"भांडखोर" आईमुळे शाळेतून काढलेल्या आदिश्रीला पुन्हा प्रवेश नाही ही लोकसत्ताची बातमी येथे पुन्हा देत आहे. नंतर त्यावर भाष्य.
मुंबई, ८ जुलै/प्रतिनिधी
आदिश्री गोपालकृष्णन या इयत्ता नववीतील विद्यार्थिनीच्या आईने गेली तीन वर्षे शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध दंड थोपटून त्यांना सळो की पळो केल्यामुळे आदिश्रीला यंदाच्या शैक्षणिक वर्षांसाठी आधी दिलेला प्रवेश रद्द करण्याच्या गोरेगाव येथील विभ्ग्योर हायस्कूलच्या निर्णयात हस्तक्षेप करून आदिश्रीला पुन्हा शाळेत घेण्याचा आदेश शाळा व्यवस्थापनास देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. गेली सात वर्षे याच शाळेत शिकणाऱ्या आदिश्रीला बिभ्ग्योर हायस्कूलने पालकांनी भरलेली फी स्वीकारून १९ मे रोजी इयत्ता नववीमध्ये रीतसर प्रवेश दिला होता. परंतु ३ जून रोजी शाळा सुरु होण्याच्या आदल्या दिवशी शाळेच्या व्यवस्थापनाने आदिश्रीचा प्रवेश रद्द करण्यात आल्याचे पत्र तिच्या पालकांना पाठविले व तिची घेतलेली फी परत करून सोबत तिचा दाखलाही पाठविला. शाळेच्या या कृतीविरुद्ध आदिश्रीच्या आईने केलेल्या रिट याचिकेवर गेले दोन दिवस मुख्य न्यायाधीश न्या. मोहीत शहा व न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या खंडपीठापुढे अक्षरश: खंडाजंगीची सुनावणी झाली होती. आदिश्रीला पुन्हा शाळेत घेण्याचा अंतरिम आदेश दिला जाणार असेल तर आम्ही शाळेत न जाण्याची, शाळेशी कोणताही पत्रव्यवहार न करण्याची किंवा शाळेसंबंधी कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याकडे कसलीही तक्रार न करण्याची लेखी हमी देण्याची तयारीही आदिश्रीच्या पालकांनी एका टप्प्याला दर्शविली होती. मात्र मागचा अनुभव लक्षात घेता आदिश्रीचे पालक हे अभिवचन पाळतील असे आम्हाला वाटत नाही. आदिश्री हुशार विद्यार्थिनी आहे व तिला शाळेतून काढण्याचा निर्णय आम्हालाही व्यथीत मनानेच घ्यावाच लागला आहे. पण या एकटय़ा विद्यार्थिनीच्या आईच्या ‘भांडखोर’ आईमुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण कलुषित झाले आहे. आदिश्रीला पुन्हा शाळेत घ्यावे यासाठी ‘मनसे’ कार्यकर्त्यांनी शाळेत घुसून मोडतोड केल्याने इतर १७०० विद्यार्थ्यांचे पालक धास्तावलेले आहेत. शिक्षकवर्ग भीतीच्या छायेत काम करीत आहे. अशा परिस्थितीत इतर विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी आदिश्रीला पुन्हा शाळेत घेण्यास आम्ही तयार नाही, असे शाळेच्या व्यवस्थापनाने ठामपणे सांगितले होते.
या पाश्र्वभूमीवर याचिका फेटाळताना खंडपीठाने नमूद केले की, शाळा व पालक यांच्यात गेली तीन वर्षे जुंपलेल्या भांडणामुळे आधीच आदिश्री कमालीच्या तणावाखाली आहे. अशात तिला पुन्हा त्याच शाळेत प्रवेश देण्याचा आदेश देणे तिच्या हिताचे होणार नाही, असे आम्हाला वाटते. इतरत्र कुठे प्रेवश घेण्यासाठी खरे तर आता उशीर झाला आहे. पण आदिश्रीचे पालक तिच्या प्रवेशासाठी अन्य शाळेत गेले तर केवळ उशीर झाला आहे एवढय़ाच कारणावरून तिला प्रवेश नाकारला जाऊ नये, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
मुख्य न्यायाधीशांनी लघुलेखकास सांगितलेले निकालपत्र नीटसे ऐकू आले नाही. त्यामुळे अर्जदारांचे वकील अॅड. डॉ. बी. के. सुब्बाराव यांनी आम्ही उपस्थित केलेल्या कायदेशीर मुद्दय़ांचे काय, असे विचारले असता न्या. धर्माधिकारी यांनी आम्ही निकालपत्रात त्याचा परामर्ष घेतला आहे, असे सांगितले.
