पालेभाजी - करडई

जागु's picture
जागु in पाककृती
17 Jul 2010 - 1:18 pm


लागणारे साहित्य :
करडईची पाने निवडून, धुवुन चिरुन
३-४ लसुण पाकळ्या
१ मोठा कांदा चिरुन
कोणती डाळ भिजवुन (चणाडाळ, मुगडाळ, तुरडाळ)
मिरची १ किंवा २
थोड ओल खोबर करवडून
हिंग, हळद
चवीपुरत मिठ
किंचीत साखर
तेल

पाककृती:
तेलात लसणाच्या पाकळ्यांची फोडणी देउन त्यावर मिरची व कांदा घालावा, हिंग, हळद घालुन डाळ व करडई घालावी. ड नंतर परतुन थोडावेळ भाजी शिजु द्यावी. मग मिठ, साखर, खोबर घालुन परतुन गॅस बंद करावा.

जाणकारांनी अधिक माहीती द्यावी
मी भाजीवालीकडून भाजी घेतली. आणि तिलाच रेसिपी विचारली. ती म्हणाली की ही भाजी तेलकट असते.

प्रतिक्रिया

पांथस्थ's picture

17 Jul 2010 - 2:00 pm | पांथस्थ

भाजी तेलकट असते

हे बरोबर असावे कारण करडईच्या बियांचे तेल काढतात.

लहानपणी मामाच्या शेतात खाल्ली आहे. माझ्या आठवणीप्रमाणे हि भाजी थोडी आंबट असते.

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

रेवती's picture

17 Jul 2010 - 4:25 pm | रेवती

तुम्हाला अंबाडीबद्दल म्हणायचे आहे का? ती आंबट असते.
आमच्याइथे करडई वाईट असली की कडू निघते.

रेवती

कच्चा पापड पक्का पापड's picture

17 Jul 2010 - 3:13 pm | कच्चा पापड पक्क...

करडईची पाने निवडून, धुवुन चिरुन कुकर मध्ये शिजवून घ्यावी. त्यात डाळीचे पीट घालुन घोटुन घेणे. तेलात हिंग, हळदीची फोडणी देउन त्यावर बारीक वाटलेली मिरची व लसुण घालावा, नंतर घोटलेली भाजी ,मीठ घालुन शिजवणे. अशी पळीवाढी भाजीपण छान लागते.

कच्चा पापड

रेवती's picture

17 Jul 2010 - 4:23 pm | रेवती

जागुताई, आमच्यकडे चक्क करडई मिळते.
दरवेळेस चांगली कोवळी असेलच असे नाही.
कच्चा पापड साहेब म्हणतात त्याप्रमाणे ही भाजी शिजवून घोटून मग फोडणी घालते. छान लागते. भाकरीबरोबर तर ग्रेटच लागते.
मी एक दोन वेळा पान मोडून चव न बघता करडई आणली आणि कडू निघाली. अश्यावेळी फेकून देण्याशिवाय पर्याय नसतो.

रेवती

विंजिनेर's picture

17 Jul 2010 - 5:23 pm | विंजिनेर

करडईची भाजी + भाकरी जोडीला कांदा = फस्क्लास
शेवटी लोटाभर ताक आणि मोठ्ठा ढेकर!

जागु's picture

17 Jul 2010 - 9:17 pm | जागु

पांथस्त ही भाजी आंबट नसते.
कच्चा पापड, रेवती तुमची रेसिपी आवडली पुढच्यावेळी तिच करणार.
विंजीनेर व्वा मस्त बेत.

प्रभो's picture

18 Jul 2010 - 9:42 pm | प्रभो

मस्त!!!

स्मिता_१३'s picture

19 Jul 2010 - 7:32 am | स्मिता_१३

स्मिता