भाग्यवान

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in काथ्याकूट
31 Mar 2008 - 10:17 pm
गाभा: 

नक्की भाग्यवान कोण असतं असा मला सध्या प्रश्न पडला आहे. मी आम्हा भावंडांच्यात मधली होते. माझी मोठी बहिण बाबांची लाडकी आणि लहान भाऊ आईचा लाडका. त्यामुळे मला वाटायचे ते दोघेही भाग्यवान.

लहान भावाला वाटायचे सगळ्यात लहान असले की सगळे हुकुम गाजवतात त्यामुळे सर्वांत मोठे होणे भाग्याचे. मोठ्या बहिणीला वाटायचे की मोठी म्हणून जबाबदारीची जाणीव लवकर येते त्यामुळे सर्वांत मोठे असण्यात हशील नाही. त्यापेक्षा शेंडेफळ होण्यात खरी मजा आहे.

तरीही मला अजूनही प्रामाणिकपणे वाटते की मधले होणे ह्यासारखे वाईट काही नाही आणि एकुलते एक अपत्य असणे ह्यासारखे भाग्याचे काहीच नाही.

तुमचा स्वत:चा अनुभव काय?

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

31 Mar 2008 - 10:35 pm | ब्रिटिश टिंग्या

चांगला विषय निवडलाय चर्चेसाठी.....

आमच्या मते मधले भावंड होणे सर्वात चांगले.....
त्याचा फायदा असा की मधले भावंड म्हणून छोट्याच्या समोर दादागिरी करता येते तसेच मोठ्यांच्या समोर बालीशपणादेखील करता येतो....डब्बल मज्जा!....
असो, हे आमचे वैयक्तिक मत आहे.....यास दुमत असु शकेल.....

अवांतर : तरीही मला अजूनही प्रामाणिकपणे वाटते की मधले होणे ह्यासारखे वाईट काही नाही.
यापेक्षा तरीही मला अजूनही प्रामाणिकपणे वाटते की मधले भावंड होणे ह्यासारखे वाईट काही नाही. असे लिहीले असते तर बरे झाले असते ;)

ह घ्या

(अवांतरीत)टिंग्या ;)

अरे बापरे एकुलते एक अपत्य? मी ते आत्तापर्यन्त भोगतोय ते. तसे तर कधीच नसावे
देवा कोणाचाही नशीबी एकुलते होणे लिहु नको रे.स्वतःचे कोणतेही निर्णय घेता येत नाहीत्.शिक्षणापासुन बायको निवडण्यार्यन्त .प्रत्येक गोष्टी साठी संघर्ष करावा लागतो.
आपली प्रत्येक गोष्ट पालकाना जगावेगळी वाटत असते.
तुम्हाला काय समजणार ही दुख्खे.
मला नेहमी दोन भाउ दोन्बहीणी किंवा भाउ बहीण एकमेकांत काय बोलतात याचे नेहमीच कुतुहल वाटत आले आहे .
"चिपर बाय डझन" पुस्तक वाचल्यापासुन तर हे फार जाणवले.

बेसनलाडू's picture

1 Apr 2008 - 8:41 am | बेसनलाडू

एकुलते एक होणे जितके तुम्हांला जाणवले तितके वाईट नाही. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, बायको निवडण्याचे स्वातंत्र्य इ. वर गदाबिदा काही येत नाही. माझ्या बाबतीत याच्या अगदी विरुद्ध झाले आहे. तशी येत असेल, तर तो पालकांच्या विचारसरणीचा/व्यक्तिमत्त्वाचा/स्वभावाचा, भोवतालच्या परिस्थितीचा नि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि/किंवा स्वभावाचा परिणाम मानावा; एकुलते एक पणाचा नाही. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे पालकांकडून होणारी अतिकाळजी. पण तेही समजण्यासारखेच मानावे, असे मला वाटते.
एक मात्र खरे, की काही विशिष्ट परिस्थितींमध्ये मोठ्या बहिणीचे/भावाचे अस्तित्त्व नसल्याची खंत मला फार जाणवत आली आहे. असो.
(एकुलता एक)बेसनलाडू

कोलबेर's picture

1 Apr 2008 - 9:56 am | कोलबेर

एक मात्र खरे, की काही विशिष्ट परिस्थितींमध्ये तुम्हाला मोठ्या बहिणीचे/भावाचे अस्तित्त्व नसल्याची खंत आम्हालाही फार जाणवत आली आहे. :))
कृ .ह .घ्या.

बेसनलाडू's picture

1 Apr 2008 - 10:13 am | बेसनलाडू

ह घ्या लिहिले असले, तरी प्रतिसादातील रोख व संदिग्धता लक्षात घेता, आणि अर्थातच त्यामुळे प्रतिसाद नीट न समजल्याने ह घ्या कितपत ह घ्यावे, याबाबत संभ्रमित आहे.
(संभ्रमित)बेसनलाडू

सृष्टीलावण्या's picture

31 Mar 2008 - 10:46 pm | सृष्टीलावण्या

यापेक्षा तरीही मला अजूनही प्रामाणिकपणे वाटते की मधले भावंड होणे ह्यासारखे वाईट काही नाही. असे लिहीले असते तर बरे झाले असते

टिंगीबुवा, तुम्हाला तर चित्रपटांचे संवाद लिहिण्याचेच काम मिळायला हवे. आपण तर भल्या भल्यांना गारद कराल (खरेतर झोपवाल असेच लिहिणार होते पण... जाऊ दे ना).

>
>
वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्‍हाटी बोलैन...

ब्रिटिश टिंग्या's picture

1 Apr 2008 - 1:10 am | ब्रिटिश टिंग्या

अहो, तुम्ही असताना मला पामराला कोण सं'वाद' लिहीण्याचे काम देईल..... ;)

(आपल्याच तालमीत शिकून तयार होणारा) टिंग्या ;)

मला नेहमी दोन भाउ दोन्बहीणी किंवा भाउ बहीण एकमेकांत काय बोलतात याचे नेहमीच कुतुहल वाटत आले आहे .

विजुभाऊंशी बर्‍याच प्रमाणत सहमत !!!!!

(आमच्या तिर्थरुपांचा एकुलता एक कुलदीपक)
मदनबाण

सृष्टीलावण्या's picture

1 Apr 2008 - 11:23 am | सृष्टीलावण्या

ते तर कुतुहल आम्ही ३ भावंड असून मला पण आहे कारण आम्ही मुद्द्याऐवजी गुद्द्यांनीच
एकमेकांशी बोलायचो. शाळा, व्यायामशाळा, जेवण, वाचन आणि झोप (तेव्हा टीव्ही नावाचे विरंगुळा केंद्र आमच्याकडे आले नव्हते) यांची वेळ सोडली तर इतर वेळी आम्ही यथास्थित एकमेकांना बुकलून काढायचो.

खास भांडणे ही तर रबर, पट्टी, पेन्सिल, करकटक, गुण्या, शाळेचा पट्टा, लाल रंगाच्या रीबिनी यांच्यासाठी रोज व्हायची.

>
>
मधून मेघ हे नभास ग्रासती, मधेच ह्या विजा भयाण हासती, दहा दिशांतूनी तूफान व्हायचे..

मीनल's picture

1 Apr 2008 - 5:28 pm | मीनल

मला सख्खे भाऊ बहिण नाहीत याचे कधीही दु:ख झाले नाही.
कुणाला आहे म्हणून हेवा वाटला नाही.

माझे चुलत /मामे /मावस भाऊही मला तितक्याच जवळचे आहेत.ते ही एकुलते एक आहेत.