गाभा:
मिपाकरहो,
सध्या कंपनी मध्ये Go Green Go Green चे वातावरण आहे. त्यासाठी कंपनी एक गट तयार केला आहे. आणि आता सर्वांना t-Shirt वर "पर्यावरण" संर्दभात झकास पंच लाईन पाहिजे आहे. यासाठी मिपाकर मला मदत नक्कीच करतील.
- वाक्य शक्यतो मराठीतच पाहिजे आहे.
--श्रीराजे
प्रतिक्रिया
13 Jul 2010 - 8:03 pm | रामदास
कल्पना चांगली आहे.
13 Jul 2010 - 8:26 pm | राजेश घासकडवी
'हिरवा साज' कसं वाटतं? :)
जोक्स असाईड,
हिरवा साज, हिरवा बाज
भूमाईची राखू लाज
आणि चित्र - गोलामध्ये एक पान.
14 Jul 2010 - 7:27 am | सुनील
मी हिरवा माज असे वाचले!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
14 Jul 2010 - 1:04 am | शिल्पा ब
झाडे लावा झाडे जगवा...
जुनं असलं तरी अजूनही लागू होतंय
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
14 Jul 2010 - 8:44 am | श्रीराजे
अजुन येउ द्यात...
14 Jul 2010 - 9:02 am | सहज
कमीत कमी पोल्युशन
हेच उत्तम सोल्युशन
झाडे लावा आणि झाडे जगवा
पुढच्या पिढीला द्या स्वच्छ हवा
अजुन काही सुचल्यास लिहीन :-)
14 Jul 2010 - 9:05 am | स्पंदना
निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका
हे कस वाटत? की टी शर्ट वर मावायच नाहि?
योगेश २४ यांच्या लेखतल आहे.
पाहिजे तर थोडी काटछाट करा. मला फार आवडल हे वाक्य.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
14 Jul 2010 - 9:44 am | अडगळ
प्रायोगिक :
आणि झाडे नग्न झाली
ऐतिहासिकः
इथे गवताला भाले फुटतात
रोम्यांटिक :
झाडे लावा , झाडे जगवा , झाडे वाढवा , आडोसे मिळवा
सामाजिकः
मेधाने लावली झाडे चार
झाडाला पाणी देई सरदार
नरेंद्र त्यांचा राखणदार
हिरवे झेंडे नर्मदेपार
लोककला:
सोसंना गं ऊन बाई श्रावणाचं,
काळिज म्हणायचं का रावणाचं,
सावलीत घ्या पाखरू,
अन राया चला वृक्षारोपण करु.
14 Jul 2010 - 10:05 am | श्रीराजे
लई भारी..वाक्य आहेत..
पण :? t-Shirt वर खुप मोठी वाटतील.. बघु ग्रुपला विचारतो.
14 Jul 2010 - 10:34 am | माउली
झाडे लावा , झाडे जगवा , झाडे वाढवा , आडोसे मिळवा....लय भारी....
<:P <:P
14 Jul 2010 - 8:20 pm | धमाल मुलगा
=)) =))
एक से बढकर एक हो!
श्टेज कोन्चं म्हनायचं? :D
14 Jul 2010 - 9:47 am | प्रचेतस
स्वप्न उद्याचे..
हरीत निसर्गाचे.....
करू संवर्धन पर्यावरणाचे...
घडवू राष्ट्र समृद्धिचे, सुखाचे....
14 Jul 2010 - 9:48 am | मोहन
निसर्गाने तुम्हाला सृष्टी सौंदर्य दिले, तुम्ही निसर्गाला काय देणार ?
मोहन
14 Jul 2010 - 10:02 am | पाषाणभेद
झाडे लावा, मजेत र्हावा
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
14 Jul 2010 - 10:11 am | स्वछंदी-पाखरु
एक मूल,.....झाडे चार.........
आज का डोळ्यात माझ्या, पाणी पुन्हा दाटले होते...
