टारूशेठ कुठे गेले?

सविता's picture
सविता in काथ्याकूट
10 Jul 2010 - 11:39 am
गाभा: 

तशी मी मिपावर वाचनमात्र च!!

पण ठराविक १०-१२ लोकांचे लेख आणि प्रतिक्रिया वाचायला इथे दिवसातून एकदा तरी हमखास फेरी असतेच!!!!

७-८ महिने हे चालूच आहे.....

टारू शेठ चे लेख आणि त्यांच्या प्रतिक्रिया हे माझे असेच आवडते....

तीन चार दिवस त्यांचा ना काही लेख वाचला... ना कुठल्या लेखावर प्रतिक्रिया... म्हणून त्यांच्या ब्लॉग वर गेले... तर कळले... त्यांचा आयडी ब्लॉक झालाय.....

मान्य ते लोकांना जरा जास्त चिमटे घेतात... खिल्ली उडवतात.... पण तुम्ही आंतर्जालावर लिहिताय तर कोणी प्रशंसा करणार, कोणीतरी टिका करणार.. कोणी खिल्ली ऊडवणार हे साहजिकच आहे. हे ज्यांना झेपत नाही त्यांनी लेखन करू नये हे माझे स्पष्ट मत आहे....

मिपावर फक्त वाचनमात्र असणारे किती लोक... टारू, अवालिया,परा ,विक्षिप्त आदिती, चतुरंग, सहज,पंगा ... अन अशा काही लोकांचे लेख आणि प्रतिक्रिया वाचण्यासाठीच येतात....

जरा खोडी काढली ...की कर आयडी ब्लॉक.... हे काही बरोबर नाही....

असं आपलं मला वाटतं.

-सविता.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

10 Jul 2010 - 11:42 am | अवलिया

"रोचक" धागा.

चिरोटा's picture

10 Jul 2010 - 11:44 am | चिरोटा

मनापासुन विचार करायला लावणारा धागा.
P = NP

शैलेन्द्र's picture

10 Jul 2010 - 11:51 am | शैलेन्द्र

धागा ला भिडला...

हे आणी असे बरेच वाक्यप्रचार ही टारुची अंतरजालाला देणगी आहे... तो लवकरात लवकर परत येवो, भले दुसर्‍या कोणत्या आय डीने येवो...

वेताळ's picture

10 Jul 2010 - 11:51 am | वेताळ

खुपच आनंद झाला हा धागा वाचुन. नाना व टार्‍याचा फॅन क्लब मिपावर सुरु करावा लागणार लवकर.
वेताळ

परिकथेतील राजकुमार's picture

10 Jul 2010 - 11:54 am | परिकथेतील राजकुमार

नाना व टार्‍याचा फॅन क्लब मिपावर सुरु करावा लागणार लवकर.

चला म्हणजे नान्याचा आयडी उडणार हि बातमी खरी आहे तर.
आता दुषीत वातावरण निवळणार म्हणायचे =))

नान्याचा चौपाटी आणि चपटी वाला मित्र
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

मितभाषी's picture

10 Jul 2010 - 11:53 am | मितभाषी

हां!!
मी पण हाच विचार करत होतो आमचे आवडते लेखक टारुशेठ अखेर गेले कुठे???????
आता कळले त्यांचा आयडी ब्लॉक केल्या गेला आहे.
असतं एखादं पोरगं खट्याळ म्हणुन काय त्याला घरातुन हाकलुन द्यायचे??????????????????

निषेध! निषेध!! निषेध!!!

भावश्या.

संपादक मंडळ's picture

10 Jul 2010 - 11:59 am | संपादक मंडळ

नमस्कार,

संपादक मंडळास कळवण्यास खेद होतो की मंडळातर्फे वारंवार सूचना देऊन आणि विनंती केल्यानंतरही अवांतर आणि अनावश्यक प्रतिसाद लिहिणे, इतर सदस्यांवर व्यक्तिगत रोखाचे लेखन करणे, संपादक आणि संकेतस्थळ चालकांविषयी अनाठायी नाराजी प्रकट करणे आणि संकेतस्थळाचे वातावरण बिघडवणे अशा अनेक गोष्टींना आळा न बसल्याने 'टारझन' आणि '||विकास||' या सदस्यांचे सदस्याधिकार आज काढून घेण्यात आले आहेत.

