माननीय मिपाकरहो,
या पूर्वी मी काही उपयोगी धागे काढले म्हणून कौतूक केले त्यामूळे जाहीर आनंदून मी हा धागा काढत आहे. तसे माझ्यासमोर इतरही पर्याय होते! मिपाकर नक्की मदतीला धावून येतील अशी आशा मला नाही आहे असे नाही.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी देवळातून बाहेर येणार आहे आणि मला माझ्या जीभेला एक चटकदार, टेसदार, चमचमीत, खमंग खावू घालायचं आहे. नेहमी पेक्षा थोडंसं वेगळं असं काही खाल्लं तर हा दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात कायम राहील. मला तिला जाम खूष करायचं आहे.
इतर गोष्टींची थोडी फार माहिती सांगितली म्हणजे पर्याय सुचवायला मदत होईल असे वाटते. तो दिवस आम्ही हॉटेलमध्ये मध्ये किंवा मुंबईतल्या एखाद्या गल्लीतून (भिक मागून) परत (देवळात) येता येईल अशा ठिकाणी घालवू शकतो. माझ्याकडे मुंबई मध्ये अस्सल भिकार्याचा गेटप उपलब्ध आहे. रूपांतर करण्यात मी एक्स्पर्ट आहे. लेडी भिकारीण चा गेटप उपलब्घ आहे पण मी लेडी नाही. मी मुंबईचा आहे त्यामुळे कुठुन कसं जायचं व रस्ते मला ठाऊक आहेत. माझं भिकेचं बजेट आहे १० दिवसांचं. अर्थात तेवढे मिळालेच पाहिजेत असं काही नाही पण काही झकास दाता असेल असेल तर तयारी आहे. मी पट्टीचा शिळेपाकेआहारी असून तिलाही शुद्ध चटकदार, टेसदार, चमचमीत, खमंग अन्न नेहमी लागते.
आता पर्यंत माझ्या समोर आलेले पर्याय असे:
१. ताज कॉन्टीनेंटल ब्रंच: ताज कॉन्टीनेंटला जाण्याची ही योग्य वेळ आहे का? कर्जत पासूनची लोकल जुलैमधल्या पानकाळ्यात चालू असते का? इंटरनेटवरील साईट वाचून थोडी फार माहिती काढली आहे पण मी स्वतः कधी तिकडे गेलो नाही. आपोलो बंदर पर्यंत जाण्यास लंगडत जावे किंवा घसरगाडी वापरावी की भीक मागत मागत लोकलने? लंगडत जाण्यास मजा येईल की वाट लागेल? भीकेचं काय? भीक कमी मिळाली तर लंगडत जाणे शक्य आहे का?
२. गुजराथी थाळी : गुजराथी थाळी मध्ये मटण, कोंबडी आणखी काही मांसाहारी असते का? मस्त नळीतोड १२ नं मिळेल?
३. भात: पदार्थ छान आहे पण आख्खे १० दिवस भातच खावून करायचे काय हा प्रश्न आहे.
४. धर्मशाळा / अन्नछत्र/ सदावर्त: तिथे जाऊन परत शिळेपाके अन्न काय खायचे असं एक मित्र म्हणाला त्यामुळे हा पर्याय कितपत चांगला आहे याची कल्पना नाही.
फक्त अन्नपदार्थांच्या डिशच नव्हे तर तिला सरप्राईज देण्यासाठी आणखी काही पदार्थ असतील तर उदा. रानभाज्या - टेरी (पावसाळी आळू), सुकं मटण / (व्हेज व्हर्जन), पुदिना पुलाव वइतर पदार्थ (आठवा तुम्ही चापलेले/ तुम्ही खावू घातलेले चमचमीत पदार्थ) तर ते पण सांगा.
अनुभवी मिपाकर खवय्यंना/ खिलवयांना या प्रसंगी मदत करण्यासाठी मी कळकळीचे आवाहन करतो. सखोल रेसेपी लिहायला वेळ नसेल तर जाताजाता मेनूकार्डावरचे पदार्थ सांगितलीत तरी चालेल.