माध्यमिक शाळा संहितेनुसार पालकांच्या कथित गैरवर्तनाबद्दल पाल्याला शाळेतून काढून टाकणे पूर्णपणे बेकायदा आहे आणि ही कारवाई करण्यापूर्वी पालकांना पूर्वसूचना देण्याचे नैसर्गिक न्यायाचे तत्त्वही पाळले गेले नाही, असे मुद्दे त्यांनी मांडले होते. न्यायालयाने यावर नेमका काय निकाल दिला हे सविस्तर निकालपत्र हाती पडल्यावरच कळू शकेल. शाळा व्यवस्थापनाने अॅस्पी चिनॉय, जनक द्वारकादास व नवरोज सिरवई अशा बडय़ा वकिलांची फौज उभी केली होती.
बिभ्ग्योर हायस्कूल ही शाळा ‘आयसीएसई’ शिक्षण मंडळाशी संलग्न आहे. दोन वर्षांपूर्व त्यांनी वार्षिक फी ३४ हजारावरून वाढवून एकदम ८४ हजार केली. बाकीच्या सर्व पालकांनी ही फीवाढ निमूटपणे स्वीकारली. परंतु आदिश्रीच्या आईने त्याविरुद्ध शिक्षण विभागाकडे तत्कार केली. शिक्षण उपसंचालकांनी चौकशी केली व शाळेला फी कमी करण्याचा आदेश दिला. त्यानुसारच फी भरण्याची भूमिका आदिश्रीच्या पालकांनी घेतली. त्यावरून शाळा व्यवस्थापन व आदिश्रीचे पालक यांच्यात वारंवार खटके सुरु झाले. आदिश्रीच्या आईने गेल्या तीन वर्षांत शाळा व त्यांच्या व्यस्थापनाविरुद्ध विविध ठिकाणी एकूण २१ तक्रारी केल्या आहेत. या दोघांमध्ये विविध न्यायालयांमध्ये एकूण १२ प्रकरणे सुरु आहेत किंवा याआधी लढविली गेली आहेत.
१) फी एकदम ३४ हजारावरून ८४ हजार केली याचे उत्तर न्यायालयाने मागितले का?
२) इतकी फी मनमानीपणे वाढवता येते का?
३) या वाढीव फी संदर्भात इतर पालकांनी का प्रश्न उपस्थित केला नाही?
४) "शाळा व्यवस्थापनाने अॅस्पी चिनॉय, जनक द्वारकादास व नवरोज सिरवई अशा बडय़ा वकिलांची फौज उभी केली होती." म्हणजेच शाळा व्यवस्थापन तगडे होते. त्याच्या मोठेपणाचा न्यायालयाला (म्हणजेच मुख्य न्यायाधीश न्या. मोहीत शहा व न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांना) धाक होता काय? की काही चहापाण्याची सोय केल्या गेली काय? (आजकाल न्याय विकत घेता येतो अन कोर्ट - न्यायालय हे माणूस असते.)
५) आदिश्री च्या आईची काय चुक आहे?
६) एकट्या मनसेलाच हा प्रश्न समजलेला होता. जय मनसे! अन्य पक्ष काय झोपा काढत होते काय?
७) सामाजीक कामे करणार्या संघटना काय फक्त सरकारी पैसा गोळा करण्यासाठीच असतात काय?
८) लोकसत्ताने तरी "भांडखोर" आईमुळे... असा अवतरण चिन्हातला उल्लेख करणे अपेक्षीत होते काय? पर्यायी शब्द ते योजू शकत नव्हते काय?
९) पालकांनी भरलेली फी स्वीकारून १९ मे रोजी इयत्ता नववीमध्ये रीतसर प्रवेश घेतला होता परंतु ३ जून रोजी शाळा सुरु होण्याच्या आदल्या दिवशी शाळेच्या व्यवस्थापनाने आदिश्रीचा प्रवेश रद्द करण्यात आल्याचे पत्र तिच्या पालकांना पाठविले व तिची घेतलेली फी परत करून सोबत तिचा दाखलाही पाठविला. हे कुठल्या नियमात बसते? केवळ 'भांडखोर' म्हणून? (लोकसत्तीय शब्द. दुसरे काय?)