अशाच प्रकारचे लेखन न करण्याची विनंती आणि सूचना इतर काही सदस्यांनाही करण्यात आली आहे. त्यांच्या वर्तणूकीत सुधारणा होईल अशी आशा संपादक मंडळाला वाटते.

मिसळपाव सदस्यांवर लेखन करताना अपमानास्पद, सांसदिय भाषेस सोडून केलेले लेखन, सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून केलेले लेखन, अश्लील शब्दांचा/ चित्रांचा वापर असलेले साहित्य, सदस्यांमधले वैयक्तिक हेवेदावे, जुने हिशेब चुकते करणे (score settling) प्रकारातील प्रतिसाद किंवा लेख लिहणारे सदस्यांना तसे न करण्याची विनंती करण्यात येत आहे.
सदर प्रकार वारंवार आढळल्यास इथे जाहिर केल्याप्रमाणे कारवाई करण्याचा अधिकार संपादक मंडळाला राहिल.
सदस्यांकडुन सहकार्याची अपेक्षा आहे ....

वारंवार सूचना/ ताकीद देऊनही एखाद्या सदस्याचा खोडसाळपणा दिसून येत असेल तर विशिष्ट कालावधीसाठी व्य.नि. आणि खरडवहीची सुविधा काढून घेण्याचे अधिकार संपादक मंडळाला आहेत. या उपायानंतरही सदस्याच्या वागणूकीत सुधारणा नसल्यास सदस्याचे खाते बंद होऊ शकते ह्याची कृपया नोंद घ्यावी.

धन्यवाद,
संपादक मंडळ

आण्णा चिंबोरी's picture

10 Jul 2010 - 1:10 pm | आण्णा चिंबोरी

मला मिपावर नुकतेच एक वर्ष आणि एक आठवडा पूर्ण झाला. या कालावधीत मला खरडवही किंवा व्यनिची सुविधा का दिली नाही याचे स्पष्टीकरण या निमित्ताने संपादक मंडळाकडून अपेक्षित आहे. अनेक जण माझ्या खरडवहीत येऊन काहीही लिहून जातात पण मला तसे प्रत्युत्तर त्यांना देता येत नाही.

आण्णा चिंबोरी's picture

10 Jul 2010 - 3:25 pm | आण्णा चिंबोरी

श्री. विजुभाऊ यांनी माझ्या खरडवहीत 'ओरडता कशाला' असे लिहिले आहे. मात्र त्यांच्या खरडवहीत प्रतिसाद देण्याची मला परवानगी नाही असे दिसते. या तांत्रिक अडचणीबाबत मी लिहिले होते.

संपादक मंडळ झोपले काय?

मितभाषी's picture

10 Jul 2010 - 1:12 pm | मितभाषी

तुमचे कायदे कानुन सगळे आम्हाला मान्य आहे. काड्याघालुंच्या नाड्या आवळल्या त्याच्याशी आम्हाला काही देने घेने नाही.

पण टार्‍याला योग्य समज देवुन सन्मानाने बोलावले पाहीजे असे मला वाटते.

(कुठल्याही कंपुत नसलेला )अलिप्त भावश्या

आळश्यांचा राजा's picture

10 Jul 2010 - 12:17 pm | आळश्यांचा राजा

संबंधितांची ओळख नाही. खरडवही नसल्यामुळे काही संपर्कही नाही.

पण वाईट वाटले. टारझन कोण आहे माहीत नाही. त्यामुळे त्याचं कुणाशी भांडण वगैरे आहे की कसे याबद्दलही माहीत नाही. त्याचा स्वभाव कसा आहे माहीत नाही. त्यामुळे मी यावर टिप्पणी करणे योग्य नाही.

पण

लेखनावरून आणि प्रतिसाद वगैरेंवरून मला तरी असं वाटतं की तो एक मनमौजी मनमोकळा तरुण आहे. थोडा लहान आहे, आणि मला वाटतं तो स्वतःदेखील हे मान्य करत असावा, त्यालादेखील (अकाली) प्रौढ व्हायची हौस नसावी. तो माझा तर मनोमन मित्रच झाला आहे. चेष्टा करायची आवड आहे त्याला. करुदे की. कुठे विखार मला तरी दिसलेला नाही. त्यानं संपादक मंडळाची जी काही चेष्टा केलेली आहे, त्याने मी तरी भरपूर हसलेलो आहे. माझ्या मनातून कुणी संपादक टारझन किंवा अवलिया यांच्या चेष्टेमुळे उतरलेला नाही.

