धर्म-शिक्षणाचे धडे द्या.........

संजीव नाईक's picture
संजीव नाईक in काथ्याकूट
29 Mar 2008 - 3:46 pm
गाभा: 

धर्म-शिक्षणाचे धडे द्या.........

जून महिना उजाडला की, आपल्या पाल्याला शाळा- कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची एकच धांदल उडते. त्यातल्या त्यात पाल्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याची वाढती फॅशन अलिकडे पालकांमधे, विशेषतः शहरामधील पालकांमध्ये वाढलेली आहे. परंतु हे पालक एक गोष्ट विसरतात की, शिक्षणाबरोबर संस्कार हे ही महत्वाचे असून हे संस्कार धर्माद्वारेच मुलाबाळांमध्ये उतरु शकतात.

धर्मासंबंधी शाळांमध्ये हल्ली फक्त सुरवातीला प्रार्थना म्हणण्यापलिकडे मुलामुलींचा धर्माशी संबंध येत नाही. या पलिकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर, निरुपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही. रामायण-महाभारतातील एखादी गोष्ट पुस्तकात ठेवली की तेवढ्याने संस्कार उतरत नसतात. इंग्रजी शाळांमध्ये तर तोही प्रश्न नाही. एकीकडे भौतिकवाद, भ्रष्टाचार आणि पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव व एकीकडे धर्म व धार्मिक शिक्षणाची आबाळ यामूळेच मुलांमध्ये शिस्त व जबाबदारीची जाणीव कमी कमी होत चालली आहे. सगळे लोक या परिस्थितीत सुधारणा करण्याची भाषा बोलतात पण प्रत्यक्षांत काहीही केले जात नाही.
खरं तर शिक्षण क्षेत्रात धार्मिक शिक्षणाचा पाया घालणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणांतून संस्कार चांगले घडत असतील तर त्याला 'जातीयवाद' म्हणण्याचे काहीच कारण नाही. किंवा त्यामुळे आपल्या निधर्मीवादाला बाधा येईल अशीही भीति बाळगण्याचे कारण नाही. अलिकडे घरांघरांतून सुध्दा धर्म आणि धार्मिक शिक्षण कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांमधून धर्माबद्दल शिक्षण देण्याची अधिक आवश्यकता आहे.
माझ्या शाळेत आमच्या बालपणी रोज पहिला पाठ असाच धर्म शिक्षणाचा असे. गीता, तुकारामांची गाथा, रामदासांचे श्लोक शिकवले जात, त्याचे पाठांतर होई, अर्थ समजवून सांगितले जात, ते पाठांतर आजही मुखोद्गगत व त्याचे संस्कार मनावर कायम आहेत.
या शिक्षणाचे स्वरूप कसे असावे हा तपशिलाचा प्रश्न आहे. तो ज्या त्या शिक्षण संस्थेने सोडविला तरी चालेल. पूर्वी संस्कृत विषय होता तेव्हा त्या द्वारे थोडा तरी धर्माशी व पाठांतराशी संबंध येई. आता संस्कृत भूतकाळात जमा झाले आहे. मुले यात माणसे न बनता यंत्र बनू लागली आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या मुलाबाळांना घडवायचे असेल, नीती, चारित्र्य, भक्ती, देशभक्ति, मातृभक्ति याची चाड असणारे नागरिक निर्माण करायचे असतील तर शिक्षण संस्थांमधून धर्माचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली पाहिजे. काही शाळांनी प्रयोगादाखलही हा उपक्रम हाती घेऊन पहावा. मुलांना या शिक्षणांत गोडीही लागेल आणि त्याचे चांगले परिणामही दिसल्याशिवाय रहाणार नाहीत.
धर्म-शिक्षणाचे धडे द्या.........

