[हिंदू विवाह कायदा] उशीरा का होईना अक्क्ल आली

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
11 Jun 2010 - 4:05 pm
गाभा: 

पुरूष मुक्ती चळवळीच्या आजवरच्या प्रयत्ननाना उशीरा का होईना फळे मिळू लागली आहेत.

http://www.esakal.com/esakal/20100610/4851882883237955138.htm

प्रतिक्रिया

अवलिया's picture

11 Jun 2010 - 4:07 pm | अवलिया

पेढे द्या मालक नुसती बातमी काय देता...

(च्यायला आपल्याला काय कारण काहीही असो पेढे खाण्याशी मतलब)

--अवलिया

...(च्यायला आपल्याला काय कारण काहीही असो पेढे खाण्याशी मतलब)....

हे बाकी खरं हं.............................

अवलिया's picture

11 Jun 2010 - 4:37 pm | अवलिया

छान ! पेढे मस्तच :)

--अवलिया

शिल्पा ब's picture

11 Jun 2010 - 4:12 pm | शिल्पा ब

हा कायदा काही पटत नाही...कोर्ट कसे आणि कशाच्या आधारावर ठरवणार कि आता संबंध जोडण्यापलीकडे गेलेले आहेत ते? या कायद्याचा गैरवापर जास्त प्रमाणात होऊ शकतो.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

युयुत्सु's picture

11 Jun 2010 - 4:33 pm | युयुत्सु

.कोर्ट कसे आणि कशाच्या आधारावर ठरवणार कि आता संबंध जोडण्यापलीकडे गेलेले आहेत ते?

कोर्टाकडे ट्रायल मॅरेज हा पर्याय असतो. त्यातून कोर्टाला बरेच ईन्पुट मिळतात.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

वाहीदा's picture

11 Jun 2010 - 4:47 pm | वाहीदा

पण डायरेक्ट घटस्फोट का ? counseling का नाही ??
तोडना बहोत आसान होता है, जोडना बहोत मुश्किल
सबंध तोडल्या नंतर मुलांची अवस्था काय होणार ?
युयुत्सु,
मिठाई तो खिला रहे हो ..लेकीन तुम्हारे अंदर इतनी कडवाहट क्यूं है ??
Bad experiences either makes you a 'BETTER PERSON' or a 'BITTER PERSON'
Unfortunatley you tend to become BITTER ... :-(
~ वाहीदा

शिल्पा ब's picture

11 Jun 2010 - 4:50 pm | शिल्पा ब

तुमच बाकी सगळं ठीक आहे हो वाहिदाताई पण मधेच एकदम विंग्रजी आणि हिंदी कशाला ते? आम्हाला मराठी कळतंय कि!!!

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

अग राणी, मला पटकन मराठी शब्द सुचत नाहीत .
त्यामुळे जे सुचतं ते टंकते
ते जाउ दे ग पण या निर्णयामुळे माझ्या एका मैत्रिणीचे घर लवकर तुटणार याचे वाईट वाटते आहे. :-(
~ वाहीदा

II विकास II's picture

11 Jun 2010 - 5:18 pm | II विकास II

>>ते जाउ दे ग पण या निर्णयामुळे माझ्या एका मैत्रिणीचे घर लवकर तुटणार याचे वाईट वाटते आहे.

जे घर आज ना उद्या तुटणार आहे, ते आजच तुटलेले काय वाईट?

प्रकाश घाटपांडे's picture

11 Jun 2010 - 4:13 pm | प्रकाश घाटपांडे

कशावरुन हे पुरुषमुक्तिच्या चळवळीचे फळ? केवळ तांत्रिक कारणामुळे दीर्घ काळ प्रकरण प्रलंबित राहु लागले त्याचा परिणाम हा न्यायव्यवस्थेवरील ताण निर्माण होण्यात झाला यामुळेही कदाचित असेल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

युयुत्सु's picture

11 Jun 2010 - 4:19 pm | युयुत्सु

श्रेय द्यायचे नसेल तर देऊ नका. काहीही बिघडणार नाही. तुम्हाला समुद्र रिकामा करायला गेलेल्या टिटवीची गोष्ट ठाऊक दिसत नाही बहूधा...

