गाभा:
राग म्हणजे काय,
लय म्हणजे काय,
गायकी म्हणजे काय,
तान म्हणजे काय,
आणि सर्वात महत्वाचं
म्हणजे स्वर म्हणजे काय,
ते अण्णांकडूनच शिकावं
आज मिसळपावच्या एका स्तंभात वरील विधाने वाचायला मिळाली. ही बहूधा तात्यांची असावित कारण ते भीमसेनजींचे निस्सीम भक्त आहेत. एखाद्या कलाकाराचे भक्त असणे यात वावगं काही नाही. पण वरील विधाने मला भारतीय अभिजात संगीताच्या समृद्ध परंपरेवर अन्याय करणारी वाटली.
मला तरी असे वाटते की -
लय जयपूर घराण्यातून शिकावी
गायकी फक्त गुरुकडून तालीम घेऊन शिकावी
स्वर म्हणजे काय हे धृपदीयांकडून (विशेषतः डागरांकडून्) शिकावे...
-युयुत्सु
खुलासा - माझे भीमसेनजींशी काही वाकडे नाही, उलट सतरा वर्षांपूर्वी मी संगीतात करत असलेले काम बघायला ते आले होते तेव्हा मला स्वर्ग दोन बोटे उरला होता.
प्रतिक्रिया
20 Jun 2010 - 9:54 am | शिल्पा ब
तुम्ही तरी काय एवढा डोक्याला शीण करून घेताहात ....
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
20 Jun 2010 - 5:19 pm | वेताळ
खुपच छान.....फोटो
वरील फोटो संदर्भात लिहले तर खुप बरे होईल.
वेताळ
20 Jun 2010 - 9:59 am | चिरोटा
मी जगाच्या गानकोकिळा, आठवा सूर एम्.एस. सुब्बल़क्ष्मी(http://en.wikipedia.org/wiki/M._S._Subbulakshmi ) ह्यांचे व्यंकटेश स्त्रोत्र रोज सकाळी ऐकतो. बर्या गायच्या त्या!!!
P = NP
20 Jun 2010 - 10:06 am | टारझन
कोणत्याही विधानाशी असहमत असल्यास नविन धागे काढण्याची फ्याशन येऊ शकेल. संपादक हा फालतु धागा उडवतील काय ? असा एक व्यक्तिगत विचार मनाला चाटुन गेला... :)
बाकी तात्याने जिथे ही प्रतिक्रिया दिली , तिथेच खाली असहमत झाले असते , पण युयुत्सु ला मुखपृष्ठावर राहाण्यात इंटरेस्ट दिसतो ... काय खाली-वर खाली-वर चालु आहे ?
20 Jun 2010 - 10:15 am | शानबा५१२
मग आता तुम्ही पण गायला सुरवात करा........अन्याय करण्याचा काय त्यांनीच ठेका घेतलाय??
20 Jun 2010 - 10:16 am | शिल्पा ब
ही ही ही...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
21 Jun 2010 - 6:55 am | Pain
तुमचा टोमणा चुकलाय. त्यांचा आक्षेप त्या विधानांवर आहे, संगीत परंपरा / दर्जा यावर नाही. युयुत्सुंच्या गाण्याने काहीही फरक पडणार नाही.
20 Jun 2010 - 12:39 pm | तिमा
ते अण्णा म्हणजे नक्की कोण हे आधी स्पष्ट करा. 'गुळाचा गणपती'त दाखवल्याप्रमाणे प्रत्येकाचे 'अण्णा' हे वेगवेगळे असू शकतील.
बाकी सूर, लय, ताल वगैरे कुणाकडून शिकायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.
उदाहरणार्थ, नितिन मुकेश याने गाण्यातला सूर(?) हा त्याच्या पूज्य पिताजींकडून घेतला आहे.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
20 Jun 2010 - 12:47 pm | हेरंब
खळेकाकांना विचारा, लता-भीमसेनजी यांच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस ताल संभाळताना कुणाची त्रेधातिरपीट झाली होती ते ! शेवटी वेगवेगळे रेकॉर्डिंग करुन घ्यावे लागले आणि नंतर मिक्स करावे लागले.
