मसाला ऑम्लेट.. केसू स्टाईल

केशवसुमार's picture
केशवसुमार in पाककृती
10 Jul 2010 - 10:54 pm

नमस्कार मंडळी >:)
प्रोजेक्ट गो लाइव्ह नंतरचा पहिला निवांत शनिवार आज ऑफिसला जायचे नव्हते <:P .. त्यामुळे काल सर्व टीम मेंबरांनी अडवे होईपर्यंत 8| सुरा प्राशन करून मुकादमाला (म्हणजे अस्मादिक) मध्यावर बसवून भरपूर तोंडसूख घेतले होते :B .. त्यानंतर सर्वांच्या पालख्या त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी पोचवून झोपायला पहाटेचे ३.३० वाजले #:S (|: अर्थातच जाग यायला सकाळचे (?) ११:३० वाजले..सर्व आन्हिके उरके पर्यंत दुपारचे १ वाजले L) ब्रेकफास्ट करण्यात आता काहीच अर्थ नव्हता :D आणि लंच करत बसायचा कंटाळा आला होता I) मग कसाबसा उत्साह गोळा करत नेहमीचा यशस्वी ब्रंच , मसाला ऑम्लेट आणि ब्रेड बेत पक्का केला
चला तर मग साहित्य लिहून घ्या.. B)
साहित्य:
सर्व साहित्य एका माणसाला पुरेल ह्या हिशोबाने दिले आहे..
२ अंडी
१ लहान कांदा
१/२ टोमॅटो
१/२ बटाटा
१/२ टेबल चमचा काळा मसाला
१/२ टेबल चमचा कांदालसूण मसाला
लाल/हिरव्या मिरच्या तुमच्या ऐपती नुसार
मीठ, कोथिंबीर आवडीनुसार
जिरे पूड, धणे पूड, हळद, बटर (ह्या.प्र.कि.ते मा.न. त. आ.स्व.पा.ठे.ला.ना.अ.स. )
कृती :
कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्या, बटाट्याचे पातळा काचरे करा
DSCN0785
गॅसवर पॅनमध्ये आपल्या डायेट प्लॅन नुसार बटर गरम करा
DSCN0786
त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरच्या आणि बटाट्याच्या काचरर्‍या टाका आणि खरपूस परता
DSCN0787
एका भांड्यात दोन्ही अंडी फोडून घ्या त्यात मीठ,धणे-जीरे पूड, हळद,काळा मसाला, कांदालसूण मसाला घालून चांगले फेटून घ्या. कांदा आणि बटाट्याच्या काचरर्‍या तांबूस झाल्यावर त्या पॅन मध्ये फेटून एकजीव केलेली अंडी घाला. वरून कोथिंबीर टाका.
DSCN0788
पॅनवर झाकण ठेऊन ५ मिनिटे ऑम्लेट शिजू द्या.
DSCN0789
नंतर ऑम्लेट उलटवून पुन्हा २-३ मिनिटे शिजू द्या.
DSCN0790
ढॅन्ट ढॅन.. झाले मसाला ऑम्लेट तयार..जोडीला ब्रेडचे स्लाइस आणि गारेगार पीच आईस टी..
DSCN0793
१० मिनिटात फडशा.. चा. पु. सा. के.
DSCN0794
नंतर मुखशुद्धीला ब्रझीलीयन कोकोनट कुकीज.. :P
DSCN0795
एक जोरदार ढेकर :\
आणि हो तयारी मध्ये वामकुक्षीची आधीच तयारी करून ठेवा हे सांगायचे विसरलो.. (|: O:)

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

11 Jul 2010 - 1:10 am | श्रावण मोडक

कधी येताय परत? जमवूया! म्हणजे तुमच्या हातचं फक्त हे ऑम्लेट खायचंय. भेटूया.

(खांदेकरी)चतुरंग ;)

श्रावण मोडक's picture

11 Jul 2010 - 1:56 pm | श्रावण मोडक

अपेक्षीत होतंच. एक तरी 'संपादक' असा प्रश्न करणार हे ठाऊक होतं. :)
म्हणूनच आधीच माझा अंतस्थ हेतू लिहून ठेवला होता: "म्हणजे तुमच्या हातचं फक्त हे ऑम्लेट खायचंय. भेटूया."
थोडा कर्सर फिरवा. ;)

धनंजय's picture

11 Jul 2010 - 1:42 am | धनंजय

अंड्याची पोळी तर मस्तच. क्वचितच खातो. पण मजा येते.

भडकमकर मास्तर's picture

11 Jul 2010 - 2:18 am | भडकमकर मास्तर

चाटून पुसून साफ आणि मुखशुद्धी आणि विश्रान्तीसाठी तयारी हे आवडलं...

शानबा५१२'s picture

11 Jul 2010 - 9:27 am | शानबा५१२

अगदी हेच म्हणायच होत.
पण ऑमलेट खुप कमी तिखट झाल असणार अस वाटत.
आणि तो कांदा हीरवट कसा काय दीसतो?

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

केशवसुमार's picture

11 Jul 2010 - 3:19 pm | केशवसुमार

ती फोटोत दिसणारी मिर्ची आहे ना ती मिर्ची नाही मेक्सिकन बाँब आहे X(
म्हणूनच लागणार्‍या साहित्यात मिर्ची आपापल्या ऐपती नुसार अस लिहीले आहे.. =P~
इथे भारतात मिळतात तसे वाळलेले कांदे फार कमी वेळा मिळतात, हिरवट पांढरे ओले कांदेच जास्त आणि स्वस्त मिळतात.. हा कांदा नुसता कच्च्चा खायला तिखट आणि उग्र लागतो 8}

शानबा५१२'s picture

11 Jul 2010 - 10:11 pm | शानबा५१२

मला वाटल भारतात राहता म्हणुन विचारल.
आणि अंड,ब्रेड व त्यावर/त्याबरोबर थंड काही पिण नाही आवडत.