१०) >>>> आदिश्रीला पुन्हा शाळेत घेण्याचा अंतरिम आदेश दिला जाणार असेल तर आम्ही शाळेत न जाण्याची, शाळेशी कोणताही पत्रव्यवहार न करण्याची किंवा शाळेसंबंधी कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याकडे कसलीही तक्रार न करण्याची लेखी हमी देण्याची तयारीही आदिश्रीच्या पालकांनी एका टप्प्याला दर्शविली होती. मात्र मागचा अनुभव लक्षात घेता आदिश्रीचे पालक हे अभिवचन पाळतील असे आम्हाला वाटत नाही. आदिश्री हुशार विद्यार्थिनी आहे व तिला शाळेतून काढण्याचा निर्णय आम्हालाही व्यथीत मनानेच घ्यावाच लागला आहे. पण या एकटय़ा विद्यार्थिनीच्या आईच्या ‘भांडखोर’ आईमुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण कलुषित झाले आहे. आदिश्रीला पुन्हा शाळेत घ्यावे यासाठी ‘मनसे’ कार्यकर्त्यांनी शाळेत घुसून मोडतोड केल्याने इतर १७०० विद्यार्थ्यांचे पालक धास्तावलेले आहेत. शिक्षकवर्ग भीतीच्या छायेत काम करीत आहे. अशा परिस्थितीत इतर विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी आदिश्रीला पुन्हा शाळेत घेण्यास आम्ही तयार नाही, असे शाळेच्या व्यवस्थापनाने ठामपणे सांगितले होते.
होईल, केले जाईल, घडेल अशाही शक्यतांवर न्यायालय विश्वास ठेवते तर मग इतर ठिकाणी उठसूट पुरावे का मागते?
१२) >>> 'मनसे' कार्यकर्त्यांनी शाळेत घुसून मोडतोड केल्याने इतर १७०० विद्यार्थ्यांचे पालक धास्तावलेले आहेत.
मनसे कार्यकर्त्यांची मागणी न्याय्य आहे. पालक धास्तावलेले आहेत की शालेय व्यवस्थापनाने धास्तावू केल गेले आहे?
प्रतिक्रिया
10 Jul 2010 - 9:13 pm | नितिन थत्ते
१) फी एकदम ३४ हजारावरून ८४ हजार केली याचे उत्तर न्यायालयाने मागितले का?
२) इतकी फी मनमानीपणे वाढवता येते का?
- न्यायालय हे उत्तर मागायला बांधील नाही
- खाजगीकरणाच्या आणि बाजारप्रधान युगात फी मनमानीपणे वाढवता येते. फी न पटल्यास दुसर्या शाळेत जाणे हाच एकमेव पर्याय असतो. जसे क्ष उत्पादनाची किंमत दुप्पट झाल्यास मला त्याचे कारण विचारता येत नाही. दुसरे य उत्पादन कमी किंमतीत मिळत असेल तर ते विकत घेणे किंवा क्ष ची वाढीव किंमत देणे हेच पर्याय असतात.
३) या वाढीव फी संदर्भात इतर पालकांनी का प्रश्न उपस्थित केला नाही?
- ते इतर पालकांना विचारावे लागेल.
- काही काळापूर्वीच मिपावर झडलेल्या चर्चेनुसार पालकांनी फी स्वीकारणे/नाकारणे हे त्या शाळेविषयीची पर्सीव्ह्ड व्हॅल्यू पालकांच्या मनात काय आहे यावर अवलंबून आहे. इतर पालकांना ती शाळा इतकी हुच्च वाटत असावी + शाळा सोडून दुसर्या शाळेत जाणे-मुलीचा ग्रुप फुटणे आदि मानसिक त्रासाची व्हॅल्यू वाढलेल्या फीच्या तुलनेत अधिक असावी.
४) "शाळा व्यवस्थापनाने अॅस्पी चिनॉय, जनक द्वारकादास व नवरोज सिरवई अशा बडय़ा वकिलांची फौज उभी केली होती." म्हणजेच शाळा व्यवस्थापन तगडे होते. त्याच्या मोठेपणाचा न्यायालयाला (म्हणजेच मुख्य न्यायाधीश न्या. मोहीत शहा व न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांना) धाक होता काय? की काही चहापाण्याची सोय केल्या गेली काय? (आजकाल न्याय विकत घेता येतो अन कोर्ट - न्यायालय हे माणूस असते.)
- या विधानामुळे नक्कीच कंटेम्प्ट ऑफकोर्ट होऊ शकतो. (निकाल चॅलेंज करण्याने नाही....दिलेल्या निकालामागे वाईट हेतू असल्याचा आरोप करण्याने)
५) आदिश्री च्या आईची काय चुक आहे?
