नवे भन्नाट अर्थ

मनापासुन's picture
मनापासुन in काथ्याकूट
29 Mar 2008 - 11:08 am
गाभा: 

आपल्या मराठीमधे अनेक उपदेश कथा आहेत्...उपदेश सोप्या भाषेत कसा द्यायचा हे त्या कथा लिहीणाराला सहज जमुन जाते.
या कथा केवळ आपणाला ठाउक असणारा उपदेश सांगतात असे नव्हे. त्यातुन आपणाला माहीत नसणारा नवा उपदेश ही तेवढाच मोलाचा असु शकतो.
तो कळण्या साठी फक्त आपण आपला द्रुष्टीकोन बदलणे जरुरीचे आहे...
इथे एक गोष्ट सांगतो..पहा तुम्हाला अशा इतर गोष्टी आठवता का? तुमच्या बुद्धी साठी हा एक नवा खेळ / चॅलेन्ज समजा....
हितोपादेश या पुस्तकात एक चिमणीची आणि माकडाची गोष्ट आहे...
एक माकड पावसात भिजले होते.. त्याला थंडी वाजत होते. थंडी घालवण्यासाठी माकडाने थोडे गवत गोळा केले.
विस्तव पेटवण्यासाठी माकडाने एक काजवा पकडला आणि तो गवतावर ठेवुन ते फुंकर घालु लागले.
जवळ्च असलेल्या एका चिमणीने ते पाहीले.आणि माकडाला ती सांगु लागली...की अरे बाबा काजव्या ने विस्तव पेतत नाही.
माकडाने एकदा...दोनवेळा दुर्लक्ष केले..पण ही गोष्ट चिमणी ने तिसर्‍यांदा सांगितली तेंव्हा माकडाने चिडुन जाउन चिमणीलाठार मारले
हितोपदेश चिमणीला सल्ला / उपदेश देते की : मूर्खाना उपदेश करु नये.
हा उपदेश झाला चिमणी आणि माकड द्रुष्टीकोनात ठेउन... थोडा द्रुष्टीकोन व्यापक केला आणि कथे कडे काजव्याच्या द्रुष्टीकोनातुन पाहीलेतर आपल्याला एक वेगळाच उपदेश मिळतो...
काजव्याला सल्ला: तुम्हाला असे वाटत असेल की तुमची कर्यक्षमता नीट वापरली जात नाही ...तर असे समजा की तुम्ही माकडाच्या हाताखाली काम करत आहात...( स्वतःसाठी काम करत असाल तरी हे लागु होते.)

पहा मंडळी अशा नेहमीच्या कथांमधुन नव्या कल्पना काढता येतात का?
ईसापनीति च्या तर प्रत्येक कथे मधुन असे भन्नाट अर्थ निघु शकतात. आपण ट्राय करु या.......तुमच्या कल्पना पोस्ट करा..काही तरी वेगळे अनुभवायला मिळेल.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

29 Mar 2008 - 11:37 am | विसोबा खेचर

चिमणीला सल्ला / उपदेश देते की : मूर्खाना उपदेश करु नये.
काजव्याला सल्ला: तुम्हाला असे वाटत असेल की तुमची कर्यक्षमता नीट वापरली जात नाही ...तर असे समजा की तुम्ही माकडाच्या हाताखाली काम करत आहात...( स्वतःसाठी काम करत असाल तरी हे लागु होते.)

अहो पण यातून फक्त चिमणीला आणि काजव्याला सल्ला मिळाला. पण माकडाचं काय? त्याला कोणता सल्ला मिळाला पाहिजे? :)

असो,

मनापासून, तुमची कथा गंमतीशीर असून बोधप्रद आहे व अश्या प्रकारच्या कथा इथे याव्यात हा तुमचा उपक्रमही चांगला आहे असे मी 'मनापासून' म्हणतो! :)

आपला,
(सल्ला न मिळालेलं माकड!) तात्या.

