गाभा:
रुपया पूर्ण पणे परिवर्तनीय.....rupee fully convertible... असावा अशी चर्चा व मागणी फार पूर्वी एकली होती..प्रश्न खूप टेकनिकल असल्याने .. कुणी जाणकार समजावून सांगू शकेल काय..
१...म्हणजे नेमके काय...
२..फायदे ...तोटे
३..सरकारची भूमिका,
४..आज रुपया परिवर्तनीय. आहे का
प्रतिक्रिया
2 Jul 2010 - 5:43 pm | सुखदा राव
चलन परिवर्तनियता म्हणजे एक चलन दुसर्या चलनाबरोबर किन्वा सोन्याबरोबर एक्ष्चेन्ज करता येण्याची त्याची क्षमता. ही क्षमता देशाचे सरकार, देशाची मुख्य बॅन्क देशाच्या आर्थिक परिस्थितीचा अन्दाज घेउन ठरवतात.
चलन पुर्ण किन्वा अन्शतः परिवर्तनिय किन्वा अपरिवर्तनिय असते. कोरिया, क्युबा या देशान्चे चलन अपरिवर्तनिय आहे. म्हणजे त्या देशान्च्या चलनाच्या बदल्यात इतर चलने मिळत नाहीत. ( अशा ठिकाणी चलनान्चा काळा बाजार असतो. तिथुन इतर चलने मिळवता येतात.)
भारतात रुपया अन्शतः परिवर्तनिय आहे. याचा अर्थ जर कोणाला डॉलर हवे असतिल तर आर.बी.आय. ने त्या दिवशी डॉलरचा जो भाव ठरवला असेल त्याच भावाला ते ठराविक ठिकाणी रुपयाच्या बदल्यात मिळू शकतात. हेच जर रुपया पुर्णपणे परिवर्तनिय असता तर तो तुम्हाला इतर वस्तूप्रमाणे भाव करुन घेता आला असता.
याचे फायदे-तोटे आणि सरकारची भुमिका यावर अभ्यास करून लिहाव लागेल. तुर्तास एवढेच.
2 Jul 2010 - 10:15 pm | शिल्पा ब
<<<हेच जर रुपया पुर्णपणे परिवर्तनिय असता तर तो तुम्हाला इतर वस्तूप्रमाणे भाव करुन घेता आला असता.
अर्थ नीट समजला नाही... म्हणजे इतर वस्तुसारखे घासाघीस करता येते? जर तसे असेल तर कशाच्या जोरावर घासाघीस करणार? रुपयाची किंमत $ पेक्षा कमीच असते म्हणून कशा प्रकारचे निकष लावणार.
आणि चलन ब्यांकेतूनच मिळते कि अजूनही काही institutions आहेत?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
2 Jul 2010 - 6:30 pm | अविनाशकुलकर्णी
सुखदा राव००००००००००००धन्यवाद
3 Jul 2010 - 1:51 pm | सुखदा राव
तुम्हाला जर एखाद्या कम्पनीचे शेयर्स घ्यायचे असतिल तर तुम्ही ते विकणार्याशी १ प्रकारे भावच करत असता. तुमची आणि त्याची पैशाची अपेक्षा पुर्ण झाली की तो तुम्हाला त्याचे शेयर्स विकतो. चलनाचेही तसेच आहे. पुर्णपणे परिवर्तनिय असणारे, समजा 'क्ष', हे चलन मला तुमच्याकडुन हवे आहे तर आपण त्याचा भाव करायचा (भाजी घेताना करतो तसा.) अर्थात हे भाव करण वगैरे आपण लोक करु शकत नाही कारण हे सगळे व्यवहार खुप मोठ्या प्रमाणावर होत असल्याने भाव मार्केट मधुन ठरुनच आपल्यापर्यन्त पोचतात. या मार्केटमध्ये काही शे किन्वा काही हजार कोटीन्मध्ये उलाढाली चालतात आणि म्हणुनच हा भाव ठरवू शकण्याची क्षमता अशा मोठमोठ्या लोकान्कडेच असते.
परकिय चलन बॅन्केतुन मिळते तसे ते इतरही ठिकणून मिळू शकते. भारतात आर.बी.आय. कडुन १ विशिश्ट परवाना घेउन अश्या प्रकारे एका चलनाच्या बदल्यात दुसरे चलन विकण्याचा व्यवसाय करता येतो. पण यासाठी खुप कडक कायदे आहेत.