- बाजारप्रधान व्यवस्थेची तत्त्वे न समजून घेणे ही चूक आहे
६) एकट्या मनसेलाच हा प्रश्न समजलेला होता. जय मनसे! अन्य पक्ष काय झोपा काढत होते काय?
- मनसेला ही बाजारप्रधान व्यवस्थेची तत्त्वे कळत नाहीत असे दिसते. सरकार अनुदान देत नसताना फी ठरवण्याचे स्वातंत्र्य शाळेला असायलाच हवे.
७) सामाजीक कामे करणार्या संघटना काय फक्त सरकारी पैसा गोळा करण्यासाठीच असतात काय?
- इथे याचा संबंध कळला नाही.
८) लोकसत्ताने तरी "भांडखोर" आईमुळे... असा अवतरण चिन्हातला उल्लेख करणे अपेक्षीत होते काय? पर्यायी शब्द ते योजू शकत नव्हते काय?
- आई भांडखोर आहे हे लोकसत्ताने म्हटलेले नसून शाळेने म्हटले आहे. लोकसत्ताने ते फक्त रिपोर्ट केले आहे.
९) पालकांनी भरलेली फी स्वीकारून १९ मे रोजी इयत्ता नववीमध्ये रीतसर प्रवेश घेतला होता परंतु ३ जून रोजी शाळा सुरु होण्याच्या आदल्या दिवशी शाळेच्या व्यवस्थापनाने आदिश्रीचा प्रवेश रद्द करण्यात आल्याचे पत्र तिच्या पालकांना पाठविले व तिची घेतलेली फी परत करून सोबत तिचा दाखलाही पाठविला. हे कुठल्या नियमात बसते? केवळ 'भांडखोर' म्हणून? (लोकसत्तीय शब्द. दुसरे काय?)
- ही मात्र चूक असावी (शाळेने मागितल्याप्रमाणे फी भरली असेल तर). त्यावर कॉण्ट्रॅक्ट अॅक्टान्वये दाद मागायला हवी होती. शि़क्षण उपसंचालकांनी सांगितलेली फी शाळेने स्वीकारली असेल तर या कृतीचा दोघांमधील करारात काय परिणाम होतो हे सांगता येत नाही.
१०) >>>> आदिश्रीला पुन्हा शाळेत घेण्याचा अंतरिम आदेश दिला जाणार असेल तर आम्ही शाळेत न जाण्याची, शाळेशी कोणताही पत्रव्यवहार न करण्याची किंवा शाळेसंबंधी कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याकडे कसलीही तक्रार न करण्याची लेखी हमी देण्याची तयारीही आदिश्रीच्या पालकांनी एका टप्प्याला दर्शविली होती. मात्र मागचा अनुभव लक्षात घेता आदिश्रीचे पालक हे अभिवचन पाळतील असे आम्हाला वाटत नाही. आदिश्री हुशार विद्यार्थिनी आहे व तिला शाळेतून काढण्याचा निर्णय आम्हालाही व्यथीत मनानेच घ्यावाच लागला आहे. पण या एकटय़ा विद्यार्थिनीच्या आईच्या ‘भांडखोर’ आईमुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण कलुषित झाले आहे. आदिश्रीला पुन्हा शाळेत घ्यावे यासाठी ‘मनसे’ कार्यकर्त्यांनी शाळेत घुसून मोडतोड केल्याने इतर १७०० विद्यार्थ्यांचे पालक धास्तावलेले आहेत. शिक्षकवर्ग भीतीच्या छायेत काम करीत आहे. अशा परिस्थितीत इतर विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी आदिश्रीला पुन्हा शाळेत घेण्यास आम्ही तयार नाही, असे शाळेच्या व्यवस्थापनाने ठामपणे सांगितले होते.
-इथे शाळेच्या व्यवस्थापनाचे आर्ग्युमेंट चुकले असे वाटते. तिला प्रवेश न दिल्यास उलट दंगल व्हायची शक्यता जास्त आहे. प्रवेश दिल्यावर खरे तर भीतीचे वातावरण निवळून जाईल.
होईल, केले जाईल, घडेल अशाही शक्यतांवर न्यायालय विश्वास ठेवते तर मग इतर ठिकाणी उठसूट पुरावे का मागते?
-क्र ११ प्रमाणेच
- न्यायालयाने पुरावे 'मागितलेच नाहीत' आणि शाळेने 'दिलेच नाहीत' हे कोणत्या आधारावर म्हणता येईल?