:)

धनंजय's picture

29 Mar 2008 - 5:38 pm | धनंजय

काजव्याला फुंकर घालून तो पेटला नाही, तरी तसा तो उपद्रवीही नाही. चिमणीच्या उपदेशाने उष्णता मिळत नसली, तरी जठराग्नीसाठी जळण म्हणून तिचा उपयोग होऊ शकतो.

सारांश/उपदेश : जे निरुपद्रवी आहेत त्यांना फुंकर घाला. अव्यवहार्य टीका करणार्‍या टीकाकारांचा दुसरा काही व्यवहार्य उपयोग अमलात आणा - त्यांचा फडशा पाडा.

पिवळा डांबिस's picture

30 Mar 2008 - 12:13 am | पिवळा डांबिस

अव्यवहार्य टीका करणार्‍या टीकाकारांचा दुसरा काही व्यवहार्य उपयोग अमलात आणा - त्यांचा फडशा पाडा.
हा, हा, हा!!! एकदम पटलं!!!!:))

कोलबेर's picture

30 Mar 2008 - 12:27 am | कोलबेर

माकडे ही शुद्ध शाकाहारी असतात असे ऐकून आहे. त्यामूळे जठराग्नीसाठी जळण हा उपयोग तितकासा होईलसा वाटत नाही.
स्वतः जळून प्रकाश देणारे, टीका करणारे आणि माकड ह्यातले शेवटी माकडच जगले.. त्यामुळे माकडाला कसलाही बोध घ्यायची आवशकता नाही. :)

पिवळा डांबिस's picture

30 Mar 2008 - 12:30 am | पिवळा डांबिस

माकडे ही शुद्ध शाकाहारी असतात असे ऐकून आहे.
माकडे मुंग्या सर्रास खातात हे मी पाहिले आहे. इतरही छोटे प्राणी खातात असे कळते (रेफः नॅशनल जिऑग्राफिक)

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Mar 2008 - 9:39 pm | llपुण्याचे पेशवेll

माकडे म्हणे केसातल्या ऊंवा पण खातात.. ऊवा शाकाहारी असतात का? ;)

पुण्याचे पेशवे

मदनबाण's picture

30 Mar 2008 - 6:04 am | मदनबाण

हो माकडे मांसाहार देखील करतात, एका मोठ्या गोरिला ने दुसर्‍या एका लहान गोरिलाला ठार मारुन त्याचेच मांस खाताना मी देखील पाहिले आहे.(रेफः नॅशनल जिऑग्राफिक)
(अवांतर :-- ऍनाकोंडा ने एका मगरीला आणि पाणघोड्याला गिळताना याच चॅनल वर मी पाहिले आहे.)

(मॅन-ईटिंग लेपर्ड ऑफ़ रुद्रप्रयाग --जिम कार्बेट फॅन)
मदनबाण

या इथे लोक ईतर काही नव्या कथा पेष करतील असे वाटले होते.
पण ईथे तर केवळ अगोदर लिहीलेल्या कथेवरच चर्वण चालले आहे. विषय सोडुन मुंग्या, शाकाहार,गोरिला, अनाकोंडा, मगर, पाणघोडा यानी काय म्हणुन हजेरी लावली कोण जाणे.
असो.
नवी कथा सांगतो
विहीरीत नवा सिंह पहाणार्‍या सिंह आणि सशाची गोष्ट ...
एक जंगलात एक सिंह रहात होता. तो जंगलाचा राजा होता. त्याने रोज एका प्राण्याने त्याच्या भेटीस यावे असा आदेश काढला.भेटीस येणार्‍या प्राण्याची तो शिकार करायचा.एक दिवस एका छोट्या सशाची पाळी होती.त्याने सिंह कडे जण्यास उशीर लावला.भुकेलेला सिंहाने त्याला कारण विचारताच ससा म्हणालावाटेत त्याचा रस्ता दुसर्‍या सिंहाने आडवला होता.
कोठे आहे तो दुसर सिंह मी त्याला ठार मारतो असे सिंहने म्हणताच ससा त्याला जंगलात एका विहीरीजवळ घेउन आला.
सिंहाने विहिरीत पाहीले त्याला स्वतःचेच प्रतिबिंब दिसले.त्या प्रतिबिंबालाच नवा सिंह समजुन सिंहाने एक जोरदार डरकाळी फोडुन त्या नव्या सिंहाला मारण्यासाठी विहीरीत उडी घेतली आणि तो बुडुन मरण पावला.
पंच तंत्रातील ही गोष्ट युक्तिने आपल्या पेक्षा मोठ्या प्राण्याला कसे जिंकता येते हे सांगते.
या गोष्टीतुन नवा बोध:

स्वतःला ओळखा......कदाचीत तुमची लोकांमधील प्रतिमा तुम्हाला खड्ड्यात घालु शकते.
konw image. It may drag you in to the ponds of trouble.

पहा मंडळी अशा नेहमीच्या कथांमधुन नव्या कल्पना काढता येतात का?
ईसापनीति च्या तर प्रत्येक कथे मधुन असे भन्नाट अर्थ निघु शकतात. आपण ट्राय करु या.......तुमच्या कल्पना पोस्ट करा..काही तरी वेगळे अनुभवायला मिळेल.

इथे लोक ईतर काही नव्या कथा पेष करतील असे वाटले होते.
पण ईथे तर केवळ अगोदर लिहीलेल्या कथेवरच चर्वण चालले आहे. विषय सोडुन मुंग्या, शाकाहार,गोरिला, अनाकोंडा, मगर, पाणघोडा यानी काय म्हणुन हजेरी लावली कोण जाणे.
खरे आहे..मिपा वर लेखकानी लिहावे असे वाटत असेल तर हे असले विषय सोडुन असलेले प्रतिसाद हा मोठा अडथळा ठरणार आहे.
या गोष्टी लेखकाला निरुत्साही करणार्‍या आहेत.

विजुभाऊ's picture

1 Apr 2008 - 9:56 am | विजुभाऊ

असो..तहानलेला कावळा..........या गोष्टीचे सुद्धा नवे अर्थ लागु शकतील?

हो त्याबद्दल मी लिहीणारच आहे.
नीळा कोल्हा...माकड आणि टोपीवाला...लाकुडतोड्या आणि त्याची कुर्‍हाड
या सारख्या बर्‍याच गोष्टी आहेत पण लोकानी किमान निदान काही गोष्टी तरी इथे मांडाव्या ही मनापासुन अपेक्षा

विजुभाऊ's picture

2 Apr 2008 - 2:37 pm | विजुभाऊ

तहानलेला कावळा.............या गोष्टी मधे
कावळ्याला तहान लागते.त्याला एक मातिचे रांजण दिसते.त्याच्या तळाशी थोडे पाणी असते.
पाणी कसे काढायचे हा विचार करत असताना कावळाशोध घेतो.तो इकडे तिकडे पहातो.त्याला काही साधन सापडत नाही.
म्हणुन्तो थोडा उडुन उंचावर फांदीवर बसतो. फांदीवरुन त्याला आसपासचे बरेच काही दिसते.एके ठीकाणी काही खदे पडलेले असतात.
कावळ्याला युक्ती सुचते.तो तेथुन खडे आणुन रांजणात टाकतो. खडे टाकल्यामुळे रांजणातील पाणी हळु हळु वर येउ लागते.
पाणी बर्‍यापैकी वर आल्यावर कावळा पाणी पितो उडुन जातो.

या गोष्टीतुन नवा बोध: A solution to a problem can not be found at the same level at which its beencreated
..बरोबर्...........तुम्हाला मनापासुन्हेच म्हणायचे होते ना.
तहानलेला कावळा विजुभाऊ

मनस्वी's picture

2 Apr 2008 - 2:44 pm | मनस्वी

जमलं रे जमलं