गाभा:
आजच्या वर्तमानपत्रात बातमी आहे. डॉ. झाकिर नाईक यांना इंग्लंड मधे येण्यास बंदी अशी.
कोण आहेत हे झाकिर नाईक ?
डिएनएने असे लिहले आहे की '... Zakir Naik, 44, will not be allowed to enter the country due to his 'unacceptable behavior' ... '
त्यांचे हे अनअॅक्सेप्टेबल बिहेविअर काय आहे/होते ?
या प्रश्नांची उत्तरे जाणण्यासाठी आणि या विषयावर उहापोह होण्यासाठी हा काथ्याकुट.
प्रतिक्रिया
19 Jun 2010 - 9:31 am | अर्धवट
पीस या नावाचा एक चॅनल लागायचा.. त्यावर डॉ. साहेब अत्यंत तर्कसंगत, ठाम, सडेतोड पण आततायी आणि एकतर्फी युक्तीवाद करायचे.. धर्म या विषयावर..
खुप मस्त बोलतो हा माणुस.. मी बोलण्याच्या पद्धतीबाबत सांगतोय..
मी स्वतः खुप पद्धती उचलल्या आहेत त्यांच्या युक्तीवादाच्या, माझ्या प्रवचनासाठी.. तूनळी वर बघा मिळेल बरच काही. सरकारने तो चॅनल बंद केला नंतर, याच कारणासाठी.
19 Jun 2010 - 9:45 am | टारझन
या महाशयांना भारतातही बंदी हवी :) पक्का कट्टर मुसलमानी लेक्चरं देत फिरतो , मुस्लिमप्रेमी असण्यात ना नाही , पण त्याच्या प्रत्येक दुसर्या वाक्यात बायबल आणि गिता कशी चुकीची आहे , आणि कुराणंच कसं पाक आहे हे सांगण्याचा हेका असतो. एकदा ह्याचा पिस टिव्ही वर (अफ्रिकेत) कार्यक्रम लागला होता , साला मला क्षणभर हा काय आतंकवादी बणवतोय की काय अस वाटलं .. आधी वाटलं असेल साला पाकड्या ... पण *** हा तर इंडीयन ? :)
बरं रिबिट मारलंय इंग्लंड ने , इंग्लंड चं अभिनंदन ..
साला , आखाती देशांत इतर धर्मांची पुस्तकं सुद्धा निशिद्ध आहेत (असं ऐकलंय) मग इंग्लंड ने ह्याला आपल्या देशात यायला रोखला ते बरोबरंच की ;)
अवांतर : काय आणंदयात्री , ह्या विकांताचा काय प्लान ? येणार का लायण पाईंट ला ? प्यार्टी करु प्यार्टी :)
- लोणावळायात्री
19 Jun 2010 - 9:48 am | अप्पा जोगळेकर
टार्याशी सहमत. टेररिस्ट आहे साला ***.
19 Jun 2010 - 9:54 am | अर्धवट
आप्पा .. टेररीष्ट तर आहेच हो पण त्याच्यासारखा युक्तीवाद करायला पण शिकलं पाहिजे आपण.. तो कंटेंट नसताना इतकं बोलतो.. आपल्याकडे कंटेंट आहे मांडता येत नाहिये..
19 Jun 2010 - 7:03 pm | आवशीचो घोव्
+१
सहमत!!!
या एकाच कारणासाठी मी त्याची काही भाषणं torrent वरून उतरवून घेतली आहेत.
19 Jun 2010 - 9:58 am | शिल्पा ब
भारतात अशा लोकांना अजिबात बंदी नव्हती, नाही आणि नसेल...बाकी या माणसाचं नाव पहिल्यांदाच ऐकतेय...you tube वर बघते काय प्रकार आहे ते.... आता बुद्धिवादी (विचारवंत) terrorist सुद्धा व्हायला लागलेत...मुसलमान अर्थातच..
सविस्तर प्रतिसाद नंतर.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
19 Jun 2010 - 11:07 am | मदनबाण
या माणसाचे पाठांतर जोरदार आहे हे मात्र खरं...
अर्धवटरावांशी १००% सहमत.
मदनबाण.....
"Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep."