20 Jun 2010 - 3:10 pm | युयुत्सु
हम्म... अशा कथा मी पण ऐकल्या आहेत.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
21 Jun 2010 - 11:06 am | आंबोळी
अशा कथा मी पण ऐकल्या आहेत.
आम्ही नाही ऐकल्या....
प्लिज सांगाना.
आंबोळी
21 Jun 2010 - 12:11 pm | युयुत्सु
दगड्फेक, जाळपोळ होईल असे किंवा गेला बाजार धागा उडवला जाईल असे मी काहीही लिहीणार नाही. ;)
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.जअईदगड्फेक, जाळपोळ होईल असे किंवा धागा उडवला ज
21 Jun 2010 - 12:25 pm | II विकास II
>>दगड्फेक, जाळपोळ होईल असे किंवा गेला बाजार धागा उडवला जाईल असे मी काहीही लिहीणार नाही.
असे काही होईल असे वाटत नाही.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
21 Jun 2010 - 12:27 pm | वेताळ
आम्हाला पण उत्सुकता लागुन राहिली आहे. अन जाळपोळ,दगदफेक नाही होणार.
वेताळ
23 Jun 2010 - 9:50 am | विशाल कुलकर्णी
दगड्फेक, जाळपोळ होईल असे किंवा गेला बाजार धागा उडवला जाईल असे मी काहीही लिहीणार नाही. >>>>>>
च्यामारी टोपी...
मी नाय त्यातली आन कडी लावा आतली ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
20 Jun 2010 - 1:42 pm | वेताळ
प्रत्येकाला आपला गुरु इतरांपेक्षा श्रेष्ठ वाटतो,त्यामुळे चिढायचे काही कारण नाही.
वेताळ
20 Jun 2010 - 1:50 pm | युयुत्सु
मी चिडलेलो नाही. मी फक्त असहमती दर्शवली. भीमसेनजींच्या पलिकडे भारतीय संगीत नाही किंवा भीमसेनजी म्हणजे संगीतातला पूर्णविराम अशी समजूत करून दिली जाणार असेल तर तो अनेकांवर अन्याय आहे.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
20 Jun 2010 - 2:52 pm | डॉ.श्रीराम दिवटे
गौरवार्थ असे लिखाण होत असतेच. त्याचा आस्वाद फक्त घ्यावा काथ्याकूट करू नये.
*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...
20 Jun 2010 - 3:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>गौरवार्थ असे लिखाण होत असतेच. त्याचा आस्वाद फक्त घ्यावा काथ्याकूट करू नये.
सहमत आहे...! :)
- दिलीप बिरुटे
23 Jun 2010 - 11:19 am | युयुत्सु
असे तुमच्या सारखा प्राध्यापक म्हणत असेल तर कॉलेजात कला शाखा हवी कशाला?
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
20 Jun 2010 - 5:31 pm | अक्षय पुर्णपात्रे
हा 'च' खटकणारा आहे. त्यामुळे श्री युयुत्सुंशी सहमत आहे.
21 Jun 2010 - 12:45 pm | शानबा५१२
शयमत नाही,
तुम्ही पण लिहा एखाद्या नावापुढे 'च'.त्यांनी त्यांचे म्हणने मांडले तुम्ही तुमचे मांडा.
20 Jun 2010 - 10:07 pm | शिल्पा ब
पंडितजी हे भारतीय संगीतातील महामेरू आहेत...जर कोणी त्यांच्याबद्दल आदराने काही लिहिले तर एकदम एवढा काथ्याकुट कशाला करायला पाहिजे...तुम्हाला नाही पटत तर तुम्ही दुसर्या कोणाकडून शिका... हाय काय नि नै काय ...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
21 Jun 2010 - 4:59 am | sur_nair
ज्याचं त्याचं मत आणि आवडी निवडी त्याचं उगाच काथ्याकुट करण्यात काय अर्थ आहे. मला असं अण्णा, वसंतराव, कुमारजी, किशोरीतै असं सगळ्याबद्दल वाटतं, कुणाला आणखी कोण. कोणी गणपतीला मानतं कोणी दत्ताला, तशी ही कलेची दैवतं. कोण कुणाला का पुजेना.