१२) >>> 'मनसे' कार्यकर्त्यांनी शाळेत घुसून मोडतोड केल्याने इतर १७०० विद्यार्थ्यांचे पालक धास्तावलेले आहेत.
मनसे कार्यकर्त्यांची मागणी न्याय्य आहे. पालक धास्तावलेले आहेत की शालेय व्यवस्थापनाने धास्तावू केल गेले आहे?
- याबाबत काही म्हणता येत नाही. मोडतोडीची घटना प्रत्यक्ष घडलेली आहे.
अवांतर : शाळा पूर्णपणे स्वायत्त असू नयेत आणि इतकी फी असू नये असे माझे मत आहे पण बाजारप्रधान अर्थव्यवस्थेत त्याला काही किंमत नाही. समाजवादी अर्थव्यवस्था कोणालाच नको आहे.
नितिन थत्ते
24 Jul 2010 - 5:10 am | पंगा
आपल्या प्रतिसादातील प्रत्येक मुद्द्याशी सहमत आहे.
मात्र, आपल्या प्रतिसादा(तील मजकुरा)चा त्रास मिसळपाव प्रशासनाला होऊ शकेल असे वाटते, एवढेच या निमित्ताने सुचवू इच्छितो.
- (सूचक) पंडित गागाभट्ट.
24 Jul 2010 - 7:16 am | नितिन थत्ते
कोणत्या मजकूराचा त्रास होईल बरे?
ही मुस्कटदाबीची नवी ट्रिक आहे काय? ;)
नितिन थत्ते
10 Jul 2010 - 9:32 pm | हैयो हैयैयो
भारतात न्याय्य न्याय मागणे-भांडणे पाप नाही. ही पापे असली असती तर न्यायालये चाललीच नसती. असो.
मात्र, न्याय्य न्याय मागताना अथवा लोकसत्तोक्त संज्ञेप्रमाणे 'भांडताना' पालन करावयाचे काही यम-नियम आहेत, त्यांचे पालन करणे हे न्याय मिळणे - न मिळणे ह्या अंतिम निर्णयावर फार मोठा प्रभाव टाकून जाते.
आदिश्रीच्या आईने शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध दंड थोपटून सलग गेली तीन वर्षे त्यांना सळो की पळो केल्याचे नोंदवलेले दिसते. ह्या मातेचा धाक असा की लिखित अभिवचन देवूनदेखील पूर्वानुभवामुळे शालाव्यवस्थापनास त्यांवर विश्वास ठेवणे अशक्य असल्यासारखे दिसते.
सर्वश्री अॅस्पीजी, सर्वश्री जनक द्वारकादासजी आणि सर्वश्री नवरोजजी सिरवाई ह्यांसारखे नामांकित आणि मुत्सद्दी न्यायशास्त्राभ्यासक पुढील बाजूने लढत असतानादेखील आदिश्रीचे पालक माघार घेत नाहीत, ह्याचाच अर्थ तेदेखील बडी पार्टी - हम भी कुछ कम नही - आहेत. २१ तकरारी १२ खटले भरून शालाव्यवस्थापनास जेरीस आणणारी ही मंडळी काय उद्देशाने हे सारे करते आहे हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. (प्रथमदर्शनी दिसणारा उद्देश खराच असावा ह्यास न्यायालयाची मान्यता नाही!) बातमीवरून ही मंडळी अरेरावी वाटतात.
शालाव्यवस्थापनासंदर्भातील नियमांअनुसार शासकीय अनुदाने मिळत नसल्यास शालेय शिक्षणाचे फी ठरवणे हे शालाव्यवस्थापनाच्या अखत्यारीत येते. आपणांस ते भरणे शक्य नसल्यास आपण आपणांस परवडणार्या दुसर्या शाळेमध्ये प्रवेश घेवू शकता - नव्हे, तसा व्यक्तिस्वातंत्र्याधिकार आपणांस प्राप्त आहे. परंतु आपणास हवी त्याच शाळेच्या व्यवस्थापनावर अशा प्रकारे आपण डरावून-धमकावून आपलेच म्हणणे खरे करून घेवू शकत नाही. स्वातंत्र्याधिकार हा केवळ व्यक्तीची मक्तेदारी नव्हे - संस्थेससुद्धा स्वातंत्र्याधिकार तितकाच लागू होतो.
सदर खटल्याच्या संदर्भात हा प्रश्न अनावश्यक.
फीवाढीस मनमानी हे एकमेव कारण नसावे.
अनावश्यक.
कण्टेम्प्ट आफ कोर्ट. आस्पीजी, जनकजी, नवरोजजी तिघेही बारमध्ये अत्यंत विद्वान म्हणून ओळखले जातात. आपण त्यांस ओळखत असतात तर असे गलिच्छ आरोप लावले नसतेत.