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

रेवती's picture

11 Jul 2010 - 3:20 am | रेवती

फोटू छान आलेत पण ऑम्लेटमध्ये बटाटाही घालतात ही माहिती नविन!
ब्रझिलियन कोकोनट कुकीज छान दिसतायत! इथल्या ग्रोसरीत मिळतायत का ते पाहते.

रेवती

केशवसुमार's picture

11 Jul 2010 - 5:46 am | केशवसुमार

बटर मध्ये खरपूस परतल्या मुळे केवळ अप्रतिम लागतो.. ट्राय करा..
(प्रयोगशील)केशवसुमार
स्पॅनिश ऑम्लेट मध्ये पण बटाटा घालतात..
(माहितगार)केशवसुमार
ब्रझिलियन कोकोनट कुकीज थोड्याफार भारतात मिळणार्‍या ब्रिटानीया कोकनट क्रन्चीज सारख्या लागतात

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jul 2010 - 9:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> स्पॅनिश ऑम्लेट मध्ये पण बटाटा घालतात.. <<
हे मी पण खाल्लं आहे; एका मीटींगच्या वेळी माझ्या एका स्पॅनिश मैत्रिणीने सगळ्यांना 'टॉर्टीया' अर्थात स्पॅनिश आमलेटं खायला घातली होती. त्यात मश्रूम, ढोबळी मिरची असं काय काय होतं. अर्थातच लसूण, जिरं, वगैरे नव्हतंच ... पण बघायला तरी एकदम चोक्कस दिसतं आहे हे!

स्वाती२'s picture

11 Jul 2010 - 4:02 pm | स्वाती२

यम्मी!
माझा आवडता प्रकार. मी यात बारीक चिरुन कांदा, बटाटा, ब्रोकोली, पालक, ढब्बू मिरची, मश्रुम टाकते.

विजुभाऊ's picture

12 Jul 2010 - 12:06 pm | विजुभाऊ

बघायला तरी एकदम चोक्कस दिसतं
चोक्कस शब्दाचा चोक्कस अर्थ वेगळा आहे.
तुम्हाला चोख्खा ( चो... चिन मधल्या चि सारखा उच्चारायचा ) असे म्हणायचे आहे का?

नितिन थत्ते's picture

12 Jul 2010 - 4:31 pm | नितिन थत्ते

चोक्कस म्हणजे परफेक्ट/सही असाच अर्थ आहे ना?

नितिन थत्ते

शिल्पा ब's picture

11 Jul 2010 - 3:47 am | शिल्पा ब

आम्लेटात बटाटे? कशी काय चव लागते? केसू सोडून दुसरे कोणी केले असल्यास सांगा...चवीबद्दल.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मेघवेडा's picture

11 Jul 2010 - 3:50 am | मेघवेडा

मस्त! पण भल्या पहाटे ११.३० ला उठल्यावर परत ब्रंच करून लगेच वामकुक्षी? सहीच!
पाकृ खाली '(आडवा) केसु' अशी सही करा! ;)

सुनील's picture

11 Jul 2010 - 5:56 am | सुनील

मस्त!

आता "बैठकीला" जायचच आहे. उद्या काय करायचं हा प्रश्न होताच. केसुनी सोडवून टाकला!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सन्जोप राव's picture

11 Jul 2010 - 6:23 am | सन्जोप राव

चालू द्या. लेखणीची धार सुर्‍या, काट्यांना चढते आहे हे सुखद (आणि स्वागतार्ह?) आहे.

सन्जोप राव
होगा कोई ऐसा कि जो 'गालिब' को न जाने
शायर तो वो अच्छा है के बदनाम बहुत है

गणपा's picture

11 Jul 2010 - 6:24 am | गणपा

गुर्जी या विषयावर आपल्या सोबत बसुन काही टिप्स गोळा कराव्या म्हणतो एकदा ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jul 2010 - 3:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केसु...आम्लेटात बटाटे अजून काही खाल्ले नाही.
पाहीन ट्राय करुन. :)

-दिलीप बिरुटे

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jul 2010 - 9:37 pm | बिपिन कार्यकर्ते

ब्बोलाऽऽऽऽऽ!!! अनंतकोटीब्रह्मांडनायक बल्लवाचार्य केसुगुर्जी की.....

बिपिन कार्यकर्ते

बट्ट्याबोळ's picture

12 Jul 2010 - 12:13 am | बट्ट्याबोळ

खतर्नाक!!!

प्रियाली's picture

12 Jul 2010 - 1:02 am | प्रियाली

_/\_

पण बटाटे??

Nile's picture

12 Jul 2010 - 12:09 pm | Nile

बटाटे मला तरी आवडणार नाही ब्वॉ आम्लेटात. बाकी फोटु चांगले आहेत. पण पाककृतीत स्माईलीच जरा जास्तच झालेल्या मोहरीसारख्या लागताहेत.

-Nile

अवलिया's picture

12 Jul 2010 - 12:29 pm | अवलिया

हाफफ्रायची कृती येवु द्या...

कवितानागेश's picture

12 Jul 2010 - 4:16 pm | कवितानागेश

असे छान छान कसे काय सुचते हो तुम्हाला?

अंडे आणि काळा मसाला एकत्र काय सुंदर लागत असेल नै??

>:)
============
माउ

sur_nair's picture

13 Jul 2010 - 9:20 am | sur_nair

मस्त. करून बघेनच. त्याच्त्याच कृत्या करण्यापेक्षा नवीन रेसिपी ट्राय करायला आम्ही कधीही तयार असतो.