संपादकांना व्यनि करण्यापेक्षा इथे धागा काढणे योग्य वाटले म्हणुन टाकला आहे.
.
माझा "आमचं यंदा कर्तव्य आहे " हा धागा का अप्रकाशित गेला ? ह्या पुर्वी सुद्धा आमचे धागे उडवले गेले आहेत , पण मी जाऊन दे म्हणालो ... पण हा धागा आमचा आवडता होता ... कोणाला मिर्या झोंबल्या ह्या धाग्या मुळे ?
१. कोणताही धागा प्रत्येकाला आवडावा असा माझा कोणताही आग्रह नसतो (इनफॅक्ट कोणालाही आवडला नाही तरी काही खेद नाही) , त्यामुळे कोणाच्या "धागा आवडला नाही !! " म्हणुन कमेंट आल्या , आणि धागा उडाला हे उचित वाटत नाही.
२. सदर धाग्यात कोणत्याही मिपा आय.डी. वर डायरेक्ट वा इनडायरेक्ट चिखलफेक करण्यात आलेली नव्हती.
३. लावले गेलेले फोटो पुर्णपणे श्लिलतेच्या व्याख्येत बसणारे होते. त्यात किमान लज्जागौरीची किंवा कसल्याश्या किळसवाण्या शिल्पकलेची चित्र नव्हती
४. लेखाचा हेतु निखळ मनोरंजन इतकाच होता ...
५. लेख अप्रकाशित करण्याचं नेमकं कारण जाहिर करावं , जेणे करुन भविष्यात रणनिती आखता येईल .
इथे मनापासुन लेख लिहायचे आणि कोणी चुटकीसरशी बटण दाबुन ते अप्रकाशित करावे हे असहनिय आहे
कोणत्या संपादकाने मालकगिरी करुन धागा अप्रकाशित केला ? , लवकरात लवकर उत्तर अपेक्षित आहे.
.
(संतप्त) टारझन
मिसळपावच्या धोरणाप्रमाणे संपादक उत्तर देण्यास बांधील नाहीत मात्र त्यांची इच्छा असेल तर ते तसं करू शकतात त्याच सोबत ज्यांचे लेखन अप्रकाशित केले आहे त्यांना कारण माहिती करून घेण्याचा हक्कं आहेच. त्या करीता लवकरच स्वतंत्र दालन केले जाईल. मात्र तो पर्यंत व्य. नि. चा वापर करावा ही विनंती. सरपंचांना व्य. नि. केल्यास त्याची दखल घेतली जाईल.
तसेच या लेखाच्या शेवटच्या दोन ओळी काढल्या आहेत. संपादकांना सदस्यांनी खुलासा मागणे अपेक्षीत आहे. जाब नाही ! लेखाला किंवा व्य.नि. ला दिले जाणारी उत्तरे तसेच सर्व संपादकांची कामे मिसळपावबद्दल आणि सदस्यांबद्दल उत्तरदायीत्व वाटतं म्हणून केलं जाणारं काम आहे. मिसळपाववर जवळपास सर्वच एकमेकांना ओळखतात. त्यामुळे सौम्य शब्दांत सुध्दा आपले म्हणने मांडता येते. नव्हे तसेच अपेक्षीत आहे. सोबतच कुणी आपल्या लेखनाच्या बाबतीत खुलासा मागीतल्यास त्याला उत्तर मिळतेच. लवकरच स्वतंत्र दालन अश्या प्रकारच्या संपादकीय कामांसाठी केले जाईल तो पर्यंत कृपया संयमाने लेखन करावे.
- (संपादक) नीलकांत