Carl Sandburg
19 Jun 2010 - 12:49 pm | बिपिन कार्यकर्ते
हा माणूस सौदी वगैरेमधील भारतिय उपखंडातील लोकांमधे बराच लोकप्रिय आहे बहुधा. माझे स्वतःचे मत असे आहे की हा अतिशय हुशारीने किंवा सौम्यपणाचा आव आणून वागतो. पण बहुधा तसे नसावे. एकंदरीत मलातरी संशयास्पदच वाटतो. गंमत म्हणजे याच्याविरोधात दारुल-उलूम-देवबंदने फतवा जारी केला आहे की याची शिकवण इस्लाम-सुसंगत नाही. (भारतिय उपखंडातील सुन्नी मुसलमानांमधे देवबंद आणि बरेलवी अशा दोन विचारधारा ढोबळमानाने आहेत. त्यातली देवबंदी विचारधारा ही कट्टर आहे. सध्या ज्याला जिहादी / तालिबानी समूह म्हणले जाते ते देवबंदी विचारधारेचेच एक अपत्य असल्याचे मानले जाते.)
शिवाय मागे पुण्यात काही हिंदू मुलींनी जाहिरपणे इस्लाम स्वीकारला होता या झाकिर नाईकच्या कार्यक्रमात, तेव्हाही काही चर्चा झाली होती मिपावर.
बिपिन कार्यकर्ते
19 Jun 2010 - 1:53 pm | llपुण्याचे पेशवेll
+१
बिपीनदा. ढोंगी वाटतो हा माणूस. अत्यंत भडक वर्तन अत्यंत सभ्यपणे केल्यासार्खे दाखवण्याचे याचे कसब वादतीत आहे. मागे याच माणसाने लादेन करतो आहे ते योग्य असेही सांगितले ते याच पद्धतीने. म्हणजे तुम्हाला पाहीजे ते करण्याचे स्वातंत्र्य आहे पण तरीही तुम्ही मीच सांगतो तसे करा या पद्धतीचे त्याचे सांगणे होते.
टार्याशीही सहमत.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
19 Jun 2010 - 1:59 pm | इनोबा म्हणे
शिवाय मागे पुण्यात काही हिंदू मुलींनी जाहिरपणे इस्लाम स्वीकारला होता या झाकिर नाईकच्या कार्यक्रमात, तेव्हाही काही चर्चा झाली होती मिपावर.
आझम कँपसच्या मैदानात झाला होता तो कार्यक्रम. त्याच्यावर पोलिस केस ही झाली होती. पण मुळात त्या युवक-युवती हिंदू नसून मुस्लिमच होत्या व नाईकांनी केवळ पब्लिसीटी स्टंट म्हणून जाहिर कार्यक्रमात धर्मांतर वगैरे बनाव घडवून आणला असं ही ऐकलं होतं. यु-ट्यूबवर त्याचे विडीओ ही उपलब्ध आहेत.
21 Jun 2010 - 5:00 pm | धमाल मुलगा
पण मुळात त्या युवक-युवती हिंदू नसून मुस्लिमच होत्या व नाईकांनी केवळ पब्लिसीटी स्टंट म्हणून जाहिर कार्यक्रमात धर्मांतर वगैरे बनाव घडवून आणला
हेच महत्वाचे!
आणी गमतीची गोष्ट म्हणजे, मिडियाने आधी जी बोंबाबोंब केली, त्यानंतर खरी गोम कळाल्यानंतर सगळेजण तेरी भी चुप-मेरी भी चुप करुन शेपटं घालुन बसले होते!
19 Jun 2010 - 5:36 pm | आनंदयात्री
अच्छा .. हा माणुस कोण आहे ते तर कळले, पण त्याची अनअॅक्सेप्टेबल कृत्यं काय आहेत ती कळली नाहित. किंवा असे समजावे का की तो बायबल वर टिका करतो म्हणुन इंग्लंडने त्यावर बंदी घातली.
म्हणजे लोकशाही असुनही इंग्लंड त्यांच्या राजधर्माचा बर्यापैकी मान राखते असा तर्क सुसंगत आहे का ?
19 Jun 2010 - 5:57 pm | अक्षय पुर्णपात्रे
असे नाही. ख्रिश्चन धर्माविषयी अवमानकारक विधाने करण्यामुळे बंदी नसावी. हिंसाचारास प्रवृत्त करणारी वक्तव्ये केल्यामुळे बंदी घातली असावी. ख्रिश्चन धर्मीयांना अवमानकारक वाटणारे लिखाण/ वक्तव्ये इंग्लंडमध्ये सर्रास केली जातात.