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

29 Mar 2008 - 4:12 pm | भडकमकर मास्तर

संस्कार धर्माद्वारेच मुलाबाळांमध्ये उतरु शकतात
केवळ धर्माद्वारेच?? या ला आमचा आक्षेप आहे...
आता संस्कृत भूतकाळात जमा झाले आहे.
मान्य नाही...आता तुमच्या वेळचे संस्कृत आणि आताचे संस्कृत यात इतका जमीन अस्मानचा फरक कसा पडेल???? पोरं निदान खूप मार्क्स मिळतात म्हणून तरी शिकताहेत ना??
नीती, चारित्र्य, भक्ती, देशभक्ति, मातृभक्ति
या वरील गोष्टी स्वतन्त्रपणे महत्त्वाच्या आहेत, त्यांची धर्माशी अशी जोडणी चूक आहे... ( आता अशी पळवाट नको की हे म्हणजेच व्यापक अर्थाने धर्म ...) :)
आणि अगदी तुमचे ऐकले, तरी....
१. ...कोणत्या धर्माचे शिक्षण द्यायचे यावरून वातावरण गढूळ होणार.... आपापल्या घरी काय पाहिजे ते धर्माचे शिक्षण द्या ना.... ..
२. शिक्षक मंडळींना पुस्तकी शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करणे कठीण होत चालले आहे, त्यात घरातल्या मंडळींना संस्कार करायला वेळ होत नाही म्हणून शाळेवर जबाबदारी का? शिक्षकांना इतर कामे नाहीत का?

या पलिकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर, निरुपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही. रामायण-महाभारतातील एखादी गोष्ट पुस्तकात ठेवली की तेवढ्याने संस्कार उतरत नसतात. इंग्रजी शाळांमध्ये तर तोही प्रश्न नाही. एकीकडे भौतिकवाद, भ्रष्टाचार आणि पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव व एकीकडे धर्म व धार्मिक शिक्षणाची आबाळ यामूळेच मुलांमध्ये शिस्त व जबाबदारीची जाणीव कमी कमी होत चालली आहे.

वाचन, पाठांतर, निरुपण करून शिस्त व जबाबदारीची जाणीव वाढेल याची काय खात्री??तुमच्याच म्हणण्याप्रमाणे तेवढ्याने संस्कार उतरत नसतात...
बघा बॉ......
................ आजची तरूण पिढी कशी संस्कारी नाही, असे गळे हजारो वर्षांपासून सर्व वयस्कर काढत आहेत....चालायचेच.... पण त्यावर तुमचा धर्मशिक्षणाचा अजब उपाय अजिबात पटणारा नाही....धर्मशिक्षण ही वैयक्तिक बाब असायला हवी....

संजीव नाईक's picture

29 Mar 2008 - 4:33 pm | संजीव नाईक

मा. स _भडकमकर
धन्यवाद
माझ्या आभ्यास क्रंमासाठी उपअयुक्त प्रश्नचा परियाय दिल्याबद्द आभारी.
संजीव

भडकमकर मास्तर's picture

29 Mar 2008 - 4:39 pm | भडकमकर मास्तर

माझ्या आभ्यास क्रंमासाठी उपअयुक्त प्रश्नचा परियाय दिल्याबद्द आभारी.
कोणाचा अभ्यासक्रम?? कसला पर्याय??
टायपिंग मिष्टेक समजून घेतल्या, तरी पण काही कळले नाही...

गुन्हेगार धार्मिक असतात. धर्माने ते का नाही सुधारले?

याउलट बुद्धिप्रामाण्यवादी धार्मिक लोकांएवढे अनाचरण करीत नाहीत. धर्मशास्त्र न म्हणता धर्मनिरपेक्ष नीतिशास्त्र म्हणा. ते सर्व कॉनव्हेंटमध्ये दिले जाते. चोरी करू नये, खोटे बोलू नये, वक्तशीर राहावे, शिस्त पाळावी, लहान मुले, वृद्ध व स्त्रियांना सार्वजनिक वाहनांत अग्रक्रम द्यावा असे शिकवले जाते. तेव्हा आपला मुद्दा बरोबर नाही. संख्याशास्त्रीय विश्लेषशण नाही. निराधार असा अतार्किक आणि स्वयंभू निष्कर्ष आहे.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

रविराज's picture

29 Mar 2008 - 9:49 pm | रविराज

धर्मशिक्षणापेक्षा जर मूल्यशिक्षणाचे धडे सुरू केले तर कसे होइल? माझ्या शाळेमधे व्हायचे आणि तेच योग्य आहे. शाळांमधे सर्वधर्म समभाव शिकवतात, तेव्हा एका कुठल्या एका धर्माचे शिक्षण देणे योग्य नाही आणि सगळ्या धर्मांचे शिक्षण देणे शक्य नाही. तसेही पाहता आजकाल धर्म, धर्मशिक्षण ह्या गोष्टीच्या नावाखाली संस्कार वगैरे रुजवण्यापेक्षा धार्मिक भेदभावच रुजवला जातो. तेव्हा शाळा कॉलेज ह्या ठिकाणांना धर्मापासुन अलिप्त ठेवलेलच चांगल आहे.

रवी

प्रभाकर पेठकर's picture

29 Mar 2008 - 11:36 pm | प्रभाकर पेठकर

'संस्कार' म्हणजे 'प्रक्रिया' ज्या द्वारे पदार्थात, वस्तूत, व्यक्तिमत्वात काही बदल होतात.
कच्च्या सोन्यावर 'संस्कार' करून शुद्ध सोने बनवितात, शुद्ध सोन्यावर 'संस्कार' करून (प्रसंगी किंचित अशुद्ध करून) दागिने घडवितात.
व्यक्तिवर नुसते धार्मिक 'संस्कार' होत नाहीत, सामाजिक, राजकिय, आर्थिक, भौगोलिक संस्कारही होत असतात.
शाळेत संस्कार होतात, गल्लीत संस्कार होतात, वाचनातून संस्कार होतात, अनुभवातून संस्कार होतात. संवेदनशीलतेतून संस्कार होतात, गुणग्राहकतेतून संस्कार होतात, नेत्यांच्या, अभिनेत्यांच्या, राजकिय नेत्यांच्या, यशस्वी व्यक्तिंच्या चरित्रातून संस्कार होतात. घरातल्या वरीष्ठांकडून जाणीवपूर्वक संस्कार केले जातात, कनिष्ठांकडूनही नकळत संस्कार होतात.

परवा माझ्या मुलाने माझ्यावर एक चांगला संस्कार केला...
मी संध्याकाळी चालायला बाहेर पडलो. इमारतीतून बाहेर पडलो तर बायकोने हाक मारुन ती सुद्धा येत असल्याचे सांगितले म्हणून थांबलो. ती येताच आम्ही दोघेही चालायला निघून गेलो. इथे घरी एकटा राहून कंटाळलेला आमचा मुलगा घर बंद करून मित्राकडे निघून गेला. आम्ही पाऊण तासाने घरी आलो तर घर बंद. मी निघताना बायको -मुलगा घरीच असल्यामुळे मी किल्ली घेतली नव्हती. बायकोनेही घेतली नाही. असे आम्ही दोघेही किल्लीविना घराबाहेर अडकलो. (एक किल्ली समोरच्यांकडे असते, पण तेही घरात नव्हते). २ तास इमारती खाली लॉन वर वाट पाहून पाहून थकल्यावर मुलगा आला. आम्हाला घराबाहेर पाहून त्यालाही आश्चर्य वाटले. सत्यपरीस्थिती कळल्यावर तोही सॉरी वगैरे म्हणाला. पण त्याची काहीच चूक नव्हती. पण त्याने नकळत माझ्यावर एक संस्कार केला....
'घराबाहेर पाऊल टाकताना किल्ली घेऊनच बाहेर पडावे.'
असो.

पिवळा डांबिस's picture

30 Mar 2008 - 12:48 am | पिवळा डांबिस

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे,
शिक्षण संस्थांमधून धर्माबद्दल शिक्षण देण्याची अधिक आवश्यकता आहे.
ते फक्त हिंदू धर्माबद्द्लचे शिक्षण की कुठलाही दुसरा धर्म (यहुदी, ख्रिस्ती, इस्लाम, बौद्ध वगैरे) तुम्हाला चालेल?
मला तर वाटतं की या प्रश्नाचे तुम्ही काय उत्तर देता यातच खरी 'ग्यानबाची मेख' आहे!:))

भडकमकर मास्तर's picture

30 Mar 2008 - 12:49 pm | भडकमकर मास्तर

यातच खरी 'ग्यानबाची मेख' आहे!:))
अगदी योग्य बोललात डाम्बिस साहेब....

देवदत्त's picture

30 Mar 2008 - 3:33 pm | देवदत्त

तुमच्या लेखातील विचार चांगले आहेत पण फक्त धर्माद्वारे संस्कार शिकविले जाऊ शकतात ह्याच्याशी सहमत नाही.
तुम्ही म्हटल्याप्रमाणे "धर्मासंबंधी शाळांमध्ये हल्ली फक्त सुरवातीला प्रार्थना म्हणण्यापलिकडे मुलामुलींचा धर्माशी संबंध येत नाही. या पलिकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर, निरुपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही."
खरे असेल, पण हा अभ्यासक्रम ठरविणारे जे आहेत त्यांनी तर आपल्या लहानपणी धर्मासंबधीचे थोडेफार शिक्षण घेतले आहे का ह्याबाबत विचार अपेक्षित आहे. नसेल तर ही अपेक्षा का ठेवावी?

"शिक्षणांतून संस्कार चांगले घडत असतील तर त्याला 'जातीयवाद' म्हणण्याचे काहीच कारण नाही. "
आता हे शिक्षण कशाप्रकारे दिले जाते त्यावर अवलंबून आहे. कोणताही धर्म इतर धर्माची अवहेलना करणार नाही. जर अवहेलना करणे शिकवले जात असेल तर तो जातीयवादच ठरेल.
मी असे म्हणण्याचे कारण, आजकाल धर्म हे नाव फक्त राजकारण किंवा वृत्तवाहिनी चालविण्याकरीताच वापरले जातात असे मला वाटते. एका मित्राने सांगितल्याप्रमाणे धर्म ही अफूची गोळी आहे. त्याद्वारेच तर बहुतेक सर्व राष्ट्रांत द्वेष,युद्ध चालू असतात. आपल्या देशातील जास्तीत जास्त अंतर्गत कलह, दंगली ह्या धर्माच्या नावावरच होत आहेत. जेवढे राजकारणी आहेत त्यातील किती धर्मनिरपेक्ष वागतात? त्या लोकांनी तर आपल्या लहानपणी धर्माबाबत काहीतरी शिकले असेलच ना? मग फक्त पैसे आणि मते मिळविण्याकरीता जर धर्माचा वापर केला जात असेल तर नवीन पिढीने (खरेतर आपणही) खरोखरच धर्म नावाचा विषय मोडीत काढला पाहिजे.

संस्काराविषयी म्हणाल तर धर्मानेच संस्कार शिकविले जातात असे नाही. ज्याला धर्माविषयी काहीच माहित नाही असाही मुलगा नीट शिकविले तर सामाजिक जाणिव लक्षात ठेवूनच वागेल. रस्त्यावर कचरा न टाकणे , पान खाऊन रस्त्यावर न थुंकणे वगैरे वगैरे गोष्टी शिकविण्याकरिता/जाणण्याकरीता धर्माची शिकवण देणे गरजेचे नाही.

माझ्या शाळेत आमच्या बालपणी रोज पहिला पाठ असाच धर्म शिक्षणाचा असे. गीता, तुकारामांची गाथा, रामदासांचे श्लोक शिकवले जात, त्याचे पाठांतर होई, अर्थ समजवून सांगितले जात, ते पाठांतर आजही मुखोद्गगत व त्याचे संस्कार मनावर कायम आहेत.
सहमत. त्यावेळी आपल्याला अर्थ नीट समजावून सांगितला जात होता आणि इतर काही जास्त वाचनात/पाहण्यात नव्हते. त्यामुळे इतर गोष्टींशी सांगड घालून त्यात विश्लेषण केले जात नसे. आजकाल जे काही सभोवताली घडते आहे,मुले जे काही सभोवताली पाहतात त्यावरून मला वाटते की पालकांनीच नीट शिकवण मुलांना दिली पाहिजे. नाहितर शाळेत भले काहीही शिकवू देत, घरी जर वेगळाच प्रकार असेल तर त्याचा काही उपयोग नाही.

पाठांतरावरून आठवले. आम्हाला लहानपणी एका शिक्षिकेंनी सांगितले होते की , जुन्या काळी लहानपणी मुलांकडून श्लोकांचे भरपूर पाठांतर करवून घेतले जात असे. कारण लहान मुलांची पाठांतरशक्ती जास्त असते. मग हळू हळू मोठे झाल्यावर त्याचा अर्थ ही शिकविला जायचा किंवा मग इतर शिक्षणाने त्यांचा अर्थ स्वतःहून ध्यानात यायचा.

असो,
आता राजस्थानात नुकतेच धर्मांतरणावर बंदी घालण्यात आली, त्यावरून आपण काय बोध घ्यायचा?