कालवाचे सुक्याचे साहित्य :
कालव १ ते दोन वाटे
१ मोठा कांदा
७-८ लसुण पाकळ्या ठेचुन
हिंग, हळ्द
मसाला १ ते २ चमचे
चविपुरते मिठ
१टोमॅटो किंवा ३-४ कोकम
थोडी कोथिंबीर चिरुन
तेल
कालवांच्या सुक्याची पाककृती:
प्रथम कालव साफ करायची. कालवांमध्ये दगडी कच असतात ते कालव हातात घेतली की हाताला लागतात. ते काढायचे. कालव धुवायची आणि कढईत तेलावर लसणाची फोडणी देऊन त्यावर कांदा गुलाबी रंगावर तळावा. आता त्यावर हिंग, हळद, मसाला घालून कालव घालावी वाफेवर थोडावेळ शिजु द्यावी. पाणी घालू नका कारण कालवांना पाणी सुटत. ५ ते ७ मिनीटांनी त्यात चिरलेला टोमॅटो किंवा कोकम घाला व मिठ घाला. जरा परतुन कोथिंबीर घाला थोडावेळ वाफेवर ठेउन गॅस बंद करा.
कालवांचे सुके :
कालवांच्या वड्यांचे साहित्य
कालव १ वाटा
१ कांदा बारीक चिरुन
बेसन १ छोटी वाटी
२ चमचे तांदळाचे पिठ
आल लसूण पेस्ट १ चमचा
थोडा गरम मसाला
मसाला १ चमचा
हिंग, हळद
थोडी कोथिंबीर चिरुन
चविपुरते मिठ
तेल
कालवांच्या वड्यांची पाककृती :
कालवांच्या वड्यांचे दिलेले वरील तेल सोडून सर्व साहित्य कालवांसकट एकत्र करा थालीपिठाप्रमाणे घट्ट पिठ मळा जर कालव टाकुन पातळ होत असेल तर त्यात अजुन बेसन घाला. आणि चांगल मळून छोट्या छोट्या वड्या तव्यावर शॅलोफ्राय करा.
अधिक टिपा:
कालव समुद्राच्या खडपातील दगडाला चिकटलेल्या कवचीत असतात. कोयत्याने टोचून कवचीचे आवरण फोडून आतील कालव काढतात. त्यामुळे त्याला चिकटलेली कच राहते. म्हणून कालव व्यवस्थित साफ करावित. एकादा कच राहीला तर दाताखाली येतो.
कालवांचे कालवणही करतात पण त्यापेक्शा वड्या किंवा सुकेच चांगले लागते.
कालव मोठ्या आकाराचीही येतात. ती कापुन घ्यावी लागतात.
प्रतिक्रिया
7 Jul 2010 - 2:46 pm | जागु
ह्या फोटोच आणि माझ काय वैर आहे कळत नाही लोड होत नाही माझ्याने निट.
7 Jul 2010 - 2:54 pm | टारझन
हा हा हा ... ह्या फोटुंना एकदा धुवुनंच काढला पाहिजे .. स्साला ..
असो .. फोटु अपलोड करण्याची किटकिट करण्यापेक्षा मला बोलवा ना राव तिकडे ... :) सगळ्या डिष अश्या राऊंड मधे ठेवा ;)
तो गणप्या लेकाचा कधी येतोय इकडे कुणास ठाव !! :)
-(लॉजिकली ऑन डायट) बकासुर
7 Jul 2010 - 3:10 pm | गणपा
ए१
आई कालव्यांची भजी पण करते.
=P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~
हाच तो जागुतैंचा न धुतला गेलेला फोटो ;)
7 Jul 2010 - 3:18 pm | जागु
टारझन तुम्ही गणपाला हाक मारल्याबरोबर ते हजर.
धन्स गणपा.
7 Jul 2010 - 3:31 pm | जागु
गणपा, आता जमला. धन्स.
7 Jul 2010 - 3:52 pm | सहज
हे नाही खाल्ले.
(शिताके) मश्रुम घालुन हे कालवाचे सुके सही लागेल असे वाटतेय :-)
7 Jul 2010 - 5:42 pm | लवंगी
मस्त लागतात, पण ताजे हवेत.. भजी तर १स्त ल्कास लागते.. कालव म्हणाजेच ऑइस्टर्स..
7 Jul 2010 - 4:08 pm | मराठमोळा
हे माहीतपण नव्हते.
कुठे मिळते (आयते?) ;)
:)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
8 Jul 2010 - 3:27 pm | जागु
सहज, एकदा खाउन बघा.
लवंगी, हो ही ताजी हवीत.
मराठमोळा, वरती आहेत बघा आयती.
8 Jul 2010 - 9:23 pm | विसोबा खेचर
व्वा!