उदा.
A British evangelical organisation, Christian Voice led street protests against the BBC screening of Jerry Springer – The Opera, in which one actor wears a nappy and later, whilst portraying the character of Jesus, says "I'm a bit gay". Christian Voice published the home addresses and telephone numbers of several BBC executives on their web site. This led to one of these people receiving death threats. Another organisation, the Christian Institute attempted to level blasphemy charges against the BBC. These were rejected by the High Court.
(विकि पानावरून)
19 Jun 2010 - 6:10 pm | आनंदयात्री
ओके.
>>हिंसाचारास प्रवृत्त करणारी वक्तव्ये केल्यामुळे बंदी घातली असावी.
पण झाकिर हुसेन कुराण, बायबल आणि गीतेबद्द्ल बोलतात, राईट ?
मग हिंसाचाराला प्रवृत्त करणारी विधाने कशी केली असावीत त्यांनी ? याबद्दल कुतुहल वाटते.
आपल्याकडे (म्हणजे भारतात) तशी त्यांच्यावर काही बंदी नसेलच.
19 Jun 2010 - 6:25 pm | अक्षय पुर्णपात्रे
डॉ नाईक हे ब्रिटनचे नागरीक नसल्याने त्यांच्यावर तेथे येण्यावर बंदी घालता येऊ शकते.
मला डॉ नाईक या व्यक्तिविषयी माहिती नाही पण ते भारतीय नागरीक असल्यास त्यांच्यावर तशी बंदी घालता येणे कठिण वाटते.
19 Jun 2010 - 9:31 pm | प्रदीप
इथे पहावे...
20 Jun 2010 - 12:15 am | अक्षय पुर्णपात्रे
धन्यवाद, प्रदीप.
19 Jun 2010 - 7:02 pm | आवशीचो घोव्
पण झाकिर हुसेन कुराण, बायबल आणि गीतेबद्द्ल बोलतात, राईट ?
हुसेन नव्हे , नाईक!!!
19 Jun 2010 - 7:13 pm | इनोबा म्हणे
पण झाकिर हुसेन कुराण, बायबल आणि गीतेबद्द्ल बोलतात, राईट ?
झाकिर हुसेन बिचारा गप गुमान तबला बडवत बसलेला असतो. त्याला कशाला मधे घेता रे!
19 Jun 2010 - 7:29 pm | आनंदयात्री
व्हय जी .. चुकले वाईच .. एवड्या बारी घ्या संपादुन !
19 Jun 2010 - 10:17 pm | अविनाशकुलकर्णी
झाकिर नाइक ची भाषणे आम्हि पण ऐकली आहेत..वेळ प्रस्म्गी तो स्वथाला म्ह्नणतो
हिंदु आहे व मुसलमान झालो आहे असे भासवतो
20 Jun 2010 - 12:40 am | पुष्करिणी
मी बरीच भाषणं ऐकली आहेत डॉ. नाइक ची. खरी डॉक्टरकी सोडून धर्माला ( धर्मप्रसाराला )वाहून घेतलय त्यान..
बट्बटीत असतात भाषणं , पण वर म्हट्ल्याप्रमाणं थोड्या काळासाठी प्रभावी वक्तृत्व वाटत. उदाहरणार्थ त्याला कोणतीही गोष्ट ठासून सांगायची असेल तर तो सांगतो..अमुक अमुक पुस्तकाच्या २७९ व्या पानावरच्या खालून ४थ्या परिच्छेदात असं लिहीलय्..इ.
माझ्या एका मित्रानं आजकाल ही क्लुप्ती ऑफिसच्या मिटींगांमधून वापरायला सुरूवात केलीय्...प्रचंड सक्सेस्फुल आहे, सगळे ताबड्तोब इंप्रेस होतात :)
मध्यंतरी काहीतरी शिया विरोधात तो बोलला होता.., नेहमी त्याला हिरो मानणारे एकदम विरोधक झाले होते
http://timesofindia.indiatimes.com/India/Row_over_Islamic_preachers_rema...
