पूर्वपीठिका:
मी मुंबई विद्यापीठाशी संलग्न एका प्रथितयश महाविद्यालयातून बीएमएस (Bachelor of Management Studies) ही पदवी मिळवली आहे. त्यानंतर एका अन्य प्रथितयश महाविद्यालयातून एलएलबी चे पहिले वर्ष पूर्ण केल्यावर असे जाणवते, की आता मला माझे मुख्य ध्येय जे कंपनी सचिव (Company Secretary - Institute of Company Secretaries of India) होणे आहे, त्याला मी एलएलबी च्या अभ्यासा मुळे न्याय देऊ शकत नाहीये.
त्यामुळे मी असा विचार केला की एकाच वेळी एलएलबी आणि सीएस हे दोन आव्हानात्मक अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा आधी सीएस पूर्ण करू आणि त्या सोबत एमकॉम हा अभ्यास क्रम मुंबई विद्यापीठातून करू; मात्र आपल्या मुंबई विद्यापीठातून एमकॉम करता येण्यासाठी Business Management वा Accounts हे दोनच (बहुदा) पर्याय उपलब्ध आहेत, जे मला तितकेसे रोचक वाटत नाहीत. यावर विचार करत असताना अचानक पूर्वस्मृती [साठ्ये महाविद्यालयात एचएससी (कला) शिकत असतानाच्या] जाग्या झालाय आणि इथे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे केंद्र असल्याचे आठवले, इंटरनेट वर अधिक शोध घेतला असता या विद्यापीठाचा एम कॉम (International Business Management) हा अभ्यासक्रम मला निवडण्यास योग्य वाटला. ...
माननीय मिपाकरांना माझा प्रश्न आहे की इन्दिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा कोणी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे का? किंवा आपल्या कोणा महितीतल्या व्यक्तीने इथुन कोणता अभ्यासक्रम पुर्ण केला आहे का / करत आहे का? ह्या विद्यापीठाचा कारभार (परीक्षांची व निकालांची वेळ पाळणे इ.) कसा आहे? की मुंबई विद्यापीठच बरे? आणि एका विद्यापीठातून दुस-या विद्यापीठात प्रवेश घेताना काही विशेष कागदपत्रे जमा करावी लागतात का?
प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.
--
आपला नम्र,
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
प्रतिक्रिया
19 Jun 2010 - 5:14 pm | रामदास
मदुराई कामराज विद्यापिठाच्या स्टडी सेंटरचे काम केले होते .तुम्ही इगनाउचा उल्लेख केला आहे तशीच ही पण दूरस्थ शिक्षण देणारी संस्था आहे.विविध प्रकारचे अभ्यासक्रम तुम्हाला करता येतील. पण सगळ्याच दूरस्थ शिक्षण संस्था सेवा दाता म्हणून कुचकामाच्या आहेत. उत्तीर्ण झाल्यावर गुणपत्रीका यायला बराच वेळ लागतो. नोकरीच्या मुलाखतीला गेल्यावर ही प्रमाणपत्रे बघून नाकं मुरडली जातात. मुंबईत बरीचशी स्टडी सेंटरआणि प्रायवेट क्लास पास करण्याची रॅकेट
चालवतात.साधारण तीन ते चार हजार रुपये प्रत्येक पेपरला खर्च येतो.केवळ सर्टीफीकेट हवे असेल तर तिकडे जा.सध्या या रॅकेटचा सर्वेसर्वा मुंबईचा मलीक म्हणून एक माणूस आहे तो आहे.पास होणे सोप्पे होईल.
अवांतर :अभ्यासाच्या वाचलेल्या वेळात कमोडवर बसून सर्फींग करता यील हा आणखी एक फायदा.
19 Jun 2010 - 5:28 pm | परिकथेतील राजकुमार
कमोड मध्ये ए.सी. नसेल ह्याची काळजी घ्या म्हणजे झाले.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य