गाभा:
मंडळी, आज १७ जून. आपल्या हाती आमचा हा पावसाळी विशेषांक ऋतू हिरवा देतांना मला विशेष आनंद होत आहे. सद्द्या पावसाने चांगलाच जोर धरलाय आणि अशा कुंद-फुंद वातावरणात कॉफी अथवा मसालेदार चहाचे(आपापल्या आवडीप्रमाणे) घुटके घेता घेता आमचा हा अंक वाचतांना आपला आनंद द्विगुणित होईल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. ह्या अंकात आम्ही महाजालावरील काही नामवंतांबरोबरच नवोदितांचाही समावेश केलेला आहे....तेव्हा आता करा सुरुवात वाचायला....आणि हो...अंक आवडला/नावडला तरी कृपया तुमची प्रतिक्रिया टंकायला विसरू नका बरं का.
कळावे आपला
स्नेहांकित
प्रमोद देव
प्रतिक्रिया
17 Jun 2010 - 12:03 am | जयंत कुलकर्णी
बघितला ! रुपरंग तर छान आहे. माझा लेख प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद !
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
17 Jun 2010 - 12:30 am | रेवती
छान झालाय अंक!
सगळ्या गोष्टी नाही वाचल्या, हळूहळू वाचीन.
रेवती
17 Jun 2010 - 12:42 am | टारझन
अंक चाळावा लागेल , बाकी रंगसंगती पाहुन कुठें चाँद-चाँदणी दिसत्ये का ते शोधत होतो :)
- (इद काँ चाँद) टारुद्दिन पठाण
17 Jun 2010 - 4:06 am | पाषाणभेद
चांगला प्रयत्न आहे.
अंकातील लेखांची निवड कशी केली? तुम्ही लेख शोधून तेथे टाकले की लेखकांना लेख पाठवायला सांगितले होते अन त्यातून निवड केली?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
17 Jun 2010 - 6:40 am | सहज
प्रमोदकाका व ऋतु हिरवा मधे सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन.
17 Jun 2010 - 12:14 pm | श्रीराजे
प्रमोदकाका...
अंक छान आहे...!
17 Jun 2010 - 2:24 pm | अवलिया
याप्रमाणे दर ॠतु बदलाला देवकाकांचा विशेषांक येणार हे निश्चित.
एकदा एक गोष्ट डोक्यात घेतली की अनंत अडचणी आल्या तरी निर्धाराने ठरवलेली गोष्ट पूर्णं करण्याचा चंग देवकाकांकडुन शिकण्यासारखा !
अजुन अंक चाळला नाही. ही केवळ पोच ...
बाकी प्रतिक्रिया वाचुन देतोच
--अवलिया
17 Jun 2010 - 6:21 pm | बिपिन कार्यकर्ते
असेच म्हणतो.
बिपिन कार्यकर्ते
17 Jun 2010 - 2:42 pm | गणपा
अंक वरवर चाळला. आवडला.
रंगसंगती, मांडणी आवडली.
17 Jun 2010 - 5:31 pm | विशाल कुलकर्णी
छान जमलाय अंक यावेळी पण ! वाचतोय :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
17 Jun 2010 - 8:43 pm | मीनल
पावसाळ्यात निघालेल्या अंकात बरीच विविधता आहे. विषय, लेख प्रकार वाचनिय आहेत.
सतत पडणारे ते पाऊसाचे थेंब तर वातावरण निर्मिती करताहेत. त्यामुळे विषय पावसाचा नसला तरी ते लेख वाचताना पावसात भिजल्यासारखे वाटते आहे .बेडूकराव ही मस्त आहेत.
अंक काढणे सोपे वाटत असले तरी ते तेवढेसे नाही हे देवकाकांशी बोलल्यावर कळले.
त्यांना धन्यवाद.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
17 Jun 2010 - 7:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऋतू हिरवा अजून वाचला नाही. पण रंगसंगती आवडली.
वाचून इकडे किंवा तिकडे प्रतिक्रिया लिहितोच.
श्रेया रत्नपारखी आणि प्रमोद देवांचे मनःपुर्वक अभिनंदन....!!!
-दिलीप बिरुटे
18 Jun 2010 - 2:12 pm | प्रमोद देव
सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद.
पाषाणभेद...ह्या अंकात सहभागी होण्यासाठी मी मिपावरही एक धागा टाकला होता(आता तो उडवलाय..मीच स्वत:) ज्यात असं आवाहन केलं होतं की...इच्छुकांनी
आपलं लेखन आमच्याकडे पाठवावं...कुणाचेही लेखन नाकारलं जाणार नाही असं त्यात स्पष्टपणे म्हटलं होतं....त्यामुळे ज्यांनी पाठवलं...त्यांचं लेखन आम्ही अंकात समाविष्ट केलं....निवड करण्याचा प्रश्नच येत नाही...निवड करण्याइतपत मी स्वत:ला मोठा समजत नाही...आमचा हा सगळा हौसेचा मामला आहे.
हे लेखन सर्वस्वी ताजं असावं आणि आमच्या अंकात प्रकाशित होईपर्यंत ते अन्यत्र कुठेच प्रकाशित करू नये..इतकीच माफक अट होती आमची.
असो. आपल्याला इच्छा असल्यास आमच्या...दिवाळी अंकात जरूर भाग घ्या...
त्याची घोषणा योग्य वेळी इथे होईलच...त्याकडे लक्ष ठेवा. :)
18 Jun 2010 - 6:45 pm | अक्षय पुर्णपात्रे
सवडीने वाचणार आहे. स्क्रिनवर पाउससदृश काहीतरी पडतांना दिसत असल्याने रसभंग होत आहे.
18 Jun 2010 - 10:40 pm | छोटा डॉन
>>स्क्रिनवर पाउससदृश काहीतरी पडतांना दिसत असल्याने रसभंग होत आहे.
+१, १००% सहमत.
हेच मी कालपासुन लिहावे की नको ह्या विचारात होतो.
मुखपृष्ठावर ठिक आहे पण इतर ठिकाणी नकोसा वाटतो.
असो, अंक रोचक वाटला.
सवडीने सविस्तर वाचुन अजुन १ प्रतिसाद देईन. :)
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
18 Jun 2010 - 6:22 pm | मीनल
आता पर्यंत ६५१ वाचने झाली आहेत. त्यापैकी १०० जणांनी हा अंक निदान चाळला तरी असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
18 Jun 2010 - 10:33 pm | मदनबाण
१००० चा टप्पा लवकरच पार पडेल. :)
मदनबाण.....
A truly strong person does not need the approval of others any more than a lion needs the approval of sheep.
Vernon Howard