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

मिसळभोक्ता's picture

11 Jun 2010 - 11:20 pm | मिसळभोक्ता

आदरणीय युयुत्सु,

स्वतःला टिटवी वगैरे म्हणणे, हा आपला मानभावीपणा (मॉडेस्टी) आहे. आपण ह्या क्षेत्रातले अगस्ती ऋषी आहात. आपला जाहीर सत्कार करावा म्हणतो.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

शिल्पा ब's picture

11 Jun 2010 - 11:26 pm | शिल्पा ब

आपले भारतीय ऋषी मुनिबद्दल असलेले प्रेम पाहून संतोष जाहला...तुमचे लिखाण आणि respect give करनेका हमे कौतुक हय... ऐसेहीच respect देनेका होता हय...otherwise you will be given eno ...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

आली लहर केला कहर ................... दुसरे काय ???????????

...... बाकी चालू द्या............

II विकास II's picture

11 Jun 2010 - 4:19 pm | II विकास II

लेखाखालच्या प्रतिक्रिया पहा, मौज वाटेल.

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jun 2010 - 4:28 pm | परिकथेतील राजकुमार

युयुत्सु तुम्ही जळक्या लोकांकडे लक्ष न देता अशा बातम्या इथे देत चला. तुमचे लिखाण आणि प्रयत्न (पुरुष मुक्ती चळवळ) दोन्ही कौतुकास्पद आहेत.

आम्हाला पेढे द्याच बॉ आणी बाकिच्यांना इनो द्या.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

11 Jun 2010 - 4:41 pm | नितिन थत्ते

दुव्यावरील बातमीवर लोकांनी दिलेले प्रतिसाद युयुत्सुंना वाटतंय त्याच्या उलट म्हणतायत. (म्हणजे याने स्त्रियांनाच फायदा होणार असे म्हणत आहेत),

नितिन थत्ते

अवलिया's picture

11 Jun 2010 - 4:43 pm | अवलिया

चला आता तुम्ही पण पेढे वाटा

(च्यायला आपल्याला काय कारण काहीही असो पेढे खाण्याशी मतलब)

--अवलिया

राजेश घासकडवी's picture

11 Jun 2010 - 4:52 pm | राजेश घासकडवी

निरर्थक लांबण टाळून घटस्फोटेच्छू पति व पत्नी या दोहोंना आपल्या पुढच्या आयुष्यासाठी मोकळं करणे ही आजच्या समाजाची गरज आहे. विशेषत: स्त्री पुरुष समानता वाढल्यामुळे आता स्त्रिया पुरुषांवर अवलंबून नसल्यामुळे. तेव्हा या निर्णयाचं स्वागत. या तरतुदींचा शक्यतो सदुपयोग होईल अशी सदिच्छा.

लेखाखालच्या प्रतिक्रिया पहा, मौज वाटेल

मिपावरसुद्धा अशाच असंबद्ध प्रतिक्रिया यायला लागल्या तर काय बहार येईल नै? कोणीतरी सुरूवात केली पाहिजे.

पंगा's picture

11 Jun 2010 - 8:30 pm | पंगा

विशेषत: स्त्री पुरुष समानता वाढल्यामुळे आता स्त्रिया पुरुषांवर अवलंबून नसल्यामुळे.

याचा अर्थ तितकासा नीट कळला नाही, तेव्हा या एका मुद्द्याबाबत सहमत आहे की नाही ते सांगू शकत नाही. (किमानपक्षी या मुद्द्याला कितपत महत्त्व आहे, किंवा तुमचा मूळ मुद्दा या मुद्द्यावर अवलंबून असण्याची कितपत आवश्यकता आहे, याबद्दल साशंक आहे.)

उर्वरित प्रतिसादाच्या शब्द-न-शब्दाशी सहमत.

लेखाखालच्या प्रतिक्रिया पहा, मौज वाटेल

मिपावरसुद्धा अशाच असंबद्ध प्रतिक्रिया यायला लागल्या तर काय बहार येईल नै? कोणीतरी सुरूवात केली पाहिजे.

अगदी! तिथली ती भोपाळ वायू अपघाताबद्दलची प्रतिक्रिया तर मस्तच होती. :D

- पंडित गागाभट्ट.

राजेश घासकडवी's picture

12 Jun 2010 - 12:15 am | राजेश घासकडवी

मला म्हणायचं होतं की एके काळी पत्नी ही नवऱ्यावर अवलंबून असायची, आणि त्याने तिला टाकलं तर तिला समाजात स्थान नसे. या वाईट परिस्थितीवर 'उपाय' म्हणून घटस्फोट प्रक्रिया कठीण केली गेली होती. याचा त्रास मोजक्या स्वावलंबी स्त्रियांना, ज्यांना खरोखरच घटस्फोट हवा असे अशांना होत असे, व फायदा अनेक स्त्रियांना ज्यांचं आयुष्य घटस्फोटाने बरबाद होऊ शके अशांना होत असे. आता स्वावलंबी स्त्रियांची संख्या पुरेशी वाढली असेल (यावर कोणी वाद घालू शकेल) तर घटस्फोटाची प्रक्रिया सोपी करणं फायदेशीर ठरू शकेल. आदर्श व्यवस्थेत सर्वच जण सज्ञान व स्वावलंबी असतील, व घटस्फोट हा लग्ना इतकाच सोपा असेल. वरील निर्णय आदर्श व्यवस्थेकडे आत्तापुरतं योग्य असं छोटंसं पाऊल आहे असं वाटतं.

बाकी असंबद्ध प्रतिसादांविषयी - मिपावर खरंच कोणी असे प्रतिसाद देण्याचा विचार का करत नाही हे मला कळत नाही. मनोरंजन, टीआरपी, वैयक्तिक कंडुशमन (शब्द मुसुंकडून साभार) किती गोष्टी साध्य होतील! संपादकांनी यात लक्ष घालावे...

पंगा's picture

12 Jun 2010 - 12:24 am | पंगा

म्हणणे लक्षात आले. पटण्यासारखे आहे.

कोर्टाचा निर्णय योग्य असण्याबद्दल सहमत.

- पंडित गागाभट्ट.

आता भारतात ही घटस्फोटित मुक्त पुरुष नाक्या नाक्या वर पहायला मिळतील. व भारतिय स्त्रिया ओव्हरटाईम कमी करतील. :D
वेताळ

वाहीदा's picture

11 Jun 2010 - 4:59 pm | वाहीदा

तुम्हाला बरे विनोद सुचतात, घरं तुटतिल त्याचे काय ??
~ वाहीदा

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jun 2010 - 5:20 pm | परिकथेतील राजकुमार

अय्या !!!!

मग तु 'माझ्या घटस्फोटित मुक्त मैत्रीणीची कहाणी' लिही ना.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

II विकास II's picture

11 Jun 2010 - 5:20 pm | II विकास II

>>मग तु 'माझ्या घटस्फोटित मुक्त मैत्रीणीची कहाणी' लिही ना.
+१

वाहीदा's picture

11 Jun 2010 - 5:31 pm | वाहीदा

पण मग ती मध्येच मराठी, मध्येच हिंदी / उर्दु , मध्येच विंग्रजी अशी कथा झाली तर.. तू एडीट करून देशील ?? नको बाई मी व्यनीच करेन तुला
ती बिचारी कित्ती आपले लग्न वाचवायचा प्रयत्न करते आहे
कित्ती मार खाते सासर् च्या लोकांचा पण २मुलीं साठी लग्न वाचवायचा प्रयत्न करत आहे . काय सांगू तुला तिची कहाणी ..सहनशक्तीचा अंत आहे फक्त लहानग्या मुलींसाठी !
~ वाहीदा

II विकास II's picture

11 Jun 2010 - 5:34 pm | II विकास II

ती बिचारी कित्ती आपले लग्न वाचवायचा प्रयत्न करते आहे
कित्ती मार खाते सासर् च्या लोकांचा पण २मुलीं साठी लग्न वाचवायचा प्रयत्न करत आहे . काय सांगू तुला तिची कहाणी ..सहनशक्तीचा अंत आहे फक्त लहानग्या मुलींसाठी !

== स्त्रीया मार खाउन लग्न वाचवायचा प्रयत्न करतात, तिथेच चुकतात.

मुलींवर काय परीणाम होतील आईला नेहेमी मार खाताना बघून! आज आपली आई सहन करतेय, उद्या आपलीवेळ आली तरी आपण गुपचूप अन्याय सहन करायचा ही शिकवण आपल्या मुलींना देण्यात काय अर्थ आहे वहिदा! उलट तीने जर या जाचातून बाहेर पडून मुलींना वाढवले तर मोकळा श्वास घेऊन जगण्याची संधी ती आपल्या मुलींना देऊ शकेल.. हे करण इतक सोप नाही याची जाणीव आहे पण फक्त मुलींसाठीच जर ती हे लग्न टिकवण्याचा प्रयत्न करत असेल तर ती चूक करतेय अस मला वाटत..

वाहीदा's picture

12 Jun 2010 - 1:26 pm | वाहीदा

लवंगी, तुझ्याशी अगदी सहमत. ती नोकरी करते आपल्या पायावर उभी आहे पण पैसा म्हणजेच सगळ नाही .
माहेरहून ती पुर्णतः अनाथ आहे . आपल्याला बापाचे प्रेम नाही म्हणून मुलींना तरी मिळू देत म्हणून सगळा खटाटोप
गावी आजी ने लग्न लावून दिले. जाणार कुठे ?? भावांकडे गेली तर वहिनींना त्रास .. आता ती भेटल्यावर आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून तिची समजूत घालूच म्हणा .
तुमच्या (अ-खवट) समंजस सल्याबध्द्ल धन्यवाद.
~ वाहीदा

टारझन's picture

12 Jun 2010 - 1:38 pm | टारझन

हो अगदी !!! असले त्रास सहन करुन जगण्यात काही पॉईंट नाही... स्त्रीयांनी स्वावलंबी बनावं ,... म्हणजे असलं दुसर्‍याच्या भरोश्यावरचं जगणं जगायची पाळी येत नाही ... उगा हातपाय गाळुन बसायचं .. आणि "आता मी काय करू?"म्हणायचं .. छ्या .. काय अर्थ नाही !

बाकी " णथिंग इज बेटर दॅण समथिंग राँग " !

वाहीदा's picture

11 Jun 2010 - 5:37 pm | वाहीदा

मी कथा लिहते सगळ्या मिश्र भाषेत अन तु मला एडिट करुन दे चालेल ??
~ वाहीदा

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jun 2010 - 6:29 pm | परिकथेतील राजकुमार

छे छे, मी जास्तीत जास्त "अय्या !! कसे ग इतके छान छान सुचते तुला" किंवा "बोलायला आता काही उरलेच नाही" असे प्रतिसाद देऊ शकीन.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

II विकास II's picture

11 Jun 2010 - 5:20 pm | II विकास II

>>आता भारतात ही घटस्फोटित मुक्त पुरुष नाक्या नाक्या वर पहायला मिळतील. व भारतिय स्त्रिया ओव्हरटाईम कमी करतील.

कुठे तरी वाचले होते, अमेरीकन पुरुष लग्न वाचण्यासाठी वेळेवर घरी (कोणाच्या ते विचरु नका ;)) जातात, जादा वेळ काम करत नाहीत.

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

मदनबाण's picture

11 Jun 2010 - 5:24 pm | मदनबाण

लोकांची आयुष्य अशी विस्कटली जातात त्याचे वाईट वाटते... :(

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

समंजस's picture

11 Jun 2010 - 5:49 pm | समंजस

अंशतः सहमत!

यांचे(नवरा-बायको) संसार आधीच विस्कटलेले असतात फक्त न्यायालयाची मोहोर तेवढी आवश्यक असते औपचारीकता पुर्ण करायला. ती(मोहोर) उशीरा मिळण्यापेक्षा लवकर मिळाली तर काय वाईट...
दोघेही आपापलं आयुष्य हवं तसं जगायला स्वतंत्र :)

[मात्र यात खरं नुकसान होतं ते लहान मुलांचं. त्यांची पुर्ण कुतरओढ होते :( लहान वयात मुलांना दोघांचीही गरज असते ]

गणपा's picture

11 Jun 2010 - 6:26 pm | गणपा

घटस्पोट मग तो कुणाकडुनही असो (पुरुषा कडुन वा स्त्री कडुन) तो एक दुर्दैवी निर्णयच. आणि जर त्या जोडप्याला मुल असतील तर मधल्या मधे त्यांच मरण निश्चितच.

या निर्णयामुळे काही जणांना याचा लाभ होईल याचा तर काही जण याचा दुरुपयोग करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पण यामुळे न्यायालत खितपत पडलेली वरीच प्रकरण मार्गी लागुन त्यांच्यावरचा ताण कमी होईल.
अशी बरीच प्रकरण असतात की जीथे नुसत नडायच म्हणुन घटस्पोट दिला जात नाही. मग तो पुरुष असला तर तो बाहेर सगळ करायला मोकळा, पण स्त्री मात्र अडकुन पडते.
पुनर्विवाह करायचा असल्यास घटस्पोट न झाल्याने कायदा आड येतो.
(हे मी बहुसंख्यां बद्दल म्हणतोय. अपवाद आहेतच.)

मी तरी या निर्णयाच स्वागतच करतो.

मीली's picture

11 Jun 2010 - 6:38 pm | मीली

|या निर्णयामुळे काही जणांना याचा लाभ होईल याचा तर काही जण याचा दुरुपयोग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. |

आमच्या ऑफिस मधल्या एका मैत्रिणीची केस पण ६ वर्ष झाले तरी अजून रखडत आहे.घटस्पोट मिळत नाही त्यामुळे दुसर्या लग्नाचे पण बघता येत नाही.

मीली

घाशीराम कोतवाल १.२'s picture

11 Jun 2010 - 6:53 pm | घाशीराम कोतवाल १.२

गणपा आणी मिली तुमच्या प्रतिसादातील शब्दाशब्दाशी सहमत
@मिली आमच्या ऑफिस मधल्या एका मैत्रिणीची केस पण ६ वर्ष झाले तरी अजून रखडत आहे.घटस्पोट मिळत नाही त्यामुळे दुसर्या लग्नाचे पण बघता येत नाही.

असच माझ्या एका मित्रा बरोबर घडले त्याच्या काकांनी त्याच्यासाठी एक मुलगी पाहिली तिच्या दोन्ही डोळ्यात दोष होता ( अंशत: आंधळे पणा म्हणा हव तर) काकांनी त्याला सांगितले मुलगी चांगली आहे वैगरे वैगरे हा पठ्या त्यांच्यावर विश्वास ठेवुन लग्नाला तयार झाला लग्न झाल १५ दिवसात ह्याला कळाले बायकोचा प्रॉब्लेम काय आहे तो त्यांने तिच्या माहेरच्या लोकांना बोलाविले मिटिंग भरली तर त्या लोकांनी ह्यालाच अरेरावी वैगेरे केली झाले प्रकरण पहिले पोलिस स्टेशनला मग कोर्टात अहो झालेल लग्न अक्षरशा २० दिवसात मोडण्याच्या परिस्थीत आता ४ वर्ष झाली घटस्फोटासाठी कोर्टाच्या पायर्‍या झिझवतो आहे पण घटस्फोट काहि मिळाला नाही त्याला तारिख पे तारिख हा पठ्या दर महिण्याला मुंबई ते कराड असा प्रवास करतो आणि तारखेला हजर होतो आणि हात हलवित मुंबईला परत येतो

______________________________
संपादक
घाश्या कोतवाल
भुर्जीपाव डॉट कॉम

II विकास II's picture

11 Jun 2010 - 10:59 pm | II विकास II

इतक्या दिवसात तो तीच्या २ पोरांचा बाप झाला असता. अंशत आंधळी म्हणजे किती टक्के आंधळी?? दिवसा तर लख्ख उजेड असतोच. रात्री दिवे बंदच ठेवतात. त्यामुळे फारशी अडचण नवहती.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

14 Jun 2010 - 2:19 pm | घाशीराम कोतवाल १.२


इतक्या दिवसात तो तीच्या २ पोरांचा बाप झाला असता. अंशत आंधळी म्हणजे किती टक्के आंधळी?? दिवसा तर लख्ख उजेड असतोच. रात्री दिवे बंदच ठेवतात. त्यामुळे फारशी अडचण नवहती.

तुमचे तत्वद्यान कळले किव येते
जाउ द्या

______________________________
संपादक
घाश्या कोतवाल
भुर्जीपाव डॉट कॉम

II विकास II's picture

14 Jun 2010 - 5:10 pm | II विकास II

इतक्या दिवसात तो तीच्या २ पोरांचा बाप झाला असता. अंशत आंधळी म्हणजे किती टक्के आंधळी?? दिवसा तर लख्ख उजेड असतोच. रात्री दिवे बंदच ठेवतात. त्यामुळे फारशी अडचण नवहती.

>> आधीच गोष्टी बघुन घ्याव्यात. ते जमले नाही तर समझोता करायला शिकावे.

टारझन's picture

11 Jun 2010 - 6:10 pm | टारझन

पाण्चट धागा आणि पाण्चट लोकांच्या पाण्चट प्रतिक्रीया !! :)
करमणुक झिंदाबाद !!

शिल्पा ब's picture

11 Jun 2010 - 10:21 pm | शिल्पा ब

आता बोलायला काहीच उरले नाही यानंतर...(हि आमचीच ओरीजीणाल प्रतिक्रिया आहे...आम्हाला बा आमचं आमचं सुचत..)

बाकी कैचा कै अवांतर प्रतिक्रिया देणारी टीम (पुन्हा विंग्रजी) वाढली दिसतेय ....

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शानबा५१२'s picture

12 Jun 2010 - 12:18 am | शानबा५१२

अर्थहीन्,बुध्दीशुन्य,उगाच लिहलेल.........अगदी लेखासमावेत खुप काही वाचायला भेटल.

असे स्त्री-पुरुष मधे तेढ वाढवणारे लेख का लिहले जातात व ते का चर्चिले जातात???

शिल्पा ब's picture

12 Jun 2010 - 12:47 am | शिल्पा ब

I am very very angry...why people write these type of things when there are so many colorful blue, yellow etc. literature is available even on Mipa by talented writers..

हम बहुत बहुत घुस्से मी हय...इस तरीके के वागणूक का निषेध करते हय...

बाकी वाचायला मिळणे हा शब्द माहिती होता पण वाचायला भेटतं म्हणजे काय भेटतं कुठे भेटतं...आमच्या सगळ्याच भाषा कच्च्या...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शानबा५१२'s picture

12 Jun 2010 - 2:02 am | शानबा५१२

'निंदकाचे घर असावे शेजारी' अस काय तरी ज्ञानेश्वरांनी लिहलय.......ह्यानुसार तुमच्या शेजा-याचा हेव वाटतो व दया पण येते............ ;)

मिळण्,भेटण,सापडण ह्या मधला 'सापडण'
म्हण्जे 'शोधताना सापडल' असा अर्थ मी घेतो.

मिळण व भेटण ह्यातला फरक फारसा असावा अस नाही वाटत्,पण ह्या आगोदर ही मला दोन वेळा अस चुकीबद्दल सुचवण्यात आल होत.पण 'आमच्या साठी कोण सुधारत नाही तर आम्ही कोणासाठी का सुधारु?' हे आम्ही पहील्यापासुनच म्हणत आलोय.

बाकी english मधला need हा शब्द पहील फक्त क्रीयापद म्हणुन वापरात होता नंतर तो नाम म्हणुन ही वापरात आला......तस modification मराठी मधे आल तर आमच्यासारख्यांची सोय होइल.
चुक काढणा-याची गैरसोय होइल व त्यांना लिहायला जास्त काही राहणार नाही हा वेगळा भाग!
आणि हो येथे प्रतिक्रीया देउन ह्या 'कु - उद्देश' असणा-या लेखाचे महत्व वाढवु नका,ही विनंती

शानबा५१२ ,
उगाचच 'कु - उद्देशाने' लिहलेल्या खवट प्रतिसाद देण्यार्ञांची मला फक्त किव येते.
ज्यांना घटस्फोटाने घर तुटणे म्हणजे काय हे माहीत नाही त्यांना काय बोलणार ??
बाकी हिंदी वाक्याचा शेवट 'हय, हय' लिहणार्यांच्या भाषेचे ज्ञान किती अगाध ते ही दिसले अन खवट पणाही जाणविला 8}
~ वाहीदा

II विकास II's picture

12 Jun 2010 - 1:29 pm | II विकास II

अगदी छान छान प्रतिसाद आहेत वरचे.
खुप करमणुक झाली.

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

शानबा५१२'s picture

12 Jun 2010 - 11:48 pm | शानबा५१२

उगाचच 'कु - उद्देशाने' लिहलेल्या खवट प्रतिसाद देण्यार्ञांची मला फक्त किव येते.

आणी आपला उद्देश 'सु- ' आहे का?? असल्या प्रतिसादाची कीव नाही तर चीड येते...........का तर माझा प्रतिसाद ह्या मुळ लेखा कींवा त्या कायद्याला नसुन लेखकाच्या ह्या आगोदर लिहलेल्या लेख व प्रतिसादाबद्दल होता

टारझन's picture

13 Jun 2010 - 12:05 am | टारझन

आणी आपला उद्देश 'सु- ' आहे का??

शी बै .. काहीही घाण घाण लिहीतो हा शाणबा =)) =))

- गेणबा९९९

अहो,
तुम्ही माझ्यावर का चिडलात काहीच समजले नाही . :T
मला फक्त माझ्या मैत्रिणीची काळजी वाटली म्हणून प्रतिसाद टाकले होते पण तुम्ही ज्यांना प्रतिसाद दिला त्या मैडमनी उगाचच खोडसाळ वृतीने मला डिवचण्याचा प्रयत्न केला होता त्याचे मी फक्त उत्तर दिले
~ वाहीदा

पाषाणभेद's picture

11 Jun 2010 - 8:05 pm | पाषाणभेद

धाग्याचे केवळ नावच वाचून आम्ही अंदाज (नाडी न बघता) केला होता की हा तुमचाच धागा असेल. अन ते भाकित खरे ठरले.

बाकी तुम्ही पेशालिश्ट झालात हं.

बाकी पेढे मस्तच
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

शानबा५१२'s picture

12 Jun 2010 - 12:17 am | शानबा५१२

१०००००००००००००% शयमत!!

पाषाणभेद तुम्ही ह्याच्या निषेधात गावातल्या भाषेत ह्याचा समाचार घ्या मजा येईल.

काय लेख लिहतुया,
काय शोभेना तूझ्या असल्या कुरती!

अस उगाच काहीतरी मनात घालुनी,
का उगा आसं बोलतुया!

अस काही तरी...... :D

पाषाणभेद बाबा की जय हो!!!!!!!!!

आळश्यांचा राजा's picture

11 Jun 2010 - 11:49 pm | आळश्यांचा राजा

पुरूष मुक्ती चळवळीच्या आजवरच्या प्रयत्ननाना उशीरा का होईना फळे मिळू लागली आहेत.

अशी काही 'चळवळ' आहे का? कोण चालवतं? काय भानगड आहे? आणि कुणापासून - कशापासून मुक्ती हवी आहे? खुलासा झाला तर माहितीमध्ये भर पडेल.

(पुरूषांना मुक्ती नको असते असा एक समज एका गाण्याने पसरवला होता त्याची आठवण झाली - ....कैद मांगी थी रिहाई तो नही मांगी थी!)

असो. घटस्फोट लवकर मिळावा हा या निर्णयामागचा हेतू नसून लांबत जाणार्‍या कज्जेकचेरीतून सर्वांचीच ( पक्षकार, वकील - स्त्री, पुरूष, आणि न्यायासनावर बसलेले स्त्री-पुरूष) 'मुक्ती' व्हावी असा व्यापक हेतू असावा असे वाटते!

आळश्यांचा राजा

अरुंधती's picture

12 Jun 2010 - 5:57 am | अरुंधती

<<
पती-पत्नी सामोपचाराने घटस्फोट घेण्यास तयार असतील आणि त्यांचा विवाह टिकण्याची शक्‍यता नसेल किंवा दोघांपैकी एकाने घटस्फोटासाठी अर्ज केला असेल; मात्र दुसरी व्यक्‍ती न्यायालयात उपस्थित न राहता न्यायालयीन प्रक्रिया लांबवून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा प्रकरणांमध्ये अडकलेल्यांना या तरतुदीचा फायदा होणार आहे. न्यायालयांमध्ये घटस्फोटांबाबतच्या प्रलंबित प्रकरणांचा ताण कमी होण्याच्या दृष्टीने या तरतुदीचा लाभ होणार असला, तरी यामुळे अनेक समस्याही उद्‌भवण्याची शक्‍यता असल्याने ही तरतूद वादग्रस्त होण्याची शक्‍यता आहे. >>

बातमीतील ह्या मजकुरानेच कायद्यातील ही सुधारणा घटस्फोट इच्छिणार्‍या स्त्री व पुरुष, दोघांसाठीही कटकट कमी करणारी ठरणार आहे हे सुस्पष्ट केले आहे! त्यामुळे कोणत्याही मुक्तीवाद्यांनी आताच जयघोषास सुरुवात करण्याची काय गरज?

शिवाय ''अनेक समस्या उद्भवण्याची'' जी शक्यता बातमीत वर्तवली आहे (पण नक्की कोणत्या समस्या ते सांगितले नाही) ते बघता जरा धीर धरावा आणि सर्व शक्याशक्यता पडताळून मगच आनंद व्यक्त करायचा किंवा नाही ते ठरवावे!

बाकी, या तरतुदीमुळे विसंवादी-विवाहित व घटस्फोटेच्छुक स्त्री-पुरुषांवर येणारा आर्थिक-मानसिक-भावनिक-व्यावहारिक ताण संपून जर ते नव्या आयुष्याला सुरुवात करायला मोकळे होत असतील तर ते चांगलेच आहे! कोर्टावरचाही अतिरिक्त ताण आवाक्यात येईल. मुलांचा प्रश्न मात्र असणार! पण मग समुपदेशक मंडळी आहेतच! आणि वर्षानुवर्षे आईवडीलांची भांडणे, विसंवाद, तणाव वगैरे पाहण्यापेक्षा सत्य परिस्थितीला सामोरे जाणे एका परीने मुलांसाठी फायद्याचेच ठरेल असे वाटते!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

separated couples ची मुलं साधारणतः आई कडेच असतात. त्यामुळे आई सहसा नव्या आयुष्याची सुरवात दुसर्या लग्नाने करेलच असे नाही
वडील मात्र आर्थिक-मानसिक-भावनिक व्यवहार संपवून आयुष्याची नविन घडि बसवायला सुसज्य असताना दिसतात .
या निर्णयामुळे जर दोघांच्या आयुष्याला नविन वळण लागले तर स्वागतार्ह्य आहे.
~ वाहीदा

शुचि's picture

12 Jun 2010 - 6:08 am | शुचि

बातमी स्वागतार्ह आहे. =D> =D>
घासकडवी आणि अरुंधती यांचे प्रतिसाद आवडले.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

JAGOMOHANPYARE's picture

12 Jun 2010 - 1:22 pm | JAGOMOHANPYARE

छान झाले... जोडणे सोपे, तोडणे अवघड हे खरे.... पण जोडताही येत नाही आणि तरीही तोडताही येत नाही, अशा सिचुएशनमध्ये हा कायदा नक्कीच मदत करेल....

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll