आताच धनंजय रावांच्या या धाग्यात काही मिपा मित्रांनी मिपाच मुखपृष्ट (फिफा विश्वचषका संबंधित) बदलल्या बद्दल खंत आणि नाराजीचा सुर लावलेला दिसला.
जरी फुटबॉल चा विश्वचषक चालु असला तरी सध्या ती एकच गोष्ट महत्वाची आहे असे मला वाटत नाही . तेव्हा जर अधे मध्ये एखादा खास दिवस असला (जसे आज आपल्या सर्वांच्या लाडल्या व्यक्तिमत्वाची पुण्यतिथी आहे) तर त्या दिवसाची आठवण म्हणुन जर मिपाच्या मुख पृष्ट बदलल तर त्यात काही वावग आहे अस मला तरी वाटत नाही.
हि स्पर्धा अजुन १५-२० दिवस तरी चालणार आहे. वाटल्यास उद्या परवा परत ते मुखपृष्ट लावता येईल.
आजवर मिपाच्या मुखपृष्टाने नेहमी एखाद्या विषेश दिवशी त्या दिवसाची आठवण करुन देणार मुखपृष्ट देउन मिपाची शोभा वाढवली आहे. तसा पायंडाच पाडलाय म्हणाना.
त्यामुळे आजचं पुलंना श्रधांजली वाहिलेल मुखपृष्ट मला मुळीच वावग वाटल नाही.
खर तर माझा हा प्रतिसाद मी तिथेच देणार होतो.
पण इतर मिपाकरांच या बाबतीत काय मत आहे हे जाणुन घ्यायला आवडेल म्हनून हा काथ्याकुट.
प्रतिक्रिया
12 Jun 2010 - 12:24 pm | मदनबाण
गणा सेठ तुझ्याशी मी पूर्णपणे सहमत आहे... मुखपॄष्ठ कोणी लिहावे या बद्धल ही मला
काहीही म्हणायचे नाही.
आत्ता जे मुखपॄष्ठ दिसत आहे त्यावर सुद्धा काही आक्षेप नाही,पण सकाळी जे मुखपृष्ट होते त्या बद्धल फक्त विचारणा करण्यात आली होती.
मदनबाण.....
A truly strong person does not need the approval of others any more than a lion needs the approval of sheep.
Vernon Howard
12 Jun 2010 - 12:25 pm | mamuvinod
हा वादाचा मुद्दा असुच शकत नाहि..
भाइना विनम्र श्रधांजली
मामु
12 Jun 2010 - 12:27 pm | आनंदयात्री
गणपाशी सहमत आहे.
12 Jun 2010 - 12:47 pm | दत्ता काळे
गणपाशी सहमत.
12 Jun 2010 - 12:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुखपृष्ठावर काय असावं काय नसावं हा व्यवस्थापनाचा भाग आहे, असे मी समजतो. प्रसंगानुसार व्यवस्थापन त्यात बदल करत असते, असेही मी पाहिले आहे. मुखपृष्ठ काय असावे, काय नसावे, या फंदात सदस्यांनी पडू नये असे माझे स्वत:चे मत आहे. फार तर व्यवस्थापन एखादी 'विशेष’घटना विसरले आहे असे वाट्ल्यास प्रंसगानुसार व्यवस्थापनास सुचवणी निरोपाद्वारे,खरडीद्वारे, करण्यास हरकत नसावी. किंवा व्यवस्थापन मुखपृष्ठाबद्दल काही सुचवण्या मागतील तेव्हा सदस्य म्हणून आपण योग्य सुचवण्या दिल्या पाहिजेत, आलेल्या सुचवण्यांचे योग्य विश्लेषण करुन व्यवस्थापन कदाचित योग्य बदल करतीलही. एखाद्या प्रसंगी राहवल्याच जात नसेल तर [ज्याला आपण खाज असे म्हणतो] आपले म्हणने व्यवस्थापनाला निरोपाने तातडीने कळवले पाहिजे. कार्यवाही होईल अथवा न होईल व्यवस्थापनावर सोडून द्यावे. जाहीर धागा असेल तेव्हा संकेतस्थळाचे हित लक्षात घेऊन लिहिलेही पाहिजे. पण, कारण नसतांना काही सन्माननीय सदस्य वाटेल तिथे असेच का आणि तसेच का, याबद्दल संस्थळावर विनाकारण चर्चा करुन संस्थळाला वेठीस म्हणत नाही. पण, निष्कारण चांगल्या चालत असलेल्या संस्थळाला चावत फिरत राहतात, ही गोष्ट मला चांगली वाटत नाही इतकेच माझे मत आहे. बाकी चालू द्या...!