21 Jun 2010 - 12:45 pm | परिकथेतील राजकुमार
साला कायम चर्चेत कसे रहावे हे आमच्या त्यात्याकडूनच शिकावे. :)
तात्याचा फ्यान
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
22 Jun 2010 - 5:57 pm | आनंद
तुम्ही संगीतात करत असलेले काम हे होत का?" Gandharva," Computing in Musicology
जरा डिटेलवारी सांगाल काय?
22 Jun 2010 - 6:27 pm | विसोबा खेचर
असहमत.. लयीचं सौंदर्य हे प्रत्येक घराण्याचं वेगवेगळं.. आता किराणा गायकी ही स्वरप्रधान गायकी आहे असं म्हटलं जातं, याचा अर्थ त्यात लयीचं सौंदर्य नाही असा नाही..
असहमत.. गायकी गुरुंव्यतिरिक्तही अनेकांकडून शिकता येते.. फक्त शिष्य ती गायकी अलगद टिपणारा असावा.. स्वत:च्या गुरुंव्यतिरिक्त अन्य गुणीजनांकडून गायकी शिकल्याची, टिपल्याची आणि ती गायकी आपल्या गायकीत सुरेख रितीने सामावून घेणार्या कलाकारांची अनेक उदाहरणे सांगता येतील..
पुन्हा एकदा असहमत..
असो, असहमत असलो तरी आपल्या विचारांचा आदर आहेच..
अजून एक खुलासा..
अण्णांकडूनच शिकावं असं जरी म्हटलं असलं तरी ते शब्दश: घेऊ नये. ते केवळ अण्णांविषयीच्या आदरापोटी लिहून गेलो होतो..कला हा विषय असा आहे की तो कुणाही गुणीजनांकडून, गुरुजनांकडून शिकावा. केवळ एका 'च' ला असहमती दर्शवण्याकरता सबंध धागा काढला गेला हे जरा हास्यास्पदच वाटले..असो..
अशी समजूत करून देण्याचा माझा कोणताही हेतू नाही याचं मला स्पष्टीकरण द्यावं लागत आहे याची गंमत वाटते..! आजपर्यंत अण्णांच्या गाण्याव्यतिरिक्त इतर अनेकांच्या संगीतकलेबद्दल मी मिपावर व अन्यत्र भरभरून लिहिले आहे..
दिवटेसाहेबांनी अगदी साधा कॉमन सेन्स दाखवला आहे. धन्यवाद दिवटे साहेब! :)
आपला,
(गजाननबुवांच्या हमीरचा प्रेमी) तात्या.
ता क - हमीर हा केवळ आमच्या गजाननबुवांनीच गावा! :)
तात्या.
23 Jun 2010 - 9:31 am | युयुत्सु
तुमची असहमती मी gentlemen's disgreement' म्हणून स्वीकारतो. पण एका गोष्टीचा उल्लेख इथे केल्याशिवाय राहवत नाही. Wim Van Der Meer
नावाच्या एका musicologist ने खरोखर मोठा संगीतकार्/गायक्/वादक कोण याची व्याख्या एकदा गप्पामध्ये सांगितली होती.
तो म्हणाला, " दोन सूरांमधली स्पेस ज्याला मोठी करून दाखवता येते तो खरा musician".
मला ही व्याख्या मनोमन पटते... आणि या व्याख्येच्या कसोटीला फक्त धृपदीयेच उतरतात.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
23 Jun 2010 - 2:35 pm | विसोबा खेचर
पुन्हा एकदा असहमत.. धन्यवाद.
अर्थात, आपण आणि Wim Van Der Meer या दोघांच्याही मतांचा मला आदर आहेच!
आपला,
(ख्यालप्रेमी) तात्या.
22 Jun 2010 - 6:37 pm | युयुत्सु
"तुम्ही संगीतात करत असलेले काम हे होत का?"