बरोबर लढा चुकीच्या पद्धतीने लढणे ही चूक आहे.
हा ज्याचात्याचा प्रश्न आहे.
----||----
कृपया 'भांडखोर' ह्या शब्दास पर्यायी शब्द सुचवावेत.
एक लीगल् पर्सन् म्हणून शालाव्यवस्थापनास स्वतःचे नियम करण्याचे स्वातंत्र्य आहे, बहुधा त्या नियमांत बसते.
न्यायालय हे न्यायालय असले तरी कार्यपद्धतीच्या बाहेर त्यास जाता येत नाही. अन्यथा आरडावयास लोक तयार असतातच!
मनसेला हाताशी धरले नसते, तर हा प्रश्न कदाचित वेगळ्याप्रकारे सुटला गेला असता.
बाकी, मुख्य न्यायाधीशांनी लघुलेखकास सांगितलेले निकालपत्र सर्वश्री सुब्बारावांस नीटसे ऐकू आले नाही हे काहीसे पटत नाही! असो!
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्र्क्टा मराट्टिदेडत्तुक्कु वन्दु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
11 Jul 2010 - 12:13 am | शिल्पा ब
थोडक्यात काय तर जे चालले आहे ते आपल्या लेकराच्या भल्यासाठी स्वीकारा...आणि न्याय बिय मागायच्या भानगडीत पडू नका....कारण त्याला इतरांचा (समदुःखी असले तरी) सपोर्ट मिळणार नाही.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
11 Jul 2010 - 12:22 pm | अवलिया
ब-याच वेगवेगळ्या घटना पाहुन भारतात काही काही वेळेस न्याय मागणे हे पाप आहे असेच वाटते.
11 Jul 2010 - 4:39 pm | अविनाशकुलकर्णी
आय बी एन मधे चर्चा ऐकली ..भांडवल शाहिचा क्रुर चेहरा सामने आला आहे..जी गत फि ची तिच अन्न धन्ये व सा~यांची..समाज वादी व्यवस्थेत तत्वे वगैरे होति..आता सारे अवघड आहे..
11 Jul 2010 - 8:05 pm | ज्ञानेश...
काही ठोस अनुमान लावणे कठीण आहे.
अदिश्रीबद्दल सहानुभूती वाटते.
12 Jul 2010 - 4:39 pm | कोदरकर
शाळानीही हेच सुत्र अवलंबिले तर आदिश्री ने शिकायचे नाही का??
हाच का शिक्षणाचा अधिकार ????
पालकांनी शाळेशी संपर्क ठेवायचा नाही???
12 Jul 2010 - 5:44 pm | नितिन थत्ते
जर आदिश्रीच्या पालकांना ८४००० रु फी परवडत नसेल तर सरकार आपल्या शाळेत तिला प्रवेश देईल.
शिक्षनाचा अधिकार म्हणजे हव्या त्या शाळेतच पाहिजे त्या फीतच शिक्षण असे बहुधा अपेक्षित नसावे.
नितिन थत्ते
12 Jul 2010 - 10:31 pm | शिल्पा ब
वाट्टेल तशी फी वाढवणे कोणत्या नियमात बसते? आणि परवडत नाही तर सरकारी शाळेत जा हे कुठले धोरण?
बरेचदा एखादे कारण सांगून शाळा कोलेज पैसे घेते आणि पुढे काय होते माहिती नाही..आमच्या कालेजात एकदा सगळ्यानकडून १००/- घेतले बाहेरची एक भिंत रंगवायला म्हणून...अजून रंगवायची आहे....
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 Jul 2010 - 11:13 pm | नितिन थत्ते
>>वाट्टेल तशी फी वाढवणे कोणत्या नियमात बसते?
बाजारप्रधान अर्थव्यवस्थेच्या नियमात बसते.
>>आणि परवडत नाही तर सरकारी शाळेत जा हे कुठले धोरण?
खरेतर सरकारी शाळा असणे हेच बाजारव्यवस्थेत चुकीचे आहे. आपण १९ वर्षांपूर्वी समाजवादाचा जाणीवपूर्वक त्याग केलेला नाही काय?
सोयीच्या ठिकाणी बाजारव्यवस्था आणि गैरसोयीच्या ठिकाणी समाजवाद असे दुटप्पी धोरण नाही ना ठेवता येणार?