भीक द्यायची नसेल तर नका देवू हो पण चमचमीत हादाडण्याचा जेवणाचा विषय बाजुला पडु नये एवढीच अपेक्षा.
आणखी काय मागू? भीकेच्या अपेक्षेत !
~
भिकमांग्या
(उद्यापरवा हनिमुन ला काही मदत लागलीच तर अशीच चौकशी करेल)
प्रतिक्रिया
17 Jun 2010 - 6:27 am | सोम्यागोम्या
पाभे जबरी !
>>लंगडत जाण्यास मजा येईल की वाट लागेल?
=))
>>आठवा तुम्ही चापलेले/ तुम्ही खावू घातलेले चमचमीत पदार्थ
=))
सिंधुदुर्गानजिकचे गणपतीपुळेचे मंदिर फारच प्रसिद्ध आहे. उफ्फ तिकडे भीक फारच मस्त मिळेल.
पण जाऊन आल्यावर हा धागा संपादीत करा बरं का काय मिळालं त्याबद्दल.
17 Jun 2010 - 6:32 am | शुचि
सोम्यागोम्या,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. परत देऊळ त्यामुळे थोडासा विरस होण्याची शक्यता.....
बाकी जाऊन आल्यावर काय भीक मिळाली व दिवस कसा होता हे नक्की पाभे सांगतील.
17 Jun 2010 - 9:09 am | शानबा५१२
- मी ह्यावर 'सखोल' चर्चा करायला एका पायावर उभा आहे.
अवांतर : माझा अर्थ हा खराब कधीच नसतो,तुमच्या डोक्यात त्याचा खराबच अर्थ पहीला येतो त्याला मी काय करु?
17 Jun 2010 - 9:11 am | पाषाणभेद
>>> अवांतर : माझा अर्थ हा खराब कधीच नसतो,तुमच्या डोक्यात त्याचा खराबच अर्थ पहीला येतो त्याला मी काय करु?
अहो हे मीच म्हटले पाहीजे. माझे वाक्य तुम्ही कसे काय घेतले? आँ?

मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
17 Jun 2010 - 9:22 am | टारझन
प्रतिसाद चुकला आहे , आपण शाणबाचे "खुलाश्याबद्दल धन्यवाद" करायला हवे होते, असो :)
- (सुंद्रीला घेऊन बांदाबांदाने हिंडणारा) सर्जाराजा
17 Jun 2010 - 9:18 am | टारझन
=)) =)) =)) काय पाभ्या , काल काय खाल्लस भौ ?
- (डॉली वर डोरे टाकणारा ) टॉम्यामोत्या
17 Jun 2010 - 2:43 pm | जागु
तुम्ही लंगडत, सरकत कोणत्या एरियातल्या देवळात जाणार आहात ?
17 Jun 2010 - 2:52 pm | गणपा
बा पाषाणभेदा
मिपाच हे मेन्युकार्ड घे. पहा कुठला पदार्थ आवडतो का.
पचणार असेल एखादा तर हादडुन ये.
17 Jun 2010 - 3:23 pm | विसोबा खेचर
समर्थ भोजनालय, गिरगाव, मुंबई-४
17 Jun 2010 - 8:01 pm | उपास
घरची आठवण आली एकदम, गिरगाव मुं. ४
उपास मार आणि उपासमार
17 Jun 2010 - 6:24 pm | तिमा
पूर्वी फक्त पद्याचे विडंबन दिसायचे. आता गद्याचेही विडंबन करु लागली मानसं! काय प्रतिभा आटली म्हनायची का ? अशानं पाककृतीपासून संपादकीयाचेही विडंबन येनार!!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
18 Jun 2010 - 12:29 am | राजेश घासकडवी
लगे रहो पाभे.
18 Jun 2010 - 12:34 am | वारा
उफ्फ्...........भिक मागु नका........आपण काय षंढ आहे.
दारुच्या नशेत सगळ काही मंद आहे..........