उडणारे पेंग्वीन

विकास's picture
विकास in काथ्याकूट
1 Apr 2008 - 6:35 pm
गाभा: 

आजच बीबीसीने खालील लघूमाहीतीपट जाहीर केला. मिपा सदस्यांना तो पहायला आवडेल अशी आशा करतो!

प्रतिक्रिया

प्राजु's picture

1 Apr 2008 - 7:32 pm | प्राजु

इतकी सुंदर व्हिडीओ क्लिप इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
उडूनी जा पाखराच्या ऐवजी, उडूनी जा पेंग्विना असे म्हणावे वाटले..

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

चतुरंग's picture

1 Apr 2008 - 9:08 pm | चतुरंग

पेंग्विन्स स्थलांतर करुन इतके लांब उडत जातात हे माहीत नव्हते;))

चतुरंग

सर्किट's picture

1 Apr 2008 - 9:52 pm | सर्किट (not verified)

रंगराव, विसरलात का ?

- सर्किट

चतुरंग's picture

1 Apr 2008 - 9:59 pm | चतुरंग

माझ्या लिखाणातला दुवा बघा!

चतुरंग

व्यंकट's picture

1 Apr 2008 - 9:19 pm | व्यंकट

आज एक पेंग्वीन माझ्या घराच्य खिडकीच्या तुळयांवर येऊन बसला. पण त्याला आत येता येईना, मग मी त्याला पलीकडे दार आहे तिकडून ये म्हटलं, तर इंग्लीश ओन्ली म्हणाला. मग कम फ्रॉम डोअर म्हटलं. मग आला आत, दार थोडं मोठ कर म्हणाला बायकोला अजूनही आत येता नाहीये, दार पाडून त्याच्या बायकोलाही आत घेतलं. त्यांनी घराचा जरा मायना केला, म्हणाले की फोटोंच्या फ़्रेमा तकलादू आहेत. मग जाऊन एक जाडजूड फ्रेम घेऊन आलो. आता दांपत्यांचं बर्फ आणून फ्रेमवर घर बांधणं सुरू आहे, वंशवृद्धीचा विचार आहे म्हणत आहेत, सोयर की सुतक ते पुढल्या एक एप्रीलला कळवीनच.

व्यंकट

विसोबा खेचर's picture

2 Apr 2008 - 1:32 am | विसोबा खेचर

अतिशय सुरेख चित्रफित!

धन्यवाद विकासराव,

फारच गोड आणि गोंडस दिसतात ही पेंग्विन मंडळी! :)

साला पेंग्विन उडतात हे माहितीच नव्हतं मला! :)

आपला,
(पेंग्विनप्रेमी) तात्या.

चतुरंग's picture

2 Apr 2008 - 1:38 am | चतुरंग

अहो १ एप्रिलचा हा सगळ्यात जोराचा धमाका होता!;)
(वरती माझ्या प्रतिसादातला दुवा बघा;))

चतुरंग

विकास's picture

2 Apr 2008 - 3:31 am | विकास

कदाचीत तात्या मलाच गंडवत असतील :)

विसोबा खेचर's picture

2 Apr 2008 - 7:47 am | विसोबा खेचर

नाही हो, आधी मीच गंडलो होतो, परंतु चित्रफित पुरी पाहता पाहता एप्रिलफूलचं लक्षात आलं! म्हणूनच मी, 'बाकी पेंग्विन उडतात हे मला माहितीच नव्हतं' असं लिहून ठेवलं! :)

पण काय सांगावं, उडत सुद्धा असतील!

(म्हणजे बघा, अजून गंडणं सुरूच आहे!) -:)

आपला,
(गंडलेला) तात्या.

विसुनाना's picture

2 Apr 2008 - 12:50 pm | विसुनाना

इतक्या उत्तम दर्जाच्या फसवणूकीने फसवून घेण्यातही मजा आहे.

विकास's picture

2 Apr 2008 - 4:46 pm | विकास

एकदम पटले....

नाहीतर म.टा. मधील एप्रिल फूल - राणे मनसेत जाणार! आणि हे इतर...