हे कंटेम्प्ट वगैरे कन्सेप्ट वारंवार वापरुन आजकाल न्यायालयं स्वतःचं हसू करुन घ्यायला लागलेली आहेत. त्या धर्तीवरचा हा निर्णय वाटला.

या माझ्या टिप्पणीतही काही ''कंटेम्प्ट ऑफ संपादक मंडळ'' वाटला तर (फक्त) खेद आहे.

आळश्यांचा राजा

मनिष's picture

10 Jul 2010 - 12:23 pm | मनिष

लेखनावरून आणि प्रतिसाद वगैरेंवरून मला तरी असं वाटतं की तो एक मनमौजी मनमोकळा तरुण आहे. थोडा लहान आहे, आणि मला वाटतं तो स्वतःदेखील हे मान्य करत असावा, त्यालादेखील (अकाली) प्रौढ व्हायची हौस नसावी. तो माझा तर मनोमन मित्रच झाला आहे. चेष्टा करायची आवड आहे त्याला. करुदे की. कुठे विखार मला तरी दिसलेला नाही. त्यानं संपादक मंडळाची जी काही चेष्टा केलेली आहे, त्याने मी तरी भरपूर हसलेलो आहे. माझ्या मनातून कुणी संपादक टारझन किंवा अवलिया यांच्या चेष्टेमुळे उतरलेला नाही.

हे कंटेम्प्ट वगैरे कन्सेप्ट वारंवार वापरुन आजकाल न्यायालयं स्वतःचं हसू करुन घ्यायला लागलेली आहेत. त्या धर्तीवरचा हा निर्णय वाटला.

या माझ्या टिप्पणीतही काही ''कंटेम्प्ट ऑफ संपादक मंडळ'' वाटला तर (फक्त) खेद आहे.

शब्दशः सहमत! फक्त मी टारझन ला ओळखतो आणि तो माझा मित्र आहे. बाकी दुसर्‍या सदस्याबाबत 'नो कॉमेंटस"!

यशोधरा's picture

10 Jul 2010 - 2:13 pm | यशोधरा

सहमत.

स्मिता चावरे's picture

10 Jul 2010 - 12:19 pm | स्मिता चावरे

असेच वाटते. आळश्यांचा राजा यांच्याशी सहमत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jul 2010 - 12:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वरच्या यादीत माझंही नाव पाहून आश्चर्य आणि आनंद झाला.

सविताताई, आपण कोणीही २४ तास मिपावर असतोच असं नाही. अनेकदा संपादकांनी संपादन करून झाल्यावरच आपण धागे उघडतो. त्यामुळे कोणी चिमटे घेतले आहेत आणि कोणी हाणामारी केली आहे हे प्रत्येक वेळेस आपल्याला कळेलच असं नाही. काहीवेळा काही, विशेषत: संपादकांच्या, खरडवह्या उघडल्या की अनेक तक्रारीही दिसतात. हे प्रतिसाद मुख्य धाग्यांवरून गायब झालेले दिसतात. मला व्यक्तीशः असे प्रतिसाद उडाल्याचा आनंद होतो आणि कोणीतरी असं काही लिहील्याचं वाईटही वाटतं. हे असे हीन पातळीवरचे प्रतिसाद आणि लेखन न आलेलंच बरं; पण असं होताना दिसत नाही. संपादकांना वारंवार एकाच माणसाचे, आयडीचे प्रतिसाद वारंवार उडवावे, संपादित करावे लागणं संपादक आणि संकेतस्थळाच्या दृष्टीने कितपत योग्य आहे?

खट्याळपणा, चिमटे काढणे हे प्रकार अजूनही सुरू आहेत आणि सुरू रहातील याची मला खात्री आहे. पण त्याचं हाणामारीत रूपांतर होऊ न देणं हे आपल्याच हातात असतं. खोडकरपणा आणि खोड्या काढणं यातला फरक समजला नाही तर संपादकांना छडी हातात घ्यावीच लागणार आणि ती वेळ त्यांच्यावर येऊ न देणं ही सदस्य म्हणून आपलीच जबाबदारी आहे.

अनेक संपादकांना आणि टार्‍यालाही मी व्यक्तीश: ओळखते. संपादकांच्या समजूतदारपणा आणि सहनशक्तीवर माझा संपूर्ण विश्वास आहे. आणि ही टोकाची गोष्ट संपादकांनी संपूर्ण संवाद आणि विचारांती केली असेल याची मला खात्री आहे. टार्‍या चांगलं लिहू शकतो, त्याची तेवढी कुवत आहे आणि त्याने चांगलं लिहीत रहावं. आंतरजालाच्याच भाषेतच तो स्वतःचा खोडकरपणा न विसरता लवकर "मोठा होऊन" पुन्हा मिपावर दिसेल अशी अपेक्षा.

