अनुभव लिहायचा प्रयत्न पहील्यांच करतो आहे बघु केती जमतो का. (१० वी च्या परीक्षीतील निबंधानंतर थेट १२ वर्षानंतर)
कामशेत जवळ तुंग आणी तिकोन्या च्या जवळ असलेल्या टेकाडाजवळ टेंपल पायलट या पुणास्थित संस्थेने ने २ ३ ४ मे २००८ साली पॅराग्ल्यायडींग बेसिक कोर्स आयोजित केला होता. २ तारखेला दुपारी कामशेत हायवे जवळील धाब्यावर जमायचे होते. तिकडे १ तास तांत्रीक बाबी समजावुन सांगितल्या.
रोज दुपारी २.०० ते ३.०० पर्यंत तांत्रीक बाबी १/२ तास धाबा ते टेकडी सुर्यास्ता पर्यंत सराव असा दिनक्रम
होता
पहील्या दिवशी फोटोत दाखवल्या प्रमाणे ग्लायडर घेउन धावयला लावले. ट्रेनरने पळवुन जाम दमवले,
दुसर्या दिवशी जमिनी वरुन उड्डाण जमणे आवश्यक होते नाहीतर टेकडीवरुन उड्डाण करु देत नाहीत. एकदाचे खुप घाम गाळल्यावर ते जमले. शेवटच्या दिवशी मात्र थरार अनुभवायला मिळाला, एका टेकाडावरुन उड्डाण केले ३-४ मिनीटे हवाई सफारी चालली.
ज्यांना हे करवयचे आहे त्यांना काही सुचना . पहीले म्हणजे हवेत असतांना ट्रेनरने दिलेल्या सुचना तंतोतंत पाळाव्यात अन्यथा ते जीवावर बेतु शकते. हा कोर्स शक्यतो शनीवार रवीवार टाळुनच करावा कारण गर्दी. आयोजक राहण्या आणी हॉटेल ते टेकडी ने आण करण्याची सुविधा देतात का हे बघावे (टेकडी हायवे पासुन लांब आहे).
पहीला दिवस पहीला तास
जमिनीवरील हाताळणी साठी तयार
सुरवात
आणी केटी
दिवस दुसरा
वरचे वर्गात ढकलले
हुश्श पुर्वपरीक्षा उत्तीर्ण
आता उड्डाण
प्रतिक्रिया
28 Jun 2010 - 1:14 am | पक्या
छान आहेत सर्व फोटो. पण फोटोंबरोबर प्रशिक्षण कसे झाले, त्या दरम्यान आलेला अनुभव कसा होता, तुम्ही हे सर्व कसे एन्जॉय केले हे लिहीले असते तर फोटो बघण्यात मजा वाटली असती.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
28 Jun 2010 - 10:08 am | Dipankar
लिहायचा प्रयत्न करतो
28 Jun 2010 - 2:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
विस्तारपूर्वक जरूर लिहा. फोटो मस्त दिसत आहेत.
अदिती
28 Jun 2010 - 9:33 pm | Nile
सविस्तर लिहा असेच म्हणतो.
बाकी, पॅराग्लायडिंग असावे.
-Nile
28 Jun 2010 - 7:35 am | सहज
छान
28 Jun 2010 - 4:44 pm | जागु
छानच.
28 Jun 2010 - 8:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.
28 Jun 2010 - 8:13 pm | पुष्करिणी
छान आहेत फोटो,
सविस्तर माहिती लिहा,
पुष्करिणी
28 Jun 2010 - 9:25 pm | स्वाती दिनेश
छान आहेत फोटो,
सविस्तर माहिती लिहा,
असेच म्हणते,
स्वाती
28 Jun 2010 - 8:33 pm | अरुंधती
छान फोटो.... सविस्तर माहिती दिलीत तर अजून बरे! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
29 Jun 2010 - 11:18 am | स्मिता चावरे
पुण्याला जाताना बरेच वेळा पाहिले आहे. तुमचे अनुभव वाचायला नक्कीच आवडेल.