नितिन थत्ते
12 Jul 2010 - 11:23 pm | शिल्पा ब
भारतीय व्यवस्था पूर्णपणे भांडवलशाही असलेली नाही...अजूनतरी...आणि सरकारी शाळा असणे चुकीचे कसे? म्हणजे पैसे नसलेल्यांनी शिकूच नये असा अर्थ होतो..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 Jul 2010 - 11:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अर्र, तुम्हाला नितीनच्या प्रतिसादातला उपरोध समजलेला दिसत नाही.
तोच तर मुद्दा आहे, बाजारीकरण झालेल्या शाळेत जाणं परवडत नसेल तर सरकारी शाळेत जा.
अदिती
12 Jul 2010 - 11:34 pm | शिल्पा ब
अरेच्चा !!! असं ए होय .. =)) =)) =))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
23 Jul 2010 - 9:32 pm | राजेश घासकडवी
>>शिल्पा ब : आणि परवडत नाही तर सरकारी शाळेत जा हे कुठले धोरण?
>नितीन थत्ते : सोयीच्या ठिकाणी बाजारव्यवस्था आणि गैरसोयीच्या ठिकाणी समाजवाद असे दुटप्पी धोरण नाही ना ठेवता येणार?
काही सरकारी संस्थळं असावीत का असा विचार मनात राहून राहून येतोय. तिथली धोरणं काय असतील बॉ? त्यांची अंमलबजावणी पारदर्शक असेल का? प्रश्न प्रश्न प्रश्न... (ह. घ्या.)
23 Jul 2010 - 11:12 pm | पंगा
या चर्चेत आपण आतापर्यंत दिलेल्या प्रतिसादांत मांडलेली जवळपास सर्वच मते मला व्यक्तिशः पटण्यासारखी वाटत असली, तरी या एका विधानसंचाबद्दल (विशेषतः अधोरेखितांबद्दल) मतभेद नोंदवू इच्छितो.
बाजारव्यवस्थेत सरकारने शाळा चालवल्यास त्यात काहीही गैर किंवा चुकीचे असे वाटत नाही. सरकारला एक एंटिटी या नात्याने, बाजारातील आणखी एक प्रतिस्पर्धी म्हणून, (इतर अनेक गोष्टींबरोबर) शाळा चालवण्याचा जोडधंदाही करण्याचा अधिकार नसण्याचे काहीच कारण दिसत नाही. त्यापुढे जाऊन, सरकारने हा धंदा नफ्यासाठी / उत्पन्नासाठी करावा, की ना-नफा तत्त्वावर करावा, की अजिबात करूच नये, किंवा करायचा ठरवल्यास करांतून किंवा इतर उत्पन्नांतून मिळालेल्या पैशातून करावा, की शुल्क आकारावे, की या दोन्ही पद्धतींचे कोठलेतरी मिश्रण वापरावे, हे ठरवण्याचा अधिकारही सरकारला नसण्याचे काहीच कारण दिसत नाही. अर्थात, ज्या प्रमाणात (to the extent that किंवा inasmuch as अशा अर्थी) करदात्यांचा पैसा या कार्यासाठी वापरला जाणार असेल, त्या प्रमाणात करदात्यांना (आणि सरकारी धोरणाचा प्रश्न असल्यामुळे लोकशाहीत मतदारांना) आपले म्हणणे असण्याचा आणि ते मांडण्याचा अधिकार असावाच; त्याबद्दल प्रश्न नाही. मात्र मुळात सरकारने अशा धंद्यात पडणे यात बाजारव्यवस्थेतसुद्धा काही गैर दिसत नाही. (बाजारव्यवस्थेत सरकारी पर्यायाची एकाधिकारशाही किंवा सरकारी पर्याय हाच एकमेव पर्याय असू नये; सरकारी पर्यायच नसण्याचे काही कारण दिसत नाही.)
त्यापुढे, समाजवादी व्यवस्थेचा त्याग केल्यावर असे (सरकारच्या कामकाजाशी संबंध नसलेले, परंतु लोकोपयोगी किंवा कल्याणकारी, आणि/किंवा ज्याला बाजारात खाजगी पर्याय उपलब्ध आहेत असे) उपक्रम हाती घेणे हे सरकारचे कर्तव्य असू नये, येथवर पटण्यासारखे आहे. मात्र सरकारचा तो अधिकार असू नये, हे सयुक्तिक वाटत नाही.