अदिती
(हे सर्व माझे स्वतःचे विचार आहेत, मिपाचे धोरण नाही.)

परिकथेतील राजकुमार's picture

10 Jul 2010 - 12:54 pm | परिकथेतील राजकुमार

टार्‍या चांगलं लिहू शकतो, त्याची तेवढी कुवत आहे आणि त्याने चांगलं लिहीत रहावं. आंतरजालाच्याच भाषेतच तो स्वतःचा खोडकरपणा न विसरता लवकर "मोठा होऊन" पुन्हा मिपावर दिसेल अशी अपेक्षा.

शब्दाशब्दाशी सहमत. पुढे जाउन असे म्हणीन की संपादक मंडळाने मोठ्या भावाप्रमाणे न्याय करुन लहान टारु भावाला अजुन एक संधी पुन्हा द्यावी.

बर्‍याचदा टार्‍या थोडेसे दुखावणारे / खटकणारे लिहितो, हे अगदी मान्य आहे. पण त्याला प्रत्येक गोष्ट अथवा त्याच्याशी संबंधीत प्रतिक्रीया सहजपणे विनोदाने घ्यायची सवय आहे, तशीच सवय इतरांना सुद्धा असतेच असे नाही आणि टार्‍या थोडासा इथेच चुकतो. त्याच्या सगळ्याच प्रतिक्रीया विनोदाने घेतल्या जात नाहीत आणि मग टार्‍या युद्धाला उतरतो ;) पण एकदा मान्यवर सदस्यांनी टार्‍याचे 'बौद्धीक' घ्यावे व त्याला मिपावर पुन्हा प्रवेश द्यावा अशी विनंती.

टार्‍या-पर्‍या आघाडीवाला
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

परिकथेतील राजकुमार's picture

10 Jul 2010 - 12:55 pm | परिकथेतील राजकुमार

प्र का टा आ

नावातकायआहे's picture

10 Jul 2010 - 12:53 pm | नावातकायआहे

मिसळ पावात्लि तर्रि आन कान्दा गेला तर काय नुस्ता फरसान आन पाव खायचा का काय? ~X(

ऋषिकेश's picture

10 Jul 2010 - 12:56 pm | ऋषिकेश

अरेरे वाईट वाटलं. तत्कालिक कारण कळलं नाहि.
असो, संस्थळ सार्वजनिक नाहि ते खासगी आहे तेव्हा चालु द्या

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

आण्णा चिंबोरी's picture

10 Jul 2010 - 1:12 pm | आण्णा चिंबोरी

वाईट वाटले. या निमित्ताने जेम्स लेन प्रकरणाची आठवण झाली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Jul 2010 - 2:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

संपादक मंडळाने हा निर्णय विचारपुर्वकच घेतला असेल याची मला खात्री आहे. संपादकांचा असा निर्णय घेण्याचा अधिकार पुर्ण पणे मान्य असुन सुध्दा त्यांना एक विनंती करावीशी वाटते "टार्‍याला परत आणा"

टार्‍याच्या खोडसाळ पणा मुळे अनेकांची मने कदाचीत दुखावली गेली असतील. पण आपल्या घरातल्या व्रात्य मुलाला आपण काही घरा बाहेर काढत नाही. फारतर त्याच्या पाठीत एखादा धपाटा घालतो. फार तर थोडावेळ घराबाहेर उभा करतो आणि परत घरात घेतोच.

संपादक मंडळींना विनंती आहे की टार्‍या साठी मिपाचे दरवाजे कायमचे बंद करु नयेत.

आमचा मित्र नाठाळ असला तरी मनाचा फार चांगला आहे. तरुणाईच्या जोशात तो जर काही वेडा वाकडा वागला असेल तरी संपादक मंडळाने वडीलकीच्या नात्याने त्याला माफ करावे अशी कळकळीची विनंती.

पैजारबुवा,
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

मितभाषी's picture

10 Jul 2010 - 2:08 pm | मितभाषी

असेच म्हणतो.

.
.
.
.