-दिलीप बिरुटे
[मिपा सदस्य खाते क्रमांक २८]
12 Jun 2010 - 12:53 pm | सहज
सरांशी पूर्णता सहमत आहे.
12 Jun 2010 - 2:38 pm | अवलिया
सहमत आहे
(काय दिवस आले आहेत, प्रा डॉ आणि सहज या राहु केतुंशी माझ्यासारख्याला सहमत व्हावे लागत आहे... हा हंत )
--अवलिया
12 Jun 2010 - 5:34 pm | बिपिन कार्यकर्ते
+३
बिपिन कार्यकर्ते
12 Jun 2010 - 7:54 pm | लवंगी
काय दिवस आलेत!! याच्याशी सहमत.. :)
बाकी गणापाचा गैरसमज झाला होता तो दूर केला आहे
12 Jun 2010 - 12:55 pm | टारझन
सहमत , विषय संपला ...
बाकी त्या मुखपृष्ठावरच्या एक दोन गोष्टींवरुन जो बळेच वादंग होतो त्याने मात्र फुकाची कमरणुक होते :)
-(आजची पुरुषाची प्रतिमा) टारझन
12 Jun 2010 - 12:59 pm | मदनबाण
एखाद्या प्रसंगी राहवल्याच जात नसेल तर [ज्याला आपण खाज असे म्हणतो] आपले म्हणने व्यवस्थापनाला निरोपाने तातडीने कळवले पाहिजे.
ही खाज मला आज जरा जास्तच झाली. ;)
तसेच निलकांत पासुन हजर असलेल्या सर्व संपादक मंडळींकडे विचारणा केली होती.
जाहीर धागा असेल तेव्हा संकेतस्थळाचे हित लक्षात घेऊन लिहिलेही पाहिजे.
नक्कीच...
कार्यवाही होईल अथवा न होईल व्यवस्थापनावर सोडून द्यावे.
अर्थातच त्यांच्यावर सोडलेले आहे.
निष्कारण चांगल्या चालत असलेल्या संस्थळाला चावत फिरत राहतात, ही गोष्ट मला चांगली वाटत नाही इतकेच माझे मत आहे. बाकी चालू द्या...!
म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो !!!! हेच मला वाटते.
बाकी चालू द्या.
मदनबाण.....
A truly strong person does not need the approval of others any more than a lion needs the approval of sheep.
Vernon Howard
12 Jun 2010 - 1:14 pm | गणपा
>>पण, कारण नसतांना काही सन्माननीय सदस्य वाटेल तिथे असेच का आणि तसेच का, याबद्दल संस्थळावर विनाकारण चर्चा करुन संस्थळाला वेठीस म्हणत नाही. पण, निष्कारण चांगल्या चालत असलेल्या संस्थळाला चावत फिरत राहतात.
वर काथ्याकुटात नमुद केले ते माझ वयक्तिक मत आहे.
पण त्यातुन जर वरचा बिरुटेकाका म्हणतायत असा सुर निघत असल्यास तो माझ्या लिखाणातला दुबळेपणा समजावा.
संपादकांनी/ निलकांताने हा धागा उडवुन टाकण्यास माझी काहीच हरकत नाही.
-गणपा
12 Jun 2010 - 7:48 pm | नीलकांत
सरांशी १००% सहमत आहे.
- नीलकांत
12 Jun 2010 - 8:34 pm | प्राजु
अत्यंत संयत आणि योग्य प्रतिक्रिया.
सर, तुमच्याशी सहमत आहोत आम्ही.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
14 Jun 2010 - 9:32 am | मिसळभोक्ता
बिरुटे सरांनी आपला सदस्य क्रमांक अठ्ठावीस लिहून मिपाच्या संताशी (संस्थापक तात्या) आपली घसट दाखवून दिलेली आहे.
