ही भाजी समुद्राच्या कडेला मिळते. काही क्वचीत कोळणी घेउन येतात ही भाजी.
ही भाजी दिसायला ऑफीसटाईम्/घोळीच्या भाजीसारखी दिसते. हिची चव खारट असते. नुसते पान खाल्ले तरी खारट लाग्ते. ह्याची पाने काढून ती डाळीमध्ये, कोलंबीमध्ये, ओल्या, सुक्या जवळ्यात घालतात.
ज्या विकायला बसतात त्या सांगतात की ही भाजी औषधी असते. रोगांवर चांगली असते. पण नेमकी काय गुणधर्म किंवा कोणत्या आजारावर गुणकारी आहे हे त्यांना सांगता येत नाही.
प्रतिक्रिया
13 Jul 2010 - 4:53 pm | जागु
फोटो थोडा मोठा हवा आहे. साईझ किती टाकायची इमेजची ?
13 Jul 2010 - 10:23 pm | विसोबा खेचर
मस्त! :)
13 Jul 2010 - 11:16 pm | प्राजु
धन्य आहेस बाई!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
13 Jul 2010 - 11:26 pm | प्रियाली
ही भाजी मी कधी ऐकली नव्हती. नवीनच माहिती मिळाली.
14 Jul 2010 - 2:51 pm | जागु
तात्या, प्राजु, प्रियाली धन्यवाद.
14 Jul 2010 - 7:19 pm | वेताळ
तु राहतेस कुठे? ह्या भाज्या मिळणे खुप कठिण असते.त्यात त्याची पाकृ. तर महाकठिण काम. खरोखर तु ह्याचे एक पुस्तक काढ.
वेताळ
15 Jul 2010 - 12:23 pm | जागु
पुस्तक काढायचे आहेच मला. पण आधी मी रेसिपी फोटो काढून फोटो जमा करतेय.