भावश्या

भोचक's picture

10 Jul 2010 - 3:27 pm | भोचक

सहमत. टार्‍या गमती जमती करतो, क्वचित प्रसंगी त्या 'टोचतातही'. पण तरीही मनाने तो काही 'विखारी' नाही. संपादकांनी योग्य तो निर्णय घेतला असला तरी शिक्षा टोकाची होऊ नये. 'सुबह का भुला शाम को घर आए तो उसे भुला नहीं कहते' या थाटात त्याला 'घरात घ्यावे'.

(भोचक)
जाणे अज मी अजर

सागर's picture

10 Jul 2010 - 5:23 pm | सागर

मी ही वैयक्तिकरित्या टार्‍याला ओळखत नाही. पण माझेही मत इतर सर्व टारझनप्रेमींसारखेच आहे. त्याला माफ करुन सदस्यत्व बहाल करण्यात यावे.

मिसळपावच्या तर्रीला चव बहाल करणार्‍या सदस्यांवर बंदी घालणे वगैरे प्रकार वापरले जाऊ नयेत. आज टार्‍या उद्या नाना..असे व्हायला लागले तर कसे होणार?
अनेकांनी वर प्रतिसाद दिले आहेत की मिसळपाव वर येण्याच्या मागे टार्‍याचे लेखन हे देखील आहे. बंदी हा काही उपाय नाही. त्यापेक्षा संपादक समितीला विनंती की त्यांनी आक्षेपार्ह गोष्टी कोणत्या ते टार्‍याला नीट सांगावे.

(मिसळपावप्रेमी) - सागर

(अवांतर खुलासा : नानांचे नाव वर एकदा आले असल्यामुळे मी फक्त उदाहरणादाखल घेतले आहे. संपादक समितीबद्दलचा आदर राखून एक हितचिंतक म्हणून मी हे लिहिले आहे)

हापुस आम्बा's picture

10 Jul 2010 - 4:28 pm | हापुस आम्बा

नमस्कार

मराथित बरोबर लिहिता येत नाहि ............ प्लिज तार्झनला परत बोलवा.......

तार्झन्शिवाय मिसलिचि मज्जा न्हाइ.........

मितभाषी's picture

10 Jul 2010 - 4:42 pm | मितभाषी

मीप्ण हापुसाम्ब्याशी श्म्त अह.
तार्झनशिवाय मिस्ल्पाव अल्नी आह.

अर्धवट's picture

10 Jul 2010 - 4:54 pm | अर्धवट

आयला.. बोलवा रे परत एकदा त्याला..

(हे लिहुन आम्ही भविष्यातील एखाद्या टसलपाव कींवा टारबोली वरचं संपादकपद पदरात पाडुन घेतलं आहे.. नोंद असावी..)

(चाणाक्ष) अर्धवट

कवटी's picture

10 Jul 2010 - 5:23 pm | कवटी

इतक्या लोकानी टार्‍याला प्रथम पसंतीचे मत दिले आहे... त्याला दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त मते मिळत असल्याने मी अता माझे प्रतम पसंतीचे मत ||विकास|| यांच्या पारड्यात टाकत आहे. त्यांची मिपा विषयीची कळकळ बर्‍याच लोकाना लिहिलेल्या खरडीत जाणवते. त्यामुळे ||विकास|| ला परत आणाच.

आणि निदान इथून पुढेतरी सर्वांना समान नियम लावा.
एकाने लिहिले तर तिकडे काणाडोळा आणि दुसर्‍याच्या पाठीत बडगा असे नको....

शिवाय होतय अस की आयडी ब्लोक झाल्याची बोम्बाबोम्ब करायची... ब्लॉकझालेल्याने फुकटात भरपूर प्रसिद्धी मिळवायची आणि मग काही दिवसाने विजयी वीरासारखे परतायचे. इथल्या चेल्यांनी वेलकमबॅक चे होर्डिंग सगळी कडे लावायचे .... आणि परत काही दिवसातच येरे मझ्या मागल्या.....

अर्थात हे टारू आणि विकास संदर्भात नाही.
त्यांच्या बाबतीत संपादक मंडळ योग्य तोच निर्णय घेतील या विषयी खात्री वाटते.

कवटी

शुचि's picture

10 Jul 2010 - 6:25 pm | शुचि

टारगट आणि ||विकास|| यांना परत आणावे. कारण? कारण सामाजीक आहे. बहिष्कार घालून व्यक्ती सुधरत नाहीत तर शिक्षेने, सल्ल्याने, प्रेमाने सुधरतात.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||