![](http://t2.gstatic.com/images?q=tbn:MJC-QFpuxmAT3M:http://3.bp.blogspot.com/_AVneizTKcl8/SDEyWDf3X7I/AAAAAAAABJs/JqJI3tgw5u8/s320/240-FreeBird.jpg)
कासाविस या व्याकुळ आत्म्यात, आभाळ भरून साठले होते...
पण... पंख पिंजर्यातच अडकलेले होते..........
14 Jul 2010 - 10:31 am | माउली
झाडावर प्रेम करा....
झाडाखाली नको....
8} 8} 8}
14 Jul 2010 - 11:45 am | शिल्पा ब
झाडावर जाण्याऐवजी झाडाखालीच सोपं नाही का जाणार?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
14 Jul 2010 - 12:07 pm | माउली
=D> =D> =D> =D>
14 Jul 2010 - 12:06 pm | ज्ञानेश...
अफलातून ! =))
14 Jul 2010 - 4:50 pm | निखिलचं शाईपेन
झाडांखाली प्रेम करण्यासाठी
आधी
झाडांवर प्रेम करा..
All The Best ...
-निखिल.
14 Jul 2010 - 11:49 am | विजुभाऊ
Even In Dream
Go green......
14 Jul 2010 - 12:21 pm | शिल्पा ब
त्यांनी एवढं लिहिलंय मराठीत चालेल म्हणून तर द्या कि मराठी वाक्य...
झाडे लावा उष्णता कमी करा.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
14 Jul 2010 - 1:53 pm | विजुभाऊ
घ्या मराठीत
![](http://www.sdphadnis.com/sdphadnis_img_002.gif)
हिरवी वने
हिरवी मने
14 Jul 2010 - 2:09 pm | सन्दीप
उष्णता कुठे कमी करायची झाडावर की झाडाखाली
14 Jul 2010 - 8:04 pm | शिल्पा ब
ते तुमच्यावर सोपवतो....
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
14 Jul 2010 - 1:26 pm | नगरीनिरंजन
"आम्ही सृष्टीचे शिलेदार
करु धरती हिरवीगार"
*****************************
अळवावरचे पाणी
14 Jul 2010 - 2:19 pm | शिल्पा ब
अजुन एक..
पर्यावरण छान
उंच भारताची मान
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
14 Jul 2010 - 2:21 pm | नावातकायआहे
झाडे वाचवा आणि स्वःताला वाचवा
टि शर्ट वरः
झाडे
आणि वाचवा
स्वता:ला
वाचवा ह्या शब्दाचा फाँट साईज झाडे,आणि व स्वता:ला ह्या तिन्ही ओळिंपेक्षा मोठा
14 Jul 2010 - 3:11 pm | परिकथेतील राजकुमार
झाडे लावा, नाहीतर चपला घालुन चालु पडा.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
14 Jul 2010 - 4:08 pm | माउली
~X( ~X( ~X(
14 Jul 2010 - 8:20 pm | धमाल मुलगा
पंचलाईनसाठी तुकोबा महाराजांना शरण जा :)
पंचलाईन खाली ब्लॉककोट्समध्ये दिली आहे :
(हो, हल्ली असं सपष्ट लिवावं लागतंय राव! काय इथं मिपाला हुप्पकर्मी छिद्रान्वेषक वाळव्या लागत चालल्यात.... मुद्द्याची बाब अशी शेफ ठेवावी लागतिया.)
:)
14 Jul 2010 - 8:44 pm | अविनाशकुलकर्णी
झाडा झडती
14 Jul 2010 - 9:10 pm | पक्या
वर मोठ्या अक्षरात वाचवाल तर वाचाल
खाली - झाडे
बाजूला मोठ्या झाडाचे आणि त्याला टेकून आरामशीर झोपलेल्या माणसाचे चित्र
जय महाराष्ट्र , जय मराठी !
14 Jul 2010 - 9:12 pm | शिल्पा ब
झाडे लावलीच पाहिजेत
मनसेच्या हुकुमावरून...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
14 Jul 2010 - 9:46 pm | विकि
पंचलाईन-ऑक्सीजन. किंवा जगण्यासाठी आवश्यक प्राणवायू(टी शर्ट च्या बाजूला दोन तीन हिरवी झाडे दाखवा)
15 Jul 2010 - 5:17 am | मेघवेडा
एका ब्लॉग वर सापडले. फारच बोलके चित्र आहे.
15 Jul 2010 - 7:00 am | सहज
एक जुनी फिल्म डिव्हीजनने बनवलेली कार्टुन फिल्म आठवली. एक मनुष्य झाडाखाली बसला असतो, दुसरा मनुष्य ते झाड तोडायला येतो. मग त्यांची झटापट होते, तेवढ्यात इतर लोक येतात. मधेच एक फळ त्या झाड तोडायला आलेल्या माणसाच्या डोक्यात पडते....
असो इतके वर्णन करायचा उद्देश, कोणाला ती फिल्म आठवत असेल व जालावर उपलब्ध असेल तर दुवा द्या व दुवा घ्या :-)
15 Jul 2010 - 11:15 pm | विकास
मी खूप शोधायचा प्रयत्न केला पण मिळाली नाही. :(
त्यात जेंव्हा एक "नतद्रष्ट" झाड तोडायला निघतो तेंव्हा त्यातील दुसरा साधा माणूस, त्यांच्या मारामारीत जबरा ओरडताना घेतला आहे. मग त्यांच्या डोक्यावर फळ पडते आणि डोळे उघडतात. मग सगळ्यांचा नाच देखील बघण्यासारखा आहे. :)
मला पण दुवा मिळाला तर आवडेल.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
15 Jul 2010 - 8:51 am | श्रीराजे
खरचं चित्र खुप छान आहे..
t-Shirt च्या पाठीमागच्या बाजुस टाकण्यात काही हरकत नाही.
15 Jul 2010 - 9:51 am | शिल्पा ब
हो पण आधी त्या ब्लॉग वाल्याची परवानगी घ्या म्हणजे नंतर भानगड नको..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
15 Jul 2010 - 11:19 am | माउली
फारच छान...
15 Jul 2010 - 2:19 pm | माउली
हे चित्र आपल्याला कोणत्या ब्लॉग वर सापडले???
15 Jul 2010 - 6:12 pm | बरखा
वाढवून झाडा॑चा हिरवा साज,
आपलेच आयुष्य वाढवू आज.
19 Jul 2010 - 2:01 pm | मितभाषी
फेडुया धरतीमातेचे ऋण.
वृक्षारोपण करुन.
26 Jul 2010 - 3:25 pm | बेभान
१. हम दो हमारे दो : या वाक्या आधी/ नंतर/पुढे /वरती /खाली एक जोडी (पुरुष आणि स्त्री) दोन आपापल्या (त्यांनी लावलेल्या) झाडाखाली एकमेकांचे हातात हात धरून बसले आहेत.
२. वरील संकल्पना वापरून "आमचा आधारवड" हे लिहून त्या खाली एक वृद्ध जोडपे बसले आहे. पंचलाईन कोणाला सुचली तर सांगा.
३. झाडे लावा कारण: आणि मग कारण एक, दोन, तीन,.... एक झाड त्याच्या आयुष्यात किती प्रदुषण कमी करते ते ही लिहा.
४. जर तुम्हाला तुमचे सगळे ऐकुन घेणारा, तुमच्याशी कोणत्याही गोष्टीवर वाद न घालणारा, तुम्हाला उन्हात सावली देणारा, मित्र हवा असेल तर: झाडे लावा.
५. मी माझा प्रत्येक वाढदिवस रोपे देवुन साजरा करतो. जरी करत नसाल तरी टी-शर्टद्वारे लोकांना ही idea देण्यात काहीच गैर नाही.
६. मी माझ्या बायकोवर आणि झाडांवर सारखेच प्रेम करतो.
७. झाडे लावा. झाडे जगवा. आनंद मिळवा.
८. तुमच्या मुलाच्या निरोगी/सुस्थ/आरोग्यदायी/निरामय भविष्यासाठी: झाडे लावा.
९. ते I love NY, LA, SD, त्याच फॉरमॅट मध्ये I love Trees.
आठवतील/जमतील तसे टाकतो.