जिरं खरपूस भाजून घ्यावे. शिजलेली डाळ डावेनी घोटून एकजीव करुन घ्यावी. आता त्यात अंदाजे पाणी घालून उकळवण्यास ठेवावी. भाजलेलं जिरं आणि खोबरं त्यात चुरुन घालावे. चिंचेचा कोळ,चवीप्रमाणे मीठ घालावे.
एका कढल्यात तेलाची फोडणी करावी. त्यात कढिपत्ता, हिरवी /लाल मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण घालावे. लसूण खमंग होईपर्यंत परतावे. आता उकळी आलेल्या मिश्रणात ही फोडणी घालावी. अजून एक उकळी येऊ द्यावी.
वाफाळत्या भातावर गरमागरम घुटं घेऊन भात ओरपावा.

--शाल्मली.

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

19 Jul 2010 - 11:07 pm | श्रावण मोडक

जेवण झालं होतं हे बरं. असे धागे भारतातील अशाच वेळी टाकत जा हं... :)

चतुरंग's picture

19 Jul 2010 - 11:13 pm | चतुरंग

थोडक्यात वाचलो मी पण! :T

(घुटघुटीत)चतुरंग

प्रभो's picture

19 Jul 2010 - 11:08 pm | प्रभो

मस्त दिसतेय आमटी.....पण कधी खाल्ली नाही...

आईला करायला सांगायला हवी... :)

स्वाती२'s picture

19 Jul 2010 - 11:15 pm | स्वाती२

मस्तच!
गेल्याच आठवड्यात आईशी बोलताना या आमटीची आठवण निघाली . माझ्या आईला तिच्या आजीच्या हातच्या घुट्याची आठवण येत होती आणि मला माझ्या आजीच्या!

क्रान्ति's picture

19 Jul 2010 - 11:20 pm | क्रान्ति

दिसतेय पाकृ. :)

क्रान्ति
अग्निसखा

शिल्पा ब's picture

19 Jul 2010 - 11:43 pm | शिल्पा ब

छान दिसतेय...करुन बघते या आठवड्यात..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

रेवती's picture

20 Jul 2010 - 1:22 am | रेवती

छान पदार्थ!
गरमागरम भात आणि ही आमटी ........जोडीला पाऊस!
मज्जा!
आणि शाल्मलीताई वेलकम ब्याक! :)

रेवती

धनंजय's picture

20 Jul 2010 - 3:39 am | धनंजय

यात फोडणीत कोथिंबीरही परतायची आहे का? (फोडणीत लसूण खमंग होईस्तोवर कोथिंबीर चांगलीच कोळपेल.)

गोरीगोमटी आमटी छानच दिसते आहे. चिंचही बहुधा हलक्या हातानेच घालायची असेल.

शाल्मली's picture

23 Jul 2010 - 10:30 pm | शाल्मली

नाही.. नाही.. जरा फोडणीचा क्रम चुकला.. आधी लसूण परतून घ्यायची आणि मग कोथिंबीर घालून लगेच गॅस बंद करायचा. म्हणजे कोथिंबीरही हिरवी रहाते. :)
लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

--शाल्मली.

मीनल's picture

20 Jul 2010 - 4:19 am | मीनल

उद्याच करेन म्हणतेय
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

सहज's picture

20 Jul 2010 - 7:07 am | सहज

करुन पाहीले पाहीजे.

तूर, मुग, मसुर, मिश्र बरेचदा होते आता हे स्पेशल उडीद केले पाहीजे.

स्वाती दिनेश's picture

20 Jul 2010 - 11:16 am | स्वाती दिनेश

हरबरा डाळ घालून केले नाही कधी..
उडदाचं वरण आमच्याकडे ब्रह्मदेवाच्या नेवैद्यासाठी करतात.
स्वाती

जागु's picture

21 Jul 2010 - 11:20 am | जागु

छान पाकृ.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

21 Jul 2010 - 1:21 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

माझी आई घुट वेगळ्या पद्धतीने करते. म्हणजे उड्दाचे पीठ वापरून.
पण इथे ते मिळ्त नसल्याने मी या सुखापासून वन्चित होते....आता करु शकेन्....शुक्रान्!(अरेबिक मध्ये आभार)

श्रीयुत संतोष जोशी's picture

21 Jul 2010 - 6:36 pm | श्रीयुत संतोष जोशी

छान पाकक्रिया आहे.
करून पहायलाच हवी.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

अरुंधती's picture

21 Jul 2010 - 10:07 pm | अरुंधती

पाकृ मस्तच! माझी काकू करते बहुतेक शनिवारी हे घुटं आवर्जून! :)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

आमोद शिंदे's picture

22 Jul 2010 - 3:50 am | आमोद शिंदे

वा! चविनं खाणार त्याला देव देणार.

चित्रा's picture

24 Jul 2010 - 12:22 am | चित्रा

उडदाचे घुटे पिण्यासारखी हवा आहे आज, तेव्हा नक्की करतेच :)

छान. मला या आमटीला घुटे म्हणतात हे बरेच वर्षे माहिती नव्हते. सासरी आल्यावर कळले. आमच्याकडे त्याला उडदाची आमटी असेच म्हणत असत.

फक्त त्यात हरभर्‍याची डाळ आमच्याकडे घालत नाहीत. ही पाककृती वेगळी दिसते आहे, त्याबाबतीत.

फेसबूकवरच्या 'आम्ही सारे खवय्ये' या प्रमोद तांबे चालवत असलेल्या पेजवर ही पाकृ फोटोसहीत उचलून टाकली आहे. शब्द थोडेफार बदललेत.
मी रिपोर्ट करण्यासाठी अजून माहिती वाचली, पण चोरलेली पाकृ, फोटो माझे स्वतःचे नसल्याने मी ते रिपोर्ट करु शकत नाही.

हे पेज रिपोर्ट करण्यासाठी मिपा प्रशासन काही करु शकेल का?
मिपाकरांच्या पाकृ चोरण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही.

ही फेसबूकवरच्या पोस्टची लिंक

हीच पाककृती स्वत: करून फोटो टाकून देता आली असती फेसबुकावर. अर्धापाऊण तास लागला असता.
//अशी पाकृती मिपा संस्थळावर आलेली आहे तरी नवीन लिहावी// हे तांबेला कळवू शकतो.ग्रुप अडमिनला दखल घ्यावीच लागेल.

रेवती's picture

16 Aug 2017 - 6:18 am | रेवती

रुपी, शाल्मलीने जर फेसबुकातूनच तिकडे निषेध नोंदवला तर बरे होईल असे वाटतेय.
स्वातीताई (स्वातीदिनेश), शाल्मलीला कळवता येईल का?