अवांतर (माहितीकरिता): अमेरिकेसारख्या देशातसुद्धा (जेथील राजकीय गोटांत निदान उघडपणे तरी बाजारव्यवस्थेचे समर्थन चालते, आणि 'समाजवाद' हा शब्द जाहीरपणे उच्चारणे हे अनेक गोटांत शिवीसमान किंवा देशद्रोहापेक्षाही भयंकर पातकासमान मानले जाऊ शकते) सरकारी शाळा आहेत. किंबहुना (माझ्याकडे आकडेवारी नसली तरी) बहुतांश अमेरिकन मुले ही सरकारी शाळांतून शिकत असावीत असे वाटते. (खाजगी शाळा खर्चिक आहेत आणि त्या मानाने तुरळक असाव्यात, आणि ज्यांना खाजगी शाळा परवडू शकतात अशा पालकांपैकीसुद्धा सर्वच जण आपल्या मुलांना खाजगी शाळांत धाडत असावेत असे वाटत नाही.) सरकारी शाळांचा शैक्षणिक आणि एकंदर दर्जा सर्वत्र समान नाही; जिल्ह्याजिल्ह्याप्रमाणे, शहराशहराप्रमाणे आणि विभागाविभागाप्रमाणेसुद्धा बदलू शकतो. ('खूप चांगल्या'पासून 'खूप वाईट'पर्यंत आणि या दोन टोकांच्या मध्ये कोठेही असलेल्या सरकारी शाळा सापडू शकतात.) सरकारी शिक्षणव्यवस्थेला शिव्या देणारेही आहेत, आणि 'सरकारी शाळेत फुकटात शिक्षण मिळत असताना महागड्या खाजगी शाळेत कशाला पाठवायचे? आपण कर कशासाठी भरतो?' अशी विचारसरणी असणारेही आहेत. (त्यापुढे जाऊन, आपल्या पाल्यास सरकारी शाळेचासुद्धा जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि शक्य तितके चांगले शिक्षण मिळावे म्हणून मुलाच्या शिक्षणात आणि शाळेच्या कारभारात जातीने लक्ष घालणारे पालकही आहेत, आणि 'सकाळीसकाळी आपला पाल्य इतर चार पोरांसोबत पिवळ्या बसच्या रांगेत लागला, की दुपारी चार वाजेपर्यंतची कटकट मिटली' असे समजणारे पालकही आहेत.) पण एकंदरीत सरकारी शाळा आहेत, चालतात, त्यांत मुले जातात आणि बहुतांश पालक आपल्या मुलांना तेथे धाडतात.
- पंडित गागाभट्ट.
23 Jul 2010 - 11:38 pm | नितिन थत्ते
आपला संपूर्ण प्रतिसाद आणि अमेरिकेची वगैरे दिलेली उदाहरणे मान्य आहेत.
मी हे सर्व उपरोधिक पणे लिहिले होते.
आपल्याकडचे बाजारवादी हॉक्स या गोष्टींना विरोध करीत असतात. इतकेच कशाला अमेरिका आणि युरोपातली संपूर्ण शेती मोठ्या प्रमाणात सबसिडीवर चालते. आपल्याकडचे नवबाजारवादी मात्र सबसिड्या हटवा सबसिड्या हटवा म्हणून बोंबा मारीत असतात.
युरोपीय भांडवलशाही देशांतसुद्धा आरोग्यसेवा, रेल्वेसेवा वगैरे सरकारीच असतात. पण आपल्याकडे मात्र या गोष्टी सरकारने करू नयेत अशी हाकाटी चालू असते.
सबसिड्या नको म्हणणारे अर्थतज्ञ टाटां*ना नॅनो प्रकल्प काढण्यासाठी मिळणार्या सबसिड्यांबाबत मूग गिळून असतात.
*टाटा हे नुसते एक उदाहरण आहे. सर्वच उद्योग प्रकल्पाबाबत हे खरे असते.
मला सामान्यांच्या विचारातला विरोधाभास दाखवायचा होता.
(सरकारी टीव्ही चॅनेल नको. खाजगी हवा म्हणायचे. आणि मग केबलचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा करायची).
नितिन थत्ते
23 Jul 2010 - 2:00 pm | विजुभाऊ
व्यपस्थानाची मनमानी हे बहुतेक सर्वच शाळांत होत असते
23 Jul 2010 - 3:08 pm | ऋषिकेश
जर भारत पूर्ण भांडवलशाही राष्ट्र झाले असेल तर निकाल योग्य वाटतो या नितिन यांच्या मताशी सहमत. मात्र भारताचय सांविधानात देश समाजवादी असल्याचे म्हटल्याने या निकालामागची भुमिका मला समजली नाहि.
याच निकालावर रेडीयोवरही चांगली चर्चा झाली होती.
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा