मनोरंजक आकडेवारी फुटबॉल विश्वचषक (केवळ गंमत)

कापूसकोन्ड्या's picture
कापूसकोन्ड्या in काथ्याकूट
6 Jul 2010 - 12:33 am
गाभा: 

वेगवेगळ्या मित्रांकडून फिरत फिरत आलेली एक मेल मराठीत टंकीत करून आपल्या वाचकांसाठी देत आहे.
केवळ गंमत म्हणून या कडे पहावे.
(हा वर्ल्ड कप कुणाला द्यायचा आहे हे अगोदरच ठरले आहे का?)
===========================
विश्वचषकाचे मानकरी त्यांचे वर्ष आणि काही बेरजा

१) ब्राझील १९९४ आणि १९७० (१९७०+१९९४)=३९६४

२) अर्जेंटीना १९८६ आणि १९७८ ( १९७८+१९८६)=३९६४

३) जर्मनी १९९० आणि १९७४ (१९९०+१९७४) =३९६४

४) ब्राझील २००२ आणि १९६२ (२००२+१९६२)=३९६४

वरील आकडेवारी बघता, एक सोपी गोष्ट करा. ३९६४ मधून २०१० वजा करा. उत्तर येईल,१९५४!
१९५४ मध्ये कुणी कप घेतला होता?

जर्मनी ??????

प्रतिक्रिया

रामदास's picture

6 Jul 2010 - 12:40 am | रामदास

पण बेटींग करणारे अशाच माहीतीच्या आधारे खेळतात.

कापूसकोन्ड्या's picture

6 Jul 2010 - 12:52 am | कापूसकोन्ड्या

मग काय लावताय का जर्मनी वर?

डावा हात कुठेही न ठेवता उजव्या हाताने सलाम!

योगी९००'s picture

6 Jul 2010 - 12:42 am | योगी९००

१९५४ ला पश्चिम जर्मनी जिंकली होती.
http://en.wikipedia.org/wiki/FIFA_World_Cup

म्हणजे यंदा जर्मनीच जिंकणार..

(पण मागच्या विश्वचषकाच्यावेळी ब्राझिल का नाही जिंकली..?? त्यांनी तर १९५८ ला पण विश्वचषक जिंकला होता.)

खादाडमाऊ

टारझन's picture

6 Jul 2010 - 1:06 am | टारझन

बादरायण संबंध जोडण्याचा एक हळवा प्रयत्न ;)

-(श्वेता जुमानी प्रेमी) स्वतः गजनी

बबलु's picture

6 Jul 2010 - 3:36 am | बबलु

मनोरंजक माहिती !
अतिकिंचीत ओढून-ताणून आकड्यांत बसवलेली. :)

ब्राझील जर १९६२, १९७०, १९९४ आणि २००२ मध्ये जिंकली, तर ते आकडे फिरवले कशाला ?
उगाच ताणलंय, दुसरं काय ?

....बबलु

मनोरंजक पण बादरायण.. :)
उपास मार आणि उपासमार

स्वाती दिनेश's picture

6 Jul 2010 - 11:14 am | स्वाती दिनेश

माहिती गमतीदार,
स्वाती