हो ! बरोब्बर.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
22 Jun 2010 - 11:52 pm | वाटाड्या...
युयुत्सु साहेब..
१. आपण गाणं गायला शिकला आहत काय? (नुसतं गाणं वाचायला बरेच जण शिकतात). जसं पुणेरी पब्लिक ...नो ऑफेन्स....
२. भाग्यवान आहात की अण्णांशी तुमचा संगीतविषयक संबंध आला आहे.
३. काय कशाशी खातात ह्या विषयावर ज्याचे त्याचे वैयक्तिक मत असेल पण शेवटी अश्या मोठ्या लोकांविषयी बोलताना आपण कुठे आहोत याचा विचार करणे जास्त रास्त आहे असं मला वाटतं. अण्णांसारखा नुसता धीरगंभीर षड्ज जरी तासभर लावता आला तरी त्यांच्या संगीतातल्या मातब्बरीवर आपल्याला उणं बोलायचा अधिकार आहे असं प्रत्येकानं प्रामाणिकपणानं मानावं. १४ - १४ तास रीयाजाची मेहेनत करणं आजकाल कुणाच्या तीर्थरुपाना सुद्धा जमणार नाही.
४. तसे अण्णांच्या बरोबरीचे लोक आहेतच की जे स्वर कशाशी खातात ते जाणुन आहेत. जसे यशवंतबुवा जोशी.
कळावे..
- वाटाड्या....
23 Jun 2010 - 9:39 am | युयुत्सु
आमचे आजे-गुरुजी आणि गुरुजी
आमचे आजे-गुरुजी (गुरुजींचे गुरुजी) उस्ताद फरिदुद्दीन डागर खूप गोष्टीवेल्हाळ आहेत. त्यांना आम्ही एकदा प्रश्न विचारला, "उस्ताद, तुम्ही किती तास रियाज केला आहे?
त्यावर त्यांनी उलट प्रश्न विचारला, "तुम्हाला खरं उत्तर सांगू की खोटं?"
आम्ही म्हटलं, "खरं आणि खोटं,दोन्ही"
त्यावर ते म्हणाले, "खोटं उत्तर आहे, १८-१८ तास, आणि खरं उत्तर आहे सुरुवातीला ५-६ तास आणि नंतर नंतर तीन तास."
मग थोडा पॉज घेऊन ते म्हणाले, "डोक्यात २४ तास गाणं झुळझुळत असेल तर १८ तास रियाजाची काहीही आवश्यकता नसते"
सूज्ञांस अधिक सांगणे न लगे...
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
23 Jun 2010 - 9:43 am | अर्धवट
जाना दो... युयुत्सुभाय, तात्या.. काय लावुन धरलय राव.. जरा कुमारजींच्या, वसंतरावांच्या, अभिषेकीबुवांच्या एखाद्या चीजेवर लिहा की कायतरी ह्याच्यापेक्षा.. जास्त आनंद नाय का मिळनार, तुम्हाला आन् आमालापण...
आमच्या कानात कायतरी चांगल ओता की राव.. काय कालवा लावलाय.. तुमाला जरा कळतं गाण्यातलं म्हणुन आमी सांगायलो तर तुमी भांडून काहुन राह्यले..
23 Jun 2010 - 1:49 pm | राजेश घासकडवी
हेच म्हणतो. किमान तुमच्या रागरागिण्यांतल्या सुरावटी निर्माण करणार्या काँप्युटर प्रोग्रमच्या प्रोजेक्ट विषयी तरी लिहा. नरड्यात जादू होती त्याच्या.
23 Jun 2010 - 3:11 pm | युयुत्सु
जरूर विचार करीन...
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
23 Jun 2010 - 10:06 am | विशाल कुलकर्णी
जास्त आनंद नाय का मिळनार, तुम्हाला आन् आमालापण...>>>>
आपल्या आपल्या आनंदाच्या व्याख्या अर्धवटराव, त्यांना यातच आनंद मिळत असेल तर आपण कोण अडवणारे ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"