पुष्करिणी
20 Jun 2010 - 12:05 am | हुप्प्या
जादूगार जशी हातचलाखी करतो तशी हाही करतो. कुराण ह्याला अ ते ज्ञ पर्यंत पाठ आहे हे अगदी खरे. त्यामुळे इम्प्रेशन मारले जाते हेही खरे. पण ह्यातील अरबी जाणणारे फार कुणी नसल्याने त्या वचनांचा वाट्टेल तो अर्थ तो लावतो. कुराणात तमाम शास्त्रीय शोध ठासून भरलेले आहेत. आधुनिक विज्ञानात जे काही म्हटले आहे ते सगळे कुराणात आधीच शोधले आहे असे आपल्या काही हिंदूत्ववाद्यांच्या तोंडी ऐकू येणारे संवाद ह्याच्या तोंडी असतात. फक्त आपले लोक वेदात सगळे आहे असा दावा करतात तर हा कुराणात सगळे काही असल्याचा दावा.
अली सिना नावाच्या एका अरब जाणणार्या पण असल्या इस्लामच्या विरोधी असणार्या जाणकाराने नाईकाच्या लावलेल्या अर्थाला आव्हान दिले आहे. त्याला ऑनलाईन वाद करायचे आव्हान दिले आहे. पण नाईकाने ते उडवून लावले आहे. इथे बघा.
एक मासलेवाईक उदाहरण. सौदी अरेबियात मशिदी सोडून कुठलेही प्रार्थनास्थळ बांधायला परवानगी नाही. असे का? असा एका श्रोत्याने विचारला होता. त्याचे नाईकांचे उत्तर असे की, समजा एखाद्या शाळेकरता शिक्षक निवडायचा आहे. तीन उमेदवार आहेत. प्रत्येकाला २+२ किती असा प्रश्न विचारला. एकाने उत्तर सांगितले ३. दुसर्याने सांगितले ५ आणि तिसर्याने सांगितले ४. आता कुणाला नोकरी द्याल? अर्थातच तिसर्या उमेदवाराला. त्याच प्रमाणे जो देवाकडे जायचा खरा मार्ग सांगतो त्याच धर्माला प्रार्थनास्थळे बांधायची परवानगी दयाळू सौदी सरकारने दिली आहे.
आता उथळ विचार करणार्याला, इस्लामवर नितांत श्रद्धा असणार्याला हे उत्तर बिनतोड वाटेल. पण ह्यातील प्रश्न हा २+२ किती? इतका ढोबळ आणि स्पष्ट आहे का? अमकेच उत्तर बरोबर हे कुणी आणि कसे ठरवले? असले प्रतिप्रश्न विचारायला वाव नसतो. ह्या माणसाचे गुंड प्रेक्षकांमधेच बसलेले असतात. फार जास्त विचारू लागले तर ते त्याची काळजी घेतात.
भारतीय मुस्लिम नाईकाविरुद्ध बिथरायचे कारण हे की त्याने दर्गे, पीर, उरुस वगैरे गैर इस्लामी आहेत असे सांगितले. कुणाच्याही अगदी महंमदाच्या कबरीवर चादर चढवणे, फुले वाहणे, धूप जाळणे हे इस्लामला मंजूर नाही. काटेकोरपणे पाहिले तर हे खरे आहे. ह्या सगळ्या परंपरा काही प्रमाणात मूर्तीपूजा आहेत आणि त्या पद्धती हिंदू धर्माच्या प्रभावामुळे आल्या असणे शक्य आहे. पण ह्या विधानामुळे अनेक भारतीय मुस्लिम खवळले आणि त्यांनी ह्या माणसाविरुद्ध फतवा जारी केला आहे. हे दर्गे वगैरे अनेकांचे श्रद्धास्थान बनले आहे. अनेकांची पोटे त्यावर चालतात. त्यावर घाला घालणे अनेकांना उपद्रवकारक आहे. तर एकंदरीत काट्यानेच हा काटा निघेल असे वाटते.
20 Jun 2010 - 9:16 am | आनंदयात्री
धन्यवाद हुप्प्या. अगदी हवी ती आणि योग्य माहिती पुरवली तुम्ही.
>>आधुनिक विज्ञानात जे काही म्हटले आहे ते सगळे कुराणात आधीच शोधले आहे असे आपल्या काही हिंदूत्ववाद्यांच्या तोंडी ऐकू येणारे संवाद ह्याच्या तोंडी असतात. फक्त आपले लोक वेदात सगळे आहे असा दावा करतात तर हा कुराणात सगळे काही असल्याचा दावा.
वेदात सगळे आहे हे अतिरंजित असले तरी आधुनिक विज्ञानाला लागलेले बरेचसे शोध किंवा आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने मिळालेली बरिचशी माहिती (जी आपण आधुनिक विज्ञानाचीच देण आहे असे मानले जाते), भारतिय पुराणपुरुषांना होती हे अगदीच खोटे नाही. याला तुम्ही सहमत असाल असे वाटते.
उदाहरणादाखल शस्त्रक्रिया शास्त्राचा इसवीसन पूर्व दुसर्या शतकात विकास करणारा सुश्रुत. त्याचे कार्य आजही प्रमाण मानले जाते. त्याने त्या काळात वापरलेली शस्त्रक्रियेची शस्त्रे आजही थोडाफार बदल करुन वापरली जातात.
आधुनिक मेडीसिनचा जनक हिप्पोक्रेटिस त्याच्या पुस्तकांच्या प्रस्तावनेत अश्या बर्याच गोष्टीचे श्रेय सुश्रुताला देतो असे ऐकिव माहितीच्या आधारावर सांगु इच्छितो.
अशीच उदाहरणे आर्यभट्ट, कणाद इत्यांदींचीही देता येतिल.
वेदांतच सगळे ज्ञान आहे, ते आमचे चोरले असे म्हणने जसे संयुक्तिक नाही तसे आपल्या सांस्कृतिक वारश्यांच्या हक्कमांडणीची तुलना अतिरेकी वेडाचाराबरोबर करणेही योग्य वाटत नाही असे वाटते. चुकभुल द्यावी घ्यावी.
धन्यवाद.
20 Jun 2010 - 7:11 pm | हुप्प्या
सुश्रुत, चार्वाक, आर्यभट्ट, भास्कर यांचे कर्तृत्त्व उच्च होते ह्यात शंका नाही. पण ते आधुनिक विज्ञानाच्या तोडीचे नव्हते. ते ज्या काळात वावरले त्या काळाच्या मानाने त्यांचे ज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगत होते हे नक्की. पण मी अणू, परमाणू, सबअॅटोमिक पार्टिकल्स, विमाने, रॉकेटे हे सगळे वेदात असल्याचे दावे वाचलेले आहेत. माझी तुलना त्या लोकांशी होती. अर्थात तो एक वेगळा विषय आहे.
नाईकांचे अजून एक उदाहरण म्हणजे एका श्रोत्याने त्यांना विचारले की इस्लामच्या कायद्याप्रमाणे इस्लाम सोडणार्या धर्मभ्रष्टाला मृत्युदंड फर्मावला जातो. असे का? आणि ते योग्य आहे का?
ह्या गृहस्थांचे उत्तर असे होते की, एखाद्या सैन्यात एखाद्या सैनिकाने फंदफितुरी केली आणि त्यांची गुपिते शत्रूला सांगितली तर त्याची शिक्षा काय असते? अर्थातच सजा-ए-मौत. तेच सूत्र इथेही लागू पडते. आणि हीच शिक्षा योग्य आहे वगैरे वगैरे.
आता कुणीही सोम्यागोम्या मुसलमान (किंवा अमद्याममद्या म्हणू हवे तर! ;-) ) धर्मांतर करता झाला तर तो काय गुपिते शत्रूला देणार आहे? मुळात त्याला काही गुपिते माहित असतील का? असल्या गुपितांचे शत्रू, म्हणजे परधर्म काय करणार आहे? आणि सिव्हिलियन माणसांना सैन्याचे कायदेकानून का लागू करायचे? असले प्रश्न विचारू दिले जात नाहीत.
कुराणात जे आहे ते योग्यच आहे. त्यात काडीचाही बदल होणे नाही हे गृहितक धरूनच ह्या साहेबांची धूळफेक चालते. वरकरणी सौम्य वाटणारी भाषा, उत्तम स्मरणशक्ती, उत्तम इंग्रजी यावर साहेबांचे दुकान चालते आहे (किंवा चालले होते म्हणू या आता).
20 Jun 2010 - 9:40 am | शिल्पा ब
हुप्प्या, तुम्ही इथे पहा अशी लिन्क दिलिए ती दिसत नाही.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
20 Jun 2010 - 6:54 pm | हुप्प्या
फेथफ्रीडम डॉट ओ आर जी असा पत्ता आहे ह्या जागेचा तो आपल्या ब्राऊझरमधे टाईप करा.
21 Jun 2010 - 7:05 pm | कवितानागेश
अलि सीना बद्दल लोकाना माहित आहे हे बघून 'हुश्श' वाटले...
============
माउ
20 Jun 2010 - 12:44 am | भडकमकर मास्तर
झाकिरजी खूप छान तबला वाजवतात...
त्यांच्यावर टीका करू णये.
मला तबला हे वद्य कूप आवद्ते...
ते तबल्यावर आगगाडीचा, सतारीचा, रहाटगाडग्याचा आवाज कादून दाकव्तात..
अशे प्रतिबा अस्ने हे येरगबल्याचे काम नोहे.
त्यांच्यावर टिका केल्याबदल इंग्लंदचा निशेद...
त्यांच्या चहाच्या आणि ताज हाटीलाच्या जैराती तर फेम्स आहेत कूप...
झाकिर्जीना माजा सलाम्..
20 Jun 2010 - 4:42 am | शिल्पा ब
मास्तरांचं आपलं मधेच काहीतरी !!!
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
20 Jun 2010 - 8:34 pm | निखिलचं शाईपेन
http://www.youtube.com/watch?v=6jYUL7eBdHg
21 Jun 2010 - 2:25 pm | सुमीत भातखंडे
अशाच ह्याच्या कुठल्याश्या भाषणात, एका मुलीने इस्लाममधल्या बहुपत्नीवादाबद्दल विचारले असता, ह्या माणसाने असच वर म्हटल्याप्रमाणे, लांबलचक युक्तीवाद करून, एकापेक्षा जास्त बायका असणंच कसं योग्य हे (त्याच्या द्रुष्टीने) पटवून दिलं.
कुराणात जे आहे ते योग्यच आहे. त्यात काडीचाही बदल होणे नाही हे गृहितक धरूनच ह्या साहेबांची धूळफेक चालते
सहमत.
21 Jun 2010 - 4:36 pm | आम्हाघरीधन
यांच्या बरोबरीने मांडीला मांडी ठोकुन शंकराचार्य देखिल अश्याच स्वरूपातील प्रवचन झोडतांना दिसले आहेत.......... तसा झकिर नाइक आणि शंकराचार्य एक्मेकांचे प्रतिरूप वाटले.. असो... पैसे आणी नाव(!) कमविण्याचे विविध मार्ग या सदरात वरिल दोघे मोडतात... काही तरी शिकण्यासारखे आहे बेरोजगार युवकांना..
रग्गड पैसा बनवितात हे लोक, जनतेच्या भावनांशी खेळुन...
21 Jun 2010 - 4:57 pm | धमाल मुलगा
ह्या माणसाची मिळतील तितकी भाषणं आवर्जुन ऐकावीत! ब्रेन वॉशिंग करणं, आपले मुद्दे प्रभावीरित्या ठसवणं, मिडियाला हाताशी धरुन हवा तो परिणाम साधणं इत्यादी गोष्टींत मोठं प्राविण्य. वक्तृत्वकलाही अगदी उत्तम! पुंगीवर नागानं डोलावं असं समोरच्या गर्दीला मंत्रून टाकण्याची हातोटी.
अगदी अभ्यास करण्याजोगं व्यक्तिमत्व!
वर हुप्प्या म्हणतात त्यातील बर्याच मुद्द्यांशी सहमत. इस्लामी विचारधारेची कडवट बाजु मोठ्या साखरपेरल्या शब्दांतुन फार सुंदर मांडतो हा माणुस. इतकी की एखादा कडवा इस्लामविरोधीसुध्दा काही काळ का होईना डळमळीत होईल.
मध्यंतरी असंही ऐकिवात आलं होतं की 'ह्या डॉक्टरसाहेबांचे सिमीशी लागेबांधे होते.'
(इथे तुलना अत्यंत अप्रस्तुत ठरेल पण मला दुसरी उदाहरणं आठवत नाहीयेत सध्या म्हणुन जे आठवलं त्याप्रमाणे लिहितोयः) जशी रामदासस्वामींनी हिंदवी स्वराज्यासाठी प्रत्यक्ष नव्हे, पण अप्रत्यक्ष मदत केली, त्याप्रमाणे हे डाकटर अप्रत्यक्षरित्या तथाकथित जिहादाला मदत करत असतात.
एकदा एका सभेनंतर ह्यांना असा प्रश्न विचारला, "लष्कर, मुजाहिदिन इत्यांदीही मुस्लीमच, आणि इथे बाँबस्फोटात, गोळीबारात मरणारेही मुस्लीम मग हे असं का?" त्यावर मोठं घोळुन घोळुन उत्तर मिळालं ज्यात 'इस्लामची तत्वं, कायदे, शरियत इत्यांदी जे मुस्लिम योग्यरित्या पाळत नाहीत त्यांना शिक्षा देण्यासाठी कर्मठ विचारधारेच्या लोकांनी असे केले' वगैरे वगैरे... अर्थात त्या प्रश्नाच्या भल्या मोठ्या उत्तरात 'दार-उल-हरब' वगैरे उल्लेख आले आणि आम्ही सुचक हसुन खुदा हाफिस केलं :)
असो!
ब्रिटनमध्ये झालेल्या बाँबस्फोटांनंतर, पोलिस आणि एम आय-५ ह्यांनी पाळत ठेऊन माहिती काढलेल्यांमध्ये बरेचसे मुस्लिम (मुळचे तसेच धर्मांतरीत) होते. त्यानंतर ह्या बाबींवर मोठ्या प्रमाणावर लक्ष ठेवले जाते अशी माहिती मिळते.
डॉ. नाईक ह्यांना ब्रिटनमध्ये येऊ देऊन धार्मिक मुलतत्ववाद वाढवुन घेण्यात काय हशील?
बहुतेक ह्याच कारणासाठी बंदी घातली असावी असा कयास आहे.
21 Jun 2010 - 5:06 pm | मन
दहा वेळेस +१.
भरपूर वाचन असलेला आणि ते वाचलेल "येवस्थित" मांडाणारा हा सदगृहस्थ आहे.
अशा भल्या माणसांना खुलं रान आणि मोकळं पान दिल्यास भारतीय झेंड्याचा रंग बदलण्याची दाट शक्यता वाटते.
बाकी, बोलताना गीतेचे वगैरे भन्नाट दाखले देतो.(आणि कुराणच कसं ह्या सगळ्यांचा बाप आहे हे खुबीनं मांडतो.)
आपलाच,
मनोबा
21 Jun 2010 - 5:09 pm | धमाल मुलगा
तर हो! अगदी!
आणि राम, कृष्ण हे देखील 'प्रॉफेट्स' आहेत आणि हे सांगताना मांडलेले मुद्दे? =)) =))
21 Jun 2010 - 5:15 pm | वेताळ
मुस्लिम धर्मात पुरुष किंवा मुलाचे धर्मांतर कसे केले जाते हे मला ठाऊक आहे. परंतु एकाद्या मुलीचे किंवा स्त्रिंयाचे धर्मातर कसे केले जाते?
इस्लाम मध्ये तसे बघायला गेले तर स्त्रींयाना खुपच गौण समजले जाते. मग त्याच्या धर्मातराला काही अर्थ आहे का?
वेताळ
21 Jun 2010 - 5:22 pm | मन
त्याचे ते तसले दाखले ऐकुन मग वाटतं उलट त्यालाच सांगावं वाटतं की,
" अगदी बरोब्बर्....आमालाही अगदि पटतं बघ तुझ म्हणनं.ते तुझे पूज्य ग्रंथाचे लेखक हे ही कसे अवतारच आहेत्,आणि त्यांची मंदीरं बांधुन साग्र संगीत (मूर्ती) पूजा करणं कसं योग्य आहे ते."
आणि मग मस्त त्याला धोतर -सोवळं घालणं,कूंकवाचा टिळा लावणं (जमल्यास गुलाल)आणि झक्कास झांजा वाजवत त्याच्या दैवताची पूजा करणं.....
तुझा देव ग्रेट ना, करु की मग त्याची पूजा आमच्या पद्धतीनं.
आपलाच,
मनोबा