इंग्रजी सिनेमातही घुमणार... शिवाजी महाराज की जय!

घाशीराम कोतवाल १.२'s picture
घाशीराम कोतवाल १.२ in काथ्याकूट
9 Jun 2010 - 7:45 pm
गाभा: 

आताच मटा मध्ये वाचलेली बातमी येथे देत आहे http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6026826.cms

छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली, मालिका निघाल्या, मराठी सिनेमे आले. पण या जाणत्या राजाचे महत्त्व उभ्या जगाला कळावे यासाठी आता इंग्रजी सिनेमा येणार आहे. महत्वाकांक्षी कलादिग्दर्शक नितीन देसाई हा भव्यदिव्य प्रकल्प वास्तवात आणणार आहेत.

महाराष्ट्राची अस्मिता असणा-या शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्राबाहेर अनेक प्रवाद आहेत. या सा-या प्रवादांना उत्तर देण्यासाठी त्यांच्या भाषेतून महाराजांचे कर्तृत्त्व मांडणे आवश्यक आहे. यासाठीच ' ग्रेट वॉरियर राजा शिवछत्रपती ' या नावाने हा सिनेमा बनणार असून तो इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमधून प्रदर्शित होईल.

एखाद्या साहसी हॉलिवूडपटाप्रमाणे यात चित्रीकरण करण्यात येणार असून त्यासाठी कोट्यवधींचे बजेट आखण्यात आल्याचे कळते. त्यासाठी हॉलीवूडमधून विशेष तंत्रज्ञानांना बोलावण्यात येणार आहे. येत्या २४ तारखेला ' राजा शिवछत्रपती ' या मालिकेच्या डीव्हीडी प्रकाशन सोहळ्यात या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

या सिनेमासाठी आवश्यक तेथे भव्यदिव्य सेट उभारण्यात येईलच. पण या सेट्सप्रमाणे महाराजांच्या कर्तृत्त्वाची साक्ष देणारे किल्ल्यांवर या सिनेमाची चित्रीकरण करण्याची देसाई यांची मनिषा आहे. त्यासाठी ते सरकार आणि पुरातत्त्व खात्याची परवानगीही घेणार आहेत.

' राजा शिवछत्रपती ' या मालिकेत महाराजांची भूमिका गाजवणारे डॉ. अमोल कोल्हेच या सिनेमात महाराजांची भूमिका करतील. तर चित्रपटांच्या लेखनप्रक्रियेत कवी गुलजार यांचा सहभाग असावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

9 Jun 2010 - 8:13 pm | चिरोटा

प्रकप्ल भव्य दिसतोय.

त्यासाठी हॉलीवूडमधून विशेष तंत्रज्ञानांना बोलावण्यात येणार आहे.

हे खटकले.

तर चित्रपटांच्या लेखनप्रक्रियेत कवी गुलजार यांचा सहभाग असावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत

हे ही खटकले.असो.
P = NP

पक्या's picture

9 Jun 2010 - 9:48 pm | पक्या

छान बातमी.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

II विकास II's picture

9 Jun 2010 - 10:05 pm | II विकास II

सकाळीच वाचली बातमी.
पीटर-द-ग्रेट, अलेक्झांडर-द-ग्रेट इ. इ. राजांप्रमाणेच आमच्या राजाचे कार्य सर्व जगासमोर येणार हे पाहुन आंनद झाला.

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

प्रियाली's picture

9 Jun 2010 - 10:15 pm | प्रियाली

अलेक्झांडर वरचा चित्रपट अलेक्झांडर "गे" असल्याच्या काथ्याकूटासाठी जास्त गाजला होता. अलेक्झांडरचे कार्य बाजूलाच पडले.

भडकमकर मास्तर's picture

10 Jun 2010 - 1:36 am | भडकमकर मास्तर

मालिकेपेक्षा चित्रपटाचे बजेट पुष्कळ पटीने जास्त असेल अशी अपेक्षा आहे...
(मालिका सुरुवातीला खूप अपेक्षेने पाहिली...नंतर नंतर सारे युद्धाचे सीन संवादात शिवाय मुगल सरदार दोन घोडे घेऊन वळणावर उभा आणि त्याच्या लक्ष लक्ष फ़ौजा वळणाच्या मागे आहेत आणि असे गृहित धरून बेतलेले वळणदार सीन पहायची मलिकेने वेळ आणली...)
असो....
पिक्चर तरी भारी व्हावा याबद्दल सर्वांना शुभेच्छा...

II विकास II's picture

10 Jun 2010 - 8:34 am | II विकास II

सहमत (मालिकेचा भाग सोडुन; मी मालिका पाहीली नाही)

बरेचदा ऐतिहासिक चित्रपटात विरोधक हे बावळट/मुर्खे दाखवलेले असतात. त्यामुळे आपण आपल्याच माणसाची किंमत कमी करुन घेतो.
ह्या चित्रपटात ऐकीव गप्पा (भवानी माता राजांना तलवार देते., तुकाराम महाराजांच्या येथे १० शिवाजी राजे दिसु लागतात इ.इ.) नसतील अशी अपेक्षा आहे.

गनिमी कावा नावाच्या चित्रपटात दादा कोंडकेने हेराची भुमिका एका विदुषकासारखी रंगवलेली आहे.
अजुन एक शंका वाटते की बहीर्जी नाईक हा हेरप्रमुख चित्रपटात दाखवल्याप्रमाणे राजांना उघडपणे भेटत असेल का?

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

जे.पी.मॉर्गन's picture

10 Jun 2010 - 1:06 pm | जे.पी.मॉर्गन

मास्तरांशी एकदम सहमत. तान्हाजीच्या घोरपडीचा सीन बघितलात का?? ह ह पु वा.... इतकं टुकार मिक्सिंग झालं होतं की विचारायची सोय नाही. हॉलिवुडच्या तंत्रज्ञांना त्यासाठी बोलवणार असतील तर एरवीच हरकत नाही. आणि मालिकेतला शिवाजी चक्क रोमँटिक दाखवला होता. देसाईंनी ह्याचा "चित्रपट" जरूर करावा.. पण "पिच्चर" बनवू नये हीच अपेक्षा.

जे पी

अविनाशकुलकर्णी's picture

10 Jun 2010 - 1:42 pm | अविनाशकुलकर्णी

अफजल खानच्या वधाच्या पोस्टर वरुन दंगल झाली...जनभावना लक्षात घेवुन व मता कडे लक्ष देवुन हा सिन वगळणार का? का ठेवणार?