पण आता तात्या कुठे आहे ?
मिपाच्या सदस्यांना चाटण देऊन पळून गेलाय.
आता हे असे "सदस्य क्रमांक अठठावीस" चे वजन नको, मूळ कल्पनेचे (आयडियाचे) वजन हवे.
ते कुठे आहे ?
बिरुटे हा कधी एके काळी तात्याचा मित्र होता, हे वगळून लिहा राव.
ज्या लोकांचे इथे संस्थापन आहे, त्यांचेच मुखपृष्ठावर नियंत्रण हवे.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
14 Jun 2010 - 10:14 am | मी_ओंकार
मिभोंशी सहमत.
- ओंकार.
(सदस्य क्रमांक ५१५)
12 Jun 2010 - 6:31 pm | आशिष सुर्वे
गणपा ओगाशी सहमत.
भाईकाकांना विनम्र श्रध्दांजली..
======================
हसत रहा!!
13 Jun 2010 - 3:38 pm | युयुत्सु
कोणत्याही छापील प्रकाशनाच्या मालकीची आणि व्यवस्थापनाची माहिती प्रकाशनाच्या प्रत्येक आवृत्तीमध्ये दिलेली असते. मिसळपावाची अशी माहिती
कुठे बघायला मिळेल?
ÿ
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.नअकोणत्याही प्रकाशन
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
13 Jun 2010 - 4:48 pm | धनंजय
मिसळपावाच्या सदस्यांनी प्रेमळपणे व्यवस्थापनाला सुचवण्या केल्या तर चांगलेच.
मिसळपावाचा चेहरामोहरा शोभिवंत दिसावा याबद्दल विचार करणे, एकमेकांना सांगणे म्हणजे या स्थळाबद्दलची आपुलकीच आहे. काही वावगे दिसले, तर तेही सांगावे. सदस्यांचे मन आणि मान राखायचा प्रयत्न व्यवस्थापन करेल, असे त्यांनी वेळोवेळी सांगितलेले आहे.
("व्यवस्थापन वाटेल ते करेल, कोणाचे बोलायचे काम नाही" असे अरेरावीचे धोरण व्यवस्थापनाने पुकारलेले नाही. सदस्यांकडून सुचवण्या मागवल्या आहेत, ते प्रामाणिकपणेच, असे दिसते आहे. मला वाटते बिरुटेसरांनी वर असेच काही समजावून सांगितलेले आहे.)
सदस्यांची मते एकमेकांच्या विरोधात असली, तर सर्वच सदस्यांचे मत अंगीकारले जाऊ शकणार नाही. व्यवस्थापनाला काहीतरी एक मत निवडावे लागेल. अशा परिस्थितीमध्ये ज्या सदस्यांना आपुलकी वाटते, त्यांनी उदारपणे ओळखावे, की ही संस्था म्हणजे लोकसंग्रह आहे.
मिपामध्ये सध्या मोठेच तांत्रिक आणि व्यवस्थापकीय बदल होत आहेत. या बदलांनी सोयी वाढणार आहेत. परंतु संक्रमणाच्या काळात काही सदस्यांना खूप शंका-कुशंका येतील - कुणाचा अधिकार कमी होतो आहे, कुणाचा अधिकार जास्त होतो आहे, यात कसले हेवेदावे आहेत... या कुशंकांमुळे थोडीफार नाराजी होते. मग कुठल्याशा धाग्यावर बारीकसारीक धूळ उडते. काही सदस्य खरड-व्यनि-ईमेलविरोप हे राजमान्य मार्ग सोडून देतील लेखा-प्रतिसादांत आपली गार्हाणी मांडतील. याचा जोवर अतिरेक होत नाही, तोवर अशा तक्रारींबाबत बाकी सर्वांनी थोडे सोशीक असावे.
सोयी वाढतील तसे सदस्यांना हे कदाचित स्वातंत्र्य मिळेल "मिसळपाव मुखपृष्ठ माझ्या संगणकावर कसे दिसेल?" मात्र याबद्दल तांत्रिक शक्यता अजून तपासल्याच जात आहेत. असे झाल्यानंतर मुखपृष्ठाबद्दल तक्रारी कमी होतील. अशी आपणा सर्वांची आशा आहे.