आता शाळा सुरु होतील. माझ्या मुलाने या वर्षी दहावीची परी़क्षा दिली.
पण मागच्या वर्षीचाच अनुभव सांगतो.
पालक सभेला मी विचारलं की शाळा नेहमीचा एक गणवेश आणि खेळ ( स्पोर्ट्स) करिता एक गणवेश वापरायची सक्ती करते.
यामागचा उद्देश काय. तर उत्तर मिळालं की मुलं खेळाच्या तासाला उन्हात ग्राऊंडवर जातात, त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून सफेद गणवेश ठेवला आहे. पण मूळ साध्या गणवेशात सफेद शर्ट आहे आणि हा गणवेशही उन्हात जाण्यासाठी चालू शकतो.
एक तर स्पोर्ट्सच्या गणवेशाचे दिवस लक्षात ठेवावे लागतात आणि मैदानातून मळवून आणलेले कपडे धुताना नाकी नऊ येतात.
सध्या मोठी माणसेही सफेद पॅन्ट वापरायचे टाळतात, मग मुलांना ही सक्ती का? पालकांना नाडण्याच्या एकापेक्षा एक क्लुप्त्या शाळेकडून सुरुच असतात. माझ्या बाबतीत हा प्रश्न आता सुटला आहे. कारण मुलाचे शालेय जीवन आता संपले आहे. पण इतर पालकांची दया येते, म्हणून हा खटाटोप. निदान कोणीतरी आवाज उठवून हे फॅड बंद केले पाहिजे. बघा पटतंय का....
एका शाळेत दोन दोन गणवेश
गाभा:
प्रतिक्रिया
12 Jun 2010 - 7:54 pm | नितिन थत्ते
हॅ हॅ हॅ. आम्ही मर्हाटी शाळेत जायचो. तिथे असे प्रकार नव्हते. एन सी सी/स्काऊट च्या मुलांना खाकी कपडे घालायला लागत. पण ती मुले थोडी असत.
आता पण माझी मुलगी मराठी शाळेत जाते. तिला पण असे काही नाही.
नितिन थत्ते
12 Jun 2010 - 7:55 pm | वेताळ
होय बघुया कय करता येते का.आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे दाखवण्याची ह्या सगळ्या शाळामध्ये अहमिका लागली आहे.
वेताळ
12 Jun 2010 - 8:12 pm | अर्धवट
शाळेत जायचाच काही फायदा आहे यावरुनच विश्वास ऊडाला आहे..
शाळेत गेलो पण शिक्षण झाले असे ठामपणाने म्हणता येणार नाही - ईती भाईकाका
12 Jun 2010 - 8:15 pm | टारझन
आमच्या वेळेस नव्हती बा आसली काही खुळं .. तवा बिगरी पथुर श्याळा व्हती ...
मी माज्या साती ल्येकांची शिक्क्षानं अशीच केली .. त्यांच्या टायमाला पांढरा हापशर्ट आन् खाकी हापचट्टी आसायची ... त्या शर्टाचा रंग पांढरा उरला नव्हता ... न चडी ला बी पोरं करगुटा बांधुन जायची ... तरीबी गुर्जी कधी काय बोलायचा नाय ..
- टाराजी टोपाजी तपेले
13 Jun 2010 - 12:48 pm | पाषाणभेद
बघा. म्हणजे टारझन पणजोबा किती सुखी होते ते. नाहीतर आताची आपली पिढी. आम्हाला तर दर दिवशी शाळेत जातांना इस्त्री केलेले, स्वच्छ कपडेच वापरावे लागतात. अन मी जातो त्या शाळेत ड्रेस तरी किती आहे माहीत आहे का?
हे बघा:
१) शाळेचे ड्रेस - २ नग
२) स्पोर्ट्स ड्रेस(वेन्सडे ला घालतो तो) - १ नग
३) रेड हाउस ड्रेस - १ नग
३) स्काऊट ड्रेस - १ नग
आम्हाला तर बाबा कंटाळा येतो दररोज ड्रेस बदलतांना. बरे तर बरे आमचे दोन नोकर राम अन शाम रजेवर जात नाहीत. आज कोणता ड्रेस मला घालायचा तेच तर लक्षात ठेवतात. ते दोघेही रजेवर गेले की इतर चार नोकरांना काही अक्कल नसल्याने ते गोंधळतात. मग ममा तिच्या किटी पार्टीवरून फोन करून बाबाला घरी जायला सांगतात. बाबा मग त्याची बोर्ड मिटींग सोडून कंपनीतील्या नोकरांसमावेत घरी येतात अन मग शाळेचे ड्रेस घालतात मला. नंतर खुप वेळ झाल्याने मी शाळेत न जाता बाबा मग मला एस्सेल वर्ल्ड ला घेवून जातो अन मग आम्ही दोघे संध्याकाळी घरी येतो अन मी मम्माला सांगतो की "मॉम मी शाळेत खुप दमलो गं." मग मम्मा शांताबाईला गाजर चा हलवा करायला सांगते अन मम्मी तो सर्व्ह करून देते. माझ्या मम्मीला गाजर चा हलवा फार चांगला करता येतो.
आज आम्ही बेन-१० चे टॉय आणायला जाणार आहोत. पप्पा पण त्यांची स्कोडा कार बदलणार आहेत आज. फारच भंगार आहे स्कोडा कार. आज ते BMW घेणार आहेत. मम्मी तिकडे दमणहूण डायरेक येणार आहे. मम्मी ट्रीप ला गेलीय ना. म्हणून. मी 4th standard ला आहे. माझी शाळा मस्त आहे. टिचर मला नेहमी पहिल्या बेंचवरच बसवते. मला कंपोझीशन लिहायला खुप कंटाळा येतो. मग मी कॅटबरीचा डब्बा समोर ठेवतो अन एका वाक्याला एक कॅटबरी खातो. मम्मीला समजतच नाही ते. ती टिव्ही बघते ना तेव्हा. मग रामूच मला कंपोझीशन लिहून देतो. तो एम. ए. एम.फिल झालेला आहे. तरी तो सगळी कामे करतो घरातली. परवा आम्ही उटीला जाणार आहोत. पप्पाची बोर्ड मिटींग आहे ना. म्हणून.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
12 Jun 2010 - 8:27 pm | तिमा
काळानुसार बदलावे. 'एक *डीवर आणि दुसरे दांडीवर' चे दिवस गेले.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
12 Jun 2010 - 9:39 pm | विनायक प्रभू
मुलांना सवय लागायला पाहीजे.
नेहेमीकरता एक गणवेश
स्पोर्ट करता दुसरा.
काय?
12 Jun 2010 - 9:59 pm | युयुत्सु
दोन गणवेश हा शुद्ध आचरटपणा आहे.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- नक्की होईल.
12 Jun 2010 - 11:05 pm | भारद्वाज
स्पोर्टच्या दिवशी मुलांना/मुलींना शाळेला दांडी मारायला सांगा.... =))
12 Jun 2010 - 11:21 pm | अश्विनीका
आमच्या शाळेचा गणवेष म्हणजे पांढरा शर्ट सारखा ब्लाउज आणि निळा स्कर्ट. खेळासाठी किंवा शारिरिक शिक्षणाच्या तासासाठी (पीटी) स्कर्ट ऐवजी काळी शॉर्ट घालावी लागे. मुलींच्या दप्तरात काळी शॉर्ट नेहमीच घडी करून एका बाजूला ठेवलेली असे. (कारण बर्याच मुली खेळाच्या सरावासाठी रोजच शाळा सुटल्यावर थांबत असत.) किंवा ज्या दिवशी पीटी असेल त्या दिवशी शॉर्ट आणि त्यावर स्कर्ट असे घालूनच शाळेत येत असू.
आमचीही शाळा मराठी होती. पुण्यात तेव्हा (८० च्या दशकात) बुधवारातील प्रकाश डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये लेडी़ज स्पोर्ट शॉर्ट १५ की २० रूपयाला मिळत असे. आईबाबांना आज पीटी चा तास आहे, शॉर्ट घेतली का अशी आठवण कधी करून नाही द्यावी लागली.
- अश्विनी
12 Jun 2010 - 11:46 pm | टारझन
मला पकाकाकांच्या आठवणींत रमलेल्या छोटासाहेब डानरावांची आठवण झाली .
हा हा हा .
-(हाप्चड्डी प्रेमी) छोटा शॉर्ट
13 Jun 2010 - 8:21 am | शुचि
हुजुरपागा :) मी ही
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
14 Jun 2010 - 11:56 am | साक्षी
मी पण :)
~साक्षी.
13 Jun 2010 - 1:34 pm | भडकमकर मास्तर
आता एकदा अमुक एका प्रकारच्या शाळेत घातल्यावर त्या त्या शाळेची ( बरी वाईट / आवश्यक अनावश्यक / गणवेष / अमुक पुस्तिका , व्यवसायमालाच / अमुक प्रकारचे बूट ,अमुक टाय , मेंदी हवी नको, वगैरे वगैरे )सर्व प्रकारची शिस्त पाळणे भाग आहे असे मला वाटते...
किंवा शाळा बदलावी...
किंवा होम स्कूलिंग करावे
14 Jun 2010 - 10:07 am | मिसळभोक्ता
शाळेत ड्रेस घालण्याची सक्ती नको.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
14 Jun 2010 - 1:13 pm | नितिन थत्ते
शी बै आच्रत.
नितिन थत्ते
14 Jun 2010 - 10:55 pm | टारझन
काहीही काय ? ए कोण आहे रे तिकडे ? ह्या आचरट प्रतिसादा बद्दल भोक्त्याला २ तास शाळेच्या मुतारीत कोंडा ...
-(संतप्त गुर्जी) टारेश कोंडमुतारी
15 Jun 2010 - 3:28 am | पाषाणभेद
अहो गुर्जी, ते मग त्यांचे वाड्मय तेथे लिहीतील. चालेल काय?

मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही