विद्रोही कविता आणि सामाजिक जाणीव

अजय जोशी's picture
अजय जोशी in काथ्याकूट
28 Mar 2008 - 10:50 pm
गाभा: 

नमस्कार. विद्रोहींच्या भाषेत भाड्या, आलो रे..
माझ्या मते समाज्यातील सर्व घटकांसाठी लेखन असावे हे मला मान्य आहे. परंतु कविता करताना वेगळे भान ठेवावे असे वाटते.
समाजाला दलदलीतून वर आणण्याचे काम कवीचे आहे. सातत्याने विचित्र लिखाण करून आपणच आपल्या समाजाचे नुकसान करतो आहोत असे वाटते. खोटे सांगावे असे माझे म्हणणे नाही. समाजासमोर चांगले आलेच नाही तर ?
काही कविता पाहून खेद वाटतो - तरूण, नवख्या कवीने अभ्यास म्हणून जरी वाचले तरी त्याला वाटेल -
पहायला गेलो सर्वसमावेशक सागरा, भेटून धन्य झालो तुला, हे गटारा.

प्रतिक्रिया

सर्किट's picture

28 Mar 2008 - 11:19 pm | सर्किट (not verified)

समाजाला दलदलीतून वर आणण्याचे काम कवीचे आहे.

हे कुणी , कधी, कसे ठरवले बुवा ?

आणि मुळात समाज दलदलीत गेला कधी ?

आपण कोणता समाज पाहताय हे ठावूक नाही, पण समाज म्हणजे आपण सर्व, ही व्याख्या गृहीत धरली, तर आपण सर्व दलदलीत आहोत, असे म्हणायचे आहे का ?

असे असल्यास, माझा तीव्र निषेध आहे !

- (दलदलीबाहेरचा) सर्किट

नीलकांत's picture

29 Mar 2008 - 10:00 am | नीलकांत

... जरा सविस्तर सांगाल का? म्हणजे आमच्या टाळक्यात घुसेल.

(मंद) नीलकांत

मनापासुन's picture

29 Mar 2008 - 10:18 am | मनापासुन

भाड्या, आलो रे..
हो रे माझ्या रिक्षा/टॅक्षी वाल्या दादा....
मला ठाउक आहे वाट पाहाता तुम्ही भाड्याची
दिसता स्वारी दुरुनी जरी. मनी हाक देता त्यांस
भाड्या, आलो रे..
पोट तुमचे चाले त्या भाड्यावरती...
मीटर दावते त्यास आकडे स्वतः वरती
हात कोणी दावता आनन्द होतो तुम्हा
प्रुछा होता जवळच्या ठीकाणची
मान अगोदरच ना म्हणते तुमच्या आधी.
पहाताच दुसरा कोणी दूरचा मुशाफीर
आनन्द होतो मनी असो हिंदु वा तो काफिर
मग आनन्दे शब्द येती मनात ते
भाड्या, आलो रे..
बैसता स्वारी आत्....ये मनी विचार तुमच्या तो
बरे झाले भाडे मिळाले
बैसता स्वारी आत्...ये मनी विचार त्याच्या तो
बरे झाले मिळाले गाडी भाड्याची..
बरे होइल म्हणता त्याने गड्या ये रे
म्हणाल तुम्ही झणी भाड्या आलो रे
...............जळजळीत मनापासुन विद्रोही..........

अजय जोशी's picture

29 Mar 2008 - 7:37 pm | अजय जोशी

माझे मत वाचून अशा प्रतिक्रिया अपेक्षित होत्याच. माझे म्हणणे एवढेच आहे की, ज्या गोष्टीमुळे कोणाचा उपमर्द होईल असे लिखाण टाळावे. काही उल्लेखांमुळे जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. त्या पाहून आनंद वाटला. समाज म्हणजे आपण सर्व हा विचार बोलायला ठीक आहे. प्रत्यक्षात तसे घडत नाही. अन्यथा दलित हा शब्द सर्रास वापरला गेला नसता. भाड्याची कविता फार छान वाटली रे गड्या. माझ्याप्रमाणेच आपणही काही अशिष्ट लेखन वाचले असेल. (अशिष्ट चा अर्थ ज्याने त्याने ठरवावा.) त्या लेखनाबद्दल मी माझे मत दिले आहे. पण मत दिल्यानंतर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी. माझा उद्देश लक्षात घ्या. मी वर वापरलेला शब्द भाड्या, रांड, लवडा, -----ई. देवू शकत नाही. असे शब्द कवितेत असावेत का? आपणांस काय वाटते?

सुधीर कांदळकर's picture

29 Mar 2008 - 9:31 pm | सुधीर कांदळकर

समाजाचा आरसा आहे. समाजात गटार असेल तर साहित्यात येणारच. नसेल तर ते साहित्य वास्तव आहे असे म्हणता येणार नाही.

सर्कीटराव अजयजींच्या दिव्य चक्षूंना दिसणारी दलदल आपल्याला दिसत नाही तर तुम्ही आणि आम्ही काय करणार. समाजोद्धारक कवी करतीलच की.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

अजय जोशी's picture

29 Mar 2008 - 11:18 pm | अजय जोशी

सर्कीटराव अजयजींच्या दिव्य चक्षूंना दिसणारी
इतक्या सहजपणे दिव्य चक्षू दिल्याबद्दल धन्यवाद.
आपला
चष्मेबहाद्दूर

विद्रोही लिखाण म्हणजे केवळ शिव्या देणे असते काय? हे नव्याने कळाले.
महामहोपाध्याय अजय जोशीजी आपण डॉ यशवन्त पाठक यांचे " अंगणातील आभाळ" याचे जरा वाचन करावे.
मनातली कळकळ / झालेला अन्याय त्यानी किती शिव्या न देताही सहजपणे वर्णन केलाय की काय म्हणायचे आहे ते पोहोचते.
"कार्यकर्ता " जमले तर हे पुस्तक ही डोळ्याखालुन घालावे .
आणि सगळेच विद्रोही कवि समाजोद्धारक असतात हा एक मोठ्या प्रमाणात असलेला गैर समज आहे.

विजुभाऊ's picture

31 Mar 2008 - 11:14 pm | विजुभाऊ

विद्रोही कवितांची चळवळ ज्योत ग्रंथाली वाचक चळवळी बरोबरच का विझली हो? मला नेहमी हा प्रश्न पडतो

अजय जोशी's picture

31 Mar 2008 - 11:20 pm | अजय जोशी

विद्रोही लिखाण म्हणजे केवळ शिव्या देणे असते काय?
मनातली कळकळ / झालेला अन्याय त्यानी किती शिव्या न देताही सहजपणे वर्णन केलाय की काय म्हणायचे आहे ते पोहोचते.
अतिशय बरोबर बोललात आपण. मलाही काहीसे असेच म्हणावयाचे होते. मात्र अनेक कवींना विचित्र लिहीणे गौरवास्पद वाटते किंवा कदाचित प्रसिद्धी मिळविण्याचे साधन वाटते. याबद्दल मला खरे तर सांगायचे होते. मी आपल्या मताशी सहमत आहे. धन्यवाद.